Saturday 23 April 2016

मिलाप...

मिलाप विचारांचा ,
माझ्या स्वप्नांचा ,
माझ्या अस्तित्वाचा ,
माझ्या निर्माणचा .....

मिलाप माझ्या तत्वांचा आणि विचारांचा,
सतत स्वत : ला शोधून जाणीव पूर्वक बदलाचा ,

विचार माझ्या ध्येयाचा ,
ध्येयासाठी संघर्षाचा ,

मिलाप माझ्या सहसाथींचा ....
संवाद माझ्या आत्मस्वरूपाचा ,
माझ्या विचारांना दिशा देण्याचा ,

मिलाप तन ,मन आणि विचारांचा ,
मिलाप हा सहवेदनांचा ,
मिलाप हा एकात्मतेचा ...
सक्षम देश निर्मितीचा ....
सक्षम विचारांचा .......


तुषार राजेश्री तानाजी म्हस्के  

Wednesday 13 April 2016

“ मी भारत माता की जय बोलणार नाही : मला माझ्या DNA वर विश्वास आहे ” - तुषार म्हस्के


भारत माता कि जय नाही बोललो तर तुम्ही देशद्रोही 
ठरवणार माझ्याच घरामध्ये मी काय सकाळीउठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत .... भारत माता कि जय बोलायचं ? ...मी भारत माता कि जय बोलणार नाही ...कारण, मला माझ्या DNA वर विश्वास आहे ....आणि हा प्रश्न केंद्र शासनाचा ,राज्य शासनाचा आहे ...हा प्रश्न माननीय महाराष्ट्राच्या मुख्य मंत्री साहेबांचा आहे .....आज मी भारत माता कि जय नाही बोललो तर मी देशद्रोही कसं काय होऊ शकतो ? हे नारे देश स्वातंत्र होत असताना लावले होते त्याचा उद्देश देश स्वतंत्र होणे हा  होता आता भारत माता कि जय नारे लावणारे हे सरकार नक्की काय मागत आहे ? स्वतंत्र कोणापासून .... अरे मुर्ख्यानो तुमचंच राज्य आहे केंद्रा मध्ये आणि राज्यांमध्ये ...तुमचीच सत्ता आहे आणि तुमच्याच सत्तेत भारत माता कि जय नाही बोललो तर तुम्ही देशद्रोही ठरवणार ...म्हणजे इथे तुम्ही या महाराष्ट्राचे या देशाचे कुटुंब प्रमुख आहात आणि कुटुंब प्रमुख कधी बोलतो का ? आपल्या मुलांना ...तुम्ही भारत माता कि जय बोला नाही तर तुम्ही माझी मुलं  नाहीत ....असं देशाच्या, जगाच्या इतिहासात कोणी बोललं आहे का ? .....साहेब तुम्ही असं कशासाठी बोलताय ? आणि कोणासाठी ? ...तुम्ही एक जबाबदार पालक म्हणून आपल्याच मुलांमध्ये वाद निर्माण करत आहात ...का तुम्ही महाभारतातील शकुनी मामा बनत आहात ? ...अहो , तुम्हाला याच्यातून साध्य काय करायचं आहे ? ....का....तुम्हाला आपापसात कलह निर्माण करायचं आहे ....आणि मला अभिमान आहे भारत भूमीच्या कुशीत जन्मल्याचा आणि मी भारत माता कि जय नाही बोललो आणि माझ्यासारखे हजारो ,लाखो लोक नाही बोलले ...तर माझी योग्यता कशी काय ठरवू शकता ? ...अहो या भारताचा नागरिक म्हणून मी संविधानाचा आदर करतोय ...समानता या वैचारिक तत्वाने जगतोय ...त्याचबरोबर  income tax , traveling tax ,service tax ,वस्तू खरेदिवरील tax भरतोय अजून आहेत नाहीत ती सर्व tax भरतोय ....हे कशामुळे करतोय साहेब ? ...हा एक प्रश्न आहे ना ....त्याच फक्त आणिफक्त उत्तर आहे भारताचा नागरिक आहे म्हणून ...साहेब ......माझे मित्र सर्व धर्माचे आहेत .....हिंदू ,मुस्लीम ,शीख ,इसाई त्यातून मी भारताची एकात्मता टिकवतोय  ..... फक्त भारत माता कि जय बोलून देशावरच प्रेम दाखवता येत असं कोणी सांगितल साहेब ? आज भारताचा एक युवा म्हणून मी जबाबदारीने वागतोय ....या राज्याचा एक पालक म्हणून तुम्ही आपली जबाबदारी पार पाडावी कारण तुम्ही सुज्ञान आहात आणि भावनांच राजकारण करण्यापेक्षा विचारांच स्वच्छंद राजकारण कराल हि अपेक्षा आहे .......धन्यवाद .......



तुषार म्हस्के
९०२९३३३१४७  

https://tusharmhaske.blogspot.com