मी माझ्या guts फीलिंग ला घेऊन स्वतः च अस्तित्व निर्माण करण्याचा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आणला.. जगावेगळं जगण्याचा विचार करणारे कमी असतात .. अशा ह्या खडतर वाटेवर चालण्याचा निर्णय मी घेतला. माहिती नव्हतं रस्ता काय आहे? हा रस्ता मला कुठे घेऊन जाणार आहे . काय होणार आहे माझ्या सोबत ... काहीच नव्हतं माहित मला त्या क्षणी ...
नाही .. मला जगायचं आहे .. मला माझे अस्तित्व निर्माण करायचं आहे... माझी ओळख मला बनवायची आहे...खानदानात कोणी केलं नाही ते काम मला करायचं आहे... माझं व्यक्तिमत्व मला निर्माण करायचं आहे. काय होतं त्यावेळी माझ्याकडे , जिद्द ? हो फक्त आणि फक्त जिद्द !!!... तो madness
वेड्या सारखा स्वतःचा शोध घेण्याची सुरवात झाली... बेधुंद काम करत असताना ... एवढंच माहित होत... रंगकर्म मला येत नाही... ह्याचा अर्थ मला ते आयुष्यभर तसेच न येत असल्याचा शिक्का तर लावायचा नाही... मला उठायचं आहे. मला करायचं आहे . मला शोधायचं आहे...मला माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे..
प्रस्थपित सत्तेला आवाहन देत ...स्वतःच्या आत असणाऱ्या रंगांना शोधण्यात माझं ध्येय माझ्या डोळ्यासमोर येऊन उभे राहिले...
" हो मी मान्य करतो मला काहीच येत नव्हतं ... रंगमंचाची ओळख मला काहीच माहित नव्हतं...
ती रात्र आठवते... त्या रात्री मी गहिवरलेल्या डोळ्यांनी मंचावर प्रवेश केला ...माझ्या कानावर आवाज येऊन पडला " स्वागतम , सुस्वागतम .... या विश्वाच्या रंगमंचावर तुझं स्वागत आहे... अरे , वेड्या बघतोस काय .. चल पाऊल टाक पुढे ... डोळ्यातून एक - एक थेंब पाणी पडत होते... पुन्हा आवाज येऊ लागला मी इकडे - तिकडे पाहू लागलो.. अरे, वेड्या इकडे - तिकडे पाहतोस काय... हा रंगमंच तुझं स्वागत करतोय " काय होता तो आवाज ... कोणाचा होता तो आवाज ... जो माझ्यातील कलाकाराचं स्थायी अस्तित्व टिकवून ठेवतोय ...जो सतत मला निष्क्रिय क्षणाची जाणीव करून देतोय. जो तेवत ठेवतोय ज्योत माझ्यातील कलेची , माझ्या अस्तित्वाची !!! हो , मी शोधतोय माझ्यातील ... कलागुण ... माझ्यातील साधना ... ज्या साधनेने माझ्यातील व्यक्ती आणि कलाकार ह्या दोघांना निर्माण केले.. प्रेरणेंच्या झोतात निर्माण केलेल्या माझ्यातील विचारांना ... Decode करतोय माझी लाईफ जी मी जगलेलो... शोधतोय ते सूत्र ज्या सूत्रांनी माझ्यातील अस्तित्व निर्माण केलेलं...
आयुष्यात जगलेल्या क्षणांना पुन्हा त्यांच्यातील सूत्र शोधण्याची दृष्टी थिएटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांताने मला दिली..
तुषार म्हस्के
No comments:
Post a Comment