Showing posts with label #viral _ #manjulbhardwaj #play #premanandgajvi #maharashtratimes. Show all posts
Showing posts with label #viral _ #manjulbhardwaj #play #premanandgajvi #maharashtratimes. Show all posts

Thursday, 21 March 2019

23 मार्च 2019 शहीद दिवस च्या निमित्ताने थिएटर ऑफ रेलेवन्स चे रंगकर्मी " कला ते क्रांती !" हा विचार घेऊन , विचार प्रेरणा नाट्य जागर साजरा करत आहेत.


स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला गेला, आणि स्मरणात राहिला
भारतातील स्वातंत्र्य संग्राम! जाज्वल्य देशप्रेमाने सारा देश त्याकाळी भारून गेला होता. “आम्हाला स्वातंत्र्य हवेच” या प्रेरणेने सारे भारतीय एक होऊन इंग्रजांविरुद्ध लढत होते.
प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांच्या हौतात्म्याला त्यांच्या विचारांना स्मरण्याचा दिवस ‘शहीद दिवस’ या दिवशी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी स्वतंत्र भारतातील सूर्योदय पाहण्याकरिता, आपल्या देशासाठी हौतात्म्य स्वीकारले होते.
या लढ्यात भारतीय स्त्रियाही मागे नव्हत्या. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताच्या कानाकोपऱ्यांतून असंख्य अनामिक स्त्रिया भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यास सज्ज झाल्या. या असंख्य क्रांतिवीरांच्या योगदानाला आम्हा रंगकर्मींचा सलाम !

 त्या अमर क्रांतिवीरांच्या लढाईचा संघर्ष जसा व्यापक आहे , तसाच समाज निर्माण साठी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचे योगदान ही महत्वपूर्ण आहे.
त्यांच्या जगण्याचा उद्देश एकच , मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळावा... या एकाच ध्येयाने झपाटून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाज निर्माणासाठी समर्पित केले. आज आम्ही शोधली आहे सावित्री आमच्या आत.आम्ही शोधला भगतसिंह आमच्या आत, भगतसिंहने  जीवनात वैचारिक क्रांतिची जी मशाल पेटवली, ती घेऊन आम्ही प्रत्येकात कलात्मक चेतना जागवत आहोत. कलेच्या माध्यमातून आम्ही सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे घेऊन जात आहोत. जीवनासाठी कला, परिवर्तनासाठी कला या ध्येयाने आम्ही कलाकार समाजातील विभिन्न स्तरांतील मुद्यांवर - समस्यांवर कलेच्या म्हणजेच नाटकाच्या माध्यमातून प्रस्तुती करतो आणि परिवर्तनासाठी प्रेरित करतो.

3 जानेवारी 2019 , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि 23 मार्च 2019 शहीद दिवस  च्या निमित्ताने थिएटर ऑफ रेलेवन्स चे रंगकर्मी " कला ते क्रांती  !" हा विचार घेऊन , विचार प्रेरणा नाट्य जागर साजरा करत आहेत.


या नाट्य जागरात दिनांक 22 मार्च 2019 रोजी दुपारी 2.00 वाजता वैश्विक रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या मार्गदर्शनासह,  हिंदुस्तान अँटीबायोटिक्स स्कुल, पिंपरी पुणे येथे " थिएटर ऑफ रेलेवन्स शैक्षणिक चिंतन कार्यशाळा".आयोजित होणार आहे आणि " मैं औरत हूँ " हे नाटक प्रस्तुत होणार आहे.
 
रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक – “मैं औरत हूँ !” – आपल्या असण्याची , त्याला स्वीकारण्याची आणि आपल्या "अस्तित्वाला" विभिन्न स्वरूपात पडताळण्याची , शोध घेण्याची एक यात्रा आहे. नाटक ‘मैं औरत हूँ!’ पितृसत्तात्मक भारतीय समाजाची मानसिकता , बंधन , परम्परा , समज यांना मुळापासून नाकारते आणि त्यांना खुले आवाहन देऊन स्वतःचे ‘स्वतंत्र मानवीय अस्तित्व’ स्वीकारते . हे नाटक महिला व पुरुषाला बरोबरीच्या आरशात न पाहता ‘स्त्री’ च्या ‘स्वतंत्र मानवीय अस्तित्वाला' रेखांकित आणि अधोरेखित करते. हे नाटक ‘कलाकार आणि प्रेक्षकां’ साठी आत्म मुक्ततेचं माध्यम आहे. नाटकात अभिनय करताना ‘जेंडर समानता’ च्या संवेदनशीलतेशी कलाकार एकरूप होतात आणि नाटक बघताना ‘प्रेक्षक’ ‘जेंडर बायस’ या अविर्भावा पासून मुक्त होतात . नाटक ‘मैं औरत हूँ’ कलाकार आणि प्रेक्षकांवर अद्भुत प्रभाव पाडते. ‘नारी’ मुक्ति का बिगुल बजा त्याला आपल्या ‘अधिकारा’ साठी संघर्ष करण्यासाठी प्रेरित करून ‘सक्षम’ करते .

थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांत हे "नाटकाने परिवर्तन येते " ह्याची जिवंत प्रयोगशाळा आहे. भारतीय दृष्टीकोनांमध्ये पितृसत्तात्मक समाज , रुढीवाद , धार्मिक कट्टरवाद धारण केलेला वर्ग समाजाच्या प्रत्येक भागात व स्तरात अस्तित्वात आहे. थिएटर ऑफ रेलेव्हन्स ने या आव्हानांचा एक योजनाबद्ध पद्धतीने सामना केला आहे. रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक "मैं औरत हूँ" ने स्त्री अस्तित्वावर भाष्य करून कितीतरी महिलांना स्वतः बद्दल, स्वतःच्या अस्तिवा बद्दल  विचार करण्यासाठी प्रेरित केले. वेगवेगळ्या स्तरांवरील महिलांना - मुलींना जगण्याचा नवीन दृष्टिकोन दिला …

पितृसत्तेच्या व्यवस्थेला या नाटकाने आव्हान दिले, आपल्या अस्तिवाला शोधणा-या अर्ध्या लोकसंख्येचा आवाज बुलंद करणाऱ्या ' मैं औरत हूँ' नाटकाचे 1998 पासून ते आतापर्यंत 1000 हुन जास्त प्रयोग संपूर्ण भारतात झाले आहेत. या नाटकाच्या माध्यमातून सामाजिक स्तरांवर नवनवीन संकल्पना मांडल्या आहेत. "मैं औरत हूँ " नाट्यप्रयोगाने सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत, आपले सणांना व उत्सवांना एक कलात्मक आणि वैचारिक दृष्टी प्रदान केली आहे. या नाटकाने सामाजिक उत्सवानिमित्त जनतेला (प्रेक्षकांना) ज्ञानात्मक व बोधात्मक मंच उपलब्ध करून दिला ज्याने “मैं औरत हूँ” नाटकाने सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचे स्वरूप प्राप्त केले.

कार्यशाळां मध्ये एखादा विषय अजून सखोलतेने शिकवायचा असेल तर तो विषय आम्ही नाटकाच्या माध्यमातून सहभागीं समोर प्रस्तुत करायचो आणि मग त्याचे विश्लेषण व्हायचे. असाच एक अनुभव 'Gender Sensetisation' या विषयाला अनुसरून आम्ही मंजुल भारद्वाज लिखित "मैं औरत हूँ" या नाटकाची प्रस्तुती करायचो.
एकदा झाले असे की, नाटकाच्या प्रयोगानंतर दाढी मिशी असलेले पुरुष सहभागी या नाटकाच्या प्रस्तुती नंतर ओक्साबोक्शी रडला. त्यांचे मनोगत त्यांनी व्यक्त केले की, "आतापर्यंत आम्ही स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली. अगदी बाहेर समाज कार्य करून घरातील स्त्रीची कुचंबणा केली" पण आताच्या क्षणापासून आम्ही पितृसत्तात्मक भारतीय समाजाची मानसिकतेला नकारतो. या नाट्य प्रस्तुतीतून आम्ही त्यांच्या समोर विचार तर मांडायचो, पण त्याही पलीकडे  एक महिला म्हणून जिथे स्त्रीकडे पाहण्याची एक कट्टर मानसिकता आहे अशा गावांमध्ये आम्ही एक माणूस म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली

सक्षमतेची सुरुवात आधी स्वतःपासून होते...एक स्त्री जेव्हा सक्षम होते तेव्हा परिवार ही सक्षम होतो आणि परिवारासोबत समाज ही सक्षम होतो.. आणि जसजसा समाज आपल्या नवीन सकारात्मक आणि रचनात्मक निर्माणाच्या दिशेने मार्गक्रमण करतो देश आपोआप सक्षम होऊन जातो. म्हणून हे अनिवार्य आहे की देशातील स्त्रियांनी सक्षम होणे, कारण जेव्हा स्त्री प्रगतिशील असते तेव्हा तो देश खऱ्या अर्थाने प्रगत आणि विकसित होतो.

समाजाचे रचनात्मक परिवर्तन आणि न्यायसंगत व्यवस्थेची निर्मिती आपल्या कलात्मक प्रतिबद्धतेने साकारणारे कलाकार अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर , योगिनी चौक , कोमल खामकर , तुषार म्हस्के.


आम्ही कलाकारांनी समाजात परिवर्तनासाठी पुढाकार घेऊन आपल्या परिवारासाठी, समाजातील अर्ध्या लोकसंख्येचा आवाज उठवण्यासाठी हा नाट्य जागर आयोजिला आहे, तरी आम्ही कलाकार आवाहन करत आहोत की, सामाजिक - वैचारिक परिवर्तनासाठी या नाट्य जागरात आपण पुढाकार आणि सहभाग घ्यावा.

Monday, 3 December 2018

रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य तत्वज्ञानाने मराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया!
- योगिनी चौक


मराठी रंगभूमीवर विविध नवनवीन प्रयोग सातत्याने होत असताना 'वैचारिक मूल्य' रुजवणारी व्यावसायिक नाटके असावीत हे स्वप्न मी चार वर्षांपूर्वी पाहिले... 



मी व्यावसायिक नाटकांत काम करत असताना आजूबाजूला “कॉमेडी नाटकेच चालतात”, “फेस व्हॅल्यू असणारे कलाकारच हवेत”, “वैचारिक वगैरे ते प्रायोगिक वाले बघून घेतील, आपण धंदा पाहावा” अशा विचारसरणीचे वातावरण दिसले. नाटकांचे विषय देखील बहुतांशी नवरा, बायको, लग्न, दारू... याच विषयांभोवती फिरत होते, नाटकांत, प्रामुख्याने व्यावसायिक पातळीवर वैचारिक दर्जा कसा निर्माण करता येईल आणि तो टिकून कसा राहिल या विचारातूनच मराठी रंगभूमी वर रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित "अनहद नाद - Unheard Sounds Of Universe" हे बहुभाषिक नाटक आले आणि गेल्या साडे तीन वर्षांपासून सतत या नाटकाचे प्रयोग होत आहेत.


सतत साडे तीन वर्षे सातत्याने मराठी व्यावसायिक रंगभूमीवर वैचारिक नाटकांचे प्रयोग करून मराठी रंगभूमी वरील पाच प्रतिबद्ध युवा कलाकारांनी हे शिवधनुष्य कोणत्याही निर्मात्याची मदत न घेता किंवा कोणतीही सरकारी वा निमसरकारी ग्रांट न घेता, कुठलीही स्पॉन्सरशीप न स्वीकारता केवळ जनसहयोगाने नाट्य प्रयोग सुरु ठेऊन कला उद्योजकतेचा नवा पाया रचला आहे.



थिएटर ऑफ रेलवन्स या नाट्य तत्वाला 25 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने रंगचिंतक मंजुळ भारद्वाज लिखित दिग्दर्शित नाटकांचा नाट्य महोत्सव संपूर्ण वर्षभर उत्सव स्वरूपात साजरा करण्यात आला. देशाची राजधानी दिल्ली पासून सुरू झालेला हा नाट्य महोत्सव आर्थिक राजधानी मुंबई ते ठाणे व्हाया पनवेल सांस्कृतिक राजधानी पुणे असा प्रवास करत सुरू आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे नुसतं एखाद दुसरा प्रयोग करून ही नाटके थांबली नाहीत तर सतत सातत्याने या क्लासिक नाटकांचे प्रयोग होत आहेत आणि नुसते प्रयोगच नाही तर नाट्य महोत्सव साजरे होत आहेत. 

पूर्वी होत असलेल्या आणि आता लोप पावत चाललेल्या वेळेचा सदुपयोग ही या महोत्सवाच्या काळात करण्यात आला तो म्हणजे मुंबई तील दादर शिवाजी मंदिर येथील नाट्य महोत्सवात तिन्ही दिवस लागोपाठ सकाळी 11वाजता नाट्य प्रयोग सादर झाले आणि ते देखील शनिवार रविवार नसताना मधल्या दिवसांत! आणि या महोत्सवात तिन्ही दिवस प्रेक्षक उपस्थित होते…

वेळ सकाळची असो, दुपारची असो वा प्राईम टाइम प्रत्येक स्लॉट वापरून पाहिला आणि उत्तम वैचारिक नाटक पाहण्यासाठी कोणताही ‘स्लॉट’ महत्वाचा नसून ‘विचार’ महत्वाचा आणि तो ऐकण्यासाठी सकाळी 7 च्या प्रयोगाला ही वेळेवर हजर राहणारे प्रतिबद्ध प्रेक्षक आम्हांला लाभले.




नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर प्रेक्षक संवाद या प्रक्रियेत असताना प्रेक्षक व्यक्त होत की, “ही नाटके म्हणजे वैचारिक औषध आहे.” आणि औषध घ्यायला आपण मेडिकल मध्ये जसे रात्री 2 वाजता ही जातो तसे हे वैचारिक औषध सकाळच्या प्रयोगातून घेतल्यास दिवसभर त्या विचाराचे मनन होत राहते व दुसऱ्या दिवशी त्या विचारला पुढे नेणारी श्रुंखला अनुभवायास मिळते. अशा प्रकारे हा तीन दिवसीय “वैचारिक नाट्य डोस” माणूस म्हणून जगण्याचे विचार पेरण्यास प्रतिबद्ध असतो. “ही नाटके काळाची गरज आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे” असेही मत एकमताने समोर आले.
दिल्ली, मुंबई आणि पुणे येथील महत्वाच्या व्यावसायिक नाट्यगृहात थियेटर ऑफ रेलेवन्स या नाट्य तत्वावर आधारित तीन दिवसीय नाट्य महोत्सवात लागोपाठ तीन वैचारिक आणि क्लासिक नाटकांचे प्रयोग झाले, 

गर्भ, अनहद नाद आणि न्याय के भंवर में भंवरी!

1. आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात मनुष्य रुपी देहांत 'माणुसकीला' शोधणारे नाटक “गर्भ”

2. खरेदी आणि विक्री च्या काळात कलाकारांना वस्तुकरणातून उन्मुक्त करणारे नाटक
“अनहद नाद – Unheard Sounds of Universe”
आणि 
३)अर्ध्या लोकसंख्येचा आवाज. पितृसत्तात्मक व्यवस्थेच्या शोषणा विरुद्ध हुंकार, न्याय आणि समतेची गाज, नाटक आहे, “न्याय के भंवर में भंवरी”!

या कलात्मक मिशनाला आपल्या कलेने मंचावर साकार करणारे कलाकार आहेत अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, बेट्सी एंड्रयूज आणि बबली रावत!
या प्रतिबद्ध युवा कलाकारांनी मराठी रंगभूमीवर वैचारिक नाटकांची नवी मुहूर्तमेढ रचली आणि त्याचे प्रयोग संवाद आणि कला उद्योजकतेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवले. प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संवाद करून त्यांना नाट्य संकल्पनेची पूर्वकल्पना दिल्याने प्रेक्षकांना पुन्हा नाटकाकडे आणि ते ही वैचारिक नाटकांकडे वळवण्यास आम्ही यशस्वी झालो आणि प्रेक्षक संवादातुन प्रेक्षकांची नाटक पाहण्याची आवड़ काय? त्यांना कशा पद्धतीचे नाटक पाहण्यात interest आहे हा एक प्रकारे सर्वे झाला आणि त्यात वैचारिक नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकच नाही तर तिकिट घेऊन पाहायला तयार आहेत हे प्रेक्षकांनीच दाखवुन दिले आणि हजेरी लावली!
या नाट्य महोत्सवला सामान्य प्रेक्षकांपासून ते जाणकारां पर्यंत अनेक मान्यवरांनी हजेरी लावली .


९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी हे थिएटर ऑफ रेलवन्स च्या कलात्मक नाट्य महोत्सवाचे कौतूक करताना लिहितात, “तीन दिवस मी अनुभवले सर्वांग सुंदर अनुभव, माणूस म्हणून उन्नत झालो, माणूस म्हणून माझी कर्तव्य काय याचं बोधीज्ञान, knowledge मला मिळालं आणि हाच तर कलेचा हेतू!”
कला ही केवळ मनोरंजना इतकीच मर्यादित न पाहता मनोरंजन ते परिवर्तन असा प्रवास थिएटर ऑफ रेलवन्स तत्वज्ञानावर आधारित मंजुळ भारद्वाज लिखित नाटके करत असतात आणि कोणत्याही राजाश्रयावर अवलंबून न राहता संवादाच्या माध्यमातून जन सहयोगाने ही नाटके समाजात नवं परिवर्तन घडवून आणत आहेत !