Friday, 4 January 2019

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत माझ्या आत सावित्रीबाई फुले यांचे दृष्टिगत विचार हे निर्माण केले आहेत...तुषार म्हस्के


विचार कधीच  मरत नाहीत ... विचार हे जीवंत असतात... असं बोललं जात व्यक्ती शरीर रूपाने मरतो. पण, ज्यावेळी तो विचारांना घेऊन जगतो... त्यावेळी ,तो नसतानाही समाजात जीवंत राहतो. क्रांती ज्योत सावित्रीबाई फुले आज विचार आहेत.. कारण , त्या विचारांना घेऊन जगल्या आणि मुलींसाठी पहिली शाळा काढली. विचारांची ज्योत त्यांनी आपल्या समाजात पेटवली.




सावित्रीबाई फुले आज एक विचार म्हणून मी पाहू लागलो. तीन वर्षांपासून " आपल्या अस्तित्वाची पाऊल वाट " निर्माण करणारे रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिगदर्शित नाटक " मैं औरत हूँ " खरोखर आज एक विचार निर्माण करणार ठरलं आहे




सावित्रीबाई फुले जयंती साजरी करणे हा उद्देश घेऊन ज्यावेळी , मी आणि माझी जीवनसाथी स्वाती वाघ विदर्भ विद्या मंदिर ह्या माझ्या शाळेतील संस्थेचे सचिव वीरेंद्र गुल्हाणे यांच्या समोर प्रास्तावित केलं...त्यावेळी, त्यांनी या विचारांना गती दिली आणि तेव्हा पासून ह्या नाटकाचे प्रयोग दरवर्षीप्रमाणे आता ही होत आहे... ह्या तीन वर्षात मी बदल पाहत आहे अनुभवत आहे. तो असा , शाळेमध्ये सावित्रीबाई फुले जयंती ही एक "विचार "निर्माण होण्याचं केंद्र बिंदू ठरली आहे





आज नाटक पाहत असताना नाटकातील विचार हे शाळेतील विद्यार्थ्यांना समजत आहेत आणि जगत आहेत. म्हणूनच, नाटक संपल्यानंतर एक प्रेक्षक म्हणून  विद्यार्थ्यांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
हाच आहे सावित्रीबाई फुले यांचा विचार पुढाकार घेण्याचा तो हे विद्यार्थी जगत आहेत

नाटकाची प्रस्तुती ही माझ्यासाठी महत्वाची भूमिका होती. कारण, नाटक सुरू होण्याअगोदर प्रेक्षकांबरोबर "रंगकर्मी " म्हणून केलेला संवाद हा खूपच महत्वाचा होता. नाटका अगोदर केलेला संवाद माझ्यासाठी मी जगत असणाऱ्या विचारांची अभिव्यक्तीच आहे. हे मला जाणवत होते
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताने माझ्या विचारांत केलेला हा मोठा आमूलाग्र बदल होता. माझी दृष्टी , माझी वागण्याची पद्धत ही आता माणसाप्रमाणे दिसत होती. कारण, ह्या नाट्यसिद्धांताने माझ्यातील " मर्द " वाली मानसिकता तोडून ... एक संवेदनशील व्यक्ती म्हणून माझी केलेली नवीन रचना ही खूप महत्वाची होती. मला कोणी विचारले नाटकाने तुला काय दिले तर माझं उत्तर त्यावेळी मला जीवन दिले. ज्यावेळी, मी रंगकर्मी म्हणून संवाद करू लागलो. त्यावेळी, माझ्यासमोर कोण छोटा कोण मोठा असा काहीच भेदभाव नव्हता ... माझ्यासाठी होतं ते फक्त मी रंगकर्मी आहे ...समोर असणारा माझं नाटक पाहत असणारा प्रेक्षक ...मला ह्या प्रेक्षकाबरोबर संवाद साधायचा आहे. त्याच पद्धतींने मी सुरुवात केली..



नाटक सादर होत असताना जाणवत होते...प्रेक्षकांची एकाग्रता  नाटकातील विचार हे प्रेक्षकांच्या मनात असणाऱ्या अंतर्गत संवादांना दिशा देत होते . डोळ्यात पाणी आणि विचारांत मोकळे पणा हे नाटक सम्पल्यानंतर मिळालेले पुष्पगुच्छच होते... 

250 प्रेक्षक वर्ग होता त्यामध्ये , 80 % विद्यार्थी होते . पालक ,शिक्षक मान्यवर आणि राजकीय नेते...प्रेक्षकांचा  प्रतिसाद ऐकल्यानंतर जाणवले... तीन वर्षांपासून आपण जे विचार पेरत आहोत.. त्यामध्ये, असणारी gravity जी आज प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये दिसत आहे. चालण्यात , वागण्यात,बोलण्यात आलेला धीट पणा ... येणाऱ्या प्रश्नांना उत्तर देण्याची कल्पकता... वाह ! समाधान वाटले करत असणाऱ्या कर्माचे ह्या रंगकर्माचे....
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत माझ्या आत सावित्रीबाई फुले यांचे दृष्टिगत विचार हे निर्माण केले आहेत


"विचार प्रेरणा नाट्य जागर"
थियेटर ऑफ रेलेवंस अभ्यासक आणि शुभचिंतक सादर करीत आहेत.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले विचार प्रेरणा नाट्य जागर
ते १६ जानेवारी, २०१९ दरम्यान सादर होणार आहे
रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित - दिग्दर्शित नाटक
" मैं औरत हूँ
क्रांती ज्योत सावित्री बाई फुले जयंती निमित्त
"चला शोधू स्वत:तील  सावित्री"
कलाकार :- अश्विनी नांदेडकर, सायली पावसकरआणि कोमल खामकर

रंगकर्मी 
तुषार म्हस्के

Tuesday, 1 January 2019

3 जानेवारी 2019 , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती च्या निमित्ताने थिएटर ऑफ रेलेवन्स चे रंगकर्मी "चला शोधू स्वतःतील सावित्री

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना स्मरण करताना आठवण येते ती त्यांच्या संघर्षाच्या लढाईची ....
त्यांच्या जगण्याचा उद्देश एकच , मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळावा... या एकाच ध्येयाने झपाटून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाज निर्माणासाठी समर्पित केले. आज आम्ही शोधली आहे सावित्री आमच्या आत, कलेच्या माध्यमातून आम्ही सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे घेऊन जात आहोत. जीवनासाठी कला, परिवर्तनासाठी कला या ध्येयाने आम्ही कलाकार समाजातील विभिन्न स्तरांतील मुद्यांवर - समस्यांवर कलेच्या म्हणजेच नाटकाच्या माध्यमातून प्रस्तुती करतो आणि परिवर्तनासाठी प्रेरित करतो.


रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक – “मैं औरत हूँ !” – आपल्या असण्याची , त्याला स्वीकारण्याची आणि आपल्या "अस्तित्वाला" विभिन्न स्वरूपात पडताळण्याची , शोध घेण्याची एक यात्रा आहे. नाटक ‘मैं औरत हूँ!’ पितृसत्तात्मक भारतीय समाजाची मानसिकता , बंधन , परम्परा , समज यांना मुळापासून नाकारते आणि त्यांना खुले आवाहन देऊन स्वतःचे ‘स्वतंत्र मानवीय अस्तित्व’ स्वीकारते . हे नाटक महिला व पुरुषाला बरोबरीच्या आरशात न पाहता ‘स्त्री’ च्या ‘स्वतंत्र मानवीय अस्तित्वाला' रेखांकित आणि अधोरेखित करते.



हे नाटक ‘कलाकार आणि प्रेक्षकां’ साठी आत्म मुक्ततेचं माध्यम आहे. नाटकात अभिनय करताना ‘जेंडर समानता’ च्या संवेदनशीलतेशी कलाकार एकरूप होतात आणि नाटक बघताना ‘प्रेक्षक’ ‘जेंडर बायस’ या अविर्भावा पासून मुक्त होतात . नाटक ‘मैं औरत हूँ’ कलाकार आणि प्रेक्षकांवर अद्भुत प्रभाव पाडते. ‘नारी’ मुक्ति का बिगुल बजा त्याला आपल्या ‘अधिकारा’ साठी संघर्ष करण्यासाठी प्रेरित करून ‘सक्षम’ करते .3 जानेवारी 2019 , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती च्या निमित्ताने थिएटर ऑफ रेलेवन्स चे रंगकर्मी "चला शोधू स्वतःतील सावित्री !" हा विचार घेऊन , साप्ताहिक महोत्सव सादर करू इच्छित आहेत. 3 ते 9 जानेवारी दरम्यान सादर होणाऱ्या या नाट्यमालिकेत " मैं औरत हूँ " हे नाटक प्रस्तुत केले जाईल.


आपण समाजात परिवर्तना साठी पुढाकार घ्यावा आणि या मालिकेत आपला सहयोग असावा,
आपल्या परिवारासाठी, समाजातील अर्ध्या लोकसंख्येचा आवाज उठवण्यासाठी हा प्रयोग आपण मिळून आयोजित करावा,
असे स्वप्न आपण एकत्र पाहुयात.. आणि ते साकार करूयात.

Sunday, 23 December 2018

" सरकारचा दुटप्पीपणा ...तुषार म्हस्के "

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब जरा विचार करा ..” शेतकऱ्यांनी ऊस लावू नका, साखरेचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. ती आणखी जास्त झाली तर ती समुद्रात टाकण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे सांगली येथे बोलताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान ह्या देशात साखर जास्त झाल्यामुळे पाकिस्तानने साखर भारतात निर्यात केली . पण, आपल्या भारतात असणार प्रकरण उलट आहे. इथे उत्पन्न झाल्यावर शेतकऱ्यांना उत्पन्न बदलण्याचा सल्ला  आपण देतात.

एका बाजूला हिंदू राष्ट्रवाद , दुसऱ्या बाजूला पाकिस्तान हा दुश्मन आणि मागून हात मिळवणी. चांगल आहे जनता आपली मुर्खासारखी राष्ट्रभक्ती च्या नावाखाली एकमेकांच्या मानेवर सुरी आणि चाकू ठेवते.



साखरेच प्रमाण जास्त होणारच ना !  गडकरी साहेब कारण  , केंद्र सरकारने जास्त प्रमाणात साखर पाकिस्तान हून मागवली आहे. म्हणजे बळीराजाच्या हक्काच्या नावाने अनेक योजना आणायच्या दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच पिक व्यवस्थित झाल्यावर बाहेरच्या देशातून भारतात माल मागवायचा म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हामि भाव कसा मिळेल. पिक चांगल येत नाही म्हणून मारामार आणि पिक चांगलं झाल्यावर सरकारचा मार .

साखरेचा साठा मोठ्या प्रमाणात झाला हि , काही शेतकऱ्यांची चूक नाही  . ह्यावेळी , शक्य होत साखरेला योग्य भाव मिळेल.केंद्र सरकारने साखर  पाकिस्तानातून आणण्याची गरज नव्हती. सर्जिकल स्ट्राईक चा वर्धापन साजरे करणारे सरकार पुन्हा पाकिस्तानातून साखर निर्यात करते. जनतेची राष्ट्रवादाच्या नावाखाली दिशाभूल करायची आणि मित्रता शासनाने जोपासायची.

दिनांक २३ डिसेम्बर, २०१८ ला सांगली येथे झालेल्या नितीन गडकरी यांच्या भाषणात आलेला साखरे बाबत विषय हा न पटणारा वाटतो . कारण ,  शासनाची जबाबदारी आहे भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण. इथे , भूमिपुत्र राहतात बाजूला आणि सल्ले मिळतात कारण नसताना ....

रंगकर्मी 
तुषार म्हस्के

Tuesday, 18 December 2018

आयुष्यात जगलेल्या क्षणांना पुन्हा त्यांच्यातील सूत्र शोधण्याची दृष्टी थिएटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांताने मला दिली.. तुषार म्हस्के

                                         

मी माझ्या guts  फीलिंग ला घेऊन स्वतः च अस्तित्व निर्माण करण्याचा प्रश्न   माझ्या डोळ्यासमोर आणला.. जगावेगळं जगण्याचा विचार करणारे कमी असतात .. अशा ह्या खडतर वाटेवर चालण्याचा निर्णय मी  घेतला. माहिती नव्हतं रस्ता काय आहे? हा रस्ता मला कुठे घेऊन जाणार आहे . काय होणार आहे माझ्या सोबत ... काहीच नव्हतं माहित मला त्या क्षणी ...
नाही .. मला जगायचं आहे .. मला माझे अस्तित्व निर्माण करायचं आहे... माझी ओळख मला बनवायची आहे...खानदानात कोणी केलं नाही ते काम मला करायचं आहे... माझं व्यक्तिमत्व मला निर्माण करायचं आहे. काय होतं त्यावेळी माझ्याकडे , जिद्द ? हो  फक्त आणि फक्त जिद्द !!!... तो madness
वेड्या सारखा स्वतःचा शोध घेण्याची सुरवात झाली... बेधुंद काम करत असताना ... एवढंच माहित होत... रंगकर्म मला येत नाही... ह्याचा अर्थ मला ते आयुष्यभर तसेच न येत असल्याचा शिक्का तर लावायचा नाही... मला उठायचं आहे. मला करायचं आहे . मला शोधायचं आहे...मला माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे..
प्रस्थपित सत्तेला आवाहन देत ...स्वतःच्या आत असणाऱ्या रंगांना शोधण्यात माझं ध्येय माझ्या डोळ्यासमोर येऊन उभे राहिले...
" हो मी मान्य करतो मला काहीच येत नव्हतं ... रंगमंचाची ओळख मला काहीच माहित नव्हतं...



ती रात्र आठवते... त्या रात्री मी गहिवरलेल्या डोळ्यांनी  मंचावर प्रवेश केला ...माझ्या कानावर आवाज येऊन पडला " स्वागतम , सुस्वागतम .... या विश्वाच्या रंगमंचावर तुझं स्वागत आहे... अरे , वेड्या बघतोस काय .. चल पाऊल टाक पुढे ... डोळ्यातून एक - एक थेंब पाणी पडत होते... पुन्हा आवाज येऊ लागला  मी इकडे - तिकडे पाहू लागलो.. अरे, वेड्या इकडे - तिकडे पाहतोस काय... हा रंगमंच तुझं स्वागत करतोय " काय होता तो आवाज ... कोणाचा होता तो आवाज ... जो माझ्यातील कलाकाराचं स्थायी अस्तित्व टिकवून ठेवतोय ...जो सतत मला निष्क्रिय क्षणाची जाणीव करून देतोय. जो तेवत ठेवतोय ज्योत माझ्यातील कलेची ,  माझ्या अस्तित्वाची !!! हो , मी शोधतोय माझ्यातील ... कलागुण ... माझ्यातील साधना ... ज्या साधनेने माझ्यातील व्यक्ती आणि कलाकार ह्या दोघांना निर्माण केले.. प्रेरणेंच्या झोतात निर्माण केलेल्या माझ्यातील विचारांना ... Decode करतोय माझी लाईफ जी मी जगलेलो... शोधतोय ते सूत्र ज्या सूत्रांनी माझ्यातील अस्तित्व निर्माण केलेलं...
आयुष्यात जगलेल्या क्षणांना पुन्हा त्यांच्यातील सूत्र शोधण्याची दृष्टी थिएटर ऑफ  रेलेवंस नाट्य सिद्धांताने मला दिली..




दिनांक 15 ते 17 डिसेंम्बर ,2018
युसूफ मेहरअली सेंटर, पनवेल
उत्प्रेरक :- मंजुल भारद्वाज

तुषार म्हस्के

Monday, 3 December 2018

रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य तत्वज्ञानाने मराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया!
- योगिनी चौक


मराठी रंगभूमीवर विविध नवनवीन प्रयोग सातत्याने होत असताना 'वैचारिक मूल्य' रुजवणारी व्यावसायिक नाटके असावीत हे स्वप्न मी चार वर्षांपूर्वी पाहिले... 



मी व्यावसायिक नाटकांत काम करत असताना आजूबाजूलाकॉमेडी नाटकेच चालतात”, “फेस व्हॅल्यू असणारे कलाकारच हवेत”, “वैचारिक वगैरे ते प्रायोगिक वाले बघून घेतील, आपण धंदा पाहावाअशा विचारसरणीचे वातावरण दिसले. नाटकांचे विषय देखील बहुतांशी नवरा, बायको, लग्न, दारू... याच विषयांभोवती फिरत होते, नाटकांत, प्रामुख्याने व्यावसायिक पातळीवर वैचारिक दर्जा कसा निर्माण करता येईल आणि तो टिकून कसा राहिल या विचारातूनच मराठी रंगभूमी वर रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित "अनहद नाद - Unheard Sounds Of Universe" हे बहुभाषिक नाटक आले आणि गेल्या साडे तीन वर्षांपासून सतत या नाटकाचे प्रयोग होत आहेत.


सतत साडे तीन वर्षे सातत्याने मराठी व्यावसायिक रंगभूमीवर वैचारिक नाटकांचे प्रयोग करून मराठी रंगभूमी वरील पाच प्रतिबद्ध युवा कलाकारांनी हे शिवधनुष्य कोणत्याही निर्मात्याची मदत घेता किंवा कोणतीही सरकारी वा निमसरकारी ग्रांट घेता, कुठलीही स्पॉन्सरशीप स्वीकारता केवळ जनसहयोगाने नाट्य प्रयोग सुरु ठेऊन कला उद्योजकतेचा नवा पाया रचला आहे.



थिएटर ऑफ रेलवन्स या नाट्य तत्वाला 25 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने रंगचिंतक मंजुळ भारद्वाज लिखित दिग्दर्शित नाटकांचा नाट्य महोत्सव संपूर्ण वर्षभर उत्सव स्वरूपात साजरा करण्यात आला. देशाची राजधानी दिल्ली पासून सुरू झालेला हा नाट्य महोत्सव आर्थिक राजधानी मुंबई ते ठाणे व्हाया पनवेल सांस्कृतिक राजधानी पुणे असा प्रवास करत सुरू आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे नुसतं एखाद दुसरा प्रयोग करून ही नाटके थांबली नाहीत तर सतत सातत्याने या क्लासिक नाटकांचे प्रयोग होत आहेत आणि नुसते प्रयोगच नाही तर नाट्य महोत्सव साजरे होत आहेत

पूर्वी होत असलेल्या आणि आता लोप पावत चाललेल्या वेळेचा सदुपयोग ही या महोत्सवाच्या काळात करण्यात आला तो म्हणजे मुंबई तील दादर शिवाजी मंदिर येथील नाट्य महोत्सवात तिन्ही दिवस लागोपाठ सकाळी 11वाजता नाट्य प्रयोग सादर झाले आणि ते देखील शनिवार रविवार नसताना मधल्या दिवसांत! आणि या महोत्सवात तिन्ही दिवस प्रेक्षक उपस्थित होते

वेळ सकाळची असो, दुपारची असो वा प्राईम टाइम प्रत्येक स्लॉट वापरून पाहिला आणि उत्तम वैचारिक नाटक पाहण्यासाठी कोणताहीस्लॉटमहत्वाचा नसूनविचारमहत्वाचा आणि तो ऐकण्यासाठी सकाळी 7 च्या प्रयोगाला ही वेळेवर हजर राहणारे प्रतिबद्ध प्रेक्षक आम्हांला लाभले.




नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर प्रेक्षक संवाद या प्रक्रियेत असताना प्रेक्षक व्यक्त होत की, “ही नाटके म्हणजे वैचारिक औषध आहे.” आणि औषध घ्यायला आपण मेडिकल मध्ये जसे रात्री 2 वाजता ही जातो तसे हे वैचारिक औषध सकाळच्या प्रयोगातून घेतल्यास दिवसभर त्या विचाराचे मनन होत राहते दुसऱ्या दिवशी त्या विचारला पुढे नेणारी श्रुंखला अनुभवायास मिळते. अशा प्रकारे हा तीन दिवसीयवैचारिक नाट्य डोसमाणूस म्हणून जगण्याचे विचार पेरण्यास प्रतिबद्ध असतो. “ही नाटके काळाची गरज आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहेअसेही मत एकमताने समोर आले.
दिल्ली, मुंबई आणि पुणे येथील महत्वाच्या व्यावसायिक नाट्यगृहात थियेटर ऑफ रेलेवन्स या नाट्य तत्वावर आधारित तीन दिवसीय नाट्य महोत्सवात लागोपाठ तीन वैचारिक आणि क्लासिक नाटकांचे प्रयोग झाले

गर्भ, अनहद नाद आणि न्याय के भंवर में भंवरी!

1. आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात मनुष्य रुपी देहांत 'माणुसकीला' शोधणारे नाटकगर्भ

2. खरेदी आणि विक्री च्या काळात कलाकारांना वस्तुकरणातून उन्मुक्त करणारे नाटक
अनहद नाद – Unheard Sounds of Universe”
आणि 
)अर्ध्या लोकसंख्येचा आवाज. पितृसत्तात्मक व्यवस्थेच्या शोषणा विरुद्ध हुंकार, न्याय आणि समतेची गाज, नाटक आहे, “न्याय के भंवर में भंवरी”!

या कलात्मक मिशनाला आपल्या कलेने मंचावर साकार करणारे कलाकार आहेत अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, बेट्सी एंड्रयूज आणि बबली रावत!
या प्रतिबद्ध युवा कलाकारांनी मराठी रंगभूमीवर वैचारिक नाटकांची नवी मुहूर्तमेढ रचली आणि त्याचे प्रयोग संवाद आणि कला उद्योजकतेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवले. प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संवाद करून त्यांना नाट्य संकल्पनेची पूर्वकल्पना दिल्याने प्रेक्षकांना पुन्हा नाटकाकडे आणि ते ही वैचारिक नाटकांकडे वळवण्यास आम्ही यशस्वी झालो आणि प्रेक्षक संवादातुन प्रेक्षकांची नाटक पाहण्याची आवड़ काय? त्यांना कशा पद्धतीचे नाटक पाहण्यात interest आहे हा एक प्रकारे सर्वे झाला आणि त्यात वैचारिक नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकच नाही तर तिकिट घेऊन पाहायला तयार आहेत हे प्रेक्षकांनीच दाखवुन दिले आणि हजेरी लावली!
या नाट्य महोत्सवला सामान्य प्रेक्षकांपासून ते जाणकारां पर्यंत अनेक मान्यवरांनी हजेरी लावली .


९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी हे थिएटर ऑफ रेलवन्स च्या कलात्मक नाट्य महोत्सवाचे कौतूक करताना लिहितात, “तीन दिवस मी अनुभवले सर्वांग सुंदर अनुभव, माणूस म्हणून उन्नत झालो, माणूस म्हणून माझी कर्तव्य काय याचं बोधीज्ञान, knowledge मला मिळालं आणि हाच तर कलेचा हेतू!”
कला ही केवळ मनोरंजना इतकीच मर्यादित पाहता मनोरंजन ते परिवर्तन असा प्रवास थिएटर ऑफ रेलवन्स तत्वज्ञानावर आधारित मंजुळ भारद्वाज लिखित नाटके करत असतात आणि कोणत्याही राजाश्रयावर अवलंबून राहता संवादाच्या माध्यमातून जन सहयोगाने ही नाटके समाजात नवं परिवर्तन घडवून आणत आहेत !


Friday, 30 November 2018

मराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांची सुरुवात माझ्या "अनहद नाद - Unheard Sounds of Universe" या वैचारिक नाटकाने ! ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी यांची निवड झाली त्याबद्दल त्यांचे "थिएटर ऑफ रेलेवंस" नाट्य सिद्धांताच्या अभ्यासकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन आणि त्यांनी घेतलेली वैचारिक नाटकाची नोंद म्हणून त्यांचा हा लेख..


कलेचा हेतू... मानवी उन्नयन

- प्रेमानंद गजवी







थिएटर ऑफ रिलेवन्स ही संकल्पना घेऊन रंगकर्मी मंजुल भारद्वाज हे गेली २५ वर्षे देश आणि परदेशात नाटकं करत आहेत. आपल्या संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त त्यांनी नुकताच एक नाट्यमहोत्सव मुंबईत भरवला होता, त्याचा वेध-

एखादी नाट्यसंस्था पंचवीस वर्ष टिकून राहणं ही मोठी नवलाईची गोष्ट आहे, आजच्या काळात! बरेचदा ग्रुप तयार होतो आणि त्याचवेळी तो तोडता कसा येईल याचा विचार एखादा न्रतद्रष्ट मेंदू करीत असतो. असा कुणी 'थिएटर ऑफ रेलेवन्स' मधे नसेलच असं खात्रीपूर्वक नाही सांगता येत पण असं संकट येताना दिसलं तर... डोळ्यातलं 'कुसळ' अलगद दूर करून आपलं ध्येय कौशल्यानं पुढे नेणं, हे महत्त्वाचं, आणि ध्येय काय? तर कलेनं केवळ कलेसाठीच न राबता समाजासाठी कष्टरत होऊन त्यांच्या जीवनाचा एक भाग होणं, हे आजच्या केवळ पैशांचा विचार करीत असलेल्या जगात केवढं कठीण!

पण मंजुल भारद्वाज हा एक असा रंगकर्मी... खरं तर प्रथम लेखक... असा लेखक, ज्याची लेखक-नाटककार म्हणून स्वतःची एक दृष्टी आहे. म्हणूनच तो 'कलेसाठी कला' या सूत्रात अडकून पडला नाही तर 'जीवनासाठी कला' असा विचार करीत असतानाच त्याच्याही नकळत 'ज्ञानासाठी कला' Art for knowledgeकडे तो झेपावला आहे आणि त्यातूनच त्यानं सिद्ध केलंय, 'कला कुणाची बटीक नसते आणि बटीक असते ती कला नसते.' बटीकपण नाकारत मंजुल म्हणतो, 'कलेनं मनोरंजनाच्या सीमा तोडून जीवन कसं जगलं पाहिजे, हे सांगितलं पाहिजे' म्हणजेच जीवन कसं जगावं याचं ज्ञान (knowledge) दिलं पाहिजे कलेने आणि म्हणून तीन दिवस... दि. १५-१६-१७ नोव्हेंबर २०१७; सकाळी ११ वाजता ' थिएटर ऑफ रेलेवन्स' ची पंचवीस वर्ष अतिशय उत्साहात संपन्न होतात.

मंजुल भारद्वाज आणि त्याची टीम प्रचंड उत्साहात. पहिली बेल होते, मी थिएटरमध्ये प्रवेश करतो. थिएटर, शिवाजी मंदिर. पडदा तसा उघडाच, बेल होऊनही. दुसरी बेल... तिसरी बेल... मंजुल भारद्वाज थिएटर मध्ये प्रवेशतो. मी हात मिळवायला पुढे. मी शुभेच्छा देतो आणि इनमीन १०-१२ प्रेक्षक बघून म्हणतो, 'पैसों का क्या?' तोच धागा पकडून तो म्हणतो, 'पैशाची चिंता करत नाही, पैशाची चिंता करत बसलो तर काहीच करता येणार नाही' आणि नाटकाची रूपरेखा सांगू लागतो.

'गर्भ' लेखक/दिग्दर्शक मंजुल भारद्वाज आणि नाटकाचा विषय : माणसानं आयुष्यभर माणूसपण सिद्ध करणं. किती अवघड आहे आपल्यातील माणूसपण सिद्ध करत राहणं! अगदी झोपेत सुद्धा? झोपेचं काय, गर्भात सुद्धा आपल्या माणूसपणाची कसोटी लागते. गर्भ धारणेपासूनच गर्भावर बाह्य संस्कार होतात. म्हणजे आई जो विचार करते, तोच विचार पेरला जातो गर्भाच्या मेंदूत. माता नकारार्थी विचार करत असेल तर...किंवा माताच मनात म्हणत असेल, बाहेरचं हे जग किती क्रूर आणि त्याचवेळी गर्भाच्या मनात प्रश्न येत असेल, 'अशा क्रूर जगात मी कशाला येऊ?' तर?

इथं मी नाटकाची कथा सांगणं आणि ती तुम्ही वाचणं, एक निरर्थक वेळ दवडणं आहे. मंजुलचं निवेदन संपतं आणि मंचावर प्रवेश गर्भाचा...आणि पहिलाच हुंकार, 'कुदरत- बेमिसाल- अद्भुत. अश्विनी नांदेडकरचा तो 'हुंकार' ९० मिनिटं आपल्याला हाकारत राहतो, पण ती एकटीच नाही. सोबतीला आहेत योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के. नाटक मातेच्या गर्भातून पृथ्वीतलावर येण्यापूर्वीच कोणकोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागेल याचं दर्शन घडवंत. जग वाईट असलं तरी सुंदरही आहे, हे सांगतं. खरं म्हणजे हे शब्दांत सांगणं कमीच आहे. प्रत्यक्ष प्रयोग अनुभवणं उत्तम! विविध आकृतिबंध कलावंतांनी साकारलेले; अगदी 'गर्भाशय' देखील. प्रकाश योजनेची उत्तम सोबत, प्रकाश योजना होती असं जाणवतच नाही. तीच गत नीला भागवत यांच्या संगीताची. अरे हे मी का सांगत बसलो, 'प्रयोग अनुभवणं उत्तम' म्हटल्यावर?

दुसऱ्या दिवशी १६ नोव्हेंम्बर १७, 'अनहद नाद' म्हणजे Unheard sounds of Universe! पद्धत तीच सादरीकरणाची. पडदा उघडाच आहे आणि मंजुल भारद्वाज नाटकाची पार्श्वभूमी सांगतोय. निसर्ग विविध ध्वनींनी आपल्या आजूबाजूला वावरतो की आपण निसर्गाच्या हृदयातील विविध ध्वनींच्या सान्निध्यात जगतो? जलाशयाचं खळाळा वाहणं - त्या वाहण्याचा झुळझुळणारा अनहद ध्वनी... जगण्याचा ध्वनी, आणि हे जगणं सुंदर व्हायचं असेल तर जगण्याचाही एक अनहद ध्वनी ऐकता यायला हवा.

'गर्भ' मध्ये अश्विनी तर 'अनहद नाद' मध्ये योगिनी चौक. कमाल. त्यातील आशयसूत्रातील एक वाक्य, नव्हे निव्वळ एक शब्द... 'भागले या भाग ले'. जीवनाचं सारं सूत्र 'भागले; या भाग ले' या शब्दांत सांगितलं आहे. नाटककार एका शब्दाशी खेळून शब्द अर्थवाहित्व सिद्ध करतो. शब्दकाव्य समोर ठेवतो. गर्भ पेक्षाही हा प्रयोग विविध आकृतिबंधांनी नटला आहे, पक्ष्यांचा आवाज, शीळ, झाडाच्या फांद्यांची सळसळ, दिग्दर्शकानं आपलं सारं कसब इथं रितं केलंय. एक बारीकसा दोष या प्रयोगातील वेशभूषेतला, योगिनी चौक, कोमल खामकर, अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर सगळे अंगावर जॅकीट घालतात, तर मग तुषार म्हस्केच तेवढा का नाही? योगिनी मुख्य भूमिका जगते पण बाकीचे चौघे नसतील तर... सारं निरर्थक आहे. इतका 'एकरूप' प्रयोग आहे. सुंदर.

तिसऱ्या दिवशी 'न्याय के भंवर में भंवरी'. सादरीकरण पद्धत तशीच, पडदा उघडाच आहे. दिग्दर्शक मंजुल पार्श्वभूमी सांगतो नि प्रयोग सुरू होतो. भंवरी वर जो बलात्काराचा प्रसंग ओढवला तो आपण सारे सूज्ञ जाणतो. सर्व समान आहेत, पण काही अधिक समान आहेत. या अधिक समान घटकांतील न्यायाधीशानं समान घटकांतील भंवरीला काय न्याय दिला? 'मनू कायद्या'नुसार भंवरी वर बलात्कार झालाच नाही. स्त्री जीवनाचे सारेच दुष्टत्व. लहानपणी वडिलांच्या, मोठेपणी नवऱ्याच्या आणि म्हातारपणी मुलाच्या धाकात राहण्याची शिक्षा स्त्री भोगत असते. शहरातील शिकलेल्या स्त्रियांचं ठीक. खरंतर ठीकच. पण खेड्यातील चित्र आजही भयाण आहे. डोक्यावरचा पल्लू आजही तसाच डोक्यावर, चेहरा लपवून. बबली रावत भंवरी जगली आणि प्रत्येक स्त्री एक भंवरी आहे, हे लेखनसूत्र नजाकतीने समोर ठेवलं. हा एकपात्री प्रयोग, पण एकपात्री वाटला नाही कारण सशक्त लेखन-दिग्दर्शन आणि अभिनय.

तिन्ही दिवस निखिल आणि शिवाजी यांची प्रकाशयोजना आणि संगीताची सुंदर सोबत. तीनही दिवस प्रयोग संपल्यानंतर प्रेक्षकांना स्टेज वर बोलवून कलावंत, लेखक, दिग्दर्शक तसेच प्रकाश योजनाकार, संगीतकार आणि प्रेक्षक यांच्यात घडलेला संवाद अधिक प्रेरणादायी होता.

कला क्रांती करू शकते? थेट उत्तर 'नाही' असंच दिलं जातं पण कला लोकांना 'क्रांतिप्रवण' करू शकते, एवढं खरं. शिवाजी मंदिरमध्ये घडलेल्या या तीन दिवसीय नाट्य महोत्सवास प्रेक्षक प्रतिसाद कमी होता, पण आपली पंचवीस वर्षे पूर्ण करणं आणि त्या कौतुकलेल्या वातावरणात मंजुल भारद्वाज यांचं रंगमंचीय कर्तृत्व बघून संजय आवटे यांनी 'आचार्य' ही पदवी बहाल करणे, यातच या तीन दिवसीय महोत्सवाचं मूल्य अधोरेखित होतं.

तीन दिवस मी अनुभवले, सर्वांग सुंदर अनुभव. माणूस म्हणून उन्नत झालो. माणूस म्हणून माझी कर्तव्यं काय याचं बोधीज्ञान... knowledge मला मिळालं. हाच तर कलेचा हेतू!

https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/manjul-bhardwaj/articleshow/62096018.cms?utm_source=facebook.com&utm_medium=referral


#viral #मराठी_रंगभूमीवर_वैचारिक_मूल्यांची_सुरुवात_माझ्या_अनहद_नाद_Unheard_Sounds_of_Universe 
#manjulbhardwaj #play #premanandgajvi #maharashtratimes

हे रंगभूमी तुला हा रंगकर्मी आवाहन करत आहे...तुषार म्हस्के

रंगभूमी तुला आता सज्ज व्हायचं आहे...
निर्माण केलेल्या कलेला आणि कलाकाराला जिवंत ठेवायचं आहे...
विचारवंत कलाकारांची निर्मिती करायची आहे... 
मरगळ आलेल्या मनाला आता जाग कर,नवतेजाने पुन्हा कलेची पालवी या जनमानसात फुलवायची आहे...
बाजारीकरणाच्या या संसारात गळत असणाऱ्या तुझ्या शरीराचं विरघळण तुला थांबवायचं आहे...
नवीन उमेदीची नवीन सृष्टी अजून तुला निर्माण करायची आहे... 
तुझ्या दुखापेक्षा आठव तो क्षण ज्या क्षणी 
एका ठिकाणी शेतकरी आत्महत्या करतोय ... त्याच क्षणात निर्माण होत असणाऱ्या व्यक्तीच्या विकारांना संपवायचं आहे... 
बघ उघड्या डोळ्यांनी तो क्षण ज्या ठिकाणी एका बाजूला देवीची पूजा होते दुसऱ्या क्षणी तिच्यावर बलात्कार होतोय..त्याच विकृतीला तुला थांबवायचं आहे ...



बघ तो क्षण ज्या क्षणाला तू तरुणांना जगण्याची उमेद देतेस त्यांच्या विचारांना सकारात्मक दिशा देऊन 'वाल्याचा वाल्मिकी' बनवतेस , त्यांना मायेचा पदर देऊन एक आदर्श म्हणून डोळ्यासमोर उभं करतेस अशा असंख्य तरुणांना तुला उभं करायचं आहे...
आठव तो क्षण ज्या क्षणाला तू आपल्या अस्तित्वाच्या निर्माणासाठी लढलेली लढाई,जी महिलांना सावित्रीबाई फुले च्या ज्ञानाची ज्योत घेऊन बाहेर पडून आपल्या ध्येयाला आपल्या कलेबरोबर जोडत एक आदर्श समाज रचना करतेस " महिला वस्तू नाही मनुष्य आहे " मनुष्य म्हणून स्वीकार कर ह्या विचाराला तू रुजवतेस ... अशा असंख्य महिलांना सक्षम करून एक न्यायप्रिय समाज बनवायचा आहे ... 
बाजारीकरणाच्या चक्रव्यूहात अडकलेली रंगभूमी आणि कलाकार यांना तू उन्मुक्त केलंस आता एक नव्या उमेदीच्या नवीन रंगकर्मींची पिढी तुला तयार करायची...
तुझ्या भोवती निर्माण होणाऱ्या नकारात्मक उर्जेला तुला आपल्या कलेने सकारात्मक करायचं ... घाबरू नकोस हे " माय - रंगभूमी " एक कलाकार म्हणून रंगकर्म करण्यासाठी हा रंगकर्मी सज्ज आहे... 
असंख्य वेदना संवेदना घेऊन इच्छा पूर्ती करणारी " रंगभूमी " तुला पुन्हा नव्या थाटात उभं राहायचं आहे...
देशात निर्माण झालेल्या विकारांना संपवण्यासाठी पवित्र राजगति ची पवित्र राजनीती घेऊन जनमानसात उतरायचं आहे आणि रंगकर्माला तुला या जनमानसात अमर करायचं आहे ... 
हे रंगभूमी तू नेहमीच आपल्या commitment ला जागली आहेस... 
कलाकाराने केलेल्या इच्छेची ...तू इच्छा पूर्ती केली आहेस... 
आता तुला तुझ्या चेतनेने तुझ्या शरीरातील स्नायूंना घट्ट करून पर्वताप्रमाणे तटस्थ उभं रहायचं आहे... 
हे रंगभूमी तुला हा रंगकर्मी आवाहन करत आहे...


रंगकर्मी
तुषार म्हस्के

#रंगभूमी #नाटक #थिएटरऑफरेलेवन्स #कलाकार #विचार #प्रेरणा