Tuesday 29 September 2015

“ अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ” का मंचन १० अक्टूबर को

रंग चिन्तक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित और निर्देशित बहुभाषिक नाटक “ अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ” का मंचन १० अक्टूबर, २०१५ - शनिवार को सुबह ११ बजे “शिवाजी नाट्य मंदिर” में होगा.
नाटक “अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ” कलात्मक चिंतन है, जो कला और कलाकारों की कलात्मक आवश्यकताओं,कलात्मक मौलिक प्रक्रियाओं को समझने और खंगोलने की प्रक्रिया है। क्योंकि कला उत्पाद और कलाकार उत्पादक नहीं है और जीवन नफा और नुकसान की बैलेंस शीट नहीं है इसलिए यह नाटक कला और कलाकार को उत्पाद और उत्पादिकरण से उन्मुक्त करते हुए, उनकी सकारात्मक,सृजनात्मक और कलात्मक उर्जा से बेहतर और सुंदर विश्व बनाने के लिए प्रेरित और प्रतिबद्ध करता है ।

अश्विनी नांदेडकर ,योगिनी चौक, सायली पावसकर,तुषार म्हस्के, कोमल खामकर और अनघा देशपांडे अपने अभिनय से नाट्य पाठ को मंच पर आकार देकर साकार करेंगें !
एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशन विगत २३ वर्षों से देश विदेश में अपनी प्रोयोगात्मक , सार्थक और प्रतिबद्ध प्रस्तुतियों के लिए विख्यात है . सम्पर्क – 9820391859, ईमेल – etftor@gmail.com

Wednesday 16 September 2015

मेरे मन की तितली.....


एक खुली मुस्कान ,
सांस भरी खुशबु ,
मन में विचार की धाराएँ,
आँखे भरी भरी सी ,
आज तू खिलती रहे ,
हँसती , नाचती और गुनगुनाती हुई ,
ये तितली एक फूल से दूसरे फूल पर मंडराती रही ,
जीने का वजूद ढूंढती रही ,
सूरज के आने से आज वो खिल खिलाने लगी ,
अपने आप को तराशने लगी ,
डर था दिल में खो जाने का ,
आज वो समझने लगी ,
अपने से निर्णय लेने लगी ,
मिलना और बिछड़ना येतो क़ुदरत का करिश्मा है ,
उस बिछडन को स्वीकार करते हुए आज विचारोंके साथ चलने लगी ,
ख़ुशी के गीत गुन गुनाते हुए हँसी भरे पल को आज शब्दों में तबदील करने लगी ,

मेरे मन की तितली आज मुस्कुराने लगी....

तुषार म्हस्के

Wednesday 2 September 2015

Performance केल्यानंतरच सुख.....


नहद ना  या मधील ‘’ बस  और वही से छुटता गया मेरा अनसुना हिस्सा …. हा संवाद सादर करताना आलेला अनुभव आणि त्यतून मिळालेला समाधान हे खूप मनाला शांत करणारे जाणवू लागले …ठरवलेला performance केल्यानंतर च सुख …. एक उर्जा देवू लागला … जाणवत होत … मी करू शकतो … आज मनात साचलेल्या पाण्याचा प्रवाह खळखळून वाह्ताना जाणवत आहे …. आज performnce झाल्यानंतर डोळ्यात एक पाण्याचा थेंब हि नाही मी फक्त प्रेक्षकांना ऐकत होतो …. प्रेक्षक स्वताला त्या ठिकाणी पाहतोय आणि मी बोललेलो संवाद त्यांच्या मनाला लागत आहेत … आणि , मी performance करताना अस ठरवलच नाही कि ,  समोर बसलेल्या प्रेक्षकांना बोलायचं आहे मी मंचावर उभा राहिल्यानंतर हातात हात घालून मंच्याकडे पाहत आहे …  डोळ्यासमोर काहीस अंधुक अंधुक होवून माझ्या मनातील एक मन हे प्रेक्षकांमध्ये जाउन बसल आणि त्या मनाशी संवाद साधत आहे अस जाणवू लागल ….मंचावर अगदी सहज येवून उभा राहिलो … पाहिलं audience च्या डोळ्यात त्या नंतर त्यांच्या डोळ्यातील भाव एक एक धागा मिळवून देऊ लागले  … या performance मध्ये मी एवढा तल्लीन आणि alert झालो कि , माझ्या अवती भोवती होणारे आवाज होणाऱ्या हालचाली यांचा वापर हा मी संवादामध्ये करू लागलो … माझ्या मध्ये  जुनून निर्माण झाला …. आवाजांचा हा विचारांप्रमाणे झालेला चढ उतार एक energy निर्माण करू लागला … सकाळ पासून माझ्या घरातून निघालेल्या जर्नी पासून समोर येणारी दृश त्या दृशांमध्ये दिसणारी सामान्य माणसाची भूमिका समजू लागली त्याच बरोबर शब्दांप्रमाणे बदललेली माझी भूमिका हि क्षणो क्षणी बदललेली वाटू लागली  … अनहद नाद चा प्रावास आणि माझी सुरु असलेली वाटचाल यांची आज समग्र पद्धतीने एकरूप होवून सादर करण  आणि ते  होण….  हे challenge मी पूर्ण  केल  होत  …. शरीरामध्ये  होणारी हालचाल…प्रेक्षक समोर असल्याची जाणीव …निसर्गाने दिलेली साथ …. हे एकाच वेळी सुरु होत…. संहिते मधील संवाद सुरु होते त्याच वेळी सामन्य हा शब्द आल्यानंतर … कुत्रे भुंकण्याचा झालेला आवाज हा अगदी जुळून येत होता … अनहद नाद मधील माझी भूमिका आजच्या performance मधून दिसू लागली …. कोल्हापूर मध्ये झालेले अनहद नाद मधील performance  यांनी माझी ऊर्जा आज वाढवली  आहे याची जाणीव होऊ लागली ….माझा performance झाल्यानंतर प्रेक्षकांच्या आलेल्या प्रतिक्रिया या ‘’ रोम रोम खिल उठा अंगावर शहारे आले ‘’ या संवादाशी connect  झाल्या होत्या …जाणवू लागलं कल्पना शक्ती हि एका जबरदस्त वेगात धावत आहे … या वेगाला एक दिशा आहे …. रंगमंचाची जोड आहे… आज माझ्या मनावर मिळवलेला विजय हे मला अति उच्य आत्मिक आनंद …विचाराना दिशा देऊन जमिनीवर आणल्याच सुख आणि ख़ुशी …. देत आहेत …हा क्षण मला लिहिण्यास प्रवृत्त करत आहे बस लिहत जावे  …. शब्द , विचार यांचा समुद्र हा डोळ्यासमोर आहे आणि मी त्याच्यात माझी बोट घेवून उभा आहे …हे चित्र  मला दिसू लागले ….

Thursday 27 August 2015

हे शिबीर माझ्यासाठी आत्मिक बळ देणारं .......

कोल्हापूर mily १४ ऑगस्ट २०१५ ते १८ ऑगस्ट २०१५

लेखक हा आपल्या विचारांतून सृष्टी निर्माण करत असतो... नाट्य लेखन हे समाजाला नवीन दृष्टी देऊन चेतना जागृत करत असतं… नाट्यलेखन कार्य शाळा मंजुळ भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर या ठिकाणी झाली... या कार्य शाळेच आयोजन मेघा पानसरे यांनी केल होत या. ५ दिवसीय कार्य शाळेत मी अनुभवलेली माझी यात्रा …

१३ ऑगस्ट २०१५ ला दिवसभरात कामाची आवरा आवर करून दुपारी ३. ३० वाजता घर सोडलं. तब्बेत ठीक नसल्यामुळे शारीरिक weakness जाणवत होता.  मी ५ वाजता CST ला पोहोचलो…अनघा आणि योगिनीची वाट पाहत होतो. ट्रेन सुरु झाली आणि माझ्या प्रवासाची सुरुवात झाली. अनघा आणि कोमल या tor च्या प्रक्रियेत कोल्हापूर ला पहिल्यांदा येत होत्या. मी ‘गर्भ ‘या नाटकाच्या प्रस्तुतीवेळी आलो होतो…. ट्रेन मध्ये बसल्यानंतर सुखद आणि explorative प्रवास करताना कुतूहल वाटत होत. खिडकीच्या बाजूला बसल्याने समोर धावत असणारी local train आणि मी ज्या ट्रेन मध्ये बसलो होतो ती सह्याद्री express.... खूप छान प्रवास सुरु होता ...local कडे बघताना गर्दी जाणवत होती…

पण, express मध्ये seat reserved असल्यामुळे तशी त्याच्यात पुरेशी जागा हि होतीच आणि माझा एकदम आरामात सुखदायी प्रवास सुरु झाला. आज शिबिरात जाण्याचा अजेंडा होता कि राजकारण हा विषय समजून घ्यायचा आहे…कारण, राजकारण हा जीवनाचा एक गाभा आणि healthy राजकारण म्हणजे नेमक काय ते मला समजून घ्यायच आहे. Healthy राजकारणाची व्याख्या मला माझ्या जीवनात अमलांत आणायची आहे आणि सर्वांना दाखवून द्यायचं आहे कि राजकारण वाईट नाही आहे …. सतत मनात एक तळमळ आहे कि येणाऱ्या काळात भारताची राजनीती हि तरुणांच्या हाती यावी …. और जो बुजुर्ग बैठे है मलाई खाने उनको बोलना है…. आप हमे जीवन मे मार्गदर्शन करो …। राजनीती राजकारण हम खेलेंगे…और हमारा प्रधानमंत्री एक सच्चा युवक होगा …. जो जनहितार्थ काम करेगा … हे राजकारणाच abstract चित्र काढताना मी दिसतोय …. येणाऱ्या सततच्या दृश्यांना आता प्रत्यक्षात उतरवण्याची हीच वेळ आहे हे लक्षात आलं …. त्याच विचार चिंतनामध्ये मी कोल्हापूर ला पोहचलो … हि आमची युरोप टूर होती .या टूर मध्ये आम्हाला आमच्या वस्तूं पासून ते वेळेवर पोहचण या बाबतीत नियोजन करायचं ध्येय दिलं होतं ....हे समजून घेण्याची हि प्रत्यक्ष दर्शी वेळ होती. मी, कोमल आणि अनघा आम्हा तिघांची मिलिंद कदम यांच्या घरी राहण्याची व्यवस्था केली होती …त्या ठिकाणी आम्ही पोहचलो साधारणता ६:३० पर्यंत... मिलिंद कदम यांच्या घरी पोहचलो आणि ८:३० पर्यंत आम्हाला तयार राहायचं आहे हे सांगण्यात आलं. त्यानुसार आम्ही तिघांनी आपली तयारी केली आणि ८. १५ पर्यंत तयार झालो... आतापर्यंत आम्ही वेळेच्या बाबतीत धावपळ करणारे आज ८.३० वाजले आणि वाट पाहत बसलो होतो निघायची.... प्रियांका राउत ८.३० वाजता येणार होती तिची वाट पाहतोय.पण त्याच वेळी डूलका लागला आणि काही वेळानंतर प्रियांका आल्याचा तिच्या आवाजावरून समजल. मग उठलो आणि घड्याला मध्ये पाहिलं तर त्यावेळी ९.३० वाजले होते अरे बापरे आता काय करणार आता सर्वांची चंपी... मी नाश्ता केला आणि आम्ही वोर्क्शोपच्या ठिकाणी पोहचलो. आणि गपचूप जाउन बसलो त्यावेळी सर वस्तू आधारीत economy, सेवा आधारीत आणि विचार आधारीत economy या बद्दल सांगत होते वस्तू आधारीत हि व्यवस्था मराठी रंगभूमीची आहे.....ना त्यामध्ये विचार आहे, ना त्याच्यात तत्व आहे …. सेवा आधारीत व्यवस्था हि अक्टिंग आधारीत आहे …. आणि विचार आधारीत व्यवस्था हि आणि ती नेहमी संसाधन निर्माण करते आणि निरंतर कालापर्यंत सुरु राहते … 
नाट्यलेखनालाची आगळी वेगळी प्रक्रिया सुरु झाली.... लेखक आपले विचार आणि त्याला दाखवायची संकल्पना घेऊन बसला होता आणि आम्ही त्या नाटक लेखनातील पात्र होतो … सरांनी सांगितले चला रंगमंचावर जा आणि सगळे रंगमंचावर फिरा … आम्ही रंगमचावर फिरण्यास सुरुवात केली त्यावेळी लेखनाची नवीन दृष्टी सर आम्हांला देऊ लागले ... रंगमंचावर वावरत होतो... नंतर मंचावर झोपायला सांगितलं आम्हाला….लागेल तेवढी जागा घेतली होती ...त्यावेळी प्रत्येकजण आपल्या व्यक्तिमत्वाचे पैलू दाखवत होता …. आणि तिकडून सामान्य विचारसरणी सुरु झाली आणि सामान्य माणूस आपल्या जबाबदारी पासून लांब जाताना दिसत होता …. मला एवढीच जागा पुरेशी आहे … माझी लायकी नाही आहे … मला एकट्यासाठी एवढी जागा पुरेशी आहे …. नाही जमणार …. अशा पद्धतीने सर्व सामान्य पळ काढताना दिसत होते... वाटत होत पूर्वीच्या काळी आपल्या कर्तव्यापासून लांब पळाल्यामुळे कोणा एका व्यक्तीची महत्वकांक्षा जागी झाली आणि त्याला जोड स्वार्था ची मिळाली आणि त्यातून राज्य निर्माण करण्याची इच्छा निर्माण झाली आणि तेव्हा पासून भांडवलशाही आणि सामंत शाही उदयास आली... नाट्य लेखनाच्या या कार्यशाळेत मनात असलेल्या राजकारणाविषयीच्या संकल्पना समजत होत्या आणि त्याच क्षणी मंचावर उभा राहून आपलं character समजून घेत होतो...
साम्यवादी विचार म्हणजे काय? हा प्रश्न गेले कित्तेक दिवस मनामध्ये आपली जागा निर्माण करून बसला होता ….एखादा व्यक्ती आहे त्यानुसार त्याला accept करण त्याचा स्वीकार करण … कारण प्रत्येक व्यक्तीच एक अस्तित्व असतो आणि त्यानुसार त्या व्यक्तीचा स्वीकार करण खूप महत्वाच आहे आणि निसर्गात दिसणार्या सर्व वेगवगेळ्या पद्धतीचे झाडे, वृक्ष , वनस्पती याना आपण आहेत त्या पद्धतीने स्वीकार करतो . त्याच पद्धतीने आपल्या आजूबाजूला असणारी परिस्थिती ला स्वीकार करण हि साम्यवादी व्यवस्था शिकवून जाते … आणि त्यामध्ये एका विशिष्ट्य फलाच आणि झाडाच पिक आपण त्याच्या फायद्यानुसार घेतोय तर त्या ठिकाणी भांडवल शाही व्यवस्था होवून जाते... आणि साम्यवादी व्यवस्था हि सर्वांच्या हिताच काम करते …. त्याच वेळी मनात एक प्रश्न आला हि साम्यवादी व्यवस्था पहिली भारतात असेल का? …. जर होती तर मग आता साम्यवादी नाव काढल्यानंतर फक्त कार्ल मार्क्स च नाव घेतल जात आणि आपल्या देशातील लेकाना ते मान्य आहे … पण, अभ्यास केल्यानंतर असा समजत हि व्यवस्था भारतात पूर्वी होती …. मग एका व्यक्तीच्या नावाने हि व्यवस्था घेतल्यामुळे या व्यवस्थेला राजकारणाचा रंग चढतो आणि त्यातून मग राजार्णातील पक्ष समोर येतात आणि त्याच्यातून याला वेगळीच दिशा मिळते …. सर्वाना समान अधिकार आहेत आणि तेच समान अधिकार रुजवण्याच काम साम्य वादी व्यवस्था करून देते.. त्यावेळी साम्य वादी व्यवस्था आणि त्या व्यवस्थेच म्हत्व मला समजले …. 
सामुहिक बसून स्क्रिप्ट लिहण त्याच्यातून thought बरोबर सतत राहता आल ….नाट्यलेखन करताना precise होन खूप गरजेच आहे कि मला आता यामधून काय दाखवायचं आहे.… ती चौकट शोधन आणि त्या चौकटीत दिसणार चित्र आपल्या शब्दांनी रेखाटन …. आणि सृजनात्मक काम करताना relax राहिल्यामुळे ध्येयाकडे लवकर पोहचता येत….. 
एकाच वेळी पाहत होतो कि लेखक आपले विचारांना कशा पद्धतीने दिशा देत आहे …. तर समोरील बाजूला असणारे कलाकार आपली भूमिका समजत आहेत.  मंचाचा वापर करण्याची दृष्टी लेखक पाहत होता. तर दुसर्या बाजूला नाट्य लेखनाच शिल्प विकसित करत होता …. Character म्हणून उभा असताना काही वेळा लेखकाच्या मनातील संवाद आपोआप तोंडातून येत होते …. त्यामुळे विचारांच्या पायावर निर्माण होणारी स्क्रिप्ट हि आपली तात्विक बाजू सहज मांडताना दिसत होती... स्क्रिप्ट जशी वेगात पुढे जात होती त्या पद्धतीने मनात विचारही पुढे जाताना दिसत होते आणि लेखकाच्या बाजूने विचार केल्यानंतर लेखक हा काळाला बांधत असतो त्यानुसार त्याची जबाबदारी त्याने समजून दिशा देण्याच काम करणे गरजेच आहे …. त्याच वेळी नाटकातील एक दृश्य उभा राहिला आणि समजल ‘’ yes….that is change…. आणि त्याच वेळी नाटकातील पात्राने आपली जागा घेतली आणि अभिमानाने अन्यायाच्या विरोधात उभा राहून आपलं कुरुक्षेत्र निर्माण केला आणि त्या कुरुक्षेत्रामध्ये त्याने निर्णय घेतला आणि आपल अभिव्यक्त स्वातंत्र त्याने मिळवल … आपल स्वातंत्र त्याने मिळवल … आणि चालत आलेली संस्कृती आणि परंपरा त्या पात्राने मोडल्या…आपला निर्णय घेवून एक प्रेरणा बनली …. त्याच वेळी मन एकदम शांत झाल होत …. आणि दर्शक म्हणून आम्ही समोर बसलो होतो त्यावेळी माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले आणि त्या प्रश्नांमध्ये एक नवीन विचार ठोस झाला हे नाटक एक जनआंदोलन आहे …. हि नाट्य लेखनाची प्रक्रिया खूप वेगळी आणि चेतना जागृत ठेवणारी भासू लागली …. आता पर्यंत अशी नाट्य लेखन पद्धती मी पहिल्यांदा पाहिली होती …. संध्याकाळी ६ वाजे पर्यंत सर्व दृश्य हे उभे राहिले ...एवढ्या कमी वेळात घडणारा हा बदल लेखनाच्या बाबतीत खूप अविस्मरणीय भासू लागला …. त्याच बरोबर मनामध्ये एक संघर्ष तर सुरूच होत होता ….

दरम्यान अनहद नाद मधील जननी चा performance, कितनी मातये आणि कोलंबस चे performance होत होते आणि ते मला रंगमचावर perform  करण्यासाठी empower करत आहेत हे सतत जाणवत होत ... होणारा प्रत्येक performance  हा नाविन्य पूर्ण जाणवत होता कारण performer मंचावर उभा राहिल्यानंतर एक positive vibration  निर्माण होताना सतत जाणवत होत... मंच दर वेळी बदलत होता त्याच बरोबर त्याची सौंदर्यता हि खूप वेगळी आणि प्रफुल्लीत करणारी जाणवत होती ....कोल्हापूरला आम्ही shopping करण्यासाठी गेलो... बाजारामध्ये असणार  महालक्ष्मी च मंदिर... लागलेली भक्तांची लाइन आणि त्याच बरोबर देवीच्या दर्शानासाठी उभे राहणारी लोकांची गर्दी हि खूप वेगळी भासत होती … कारण लक्ष्मी मातेच मंदिर आणि मंदिराच्या गाभार्यात मातांना प्रवेश नाही …. हो मनाला नाही पटत तरीही ते सत्य आहे नाटकामधील एक दृश्य तेच होत... मंदिराच्या गाभार्यात स्त्रीला प्रवेश नाही आणि आपण मातेच मंदिर म्हणतो तर त्यांना आत प्रवेश का नाही …. म्हणजेच.., हा प्रश्न कोणाला विचारला तर …. नाही ते पूर्वी पासून असंच चालत आलय … हे असंच चालणार …नाट्यलेखन करताना पडलेला प्रश्न होता स्त्रीला आपण माता म्हणतो आणि मातेच्या मंदिरात मातांना प्रवेश नाही हे काही पटत नाही … म्हणजे, माता बोलून नक्की दाबून ठेवत तर नाही ना!…. असा प्रश्न डोळ्यासमोर निर्माण झाला …बाजार पेठांच्या पुढे एक तलाव होत त्या ठिकाणी संध्याकाळची वेळ आणि लहान, मोठे , तरुण , तरुणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी जमले होते …

                                             

             एका बाजूला मनात विचार आला 'बाजूला असलेल्या मंदिरात जे समाधान मिळत नाही ते निसर्गात गेल्यानंतर सहज मिळतं आणि निसर्ग नेहमी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो' …दुसऱ्याबाजूला असंही वाटत होत कि आता जो विकास होतोय तो विकास समाधान देऊ शकत नाही...आणि समाधाणासाठी लोक समुद्र किनारी, नदीच्या किनारी आणि समुद्राच्या ठिकाणी जातात आणि ज्याठिकाणी सूर्य चंद्र दिसेल अस ठिकाण …. मग, विकास करून काही फायदा आहे का? आणि कशाचा विकास? Development झाल्यानंतर देखील समाधान मिळत नाही आहे तर अशा विकासाला काही अर्थ आहे का ? …. हा प्रश्न मनामध्ये निर्माण होऊ लागला.… 
सकाळी ६.३० वाजता आम्ही मेघा पानसरे यांच्या घरी भेटलो आज आम्ही चैतन्य अभ्यास करण्यासाठी जाणार आणि चैतन्य आभ्यासाच चैतन्य नेहमीच स्वतःला स्वतःशी जोडत असतं …. मी या चैतन्य अभ्यासाला नाव दिल नाटककाराच्या चैतन्य अभ्यासाचं चैतन्य … कोल्हापूर university चा campus खूप मोठा होता त्या campus मध्ये आम्ही जायला निघालो … रस्त्याचा आकार आणि त्याची उपयोगिता यांचा शोध घेण्यास सुरुवात केली …. मानवनिर्मित रस्त्यावर ते जाणीवपूर्वक बांधले होते … ते काटकोन त्रिकोणामध्ये दिसत होते पण रस्त्याची व्यवस्थित बांधणी न केल्यामुळे येजा करणाऱ्या वाहनांमुळे उडणारी धूळ यांमुळे होणारा त्रास खूप भयानक वाटत होता …. पुढे चालत गेल्यानंतर मानवाने बांधलेली मोठ - मोठे बंगले होते ...एक बंगल्यावर लिहील होत ’’ प्रसन्न ‘’ परंतु बंगल्याकडे पाहताना असं वाटत नव्हत कि तो प्रसन्न आहे. बंगल्याकडे पाहिल्यानंतर एकही अशी गोष्ट नव्हती जी मनाला सुख आणि समाधान मिळवून देत आहे …. काही बंगल्यांच्या बाहेर लिहील होत कुत्र्यांपासून सावध रहा …. माणूस एवढा प्रगती करत आहे कि त्याला माणसाचीच भीती वाटत आहे …नक्की विकास करतोय कि माणुसकी विसरतोय आणि माणुसकी सोडून नक्की कशाच्या मागे जातोय? हा प्रश्न मनात निर्माण झाला …university च्या बाहेरच NSS चा कॅम्प लागल होत आणि त्या ठिकाणी रणगाड्या आणि युद्धाची ट्रेनिंग देण्यासाठी तो कॅम्पस होता …. ज्याठिकाणी विद्या आहे त्याठीकाणी रणगाड्यांचा प्रशिक्षण? ....खूप वेगळ आणि मनाला न पटणार दृश्य डोळ्यांसमोर दिसत होत … विद्यापीठामध्ये आल्यानंतर दोन रस्ते होते एक म्हणजे डांबरी रस्ता आणि दुसरीकडे असणारी पायवाट... त्यावेळी मेघा ताईंनी सांगितल या पायवाटेने मी प्रवास करते … मग आम्ही त्या रस्त्याने चालत आतमध्ये प्रवेश केला …

 समोर धावत असणारे मोर …. आपल्या आवाजाने ते आम्हाला बोलावत होते … वातावरण एकदम नादमय वाटत होतं... हिरवगार गवत त्यातच पक्षांचा येणारा आवाज हा खूप आगळा वेगळा आणि करणारा वाटत होता … शांतीवन मध्ये फिरत असल्याचा भास …निसर्ग नेहमीच आपलसं करत असतो आणि जस जस त्याच्या मध्ये मी जात होतो तेवढच समाधान मला मिळत होतं…

आज निसर्ग हा माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आणि घटक होऊन बसला आहे … गवतावर पडलेले दवबिंदू चमकत होते … पुढे चालत आल्यानंतर एक गृहस्त चालत येताना दिसले आणि त्यांच्याशी सहज सरांचा संवाद झाला आणि ते सांगू लागले या campus मध्ये मी काही झाडे लावली आहेत ...इतकं बोलून ते पुढे निघून गेले …. लाजाळूची काही झाडे होती त्यांना हात लावल्या नंतर ती झाडे आपली पाने पटकन मिटत होती ….पुढे गेल्यानंतर झाडांनी घेतलेल्या वेगवेगळ्या आकारांना पाहत होतो नंतर आम्ही जाउन झाडाच्या पायथ्याशी बसलो …


जणू झाडांनी आपल्या फांद्यांनी आम्हाला बसण्यासाठी मांडव तयार केला होता आणि आम्ही खाली बसलो होतो....शांत आणि थंडगार असलेली जमीन, येणारी थंडगार हवा मनाला प्रसन्न करत होती …. मला जाणवत होतं मी आनंद घेत नाही आहे ...सतत जाणवत होत.... कारण, मनात येणारे विचार मला त्यांच्या मध्ये गुंग करून ठेवत आहेत अस भासत होत.… काही क्षणाला मी त्याचा अनुभव घेत होतो तर काही क्षणाला मी शांत होऊन जात होतो माझ्याच विचारांत …. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी शरीराने असणं आणि मानसिक दृष्ट्या त्या ठिकाणी नसणं ….त्याच प्रश्नाच उत्तर शोधत आहे हे माझ्या लक्षात येत होत … पुढे आल्यानंतर मानवनिर्मित तलाव होता पण त्याठीकाणी पाणीच नव्हत आणि ज्या ठिकाणी पाणी होत त्या जागेचं योग्य पद्धतीने नियोजन केल नव्हत.... त्यातून एवढ समजत होत कि, आता पर्यंत शासन जी कामे करतोय त्याच्या मध्ये व्यवस्थित अस नियोजन नसल्यामुळे नको त्या ठिकाणी पैसा लाऊन फक्त टेंडर पास करून दलालानी आणि मंत्र्यांनी फक्त पैसे खाल्ले आहेत …. पुढे चालत आल्यानंतर आम्हाला जाताना भेटलेल्या युवकाने सरांना आवाज दिला आणि ‘’ ओ भाऊ इकडे या ‘’ काय पाहिलत?

   त्याच्यानंतर संवाद साधण्यास सुरुवात झाली … आणि कलाकार आपल्या कवितांचा नजराणा आमच्या समोर मांडत होता …. मनातील सर्व भाव, दुख:, त्रास आणि असणारी तळमळ त्याने कवितेत मांडली होती …. त्याने आपल नाव सांगीतल … कलाकार म्हणून सरांनी त्याच स्वागत केल …त्याच्या कलाकार वृत्तीला सरांनी स्वीकारलं...त्यातच त्याच विद्रोहाच रूप हि दिसत होत... त्या रुपाला न हात लावता त्याला सरांनी दिशा देण्याच काम केलं… त्याला एक दृष्टी दिली आणि अनहद नादचा त्यांच्यासाठी performance करण्याच ठरलं … हा संवाद vibrational जाणवत होता…. रंगकर्मी ज्यावेळी निसर्गात आपला शोध घेत असतो त्यावेळी प्रेक्षक समोरून बोलावतो आणि त्याचा अनुभव सांगत असतो आणि त्यामध्ये तल्लीन होऊन जातो … आणि रंगकर्मी हा आपल्या विचारांतून त्याला दिशा देत असतो...जगण्याची नवीन दृष्टी देत आपल रंगकर्म करत असतो आणि हि प्रक्रिया मी फक्त थियेटर ऑफ रिलेवन्स नाट्य सिद्धांता मध्येच पाहिली आहे …. पुढे आनंदात उड्या मारत आम्ही चालत पुढे आलो आणि समोर दिसणारा रस्ता हा आकाशात उडताना दिसला …. जाणवत होत हा विमानांचा runway आहे आणि abroad ला आम्ही जाण्यासाठी तयार आहोत …. त्यातून मनाला कुतूहल जाणवत होत …. University च्या गेट बाहेर आल्यानंतर दोन मुली रस्त्याच्या बाजूला बसल्या होत्या … त्यावेळी सरांनी त्याना alert केल …. आणि public place मध्ये बसल्यानंतर आपण आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष देत आणि जाणीवपुर्वक बसायला हवं ह्याची जाणीव करून दिली … कारण त्यावेळी आपल्या आजूबाजूची परिस्थिती हि आपल्याला नेहमी alert राहण्यास सांगत असते …. 


प्रेस conference होती...आम्ही अनुभवलेली प्रक्रिया आणि नाट्यलेखन प्रक्रिया सांगायची होती.. त्याची तयारी आणि अनुभवलेले अनुभव यांच मनात चिंतन होत …. पत्रकार आले प्रेस conference सुरु झाली मेघा ताईंनी प्रस्तावना केली …माझ्या जीवनातील पहिली conference होती त्यामुळे मी खूप शांत बसलेलो …. 



जीवनातील स्वप्नात कधी पाहिलेले क्षण एका वर्षापासून सतत डोळ्यासमोर येत आहेत घडत आहेत आणि ते क्षण पाहताना अस वाटत कि हे स्वप्नात तर घडत नाही ना????…एका वर्षापासून मनात रुजवलेले बीच आता हळू हळू अंकुरायला लागले आहेत याच मनात एक समाधान आहे …आता प्रश्न फक्त एकच आहे जो मला सोडवायचा आहे …. मनात येणारे विचार आता आत्मसात करून त्यांना आमलात आणणं…. या नाट्यलेखन शिबिरात जाणवत होत अनहद नाद च exploration सुरु आहे …. आणि शिबिरामध्ये आलेल्या प्रत्येक कलाकारामध्ये एक ताजगी निर्माण झाली आहे …. मनातील भाव घेऊन जगत आहेत …. प्रत्येक जण स्वतःशी संघर्ष करत आहे …तत्वांना घेवून निर्माण झालेली हि संरचना विश्वव्यापी असल्याने त्यातील प्रत्येक घटक या स्क्रिप्टशी जोडलेला आहे ….



TOR च्या प्रोसेस मधील कोल्हापूर मधलं हे शिबीर माझ्यासाठी आत्मिक बळ देणारं ठरलं …

Tuesday 11 August 2015

गुलाब की खुशबु...

खुशबु इसकी दिल में समां जाती है...
बहुत रूप है इस के ...
इतिहास से जोड़कर इसकी खुशबु अत्तर सी महकती है...
इसका रूप ताजगी देता है...
प्रेम का पर्याय बनकर दिलों में खिलता है...
फूलोंका राजा बनकर खुली सांस का निर्माण करता है...
आयुर्वेदा में इसका बहुत महत्व है...
इसका जल आँखों को ठंण्डक देता है...
समाज के कांटो में यह खिल जाता है...
उसी समाज को सुगंधित कर देता है...
साहित्य में इसका विशेष महत्व है...
कवी की कल्पना में तरंगित हो जाता है...
विश्व में विविधता का प्रतिक हो जाता है...
कभी बचपन की यादें बिखेरता है...
तो बुढ़ापे में यादों का मंजर हो जाता है...
गुलाब की खुशबु शरीर में प्रेम का निर्माण कर जाती है....

~ तुषार म्हस्के

Friday 7 August 2015

मेरा इश्क़...

एक अहसास जीने की प्रेरना देता है....
एक अहसास दिल में आग लगाता है...
आँखों से बातें करवाता है...
एक अहसास मेरी धड़कन बढ़ाता है...
एक अहसास मुझे अपने से जोड़ता है...
किसी की चाहत ना होगी मेरी चाहत दुनिया बदल देगी..
एक हौसला दिल में जलाय रखता है...
क्योंकी,
मेरा इश्क़ कमजोर नहीं मुझे ताकतवर बनाता है....


तुषार म्हस्के

मिलेंगे बाते करेंगे....

मिलेंगे बाते करेंगे ,
अपने आप से मुलाक़ात करेंगे,
सोचेंगे हम दर्द को,
दर्द की दवा निकालेंगे,
अपनी यात्रा को समजेंगे,
एक दूसरे की प्रेरणा बनेंगे,
हौसला बनकर नया रास्ता निकालेंगे,
नए रंगो को समजेंगे ,
साधना की और बढ़ेंगे,
विचारोंका मंथन करेंगे,
अपने इंसान होने को जानेंगे,
मिलाप होगा मन,तन और विचारोंका ...
निकलेगी सुकून भरी सांस,
कोमल सी किरण,
पोर्णिमा का चाँद,
अंदर के भावोंको रंगो को दिशा देकर..
एक नया रंगकर्म करंगे और रंगकर्मी कहलाएँगे....

तुषार म्हस्के

Monday 3 August 2015

रस्ता हा खडतर

रस्ता हा खडतर,
थंडगार येणारी हवा ,
शरीराला स्पर्श करुण जाते ,
डोळ्यांना भावनारी विचारांची तीव्रता ,
श्वास घेवून केलेली हिम्मत,
रस्त्यावर  घट्ट पाय रोवत करत असणारा प्रवास,
वातावरण नादमय,
रंगली आहे ही जीवनाची फ्रेम ,
रस्तात कोणतीही चिंता नाही ,
चिंतनात करत असणारा प्रवास,
हृदयातिल ठोक्याप्रमाने,
विश्वाच्या पलीकडे आपल् अस्तित्व ,
विचारांमध्ये बांधन्यासाठी ,
घेतलेला निर्णय ,
ध्येया कड़े मला घेवून जाताना दिसतोय...
श्वास घेवून चालत राहण म्हणजे जीवन ,
आव्हानांना समजून केलेली मात ....
ही माझ्या जीवनाची साक्ष सोडत आहे....

...........तुषार म्हस्के

Friday 31 July 2015

शोध

हा शोध ,
अंतर्मनातील विचारांचा,

झाडावरील वेगवेगळ्या आकारांच्या पानांचा, 
त्यातही लपलेल्या हिरव्या,
पिवळ्या आणि पोपटी रंगांचा, 
श्वास घेवून निर्णय घेण्याचा, 

सतत नदीप्रमाणे प्रवाहित राहण्याचा ,
नयनांना फुलवण्याचा ,
कळत - नकळत ला पकडण्याचा, 
सोबत राहून आकाशात संचार करण्याचा, 
क्षणा क्षणाला कोकीळाचा आवाज ऐकण्याचा, 
बनवलेले मापदंड तोडण्याचा ,
मनातील कोलंबसला जिवंत ठेवण्याचा,

सतत प्रवाहाबरोबर माझा 'शोध घेण्याचा, 

तुषार म्हस्के 

Thursday 9 July 2015

यही मेरा मजहब है....

ना मै हिन्दू हूँ
ना मै मुसलमान....
ना मै सिख हूँ 
ना मैं ईसाई ....
नाही मेरा कोई मजहब है....
ना मैं कोई मजहब का हूँ....
मै खुले आसमान मेँ उड़ने वाला पंछी हूँ....
गगन में संचार करना मेरा जीवन है...
आँखों में तारे बसाना मेरी ताकत है....
दिलों को छुना मुझे अच्छा लगता है...
विचारोंको बनाना मेरी फितरत है....
मै अपने साथ ....
मेरा झंडा कोनसे रंग का नहीं है....
मेरी कफ़न इद्र्धनुष्य ने बांदी है....
आसमान को देखता हूँ...
जमीन पर सोता हूँ....
मैं मनुष्य हूँ....
और मनुष्य बनकर जीना ही मेरा जीवन है.....
इंसानियत मेरा धर्म है....
 यही मेरा मजहब है....

तुषार म्हस्के

Saturday 20 June 2015

Tuesday 26 May 2015

Glimpse of play “अनहद नाद – Unheard Sounds of Universe”.
























दि एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशन 29 मई,2015 को शाम 4.30 बजे प्रसिद्ध रंग चिन्तक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित और निर्देशित बहुभाषिक नाटक “ अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ” का मिनी थिएटर,रवीन्द्र नाट्यमंदीर, प्रभादेवी( दादर) मुंबई में प्रथम मंचन कर रही है .
नाटक “अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ” कलात्मक चिंतन है, जो कला और कलाकारों की कलात्मक आवश्यकताओं,कलात्मक मौलिक प्रक्रियाओं को समझने और खंगोलने की प्रक्रिया है। क्योंकि कला उत्पाद और कलाकार उत्पादक नहीं है और जीवन नफा और नुकसान की बैलेंस शीट नहीं है इसलिए यह नाटक कला और कलाकार को उत्पाद और उत्पादिकरण से उन्मुक्त करते हुए, उनकी सकारात्मक,सृजनात्मक और कलात्मक उर्जा से बेहतर और सुंदर विश्व बनाने के लिए प्रेरित और प्रतिबद्ध करता है ।
अश्विनी नांदेडकर ,योगिनी चौक, संदेश,सायली पावसकर,तुषार म्हस्के, वैशाली भोसले, कोमल खामकर और अमित डियोंडी अपने अभिनय से नाट्य पाठ को मंच पर आकार देकर साकार करेंगें !
एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशन विगत २३ वर्षों से देश विदेश में अपनी प्रोयोगात्मक , सार्थक और प्रतिबद्ध प्रस्तुतियों के लिए विख्यात है .
The Experimental Theatre Foundation is premiering renowned playwright & director Manjul Bhardwaj `s multilingual play “अनहद नाद –Unheard Sounds of Universe” on 29 May, 2015, 4.30 PM at Mini Theatre, Ravindra Natya Mandir (Dadar-west), Mumbai. The play “unheard sounds of Universe” is an exploration of artistic needs to emanicapte art and artists from productization to comiit their artistic creativity to make the world better and humane and not a profit and loss balance sheet of life . Ashwini Nandedkar,Yogini Chouk, Sandesh,Sayali Pawaskar,Tushar Mhaske,Vaishali Bhosale, Komal Khamkar and Amit Diondyi are performing in the play.
Experimental Theatre Foundation is known nationally & internationally for it`s experimental, relevant and committed performance since 1992.




Tuesday 12 May 2015

इप्टानामा: अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ यूनिवर्स

इप्टानामा: अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ यूनिवर्स: मुंबई। दि एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशन 29 मई,2015 को शाम 4.30 बजे प्रसिद्ध रंग चिन्तक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित और निर्देशित बहुभाषिक न...

Thursday 30 April 2015

कुदरत के करिश्मे

                                                                                                   Click by Manjul Bhardwaj


कुदरत के करिश्मे 
उसके आकार 
उसके दृश्य
उसका चैतन्य
उसका दृष्टिकोण 
उसके प्रवाह 
उसकी एक फ्रेम बनी 
बादल हवा मैं तैर रहे है 
सूरज चुपके से देख रहा है
पहाड़ आपनी शान में खड़े है
वहीँ पहाडोने हरे कपडे पहने है
पंछी बाते कर रहे है 
सॄजना का माहोल बना है 
सब में प्रसन्नता छायी हुई है
सब perform कर रहे है अपने व्यवहार में
ले रहे है सांस जीवन के जीने में
जिंदगी में उन्मकुत होने की
सुन रहे है एक दूसरे को
समज रहे है अपने को 
सुनके सुनना और जीवन में उसे respons करना 
यही तो है सुनी आवाजें 
जिसको हमने अनसुना किया था ....unheard....

एक सूर्य ......


एक सूर्य उसके बहुत से रूप
सुबह आता है तो बहुत ही प्यारा दिखता
धीरे धीरे उसकी व्यापकता बढ़ जाती है
फिर दोपहर को हम उसे देख नहीं सकते
अपना रूप बदल देता है
शाम को धीरे धीरे वापस वह दिखाई देता है
हमारी आँखे उसे देख पाती है
आज बहुत ही प्रसन्न दिखने लगा
 पुरे दिन भर perform करके आया
हस्ते हस्ते सफेद होगया
धीरे धीरे लाल होने लगा
शांत था परमानंद की कसौटी पर दिखने लगा था
सोच लिया इसको आँखों में बिठाना है
इसको ऐसे ही मेरे अपने ब्रम्हांड में जलाये रखना है
उसको जाके पकड़ा और दिल में समा लिया
मेरी मुद्राए बदलने लगी आँखे स्थिर होगयी
और शांति से आजूबाजू देखने लगा
पंछी बाते करने लगे,
हवाएँ स्पर्श करने लगी,
चाँद पिछेसे देखने लगा ,
समुन्दर खिलने लगा,
एक सुकून भरी साँस लेकर मैं अपने कलात्मक साधना की और चलने लगा.....

Monday 20 April 2015

ऐ मिट्टी .....

ऐ मिट्टी तेरी खुशबु क्या है....
समता का विचार है....
या समता का व्यापार है.....
ऐ मिट्टी तेरा रंग क्या है.....
काला,गोरा ये बतादे अब....
ऐ मिट्टी तेरा झंडा कोनसा है....
तिरंगा या फिर लाल,केसरी,हरा या नीला....
ऐ मिट्टी तेरे विचार क्या है.....
समान या समानता ....
ऐ मिट्टी तेरा अपना कौन है....
मनुष्य या फिर हर राज्य में बैठे अपने ही ठेकेदार....
ऐ मिट्टी तू क्या चाहती है.....
शांति या फिर अशांती....
ऐ मिटटी तेरा गंध क्या है....
प्रेम ,चाहत,अपना पण या फिर वैमनस्य.....
ऐ मिटटी अब तुही बता अब मनुष्य कहा है तेरी गोद में...
जो सुने अपने निर्माण की अनसुनी आवाजे...


तुषार राजश्री तानाजी म्हस्के

Friday 10 April 2015

मी स्वताशी संवाद साधू लागलो …

माझा  मी शोध घेण्यास सुरुवात केली …… माझ्या डोळ्यासमोर निर्माण झालेली परिस्थिती हि मला खूप भयानक वाटत होती …  त्याच वेळी कलाकार म्हणून जगण्याच मला  ‘’ध्येय ‘’मिळाल …. ‘ध्येय ‘’हे मी निवडलं होत …कलाकार म्हणून माझा मी शोध घेत वेड्यासारखा धावत होतो …कलाकार म्हणून जगताना पहिला माणूस म्हणून जगण्याच्या प्रवासाला सुरुवात केली …
दगडासारखा बाहेरून कडक दिसणारा मी आतून तुटत होतो …त्यातून दगडामध्ये माणूस म्हणून जगायला लागलो …भाव भावना, आनंद ,उत्साह, दुख, त्रास वेदना ,संवेदना यांची जाणीव झाली …रंगमंचावर जाता  जाता मी स्वताशी संवाद साधू लागलो …नवीन दृष्टी …. नवीन सृष्टी …. माझ्या बरोबर घडणारा प्रत्येक क्षण मला सांगत होता … मी शांत  …मी स्वता मध्ये गुंतलो होतो …. स्वतावर स्वतासाठी विचार करताना मी पहिल्यांदाच पाहिले होते …घडणारा प्रत्येक क्षण हा  नवीन भासू  लागला …… त्याला सहजच आपलस करून घेण म्हणजे जीवन …जीवन जगण्याची व्याख्या मला समजली होती ….

स्क्रिप्ट  वाचण्याची , शब्द समजण्याची, मंचावर वावरण्याची पद्धत माझ्या मनाप्रमाणे  मला सुधारताना जाणवत होती …माझ्या घडण्यामागे ग्रुप ची  माझ्यावर काम करण्याची मेहनत डोळ्यासमोर दिसू लागली …. त्याच समाधान मला सतत ताज ठेवत आहे हे जाणवू लागले ….
होणारा चैतन्य अभ्यास प्रत्येक क्षणी प्रखरतेने तेजस्वी होताना डोळ्यांना दिसत होता …. त्याच बरोबर स्वतावर विश्वास ठेवण्यास सुरुवात होत होती …. नकळत जबरदस्त चांगल काम करणारा मी मला जाणवत होत कि , मी काम करतोय ते काय करतोय ? …. कारण हवेतून आता मी जमिनीवर आलो होतो …माझी स्वप्ने ठोस होवून हवामान खात्याची जागा हि  ‘ भगत सिंघ ‘ ने घेतली होती … 

माझ्या प्रवासाच्या सुरुवातीला दिसणारी  भयानक गवते आता सुकून गेली होती ….माझी परिस्थिती बदलली होती आणि  ती मी बदलली होती … त्याच समाधान मला आनंद देवू लागल आहे हे समाधान  माझ्या डोळ्यात काजव्यां सारखे चमकु लागले … मी आहे तस माझ्या मनाला मान्य करण्यास सुरुवात झाली त्यातून आता च्या परिस्थिती मध्ये मला कस आणि काय बोलायच आहे ? कस वागायचं आहे हे  हि समजू लागले …. चैतन्य अभ्यास करताना नवीन नवीन अनुभव मला येत आहेत ….याची जाणीव झाली …मी  जगत  असताना मला आलेला अनुभव हा माझा आहे त्याला चूक आणि  बरोबर तसेच दुसर्यांना काय वाटेल म्हणून  बोलायचं टाळण …यातून माझी घुसमट होत होती हे मला जाणवू लागले …. मनात ठरवलं आता मला बोलायच  …. आणि एक  एक शब्द  का होईना बोलण्यास सुरुवात केली त्यातून  समाधान  जाणवू लागले …. नदीच पात्र  कोरड असूनही …त्या पात्रातून चालताना नदीची गती आणि तिची दिशा हि स्पष्ट दिसत होती , भासत होती त्यानुसार मला माझ्या जीवनाची दिशा हि  निश्तित केलेली आहे आता त्यावरून चालाण्यासाठी मला तयार  होवून माझी रफ्तार मला पकडायची आहे …
माळराने माझ्या मनातील दृष्टी प्रमाणे सोनेरी  भासू  लागली …. ‘शांतीवन’ मधून प्रवास करताना …माझ्या मनात एक शांतीवन निर्माण करत मी चालत राहिलो …. अनुभव प्रत्येक क्षणी मला नवीन नवीन येत होते  तेच अनुभव मला नाटक बसवताना …… मला मंचावर मांडायचे आहेत ….  याची जाणीव झाली होती …भूतकाळ हा नेहमी डोळ्यासमोर  समोर  येवून उभा राहत होता …त्यावेळी मनात भीती तर येत होती …त्याच वेळी भूतकाळातून संदेश घेवून त्याचा उपयोग अनुभवाचा साठा म्हणून जीवनात उतरवायचा आहे.  हे समजल्यावर भूतकाळ हि ज्ञानी वाटू लागला … सूर्य ,चंद्र,तारे , ग्रह , उपग्रह  यांच्याशी संवाद साधताना संपूर्ण विश्वात फिरताना  जाणवू लागले ….
त्याच क्षणी शरीरात रक्तप्रवाह स्थलांतरीत होताना ठक … ठक …….होणारा आवाज सतत जाणवत आहे …… मंचावर उभा राहताना सतत मला वाटायचं …. आता  ,  मी तुषार नाही आहे ‘ मी performers  ,performer  आहे  …… सहजच  मी माझ्या भूमेकेत  वावरताना  दिसू लागलो …… रंगमंचावर प्रयोग करताना आम्हीच प्रेक्षक आणि  आम्हीच  पर्फोमेर असल्यामुळे  आयुष्य जगण्याची ताकत मला प्रत्येक क्षणी मिळत होती …घेतलेला अनुभव मी  जीवनात उतरवण्यास सुरुवात  केली …कलाकार म्हणून ऐकलेले माझे unheard  घेवून …… मी  माझ आयुष्य  कलाकार म्हणून जगण्यास  सुरुवात केली … माझी माझ्याबद्दल विचार करण्याची दृष्टी मला थियेटर ऑफ रिलेवंस ने मला २३ मार्च ते २८ मार्च २०१५ च्या शिबारात मिळवून दिली ……