माझा मी शोध घेण्यास सुरुवात केली …… माझ्या डोळ्यासमोर निर्माण झालेली परिस्थिती हि मला खूप भयानक वाटत होती … त्याच वेळी कलाकार म्हणून जगण्याच मला ‘’ध्येय ‘’मिळाल …. ‘ध्येय ‘’हे मी निवडलं होत …कलाकार म्हणून माझा मी शोध घेत वेड्यासारखा धावत होतो …कलाकार म्हणून जगताना पहिला माणूस म्हणून जगण्याच्या प्रवासाला सुरुवात केली …
दगडासारखा बाहेरून कडक दिसणारा मी आतून तुटत होतो …त्यातून दगडामध्ये माणूस म्हणून जगायला लागलो …भाव भावना, आनंद ,उत्साह, दुख, त्रास वेदना ,संवेदना यांची जाणीव झाली …रंगमंचावर जाता जाता मी स्वताशी संवाद साधू लागलो …नवीन दृष्टी …. नवीन सृष्टी …. माझ्या बरोबर घडणारा प्रत्येक क्षण मला सांगत होता … मी शांत …मी स्वता मध्ये गुंतलो होतो …. स्वतावर स्वतासाठी विचार करताना मी पहिल्यांदाच पाहिले होते …घडणारा प्रत्येक क्षण हा नवीन भासू लागला …… त्याला सहजच आपलस करून घेण म्हणजे जीवन …जीवन जगण्याची व्याख्या मला समजली होती ….
स्क्रिप्ट वाचण्याची , शब्द समजण्याची, मंचावर वावरण्याची पद्धत माझ्या मनाप्रमाणे मला सुधारताना जाणवत होती …माझ्या घडण्यामागे ग्रुप ची माझ्यावर काम करण्याची मेहनत डोळ्यासमोर दिसू लागली …. त्याच समाधान मला सतत ताज ठेवत आहे हे जाणवू लागले ….
होणारा चैतन्य अभ्यास प्रत्येक क्षणी प्रखरतेने तेजस्वी होताना डोळ्यांना दिसत होता …. त्याच बरोबर स्वतावर विश्वास ठेवण्यास सुरुवात होत होती …. नकळत जबरदस्त चांगल काम करणारा मी मला जाणवत होत कि , मी काम करतोय ते काय करतोय ? …. कारण हवेतून आता मी जमिनीवर आलो होतो …माझी स्वप्ने ठोस होवून हवामान खात्याची जागा हि ‘ भगत सिंघ ‘ ने घेतली होती …

माझ्या प्रवासाच्या सुरुवातीला दिसणारी भयानक गवते आता सुकून गेली होती ….माझी परिस्थिती बदलली होती आणि ती मी बदलली होती … त्याच समाधान मला आनंद देवू लागल आहे हे समाधान माझ्या डोळ्यात काजव्यां सारखे चमकु लागले … मी आहे तस माझ्या मनाला मान्य करण्यास सुरुवात झाली त्यातून आता च्या परिस्थिती मध्ये मला कस आणि काय बोलायच आहे ? कस वागायचं आहे हे हि समजू लागले …. चैतन्य अभ्यास करताना नवीन नवीन अनुभव मला येत आहेत ….याची जाणीव झाली …मी जगत असताना मला आलेला अनुभव हा माझा आहे त्याला चूक आणि बरोबर तसेच दुसर्यांना काय वाटेल म्हणून बोलायचं टाळण …यातून माझी घुसमट होत होती हे मला जाणवू लागले …. मनात ठरवलं आता मला बोलायच …. आणि एक एक शब्द का होईना बोलण्यास सुरुवात केली त्यातून समाधान जाणवू लागले …. नदीच पात्र कोरड असूनही …त्या पात्रातून चालताना नदीची गती आणि तिची दिशा हि स्पष्ट दिसत होती , भासत होती त्यानुसार मला माझ्या जीवनाची दिशा हि निश्तित केलेली आहे आता त्यावरून चालाण्यासाठी मला तयार होवून माझी रफ्तार मला पकडायची आहे …
माळराने माझ्या मनातील दृष्टी प्रमाणे सोनेरी भासू लागली …. ‘शांतीवन’ मधून प्रवास करताना …माझ्या मनात एक शांतीवन निर्माण करत मी चालत राहिलो …. अनुभव प्रत्येक क्षणी मला नवीन नवीन येत होते तेच अनुभव मला नाटक बसवताना …… मला मंचावर मांडायचे आहेत …. याची जाणीव झाली होती …भूतकाळ हा नेहमी डोळ्यासमोर समोर येवून उभा राहत होता …त्यावेळी मनात भीती तर येत होती …त्याच वेळी भूतकाळातून संदेश घेवून त्याचा उपयोग अनुभवाचा साठा म्हणून जीवनात उतरवायचा आहे. हे समजल्यावर भूतकाळ हि ज्ञानी वाटू लागला … सूर्य ,चंद्र,तारे , ग्रह , उपग्रह यांच्याशी संवाद साधताना संपूर्ण विश्वात फिरताना जाणवू लागले …. त्याच क्षणी शरीरात रक्तप्रवाह स्थलांतरीत होताना ठक … ठक …….होणारा आवाज सतत जाणवत आहे …… मंचावर उभा राहताना सतत मला वाटायचं …. आता , मी तुषार नाही आहे ‘ मी performers ,performer आहे …… सहजच मी माझ्या भूमेकेत वावरताना दिसू लागलो …… रंगमंचावर प्रयोग करताना आम्हीच प्रेक्षक आणि आम्हीच पर्फोमेर असल्यामुळे आयुष्य जगण्याची ताकत मला प्रत्येक क्षणी मिळत होती …घेतलेला अनुभव मी जीवनात उतरवण्यास सुरुवात केली …कलाकार म्हणून ऐकलेले माझे unheard घेवून …… मी माझ आयुष्य कलाकार म्हणून जगण्यास सुरुवात केली … माझी माझ्याबद्दल विचार करण्याची दृष्टी मला थियेटर ऑफ रिलेवंस ने मला २३ मार्च ते २८ मार्च २०१५ च्या शिबारात मिळवून दिली ……

No comments:
Post a Comment