Monday 25 September 2017

अनहद नाद - चा प्रवास आठवला आणि मी बोलू लागलो ...तुषार म्हस्के

अनहद नाद - चा प्रवास आठवला आणि मी बोलू लागलो ...


त्यात फक्त समजण्याचा भाव ठेवून स्वतःला ऐकू लागलो...अनहद नाद च्या प्रक्रियेमध्ये राहून आलेला अनुभव ...मी तिला सांगू लागलो ....योग ...त्यातून झालेला योगा चा अनुभव ...तो प्रवास सांगत असताना... ऐकलेला नाद ...डोळे बंद करुन ...माझा आवाज ...मला जीवनात काय करायचं आहे ....?


हा प्रश्न अजिबात त्यावेळी नव्हता ...भोग ...उपभोगामध्ये अडकलेली ती माझी मानसिकता आणि त्यातही कधीही न मिळालेलं समाधान ... त्यातच स्वतःला शोधण्याची लागलेली धडपड....तिच्याशी संवाद साधता - साधता मी स्वतःबरोबर बोलू लागलो...मी घेतलेला " कलाकार " बनण्याचा निर्णय हा माझ्या मानाचा आहे ...हा कोणी बोलला म्हणून मी घेतलेला नाही ...आता पर्यंत बहुदा 99% निर्णय हे आपण influence होऊन घेत असतो ....


हो, खरोखरच त्यावेळी अंधकार धुरामध्ये आयुष्य जगत असताना ..." मला वाटलं कलाकार होयाच आहे ... त्याचा संदर्भ हा असा वाटतो लहान पणा पासून ....मंच रंगमंच बोललो की माझी छाती फुलून यायची ...मनात येऊन जायचं मला कलाकार होयाच आहे ...



पण, कधी हिम्मत झालेली नव्हती ....हो आणि त्यावेळी मी घरामध्ये शांत जीवन जगण्याच्या दबावा खाली बासलेलो होतो ...त्यावेळी , गर्भ नाट्काचा फोटो त्यांमध्ये कलाकार आणि दिसणारा मंच माझा आतील आवाज ऐकवत होता मला या मंचावर बोलवत होता ....लगेच नाट्कातील कलाकार अश्विनी नांदेडकर यांना मॅसेज केला. मला तुम्हाला भेटायच आहे ...मला नाटक करायचं आहे ...." रविंद्र नाट्य मंदिर "चा तो ऐतिहासिक क्षण आणि मी फक्त 45 मिनिटे न थांबता बोलू लागलो ...मला नाटक करायचं आहे आणि मला कलाकार होयाच आहे ...



 हो जीवनात पहिल्यांदाच एवढा वेळ बोललो आणि या भूमि बरोबर जोडल्यासारखे वाटले ...काय माहिती काय ताकत ? काय ऊर्जा होती , ती रंगभूमी मला माझ्याबरोबर जोडू पाहत होती ...मग, मी कधीच लांब जाण्याचा निर्णय घेतला नाही...विचाराने सतत गट्ट बांधलेले या प्रक्रियेबरोबर जाणवू लागले ....



मग, कार्यशालेत " शांतिवनात " आलो ...." हा रस्ता मला बोलावतोय ...ही झाडे माझ्या बरोबर संवाद साधत आहेत...सकाळ चा सूर्य मला ऊर्जा देत आहे ....रात्री त्या रात किड्यांचा येणारा आवाज ...आणि पाण्याने भरलेल्या डोळ्यांनी माझ बाहेर येन...स्वागतम ....सुस्वागतम ...वैश्विक रंगभूमिवर तुझ स्वागत आहे ...


"अरे वेड्या बघतोस काय ? ही रंगभूमी तुझी वाट पाहत आहे "...हा परिसर माझ्याशी बोलतोय ही झाडे ...या भिंती ...हा संपूर्ण परिसर मला प्रेरणा देतोय ...आणि यामध्ये माझ्या डोळ्यात फक्त पाणी ...ती नदी माझ्या आत वाहू लागली ..तेव्हा आणि आता मी अनुभव सांगत असतानाही ....मी बोलता बोलता ....तिचा त्या संध्याकाळी हात हातात पकडला आणि बोललो ...बघ , ना हा " रंगमंच" मला बोलावतोय ....






" स्वागतम ....सुस्वागतम ...अरे , वेड्या बघतोस काय ? प्रवेश कर या विश्वाच्या रन भूमिवर आता ये, माझ्या डोळ्यातील पडणार पाणी पाहून, ती गहिवर्ली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून ..बोलणार , तेवढ्यात माझ्या तोडून शब्द आला ....आणि त्यावेळी मी ठरवल मला " कलाकार " होयाच आहे ....जो आपल्या प्रत्येक कृती मधून एक प्रेरणा बनेल ..



 हेच आहे जीवन स्वप्न जे मी त्यावेळी पाहिलेला ....आणि त्याच मार्गावर मी जीवन जगत आहे ....हा, जीवनाची उजळनी करणारा प्रवास मला त्या ठिकाणी ...."अपनी अनसुनी आवाज सुनो " च्या वेळी आला ....अशा या सृजनात्मक वातावरणात तिने मला गहिरवलेल्या डोळ्यांनी मीठी मारली जी सृजनात्मक आहे ...जीवनाच तत्व थिएटर ऑफ रेलेवन्स ने मला दिलं..



मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक " अनहद नाद - Unheard Sounds of Universe "म्हणजे कलाकाराला निर्माण करतो त्याच्यातील योग्य कलांना खोदून बाहेर काढतो आणि कलाकाराची निर्मिती करतो .. 

 
रंगकर्मी - तुषार म्हस्के

tmhaske09@gmail.com

Saturday 9 September 2017

नाटकाची एक प्रस्तुती आणि प्रेक्षकांच्या मनात सुरु असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात....तुषार म्हस्के


नाटकाची एक प्रस्तुती आणि प्रेक्षकांच्या मनात सुरु असणाऱ्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागतात. कधी – कधी तर आपण अडकलेल्या परिस्थितीतीतून बाहेर येण्याचे मार्ग दिसू लागतात. नाटकांची परिभाषा केवळ ऐतिहासिक , तथाकथित , मनोरंजन इ. पहायला मिळते. समाजातील  ज्वलंत वास्तव दाखवण्यासाठी थियेटर ऑफ रेलेवंस १९९२ पासुन कार्य करत आहे . त्याच्यामध्ये फक्त वास्तव दाखवत नाही तर कुप्रता , परंपरा , संस्कृती याच्या ओझ्याखाली दबलेल्या मानसिकतेला बाहेर काढण्यासाठी काम करत आहे. मंजुळ भारद्वाज द्वारा निर्मित हे तत्व ( philosophy ) समाजातील वेगवेगळे घटक आणि समजातील वेवस्थेवर काम करत आहे. शोषित आणि शोषण करणाऱ्या वर्गाला हे तत्व योग्य दिशा आणि मार्ग दाखवून त्यांना एका समान स्तरावर घेऊन येते . एकमेकांना सामाजिक बांधिलकी मध्ये समान आधिकाराने जगण्यासाठी दिशा दाखवते. 



नाटक my name is smilyee ..I am girl  या नाटकाची प्रस्तुती दिनांक ८ सप्टेंबर २०१७ रोजी , st. Teresa high school,गिरगांव, मुंबई  मध्ये झाली. या नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे हे नाटक अगदी सहज आणि सोप्या भाषेत आपला विचार प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते. नाटकामध्ये असणार तत्व म्हणजे , हो , मी एक मुलगी आहे आणि त्याचा मला अभिमान आहे .



निसर्गाने स्त्री ला बहाल केलेली  मासिक पाळी हि सृजनात्मक आहे . तिच्यामध्ये असणारी जन्म देण्याची प्रक्रिया हि या मासिक पाळी मुळे होते . आपल्या भारतीय समाजामध्ये अनेक रूढी आणि परंपरा आहेत. ज्या मुळे समाज अशा अवस्थेत मुलींना आणि महिलांना घरापासून लांब ठेवले जाते. सामाजिक कार्यामध्ये असणारा अधिकार बळकावला जातो. अपराध्याच्या भूमिकेत त्यांना ठेवण्यात येते . या नाटकाच्या माध्यमातून माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला . बाळाला जन्म देणारी महिला पाळी च्या वेळी अशुद्ध कशी असेल . बरं, त्यामध्ये ती देवघरात जाणार नाही , देवाची पूजा करणार नाही, जेवणं बनवणार नाही . कोणाबरोबर खेळणार नाही ,बोलणार नाही . अशा पद्धतीने तिला वागायला समाज लावतो. कुठे ना कुठे ही पद्धत मनामध्ये न्यूनगंड निर्माण करते .

मुलींचा ,  महिलांचा आत्मविश्वास कमी करते. या सृजनात्मक काळामध्ये होणारी चीड - चीड ही मोठ्या प्रमाणात असते . मला या नाटकाच्या माध्यमातून समजले एक व्यक्ती म्हणून अशा स्थिती मध्ये महिलांना मदत करणे . महिन्यातील त्या 5 दिवसांमध्ये त्यांना परिवारापासून लांब न ठेवता त्यांना जाणीव करून देणे की , ही एक नैसर्गिक क्रिया आहे . त्याचं ओझं अंगावर घ्यायचं नाही . आनंदाने हे क्षण जगायचे. स्त्रियांमध्ये होणाऱ्या मासिक धर्माला सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी मला थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताने दिली आहे.


नाटकाचं सादरीकरण 140 ते 160 विद्यार्थी आणि 15 ते 20 शिक्षकांसमोर झाले . नाटक अगदी हसत - खेळत पुढे जातो . नाटकामध्ये सर्वात आवडीचा भाग म्हणजे "दुगडी- दुगडी " या रिदम ने प्रत्येक सीन ( विचार) जोडला आहे . 


त्यामुळे दुगडी - दुगडी करत असताना प्रेक्षकांच्या तोंडून आपोआप दुगडी - दुगडी यायचे. नाटकाची भाषा एकदम साधी आणि सोपी आहे . जी सर्व स्तरावर असणाऱ्या प्रेक्षकांना समजते . त्यामध्ये विध्यार्थी ,महिला ,पुरुष आणि वयस्कर माणसे . हसत - खेळत नाटकाचं सादरीकरण पूढे जातं. 


त्यामध्ये मुलीचे समानतेचे अधिकार, शिक्षणाचे अधिकार , संपत्ती मध्ये असणारा अधिकार ,पौष्टिक आहारातील अधिकार या समाजामध्ये असणाऱ्या असमान अधिकारांचे चित्रण दृश्याच्या माध्यमातून दाखवले जाते. त्याच बरोबर नाटकातील शोषित कलाकार या सर्व अधिकारांना हक्काने अभिमानाने मागून घेतो तीच बदलाची दिशा ठरली जाते...


 हे समाजातील वास्तव पाहत असताना प्रेक्षक वर्ग शांत होऊन जातो आणि स्वतः ला त्या ठिकाणी पाहतो . हे सर्व झाल्यानंतर नाटकातील कलाकार येऊन "पाळी "विषयी बोलायला लागते. त्याचबरोबर प्रेक्षक वर्ग एकदम शांत झालेला दिसला . संपूर्ण प्रेक्षागृहात शांततेचा वातावरण निर्माण झालेला . मुली एकमेकांकडे पाहत मान खाली घालत होत्या. सुरुवातीला मुलांना नक्की काय सुरू आहे ते समजलेच नाही ते मध्येच आप - आपसात चुळबुळ करत होते. Menstruation cycle हा शब्द आल्यानंतर मुले ही शांत बसली. 



थोड्या वेळानंतर नाटकामधील संवाद पुढे बोलले जात होते त्याच प्रमाणे प्रत्येक प्रेक्षक वर्ग नाटकाला एक टक लावून पाहत होते . नाटकातील शेवटच्या संवादांमध्ये काय - काय काळजी त्यांना घ्यायची आहे . त्याचप्रमाणे स्वतः ची , घरातल्या व्यक्तींची ,समाजाची ,  शाळा, महाविद्यालय या ठिकाणी त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तूंची व्यवस्था करणे , सकारात्मकतेने या प्रक्रिये मध्ये त्यांना समजून घेणे . या दृश्यामुळे एक समाधान प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दिसू लागले होते.




नाटकाचं सादरीकरण झाल्यानंतर सर्व जण शांत होते . बोलण्यासाठी कोण पुढे येत नव्हते . मग, थोड्या वेळानंतर एक मुलगा उठून उभा राहिला आणि बोलला " मी यापुढे मुलींचा respect करणार . जीवनात घडत असणाऱ्या घटना या ठिकाणी तुम्ही दाखवल्या आहेत. एका शिक्षकाने तर व्यक्तिशः भेटून सांगितले असे विषय विध्यार्थ्यांना कसे सांगायचे हा प्रश्न नेहमी येत असतो पण, नाटकाच्या माध्यमातून अगदी सहज आणि सोप्या भाषेत तुम्ही मांडला आहे.




नाटक हे व्यक्तीला त्याच्या अंतकरणातून उभा करण्यासाठी 
 सतत कार्य करत असतो . थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांतामध्ये तयार झालेलं हे नाटक  किशोर वयात आलेल्या विध्यार्थ्यांना मुलींमध्ये सृजनात्मक होणारी प्रक्रियेला सकारात्मक दृष्टीने पाहण्यास मदत करते .




"my name is smilyee , I am girl "नाटकाच लेखन आणि दिग्दर्शन मंजुल भारद्वाज यांनी केल. 
 नाटक सादर करणारे कलाकार - अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर ,कोमल खामकर , साक्षी खामकर ,प्रियंका कांबळे आणि तुषार म्हस्के आहेत.


रंगकर्मी तुषार म्हस्के
9029333147

Wednesday 6 September 2017

“ मैं औरत हूँ ” हे नाटक म्हणजे स्त्री ला तिच्या अस्तित्वाची ओळख निर्माण करण्यास प्रेरित करते ...



शब्द पुन्हा पुन्हा तेच होते पण, त्या मागे असणारा भाव मात्र वेगळा होता . ते शब्द ऐकत असताना जाणवले.   ती मात्र शब्द बोलत नाही, शब्दांच्या पलीकडे असलेले आपले भाव आणि त्या शब्दांच्या पलीकडून येणाऱ्या
भावना आपल्या शब्दांवाटे सांगत होतीे. शरीर बोलताना कापत होते , मात्र बोलताना ती धैर्य ठेऊन बोलत होती.

 “ मैं औरत हूँ ” मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक . या नाटकाची प्रस्तुति दिनांक ४ सप्टेंबर २०१७ रोजी नाटकवाला पोलीस लाईन , बोरीवली येथे झाली . प्रयोगाचं सादरीकरण झाल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद  , एका महिलेला सक्षमतेकडे घेऊन जाणारा वाटला .मनात दाबून ठेवलेले भाव घेऊन ज्यावेळी ती महिला मंचावर आली आणि समोर बसलेल्या १४० ते १६० प्रेक्षकांसमोर जाऊन नाटक पाहिल्यानंतर अनुभवलेले आपलं मत मांडले . एका नाटकाची ताकद त्यातून दिसायला लागली,कि कला जनमानसात

परिवर्तनाचे काम करत आहे .... आता पर्यंत चूल आणि मुल सांभाळणारी महिला ज्यावेळी १४० ते १६० जनमानसासमोर येऊन आपलं मत मांडते . म्हणजेच , नाटकाने व्यक्तीतील व्यक्तिमत्वाला जागवलं, याचा हा आलेला प्रत्यय.
"थियेटर ऑफ रेलेवंस" हा नाट्य सिद्धांत रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी १९९२ साली मांडला. नाटक फक्त मनोरंजनापर्यंत सीमित न राहता ते व्यक्ती मध्ये परिवर्तनाच्या सकारात्मक विचारांचे बीजारोपण करत आहे . “ मैं औरत हूँ ”  हे नाटक म्हणजे स्त्री ला तिच्या अस्तित्वाची ओळख निर्माण करण्यास प्रेरित करते . या समाज व्यवस्थेमध्ये ज्या ठिकाणी संविधान स्त्री – पुरुष या दोघांना समान अधिकार देते . 


त्याच ठिकाणी परंपरागत चालत आलेली समाज व्यवस्था . महिलांना फक्त संस्कृती-रक्षणाच्या नावाखाली पितृसत्तात्मक विचारांच्या मानसिकते खाली दाबून ठेवते. तिला तिचे निर्णय घेण्याची अनुमती देत नाही तिच्या बद्दलचे निर्णय हा समाज घेत असतो." तू किती वाजता – घरी यायच , किती वाजता घरातून बाहेर निघायचं, कोणा बरोबर बोलायचं कोणाबरोबर नाही बोलायचं". सारी बंधनं आणि सर्व परंपरा या त्यांच्यासाठीच बनलेल्या या समाजामध्ये दिसतात आणि फक्त समाज आणि संकृतीच्या नावाखाली पती ला परमेश्वर मानून त्याच्यासाठी असंख्य उपवास करायला लावतात .या  व्यवस्थेमध्ये आपली जीवनसाथी, आपली अर्धांगिनी हिला स्वतः सोबत समान पातळीवर न पाहता, तिला डावलून तुच्छ पातळीवर पाहिले जाते आणि हे काही लांब घडत नाही. माझ्या घरा पासून सुरु होते आणि प्रत्येकाच्या घराघरात ही मानसिकता पहायला मिळते. 


हा प्रयोग नाटकवाला पोलीसलाईन कॉलनीमध्ये होता. नाटक सुरु होण्याच्या कालावधीत ४० ते ६० प्रेक्षक वर्ग उपस्थित  होता आणि नाटक संपेपर्यंत १४० ते १६० खुर्च्या भरलेल्या होत्या . २५ ते ३० प्रेक्षक उभे राहून नाटक पाहत होते . लहान मुलांपासून ते महिला आणि पुरुष अशा पद्धतीचा प्रेक्षक वर्ग, त्याच बरोबर प्रत्येकजण बसलेला प्रेक्षक कुठे ना

कुठे पोलीसांसोबत जोडलेला होता . कारण, पोलीस वाला कॉलनी आणि प्रत्येक घरातील व्यक्ती हा पोलीस क्षेत्रात होता . त्यामुळे हा प्रयोग  वेगळा  होता . कलाकारांच्या कलाकृतीला पाहताना हा प्रेक्षक वर्ग स्वतः मध्ये हरवलेला दिसला . या भयान अशा कल्लोळात ..स्वत:च्या आत – अंतर मनात स्वतःच्या अस्तित्वाचा शोध सुरु झालेला. मन लावून ही कलाकृती प्रेक्षक पाहत होता . 
नाटकाचं सादरीकरण झाल्यानंतर आलेला प्रतिसाद मनाला भावणारा होता. सुरवातीला उठून एकही व्यक्ती आपलं मत मांडत नव्हती .शांतता पसरली होती, थोड्या वेळानंतर एक महिला उठून बाहेर आली आणि आपलं मत मांडू लागली “ फक्त मुलींना असं बसा असं करा , हे करू नका असं करू नका हे सांगण्यापेक्षा त्यांना काय करायचं आहे ,याचा विचार करूया, घरामध्ये मुलीला संस्कृती शिकवण्यापेक्षा मुलांना संस्कार शिकवूया". अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया प्रेषकांच्या येत होत्या. कधीही कोणासमोर न बोललेल्या महिला देखील पहिल्यांदा आपलं मत मांडत होत्या .

 
"थियेटर ऑफ रेलेवंस " नाट्य सिद्धांताची ही प्रक्रिया आहे, जी प्रेक्षकांना कला सादरीकरण झाल्यानंतर आपल्या अभिव्यक्तीद्वारे आपली ओळख निर्माण करायला शिकवते . 
 “ मैं औरत हूँ “ नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी केलं आहे . या कलेला सादर करणारे कलाकार अश्विनी नांदेडकर , सायली पावसकर आणि कोमल खामकर आहेत. 

रंगकर्मी 
तुषार म्हस्के 
9029333147

Sunday 3 September 2017

एका रंगकर्मी ने लिहिलेले हे पुस्तक रंगभूमीला आणि कलाकाराला कले बद्दल पवित्र आणि शुद्ध नजरेने पाहण्याची दिशा दाखवते .

जीवनात स्वतः प्रेरणा असणे आणि आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तींना, समाजाला, राष्ट्राला आणि जनमानसाला प्ररित करणे म्हणजेच आपल्या जीवनात, आपण जिवंत असण्याचा अर्थ व्यक्तीला कळतो. थियेटर ऑफ रेलेवंस नेहमी व्यक्तीला स्वताला प्रेरित होण्यास शिकवते. त्याच बरोबर इतरांना सकारात्मक दृष्टीने प्रेरित होण्याचे मार्ग दाखवते. ज्यामुळे सकारात्मक वादळाचे वारे वाहू लागतात. असाच हा आगळा- वेगळा अनुभव थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांतामध्ये मला आला , स्वताला सिद्ध करण्यासाठी अश्विनी नांदेडकर ( स्माईली ) पाच वर्षा पासून प्रवास  करत आहे. ती सतत थियेटर ऑफ रेलेवंस प्रक्रियेमध्ये आहे. व्यक्ती म्हणून स्वप्नांचा ध्यास ...घेण्यास सुरुवात केली. आणि एक सशक्त व्यक्ती म्हणून आज या रंगभूमीवर एक सशक्त कलाकार आहे  त्याच बरोबर, एक सक्षम व्यक्ती म्हणून उभी आहे. जीवनात येणाऱ्या अनुभवांना  दिशा देत आहे .


एक कलाकार म्हणून सतत स्वताला आवाहन करत, एक सक्षम व्यक्ती म्हणून जीवन जगत आहे ... याच जडण - घडणाचा प्रवास तिने पुस्तकात लिहायला सुरुवात केली आहे . एका रंगकर्मीचा चा प्रवास या पुस्तकात आपल्याला पहायला मिळणार आहे. वाचायला मिळणार आहे. या पुस्तकाचा पहिला ड्राफ्ट आम्ही २९ ते ३१ ऑगस्ट २०१७ ला शांतीवन, पनवेल येथे झालेल्या थियेटर ऑफ रेलेवंस च्या  कार्यशाळेत वाचायला मिळाला आणि ऐकायला मिळाला. या जीवनाला मार्ग दाखवणाऱ्या अश्विनी नांदेडकर ( स्माईली  ) च्या पुस्तकाच्या वाचनात मला आलेले अनुभव....
पुस्तकाच्या पहिल्या ड्राफ्ट मध्ये वाचत असताना पुस्तकाची भाषा सहज आणि सोपी वाटली . नवीन नवीन शब्द कानावर पडत होते. व्यक्ती बनण्यापासून सुरुवात झाली . त्यामध्ये स्वताचे निर्णय घेणे, विचारांना समजून घेणे, स्वताचे  मत मांडणे , स्वतः साठी नवीन विचारांची सोबत घेऊन जीवनाला सकारात्मकतेने पाहणे ..असा हा प्रवास दिसतो. मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक छेड़छाड़ क्यों ? पासून झालेली सुरुवात . स्वताला स्वता: बद्दल विचार करायला प्रेरित करते . त्याच बरोबर मंजुल भारद्वाज यांनी लिहिलेले आणि दिग्दर्शित नाटक गर्भ, या नाटकामध्ये स्वताच्या अस्तित्वाचा शोध घेण्यास प्रेरित केले . वेग - वेगवेगळ्या धर्मांचे कपडे काढत माणूस म्हणून जगायला, विचार करायला दिशा दाखवली . याच प्रवासात अश्विनी थियेटर ऑफ रेलेवंस प्रक्रियेत जबाबदारी घेण्यास सुरुवात करते आणि स्वताला आणि आपल्यातील कलाकाराला भक्कम करते आणि जडण घडणाचा प्रवास करते .

मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटकाद्वारे युरोप पर्यंत प्रवास करते . एका गृहिणी पासून सुरुवात झालेली हि यात्रा तिला थेट साता समुद्रा पलीकडे घेऊन जाते आणि एक आंतरराष्ट्रीय कलाकार म्हणून आपली ओळख निर्माण करते . आपल्या नाटकाद्वारे आणि थियेटर ऑफ रेलेवंस प्रक्रीये द्वारे सकारात्मक परिवर्तन आणते. अनहद नाद – unheard sounds of universe” या मंजुल भारद्वाज यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या  नाटकाच्या माध्यमातून कलाकारांना त्यांच्या उन्मुक्त्तेचा प्रवास दाखवते. अशी या पुस्तकात वेगवेगळ्या विचारांनी सजलेली यात्रा पहायला मिळते . शब्द वाचत असताना डोळ्यासमोर चित्रपट सुरु असल्यासारखं वाटत. असा हा  अश्विनी चा सुंदर प्रवास पहायला मिळतो, आणि पुस्तक वाचत असताना चेहऱ्यावर  तेज आपो-आप येऊन जाते . त्याच बरोबर सकारात्मक दृष्टी अंतर्मनात निर्माण होते . 

एका रंगकर्मी ने लिहिलेले हे पुस्तक रंगभूमीला आणि कलाकाराला कले बद्दल पवित्र आणि शुद्ध नजरेने पाहण्याची दिशा दाखवते . एक कलाकार म्हणून मी या पुस्तकाची वाट पाहत आहे . जे रंगकर्मीला नवीन रंग दृष्टी देण्यास कार्य करणार आहे . थियेटर ऑफ रेलेवंस ची हि प्रक्रिया व्यक्तीला सक्षम करण्याबरोबर आपल्या अनुभवांना शब्द रूपाने या जगामध्ये पुस्तकात मांडण्यासाठी प्रतिबद्द करत आहे . त्याच बरोबर स्वप्न दाखवत आहे . माझ्या सारख्या कलाकाराला तुही पुस्तक लिहू शकतोस म्हणून .....

सलाम , आहे रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांना ज्यांनी थियेटर ऑफ रेलेवंस हे तत्व १९९२ पासून या जगात सुरु केलं. जे व्यक्तीला व्यक्तीच्या भोवती असणाऱ्या भौतिक कठीण परिस्थितीला तोडून उन्मुक्ततेचा प्रवास करायला शिकवते .

रंगकर्मी
तुषार म्हस्के
२९ ते ३१ ऑगस्ट २०१७
शांतीवन ,

Friday 1 September 2017

थियेटर ऑफ रेलेवंस ने २५ वर्षाच्या कलात्मक उत्सवात स्थापन केली. ‘’ थियेटर ऑफ रेलेवंस ” ची रंगभूमी..... तुषार म्हस्के .

इतिहास बनवण्यासाठी त्याची पाळंमूळं ही वर्तमानात रोवावी लागतात , म्हणजे वर्तमानातील  ध्येय,  त्याकरता एक निष्ठने केलेली  वाटचाल , सार्थक परिश्रम व  योग्य नियोजन,  हे घटक  आपली एक प्रतिमा  समाजासमोर  निर्माण करत जातात.असाच हा एक ऐतिहासिक क्षण ....
इतिहासात नाव नोंदविण्याचा हा प्रवास ...आता पर्यंत कधीही न केलेला ...स्वतःची एक वेगळी प्रतिमा बनवणारा व एक राष्ट्रीय कलाकार म्हणून माझी ओळख निर्माण करणारा ..माझ्यात निर्माण होत असणारा कलाकार आणि जगाकडे पाहण्याची एक दृष्टी मिळवून देणारी साधना . 3 वर्षां पासून सतत स्वतःशी संघर्ष करून या प्रवाहात टिकून राहण्यासाठीचा हा अट्टाहास . कारण , विचार नसतात व आपण  जीवन जगत असतो . त्यावेळी का जगतोय ?असा प्रश्न पडतो ..व  या सर्वांच्या पलीकडे मंजुल भारद्वाज यांनी मांडलेले तत्व  ( philosophy ) थिएटर ऑफ रेलेवन्स या अंतर्गत स्वतःमध्ये  कलेसाठी व कलेच्या  निर्मिती केलेली सकारात्मक यात्रा जी पाहत असताना मला प्रेरणा मिळते ...
थिएटर ऑफ रेलेवन्सचा  25 वर्ष पूर्णत्वाचा  कलात्मक उत्सव दिल्ली मध्ये सादर झाला 10, 11 ,12 ऑगस्ट 2017. देश आणि विदेशात हे तत्व ( philosophy ) जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने जगायला शिकवते .



 आयुष्यात नाटक नका करू आयुष्य जगा नाटक रंगमंचावर करा . परिवर्तनाच्या दृष्टीने 1992 पासून थिएटर ऑफ रेलेवन्स ही वाटचाल करत आहे .
एक कलाकार म्हणून, मला , थिएटर ऑफ रेलेवन्स प्रक्रिये मध्ये निर्माण झालेल्या क्लासिक नाटकांमध्ये परफॉर्म करता  आलं.
सर नेहमी सांगत असतात हे एक युद्ध आहे .त्यावेळी मला काहीच कळले नाही हे युद्ध म्हणजे नेमकं काय  आहे ?आणि फेस्टिवल झालं तरीही कळलं नाही नेमकं युद्ध काय आहे .आणि गम्मत काय या युद्धामध्ये एक योद्धा म्हणून मी लढलो..हो पण, जाणीव पूर्वक ... आणि त्याचा अर्थ मला आता काळतोय हे युद्ध म्हणजे नेमकं काय ? प्रस्थापित रंगभूमीवर स्वताची ओळख निर्माण करणे आणि स्वताची ओळख निर्माण करण्यापर्यंत मर्यादित न राहता थिएटर ऑफ रेलेवन्स च्या रंगभूमीची स्थापना करणे. हे युद्ध आहे . जिथे वर्षानु वर्षे हजारो,लाखो संकल्पना आपल्या कलेतून कलाकार जगाला सुंदर बनवण्यासाठी आणि मानवीय विष पिण्यासाठी समर्पित असणार ,आणि ते मानवीय विष पिऊन नव्या जगाची निर्माण करणार. हो , हे युद्ध आहे.
युद्ध होतं त्याची कारणे वेगवेगळी असतात.
1. आपलं सम्राज्य वाढवण्यासाठी
2. आपली सत्ता स्थापन करण्यासाठी
 3.सध्याची असणारी सत्ता बदलण्यासाठी आणि नवीन सत्ता नवीन व्यवस्था बनवण्यासाठी युद्ध होत असतात . हे आता पर्यंत इतिहासात आपण ऐकलं आहे .
पुस्तकात वाचलं आहे .यात आम्ही लढत असणारे युद्ध हे कलात्मक प्रतिब्धतेचे  आहे . जी कलाकाराच्या अस्तित्वाची ओळख आहे . जी समाजामध्ये परिवर्तनाचे काम करते .कलाकार आपली कला सादर करतात आणि सादर केलेली कला जागतिकीकरणात भ्रमित झालेल्या प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करतात त्याच बरोबर विचार करायला प्रेरित करतात व सकारात्मक बदलाचे नवीन मार्ग दाखवतात,  या कलेच्या महासागरात कलात्मक अनुभव त्यांना  देत असतात. एक उन्मुक्त प्रवास करण्यासाठी कलाकारांना प्रोत्साहित करतात. कलेच्या सादरीकरणा नंतर प्रेक्षकांना कलाकार बनवून जीवनात सकारात्मकतेने जगण्याची कमिटमेंट देण्यास प्रेरणा देतात .
आयुष्य खूप छान आहे " इस पल को जी .. हर पल को जी "

मुंबई ते दिल्ली चा प्रवास...

आता पर्यंत मराठी रंगभूमी पर्यंत सीमित आपली ओळख होती . दिल्ली पर्यंतचा प्रवास म्हणजे एक उंच भरारी आहे . कारण दिल्ली हे राजधानीचं शहर आणि या ठिकाणी जाऊन आपली कला सादर करणे म्हणजे खूप मोठं धाडस आणि जिगरीच काम , कारण , या ठिकाणी असणारा प्रेषक वर्ग उदासीन आहे. म्हणजेच एक तर नाटक बघायला कोणी येत नाही . म्हणजेच मोजकाच प्रेषक वर्ग आणि या ठिकाणी छोट्या - छोट्या गोष्टी हा प्रेषक वर्ग टिपत असतो. त्यामध्ये थोडीही चूक झाली म्हणजे काय खरं नाही .. अशी धारणा मी आता पर्यंत ऐकली होती..आणि या सर्व गोष्टींमध्ये मुंबई ते दिल्ली ला जाणं , अगदी सावधानतेने व त्याठिकाणी आपल्या कलेचा झेंडा रोवून यायचा व या मधून एक राष्ट्रीय कलाकार म्हणून आपली ओळख बनवायची हे आम्हा कलाकारांच्या डोक्यात होते. दिल्ली रेल्वे स्टेशन ला सकाळी 10.00 वा . 9 ऑगस्ट 2017 ला आम्ही कलाकार पोहचलो. त्याठिकानाहून आम्ही  पहिल्यांदा मुक्तधार ऑडिटोरियम ला पोहोचलो.

 
तिकडे जाऊन  आम्ही हॉल ची पाहणी केली . ज्याप्रमाणे युद्ध भूमीवर जाण्याअगोदर ती भूमी काय आहे त्याची आखणी सैनिक करत असतात . परफॉर्म करण्याची जागा काय ? एन्ट्री exit कशी करायची . त्यानंतर music आणि लाईट्स चा क्यू कुठे असेल हे पहायचं यावेळी  मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिगदर्शित नाटक  " गर्भ " चे music मलाच करायचे होते.  त्यामुळे त्याचे क्यू मला लक्षात ठेवायचे होते . त्याच बरोबर कलाकारांबरोबर मला त्याची सांगड घालायची होती . थोडं टेन्शन तर आलेलं पण , मनात ठरवलं होतं हे मला व्यवस्थित करायचं आहे टेन्शन आजिबात घ्यायचं  नाही . त्यानुसार मी माझ्या मनाची तयारी केली व  म्युझिक करून झाल्यानंतर लगेच विंगेत जाऊन मला उभा राहायचं होतं,  त्यात  एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर  2 ते 3 मिनिट लागत होते . त्यानुसार वेळेचं नियोजन आणि कशापद्धतीने सहज कोणाला disturb न करता अलर्ट होऊन मी जाऊ शकतो त्याच माईंड मॅपिंग केलं. हे ऑडिटोरियम पाहिल्यानंतर एक अंदाज आला आता मला कुठे जायचे आहे आणि काय करायचे आहे .हे ऑडिटोरियम पाहून झाल्या नंतर आम्ही म.. भारतीय ऑडिटोरियम लोधी एस्टेट.


ला गेलो हे ऑडिटोरियम पाहिल्यानंतर एक दम भारताच्या बाहेर आपण आहोत असं वाटलं . एक दम टकाटक व चमकदार,  दुसऱ्या बाजूला स्टेज वर लाईट reflect  होत होते काही क्षणासाठी वाटले"  यार , ह्या स्टेजवर थोडा वेळ एकरूप होऊन जावे. एक कलाकार म्हणून वाटलं या स्टेज ला मिठी मारावी आणि आपली कला सादर करावी... हे ऑडिटोरियम पाहून झाल्यानंतर आम्ही स्मृती राज च्या घरी गेलो . स्मृती राज म्हणजे आमच्या फेस्टिव्हलचे  दिल्ली

मध्ये आयोजन करणारी एक तरुण योद्धा. एका बाजूला तरुण मंडळी आपलं आयुष्य फक्त खरेदी आणि विक्री मध्ये झोकून देतात , त्याच ठिकाणी स्मृती राज कलात्मकतेची एक नवीन ओळख या जगासमोर आणून देते . जी कलात्मक सत्व आणि कलेसाठी काम करते या फेस्टिव्हल च्या माध्यमातून...

स्मृती राज च्या बंगल्यावर आम्ही पोहोचलो जिथे घराचा प्रत्येक कोपरा,ठिकाण थिएटर ऑफ रेलेवन्स मय झालेलं . आम्हा कालाकारासाठी उन्मुक्त असं हे ठिकाण . याच घरामध्ये कलेचा इतिहास थिएटर ऑफ  रेलेवन्स च्या माध्यमातून रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिहीत होते .
कलाकारांची मीटिंग,  प्रत्येक अपडेट ,व नियोजन या घरामध्ये होऊन जायचे . नाटकाची तालीम ,शब्दांचा अभ्यास नाटकाचे शब्द वाचत असताना, त्याचा योग्य उच्चार व कलेसाठी आम्ही कलाकार एकत्र आहोत याची शपथ आम्ही याच ठिकाणी घेतली ... सकाळी उठल्यावर शब्दांचा अभ्यास याच घरामध्ये आम्ही करायचो ...मंजुल भारद्वाज कमी आवाजात कशा पद्धतीने शब्दांचा सूर बिघडू नये म्हणून स्वतः मध्ये बोलायला लावायचे हे अजूनही चित्र डोळ्यासमोर येत आहे ...अशी आम्हां कलाकारासाठी ही ऐतिहासिक वास्तू.... 


आम्ही घरी पोहचलो त्यावेळी रुहानी आणि सुहानी बरोबर भेट झाली ... या दोघी म्हणजे बालक्रांतिकारी कलाकार काय ऊर्जा आहे त्यांच्या मध्ये बापरे बाप ! आणि यांची ओळख म्हणजे या बबली रावत आणि मंजुल भारद्वाज सरांच्या मुली .. आता पर्यंत ऐकलं होतं यांच्या बद्दल आता प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर वेळ जगत होतो .. या दोघींनी मला शिकवलं  लहान बाळ होऊन त्यांच्यासोबत  संवाद साधायला .. सतत हसत राहायला .. पहिल्यांदा भेटलो आणि दोघींनी माझी परेड च घेतली " हवामान " उठ जाओ ... ' ऐसे आवाज करो , हात उपर करो , आणि त्यातच मी दोघींबरोबर जोडला गेलो.
बबली रावत म्हणजे एक क्रांतिकारी कलाकार म्हणजे मॅडम बद्दल आता पर्यन्त एकलेले .. खूप स्ट्रीक आहेत... आणि त्यासोबत  थियेटर ऑफ रेलेवन्स च्या 1992 पासून च्या कलाकार .. त्यांचा performance पाहून तर अंगावर काटा येऊन जायचा एकदम प्रेक्षकांच्या डोळ्यात पाहून संवाद बोलायच्या " न्याय के भंवर में भंवरी " नाटकाची रिहर्सल करत होत्या त्यावेळी मी बसलेलो आणि
त्यांनी ज्यावेळी संवाद बोलायला सुरुवात केली , माझ्याकडे बघून माझ्या डोळ्यातून पाण्याची गंगा वाहत होती .आणि त्यातच पितृसत्तात्मक विचार डोळ्यातील पाण्यावाटे माझ्या व्यक्तित्वातून निघून जात होते.आणि एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून मला निर्माण करत होते.बबली मॅडम म्हणजे एक अस व्यक्तिमत्व जे  शब्दांनी तुलना नाही करता  येत ...

व्यक्तिला भावनिक आधार जेवढा देतात त्याच पद्धतीने तत्वाने बोलतात त्यासोबत  हजर जबाबी असतात , सतत शिकण्याचा आणि समजून घेण्याचा भाव त्यांच्यात असतो कधीही परिस्थितिला हार मानत नाहीत ...

गर्भ नाटकाचा प्रयोग...

मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिगदर्शित नाटक गर्भ


या नाटकाच्या प्रयोगासाठी आम्ही तयारी केली होती. एन्ट्री exit आणि नाटकातील संवाद व्यवस्थित लक्षात होते . वेळेच्या अगोदर आम्ही मुक्तधारा ऑडिटोरियम ला पोहोचलो त्याच्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा मी music चं काम करायला गेलो मोबाईल audio system ला connect केला . Music व्यवस्थित प्ले होत आहे की नाही याची काळजी घेतली ... त्याच बरोबर स्वतःला विश्वास दिला ,हो मी व्यवस्थित   music प्ले करू शकतो . आज माझी भूमिका दुहेरी होती .


एकतर music वाजवायचे आणि दुसरा स्टेज वर येऊन performance करायचे त्याच पद्धतीने मनाची तयारी झाली होती . संकेत आवळे प्रकाश योजनेचा काम करत आहे. त्याचे काम पूर्ण होईपर्यंत मी music व्यवस्थित सेट करून घेतले. भीती फक्त एकाच संवादाला वाटायची"  एक  टुकड़ा चाँद, एक टुकड़ा आसमान , वायु ,माटी  हे जे क्यू होते ते सलग
एका मागून एक होते .यामध्ये गडबड म्हणजे संवादाचा impact कमी होऊन जाईल .आणि अस होऊ नये म्हणून स्वतःला फोकस केले व मनात ठरवले , आपल्याला एकदम काळजी पूर्वक music वाजवायची आहे . कुदरत ची पहिली लाईट संकेत ने दिली आणि त्यानुसार माझे हात आणि डोके आपोआप सुरू झाले मोबाईल मध्ये लक्ष त्याच बरोबर मंचावर कलाकारांकडे पाहून त्यानुसार काळजी पूर्वक music वाजवणे.श्वास काही काळ रोखुन ठेवला होता.
अंगावर गर्भ नाटकाचा ड्रेस आणि फोकस " तुषार म्हस्के " म्युजिक करताना मी स्वताला पहिल्यांदा पाहत होतो . म्युजिक देऊन झाले आणि लगेच खाली आरामात काळजी पूर्वक उतरलो व  स्टेज जवळ आलो व वेळ बघून मी alert होऊन विंगेत जाऊन उभा राहिलो . माझे कलाकार विंगेत  माझी वाट पाहत होते योगिनीने विंगेतून इशारा केला . हात दाखवून इशाऱ्याने very good बोलली,  म्हणजे मी माझं काम व्यवस्थित केला आहे त्याची पावती मला मिळाली . लगेच , माझी भूमिका बदलून मला आता  मंचावर परफॉर्म करायचा आहे . हे ठरवून स्वतःला स्टेज च्या स्वाधीन केले . थोडा वेळ डोळे बंद केले आणि


 

शांत राहिलो .. माझी एन्ट्री आली त्यानुसार मंचा कडे आपोआप खेचला गेलो व  सहज शब्दांबरोबर perform करु लागलो .. नाटक सुरु कधी झाले आणि कधी संपले काहीच कळले नाही शरीर , नाटकातील विचार , action एकाच वेळी सर्व होत होते...

नाटकातील संवाद जगल्यासारखे वाटू लागले आता अस वाटू लागले हे संवाद संपूच नयेत . .. सुंदर आणि प्रसन्न  ..नाटक झाल्यानंतर प्रेक्षकांचा येणारा प्रतिसाद एकदम मनाला समाधान मिळवून देणारा होता . इतिहासाच्या पानांमध्ये नाव लिहिलेला दिसू लागले . हा प्रेषक वर्ग एकदम समजदार आणि कलेला समजून घेणारा होता . नाट्य सादरीकरणामध्ये प्रेक्षकांना आलेली अनुभूती त्यांच्या शब्दांवाटे बाहेर पडत होते .कोण बोलत होते थोडे शब्द उच्चार असे हवे होते तर दुसरा बोलला नाही हे शब्दांच्या पलीकडे आहे ... हे


 
शब्दांच्या पलीकडे असणारे नाटक आहे .. या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनातून आलेले उच्चार म्हणजे कलाकारांचे समाधान आणि दिल्ली मध्ये चांगलाच प्रेषक  वर्ग आलेला दिसला...  मंजुल भारद्वाज हे नवीन ओळख करून देत होते ... ज्या ठिकाणी कलाकार सरकारी अनुदानावर जिवंत आहे त्याच ठिकाणी आम्ही कलाकार आमच्या कलेच्या जीवावर जिवंत आहोत ... हीच ओळख आता दिल्ली मध्ये स्थापन झालेली होती ....

https://www.youtube.com/watch?v=17gP9h2Skq0&t=6s

गर्भ नाटकाची प्रस्तुती झाल्यानंतर आम्ही गाडी मध्ये बसून पुन्हा घरी जायला निघालो त्यावेळीच मंजुल सरांनी सांगितले आता हा अनुभव जगा आणि गाडीतून उतरल्यावर हे नाटक सादर केलेले हे विसरून जा . कारण दुसऱ्या दिवशी अनहद नाद परफॉर्म करायचं होतं ... त्यानुसार आपले अनहद नाद चे सुर पुन्हा लक्षात आणायचे होते ... कारण , एक कलाकार एका भूमिकेतून दुसऱ्या  भूमिकेत जाणार होता ... त्यामुळे अनहद नाद नाटकाचे सूर हे वेगळे आहेत आणि ते सूर पकडून perform करण्यासाठी..

नाटक "अनहद नाद - unheard sounds of universe " प्रस्तुती...


अनहद नाद च्या प्रस्तुतीचा दिवस उजाडला
सकाळची वेळ आणि चैतन्य अभ्यास त्यामध्ये अनहद नाद  नाटकातील संवादातील  सूर मंजुल सरांनी ठीक केले ... आम्ही अनहद नाद चे संवाद धावत धावत बोलत होतो .. त्यानंतर आवाजाचा अभ्यास केला . नंतर शरीराचा अभ्यास केला .. अनहद नादचे सूर आणि ते परफॉर्म करण्याची उत्सुकता मनात वाढली होती . आम्ही ऑडिटोरियम ला वेळेत पोहोचलो.. आम्ही आमच्या entry ,exit आणि संवादांचा अभ्यास केला . आवाज शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत आहे की नाही याची काळजी घेतली..

लाईट आणि कलाकारांची जागा यांची योग्य तालीम झाली. अनहद नाद चे कपड़े घालत असताना एक सुंदर फील आला ... आणि अस वाटू लागले हे कपड्यांचे रंग किती उन्मुक्त आहेत ...थोड्या क्षणासाठी डोळे स्थिर झाले असे वाटू लागले आता हे युद्ध जिंकायचे आहे ..  जे आपलं अस्तित्व निर्माण करणार आहे ..विंगेत येऊन उभा राहिलो आम्ही कलाकार एक मेकांना भेटलो आणि सांगितले

 
आपल्याला पानिपत करायचा नाही आहे . एकमेकांकडे  परफॉर्म करताना पाहायचे आहे ...प्रत्येक कलाकार एक मेकांना शब्दांतून ऊर्जा देत होता ..त्यामुळे अंगात ताकत वाढल्यासारखी वाटू लागली होती .आप - आपल्या जागेवर येऊन उभा राहिलो . रंगमंचाकडे पाहिले आणि मंचावर एक पाय ठेवून बसलो कलाकारांकडे पाहिलं अश्विनी,योगिनी,कोमल, सायली आणि मी असे विंगेत उभे असताना दिसलो . डोळ्यातून आपोआप पाणी येऊ लागले .  माहिती नाही पण, कुठून हवेची झुळूक आली आणि जाणवू लागले हेच तुझं स्वप्न होतं रंगकर्म जे आता तू करत
आहेस .

डोळ्यातून पाण्याचा एक थेंब खाली पडला ..आणि त्याच क्षणाला जाणवू लागले हे स्टेज नाही आहे ही त्या शेतातील जमीन आहे ,    हे सम्पूर्ण शेत आहे असे वाटू लागले ,इथे आम्ही आमची कला सादर करणार आहोत . अनसुना ... चा आवाज कानावर पडला आणि वाटू लागले , हे आयुष्य जगतोय ....त्याच क्षणाला शरीर प्रेक्षकांंच्या भूमिकेत perform करतंय. संवादानुसार हालचाली शरीरात होऊ लागल्या एक - एक कलाकाराचे संवाद जबरदस्त रीत्या सादर होत होते ... प्रत्येक जन एकमेकांना प्रत्येक संवादांमधून प्रेरणा देत होते


 

...आज पहिल्यांदा वाटत होते योगिनी चौक या अनहद नादाला जगत आहे ... तिने तर स्वतः ला  या मंचावर झोकून दिले होते ... तिच्यातील कलाकार जबरदस्त रीत्या परफॉर्म करत होता . अश्विनी चा जननी चा संवाद तर ब्रम्हांडामध्ये सादरीकरण घेऊन जात होता ... आज पहिल्यांदा कोलंबस चा संवाद बोलत असताना जूनूनी असल्याचं जाणवत होते .कारण, मनात प्रेक्षकांकडे बघितल्यानंतर आलं की मी कोणाशी बोलतोय हे नक्की समजणार आहे का ? आणि याच विचाराने माझा संवाद बळकट झाला . त्यामुळे बोलत असताना ती आत्मीयता मला मिळत होती हे सादर केल्यानंतर मिळालेले समाधान म्हणजे शांतता फक्त काहीच न बोलणारी ... हा क्षण जगत असल्याची जाणीव करून देणारी ... मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिगदर्शित नाटक अनहद नाद चा सादरीकरण झालं 

https://www.youtube.com/watch?v=vJ8ItmLLmWk&t=2s


 ... त्याचबरोबर प्रेक्षक बोलायला लागला आयुष्यात आपण किती मुखवटे लावतो ? मी फक्त ऐकत असल्याचं दाखवतो पण , कधी ऐकतो का ? तर , नाही...  आपल्यातील अनहद नाद चा नाद ऐकल्यावर मिळालेलं समाधान व येणारी परिस्थिती आपण बदलू शकतो ...हे जाणवले..
अनहद नादच्या प्रयोगातून मिळालेली ऊर्जा जबदस्त होती त्या उर्जेला परावर्तित न्याय के भंवर में भंवरी या  नाटकात केले.

नाटक " न्याय के भंवर में भंवरी " सादरीकरण...
मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिगदर्शित नाटक " न्याय के भंवर में भंवरी "



या नाटकात परफॉर्म करणारे कलाकार बबली रावत आहेत . हे नाटक बबली मॅडम एकट्याच सादर करणार आहेत त्यांसाठी तयारी सुरू झालेली अनहद नाद चा सादरीकरण झाल्यानंतर आम्ही कलाकार रात्री उशिरापर्यंत बबली मॅडम बरोबर रिहर्सल करत बसलो होतो .
त्यावेळी पाहत होतो बबली मॅडम मन लावून  संवाद लक्षात ठेवत होत्या .. आणि सादरीकरण हे म ल भारतीय ऑडिटोरियम लोधी एस्टेट. ला होणार होते . या प्रयोगामध्ये नियोजन करण्यात आले सर्व कलाकार विंगेत बसून  music देणार होते , व माझ्यावर जबाबदारी होती रुहानी आणि सुहानी ला सांभाळण्याची .. लहान मुलं म्हणजे ऊर्जेचा स्रोत बापरे एका जागेवर कधी थांबत नाहीत .. इकडून तिकडून उड्या मारत असतात . या दोघींमध्ये असणारी ऊर्जा ही सर्वात जास्त ,..बबली मॅडम performance करणार,  त्यावेळी सर प्रेक्षकांमध्ये उभे असणार , दुसऱ्या बाजूला सर्व कलाकार विंगेत ...आणि रूहानी , सुहानीला सांभाळने म्हणजे बापरे बाप खूप ऊर्जा आणि सतत हसत राहणं.. आम्ही ऑडिटोरियमला लवकर पोहोचलो ... मॅडम स्टेज वर



रिहर्सल करत होत्या व मी आणि सृष्टी आम्ही रुहानी सुहानी ला सांभाळत होतो ... या दोघी मस्त पैकी धावायच्या एकदम स्पीड मध्ये न थांबता त्यांच्या मागे मी धावायचो ... मग, त्यांच्या बरोबर गाणी बोलायला सुरुवात केली . त्यांच्या बरोबर हसायला लागलो ... आणि या तीन ते चार दिवसात दोघींबरोबर मी चांगलाच जमलो होतो . यांच्याबरोबर मी मिसळून गेलो होतो त्यांच्या मधलाच एक होऊन गेलो . कारण, मॅडम घरी रिहर्सल करत असताना या दोघी माझ्याबरोबर खेळायच्या त्यामुळे तसा काही त्रास नव्हता पण, मध्येच " मम्मी " आठवण झाली तर हट्ट करू नये हा अट्टहास होता .


त्यामुळे मोबाईल मध्ये वेगवेगळी लहान मुलांची गाणी ठेवली होती . कधी काय झालं तर ते कार्टून लावून देणं . रिहर्सल झाल्यानंतर  स्टेज जवळ आम्ही गेलो .. त्यावेळी सुरुवातीला रुहानी , सुहानी गाणी बोलत होत्या आणि मी रेकॉर्ड करत होतो मोबाईल मध्ये . या सर्व प्रकिये मध्ये एक समजलं लहान मुलांना शांत बसवण्यासाठी त्यांच्याच सारख व्हावं लागतं . त्यांच्याबरोबर तश्याच त्यांच्या अवस्थेत मिसळून जावं लागत . Performance सुरु झाला आणि या दोघींना घेऊन मी आणि सृष्टी बसलो मॅडम चा परफॉर्मन्स सुरू झाला ..तसे रुहानी चे  शरीर गरम होऊ लागले . 

मॅडम चा संवाद सुरू होता . एक वेळ अस जाणवू लागलं मी आई च्या भूमिकेत आहे . रुहानी थोड्या वेळाने झोपून गेली सुहानी थोडी चलबिचल करत होती पण, थोड्या वेळाने तीही शांत झाली आणि परफॉर्मन्स होई पर्यंत दोघीही शांत होत्या ..माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होते आणि दोन पोरी बाजूला होत्या . परफॉर्मन्स झाल्यानंतर थोडा शांत वाटलं कारण ही आई ची भूमिका मी जगलो होतो .


https://www.youtube.com/watch?v=QzCD9RCiYpI&t=90s



प्रेशकांच्या आलेल्या प्रतिक्रिया समाधान कारक होत्या .कलाकार परफॉर्म करत असताना वाटत होते की आम्ही त्या नाटकाचा एक भाग आहोत .. अशा जबरदस्त फेस्टिव्हल सादरीकरणाच यश आम्हांला मिळाले होते .
हे फेस्टिव्हल म्हणजे एक युद्ध आहे .. आणि या युद्धात आपल्या असण्याची जाणीव ... या भूमीला आम्ही करून दिली होती ते आपल्या परफॉर्मन्स मधून ....अशाच सुवर्ण काळात आम्ही चमकत्या दिल्ली ला डोळ्यांनी पाहिले काल पर्यंत जगलेली यात्रा आता काळाने लिहिलेली होती...


आणि त्या काळाला आम्ही लिहिले होते....
या काळाला लिहिण्याचे कार्य - कलाकार अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक ,सायली पावसकर ,कोमल खामकर आणि तुषार म्हस्के यांनी केलं .
प्रख्यात कलाकार - बबली रावत यांनी " न्याय के भंवर में भंवरी " नाटकाच सादरीकरण केले .
या नाटकांमध्ये प्रकाश योजना संकेत आवळे यांनी केले
या फेस्टिव्हल च आयोजन स्मृती राज यांनी केले


थियेटर ऑफ रेलेवंस अभ्यासक , शुभचिंतक आणि प्रेक्षकांचा पाठींबा घेऊन थियेटर ऑफ रेलेवंस च्या रंगभूमीची स्थापना केली.
रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी सुरू केलेला जनआंदोलन थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत म्हणून जग प्रसिद्ध आहे , आणि याचा एक शिलेदार मी असल्याचं समाधान मला आहे.






रंगकर्मी
तुषार म्हस्के.