Tuesday 1 January 2019

3 जानेवारी 2019 , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती च्या निमित्ताने थिएटर ऑफ रेलेवन्स चे रंगकर्मी "चला शोधू स्वतःतील सावित्री

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मरण करताना आठवण येते ती त्यांच्या संघर्षाच्या लढाईची ....
त्यांच्या जगण्याचा उद्देश एकच , मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळावा... या एकाच ध्येयाने झपाटून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाज निर्माणासाठी समर्पित केले. आज आम्ही शोधली आहे सावित्री आमच्या आत, कलेच्या माध्यमातून आम्ही सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे घेऊन जात आहोत. जीवनासाठी कला, परिवर्तनासाठी कला या ध्येयाने आम्ही कलाकार समाजातील विभिन्न स्तरांतील मुद्यांवर - समस्यांवर कलेच्या म्हणजेच नाटकाच्या माध्यमातून प्रस्तुती करतो आणि परिवर्तनासाठी प्रेरित करतो.


रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक – “मैं औरत हूँ !” – आपल्या असण्याची , त्याला स्वीकारण्याची आणि आपल्या "अस्तित्वाला" विभिन्न स्वरूपात पडताळण्याची , शोध घेण्याची एक यात्रा आहे. नाटक ‘मैं औरत हूँ!’ पितृसत्तात्मक भारतीय समाजाची मानसिकता , बंधन , परम्परा , समज यांना मुळापासून नाकारते आणि त्यांना खुले आवाहन देऊन स्वतःचे ‘स्वतंत्र मानवीय अस्तित्व’ स्वीकारते . हे नाटक महिला व पुरुषाला बरोबरीच्या आरशात न पाहता ‘स्त्री’ च्या ‘स्वतंत्र मानवीय अस्तित्वाला' रेखांकित आणि अधोरेखित करते.



हे नाटक ‘कलाकार आणि प्रेक्षकां’ साठी आत्म मुक्ततेचं माध्यम आहे. नाटकात अभिनय करताना ‘जेंडर समानता’ च्या संवेदनशीलतेशी कलाकार एकरूप होतात आणि नाटक बघताना ‘प्रेक्षक’ ‘जेंडर बायस’ या अविर्भावा पासून मुक्त होतात . नाटक ‘मैं औरत हूँ’ कलाकार आणि प्रेक्षकांवर अद्भुत प्रभाव पाडते. ‘नारी’ मुक्ति का बिगुल बजा त्याला आपल्या ‘अधिकारा’ साठी संघर्ष करण्यासाठी प्रेरित करून ‘सक्षम’ करते .3 जानेवारी 2019 , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती च्या निमित्ताने थिएटर ऑफ रेलेवन्स चे रंगकर्मी "चला शोधू स्वतःतील सावित्री !" हा विचार घेऊन , साप्ताहिक महोत्सव सादर करू इच्छित आहेत. 3 ते 9 जानेवारी दरम्यान सादर होणाऱ्या या नाट्यमालिकेत " मैं औरत हूँ " हे नाटक प्रस्तुत केले जाईल.


आपण समाजात परिवर्तना साठी पुढाकार घ्यावा आणि या मालिकेत आपला सहयोग असावा,
आपल्या परिवारासाठी, समाजातील अर्ध्या लोकसंख्येचा आवाज उठवण्यासाठी हा प्रयोग आपण मिळून आयोजित करावा,
असे स्वप्न आपण एकत्र पाहुयात.. आणि ते साकार करूयात.

No comments:

Post a Comment