विचार कधीच मरत नाहीत ... विचार हे जीवंत असतात... असं बोललं जात व्यक्ती शरीर रूपाने मरतो. पण, ज्यावेळी तो विचारांना घेऊन जगतो... त्यावेळी ,तो नसतानाही समाजात जीवंत राहतो. क्रांती ज्योत सावित्रीबाई फुले आज विचार आहेत.. कारण , त्या विचारांना घेऊन जगल्या आणि मुलींसाठी पहिली शाळा काढली. विचारांची ज्योत त्यांनी आपल्या समाजात पेटवली.
सावित्रीबाई फुले आज एक विचार म्हणून मी पाहू लागलो. तीन वर्षांपासून " आपल्या अस्तित्वाची पाऊल वाट " निर्माण करणारे रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिगदर्शित नाटक " मैं औरत हूँ " खरोखर आज एक विचार निर्माण करणार ठरलं आहे.
सावित्रीबाई फुले जयंती साजरी करणे हा उद्देश घेऊन ज्यावेळी , मी आणि माझी जीवनसाथी स्वाती वाघ विदर्भ विद्या मंदिर ह्या माझ्या शाळेतील संस्थेचे सचिव वीरेंद्र गुल्हाणे यांच्या समोर प्रास्तावित केलं...त्यावेळी, त्यांनी या विचारांना गती दिली आणि तेव्हा पासून ह्या नाटकाचे प्रयोग दरवर्षीप्रमाणे आता ही होत आहे... ह्या तीन वर्षात मी बदल पाहत आहे अनुभवत आहे. तो असा , शाळेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती ही एक "विचार "निर्माण होण्याचं केंद्र बिंदू ठरली आहे.
आज नाटक पाहत असताना नाटकातील विचार हे शाळेतील विद्यार्थ्यांना समजत आहेत आणि जगत आहेत. म्हणूनच, नाटक संपल्यानंतर एक प्रेक्षक म्हणून विद्यार्थ्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
हाच आहे सावित्रीबाई फुले यांचा विचार पुढाकार घेण्याचा तो हे विद्यार्थी जगत आहेत.
नाटकाची प्रस्तुती ही माझ्यासाठी महत्वाची भूमिका होती. कारण, नाटक सुरू होण्याअगोदर प्रेक्षकांबरोबर "रंगकर्मी " म्हणून केलेला संवाद हा खूपच महत्वाचा होता. नाटका अगोदर केलेला संवाद माझ्यासाठी मी जगत असणाऱ्या विचारांची अभिव्यक्तीच आहे. हे मला जाणवत होते.
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताने माझ्या विचारांत केलेला हा मोठा आमूलाग्र बदल होता. माझी दृष्टी , माझी वागण्याची पद्धत ही आता माणसाप्रमाणे दिसत होती. कारण, ह्या नाट्यसिद्धांताने माझ्यातील " मर्द " वाली मानसिकता तोडून ... एक संवेदनशील व्यक्ती म्हणून माझी केलेली नवीन रचना ही खूप महत्वाची होती. मला कोणी विचारले नाटकाने तुला काय दिले तर माझं उत्तर त्यावेळी मला जीवन दिले. ज्यावेळी, मी रंगकर्मी म्हणून संवाद करू लागलो. त्यावेळी, माझ्यासमोर कोण छोटा कोण मोठा असा काहीच भेदभाव नव्हता ... माझ्यासाठी होतं ते फक्त मी रंगकर्मी आहे ...समोर असणारा माझं नाटक पाहत असणारा प्रेक्षक ...मला ह्या प्रेक्षकाबरोबर संवाद साधायचा आहे. त्याच पद्धतींने मी सुरुवात केली..
नाटक सादर होत असताना जाणवत होते...प्रेक्षकांची एकाग्रता व नाटकातील विचार हे प्रेक्षकांच्या मनात असणाऱ्या अंतर्गत संवादांना दिशा देत होते . डोळ्यात पाणी आणि विचारांत मोकळे पणा हे नाटक सम्पल्यानंतर मिळालेले पुष्पगुच्छच होते...
250 प्रेक्षक वर्ग होता त्यामध्ये , 80 % विद्यार्थी होते . पालक ,शिक्षक मान्यवर आणि राजकीय नेते...प्रेक्षकांचा प्रतिसाद ऐकल्यानंतर जाणवले... तीन वर्षांपासून आपण जे विचार पेरत आहोत.. त्यामध्ये, असणारी gravity जी आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहे. चालण्यात , वागण्यात,बोलण्यात आलेला धीट पणा ... येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्याची कल्पकता... वाह ! समाधान वाटले करत असणाऱ्या कर्माचे ह्या रंगकर्माचे....
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत माझ्या आत सावित्रीबाई फुले यांचे दृष्टिगत विचार हे निर्माण केले आहेत.
"विचार प्रेरणा नाट्य जागर"
थियेटर ऑफ रेलेवंस अभ्यासक आणि शुभचिंतक सादर करीत आहेत.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रेरणा नाट्य जागर
३ ते १६ जानेवारी, २०१९ दरम्यान सादर होणार आहे,
रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित - दिग्दर्शित नाटक
" मैं औरत हूँ "
क्रांती ज्योत सावित्री बाई फुले जयंती निमित्त
"चला शोधू स्वत:तील सावित्री"
कलाकार :- अश्विनी नांदेडकर, सायली पावसकरआणि कोमल खामकर
रंगकर्मी
तुषार म्हस्के
Very nice thoughts 👍👍
ReplyDeleteThank you ! so much
Delete