अनहद नाद या मधील ‘’ बस और वही से छुटता गया मेरा अनसुना हिस्सा …. हा संवाद सादर करताना आलेला अनुभव आणि त्यतून मिळालेला समाधान हे खूप मनाला शांत करणारे जाणवू लागले …ठरवलेला performance केल्यानंतर च सुख …. एक उर्जा देवू लागला … जाणवत होत … मी करू शकतो … आज मनात साचलेल्या पाण्याचा प्रवाह खळखळून वाह्ताना जाणवत आहे …. आज performnce झाल्यानंतर डोळ्यात एक पाण्याचा थेंब हि नाही मी फक्त प्रेक्षकांना ऐकत होतो …. प्रेक्षक स्वताला त्या ठिकाणी पाहतोय आणि मी बोललेलो संवाद त्यांच्या मनाला लागत आहेत … आणि , मी performance करताना अस ठरवलच नाही कि , समोर बसलेल्या प्रेक्षकांना बोलायचं आहे मी मंचावर उभा राहिल्यानंतर हातात हात घालून मंच्याकडे पाहत आहे … डोळ्यासमोर काहीस अंधुक अंधुक होवून माझ्या मनातील एक मन हे प्रेक्षकांमध्ये जाउन बसल आणि त्या मनाशी संवाद साधत आहे अस जाणवू लागल ….मंचावर अगदी सहज येवून उभा राहिलो … पाहिलं audience च्या डोळ्यात त्या नंतर त्यांच्या डोळ्यातील भाव एक एक धागा मिळवून देऊ लागले … या performance मध्ये मी एवढा तल्लीन आणि alert झालो कि , माझ्या अवती भोवती होणारे आवाज होणाऱ्या हालचाली यांचा वापर हा मी संवादामध्ये करू लागलो … माझ्या मध्ये जुनून निर्माण झाला …. आवाजांचा हा विचारांप्रमाणे झालेला चढ उतार एक energy निर्माण करू लागला … सकाळ पासून माझ्या घरातून निघालेल्या जर्नी पासून समोर येणारी दृश त्या दृशांमध्ये दिसणारी सामान्य माणसाची भूमिका समजू लागली त्याच बरोबर शब्दांप्रमाणे बदललेली माझी भूमिका हि क्षणो क्षणी बदललेली वाटू लागली … अनहद नाद चा प्रावास आणि माझी सुरु असलेली वाटचाल यांची आज समग्र पद्धतीने एकरूप होवून सादर करण आणि ते होण…. हे challenge मी पूर्ण केल होत …. शरीरामध्ये होणारी हालचाल…प्रेक्षक समोर असल्याची जाणीव …निसर्गाने दिलेली साथ …. हे एकाच वेळी सुरु होत…. संहिते मधील संवाद सुरु होते त्याच वेळी सामन्य हा शब्द आल्यानंतर … कुत्रे भुंकण्याचा झालेला आवाज हा अगदी जुळून येत होता … अनहद नाद मधील माझी भूमिका आजच्या performance मधून दिसू लागली …. कोल्हापूर मध्ये झालेले अनहद नाद मधील performance यांनी माझी ऊर्जा आज वाढवली आहे याची जाणीव होऊ लागली ….माझा performance झाल्यानंतर प्रेक्षकांच्या आलेल्या प्रतिक्रिया या ‘’ रोम रोम खिल उठा अंगावर शहारे आले ‘’ या संवादाशी connect झाल्या होत्या …जाणवू लागलं कल्पना शक्ती हि एका जबरदस्त वेगात धावत आहे … या वेगाला एक दिशा आहे …. रंगमंचाची जोड आहे… आज माझ्या मनावर मिळवलेला विजय हे मला अति उच्य आत्मिक आनंद …विचाराना दिशा देऊन जमिनीवर आणल्याच सुख आणि ख़ुशी …. देत आहेत …हा क्षण मला लिहिण्यास प्रवृत्त करत आहे बस लिहत जावे …. शब्द , विचार यांचा समुद्र हा डोळ्यासमोर आहे आणि मी त्याच्यात माझी बोट घेवून उभा आहे …हे चित्र मला दिसू लागले ….
खूप छान मित्रा..
ReplyDeletethank you shashank
ReplyDeleteGood! Keep it up Tushar!
ReplyDelete