Tuesday 8 January 2019

सत्तेत आल्यानंतर कोणती ही गुर्मी नेत्यांना चढते हा प्रश्न आहे. -तुषार म्हस्के


वाह ! शिक्षण मंत्री वाह ... 

तुमची प्रतिक्रिया म्हणजे याच्यावर काहीच बोलू नये असं वाटत ...सत्तेत आल्यानंतर कोणती ही गुर्मी नेत्यांना चढते हा प्रश्न आहे. अमरावती मध्ये बोलताना आपण बोललात. " गरिबांच्या मुलांना झेपत नसेल तर शिक्षण घेऊ नये. त्यांनी काम करावे.."
काय निषेध करायचा ? काय बोलायचा हा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. शिक्षण मंत्री म्हणून आपली भूमिका ही खूप भयानक आहे




एका बाजूला एक प्रशासन होते. जे सर्व शिक्षा अभियान लागू करत होते. आता एक प्रशासन आहे . जे फक्त पैसे वाल्यांनी शिकावं आणि बाकीच्यांनी फक्त काम करावे
आपली नीती ही स्पष्ट याच्यातून दिसते . जो गरीब रेषेखाली जन्माला आलाय त्याने गरीब म्हणून मरायचं.
म्हणजे, पुन्हा तीच गुलामगिरी करायची...कुठे समाज निर्माण करण्यासाठी ज्योतीबा फुले कार्य करत होते.. कुठे सावित्रीबाई फुले एक विचार घेऊन समाज बदलण्यासाठी कार्य करत होते. ज्यावेळी , काहीच नव्हतं त्यावेळी ,त्यांनी त्या काळी विश्व निर्माण केलं. आता सर्व " विकसित "राष्ट्रात असूनही सर्व काही शून्य... ज्याठिकाणी कर्माने माणूस घडत होता . तो आता कर्म सोडून पुन्हा जन्माला कुठे होतोय कोणाच्या घरी होतोय. त्याच्यावर ठरवणार आणि दोष कर्माला देणार
शासन हे नफा कमवण्यासाठी नसत. प्रशासन सोयी सुविधा देण्यासाठी असत. हे समजणे गरजेचे आहे. जनता ही गोष्ट ठरवून ज्यावेळी,मार्ग काढेल त्यावेळी,असे वक्तव्य नेते मंडळी करताना विचार करतील
राजकारण हे पोट भरण, मलाई खाणं हा प्रकार नाही आहे.जनतेला आवश्यक सोयी सुविधा मिळवून देणे आणि जनकल्यानासाठी योजना निर्माण करण्यासाठी असतो. हे का ? हे नेते मंडळी विसरतात .. हा पडलेला प्रश्न आहे
विनोद जी तावडे आपल्या हातात सत्ता आहे .त्या सत्तेचं तुम्ही काय करताय.हा माझा व्यक्तिगत प्रश्न नाही आहे. हा प्रश्न आहे. एक जबाबदार शिक्षण मंत्री म्हणून आपण आपली नीती फक्त पैसे वाल्यांसाठी बनवत आहात
तुमच्या एका वाक्यातून स्पष्ट दिसून येते ...मी कोणाच्या घरी जन्म घेतोय. हे ठरवत माझं भविष्य काय आहे ते
हा प्रश्न पडला आहे . हे प्रशासन जनतेचे आहे की, श्रीमंत लोकांचे हे एक कोढ आहे.

रंगकर्मी 

तुषार म्हस्के


No comments:

Post a Comment