Tuesday, 14 November 2017

धकधक ...धकधक ....धकधक... ट्रेन मध्ये एवढी गर्दी असते आणि त्या गर्दीमध्येही आपण स्वतः चे वेगळेपण नेहमीच जपायला जात असतो .परंतु , तो जपला जात नाही कारण या सर्व ठिकाणी गर्दी असते ...कुठेतरी , त्या गर्दीचा हिस्सा आपण झालेला असतो..ट्रेन मध्ये गर्दी चा प्रत्येक व्यक्तीला त्रास होत असतो ... मज्जा अशी असते ..या सर्वांमध्ये प्रत्येकजण आपलं एक कोष घेऊन जात असतो ...आपली एक वेगळी ओळख बनवण्यासाठी ...शोधत असतो... स्वतः मधील वेगळेपणा .... हे शोधता शोधता आपण स्वतः या गर्दी मध्ये हरवून जातो ....जबाबदारीच्या ओझ्याखाली आपण जगणंच विसरून जातो ...थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत हे गर्दी वाली मानसिकता तोडून त्याच्यातील व्यक्तीला आणि कलाकार या दोघांना नवीन संजीवनी देऊन  जिवंत करते ...
थिएटर ऑफ रेलेवन्स  कालात्मतेची 25 वर्ष पूर्ण झाली  आहेत...त्यानिमित्ताने शिवाजी मंदिर , मुंबई मध्ये 3 दिवसीय नाट्य फेस्टिव्हल साजरा होणार आहे ... दिनांक 15 ते 17 नोव्हेंम्बर 2017 ला ...

रंगकर्मी
तुषार म्हस्के
#थिएटरऑफरेलेवन्स_फेस्टिव्हल
15,16,17 नोव्हेंबर 2017
#श्रीशिवाजीमंदिरनाट्यगृहदादर
सकाळी 11 वाजता

Monday, 13 November 2017

समाधान ...तुषार म्हस्के


समाधान ... कार्य करत असताना आपण समाधान शोधत असतो ... नक्की समाधान आहे तरी काय ? हे समाधान मिळते तरी कुठे ? ...आपण करत असणारे कार्य ..ते कार्य करत असताना जाणीव पूर्वक ध्येयाच्या दृष्टीने केलेलं नियोजन ...हे समाधान देत असते ... ध्येयाच्या दिशेने वाटचाल करत असताना ...होणारा संघर्ष देखील पदोपदी समाधान देत असतो ... ध्येयप्राप्ती नंतर मिळणारे समाधान हे तेवढंच उच्च प्राप्तीचं समाधान मिळवून देत असते.मनाला समाधान मिळवून देणारा असा हा माझ्या कलाकाराचा आणि व्यक्तीचा प्रवास ..
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताने मला ही दृष्टी दिली आहे ...ज्यामध्ये माझ्यातील व्यक्तीचा आणि कलाकाराचा प्रवास मी एकत्र करत आहे ...त्याच एक समाधान मला मिळत असल्याचं मला जाणवू लागलं आहे ...
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत मानवतेला सकारात्मकतेने पाहण्याची दृष्टी देत आहे ...थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य चिंतनाने 12 ऑगस्ट 2017 ला 25 वर्षे पूर्ण केली आहेत ...
त्यानिमित्ताने शिवाजी नाट्य मंदिर ,मुंबई मध्ये 15,16 आणि 17 नोव्हेंम्बर ला 3 दिवसीय नाट्य फेस्टिवल च आयोजन केले आहे ...


रंगकर्मी
तुषार म्हस्के
#थिएटरऑफरेलेवन्स_फेस्टिव्हल
15,16,17 नोव्हेंबर 2017
#श्रीशिवाजीमंदिरनाट्यगृहदादर
सकाळी 11 वाजता

Sunday, 12 November 2017

नाटकाने माझ्यातील माणसाला जिवंत केले .. तुषार म्हस्के


एकदा मला माझ्या मित्राने विचारले .
तुषार तुला नाटकाने काय दिलं ? ..
त्यावेळी माझ्या मनातून आपोआप उत्तर आले ... नाटकाने माझ्यातील माणसाला जिवंत केले ..
मनातील भाव , वेदना संवेदना , माझ्या मनात सुरू असणारे विचार मांडण्यासाठी रंगमंच .. ज्याठिकाणी मी माझ्या विचारांना सादर करण्यासाठी सतत नवीन संकल्पना शोधतो ... जीवनातील नाटक बंद झाले ...जीवन जगायला सुरुवात केली ... माझ्यातील व्यक्तीला जिवंत ठेवण्यासाठी सकारात्मक विचारांची जोड मिळाली .. कलाकार रंगमंचावर सक्षम होत असताना माझ्यातील व्यक्तिमत्व उभं राहू लागले ... जीवनातील 19 ,20 कारनामे बंद झाली ... विचार मांडताना नवीन विचार ऐकण्याचा परीघ वाढला ...जीवनातील स्त्री - पुरुष हा भेदभाव संपला एक व्यक्तीला व्यक्ती म्हणून पाहण्याची दृष्टी मिळाली ...माझ्यातील वेगवेगळे पैलू शोधण्याची सुरुवात झाली ...नाटकाने मला वैचारिक उंची दिली ...
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत ने मला माझ्यातल्या मी ला शोधण्याचा मार्ग दाखवला ...
" थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत ने कलात्मकतेची 25 वर्ष पूर्ण करून ...जागतिक रंगभूमीवर आपल्या सिद्धांताने विश्वाला सकारात्मकतेने जगण्याचे मार्ग दाखवले
आणि 25 वर्ष पूर्ततेच्या निमित्याने शिवाजी नाट्य मंदिर ,मुंबई ला 3 दिवसीय कलात्मक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे ...
दिनांक 15 ,16 आणि 17 अनुक्रमे नाटक गर्भ , अनहद नाद - Unheard Sounds of Universe आणि नाटक न्याय के भंवर में भवरी च सादरीकरण सकाळी 11 वाजता होणार आहे .

रंगकर्मी
तुषार म्हस्के
#थिएटर_ऑफ_रेलेवन्स_फेस्टिवल
15,16,17 नोव्हेंबर 2017
#श्रीशिवाजीमंदिर_नाट्यगृह_दादर
वेळ सकाळी 11 ते दुपारी 1

Friday, 10 November 2017

अशी आहे ही कलात्मक यात्रा...तुषार म्हस्के

अशी आहे ही कलात्मक यात्रा ,
जी कलाकारांना त्यांच्या विचारांनी जगण्यास प्रेरणा देते ,
जी प्रेक्षकांना रंगकर्मी बनवून जीवन सकारात्मकतेने जगण्यासाठी दिशा दाखवते ,
तरुणांच्या विचारांना गती देते ,

अशी आहे ही कलात्मक यात्रा ,
जी बालमजुरांना शिक्षण घेण्याचा मार्ग दाखवते,
जी मुंबईतील 1992 च्या सांप्रदायिक " दंगली " मध्ये शांततेचे प्रतिक बनते ,
आपल्या कलात्मक प्रयोगाने हिंसेचे हत्यार त्यागायला लावते आणि मानवतेची सृजनात्मक हुंकार बनते ,


अशी आहे ही कलात्मक यात्रा ,
जी साता समुद्रा पलीकडे जाऊन खाजगीकरणाच्या गडावर
सार्वजनिक नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्याचा धडा शिकवते ,
ज्याच्यातून पाण्याचं खाजगीकरण काही काळ थांबवले जाते,

अशी आहे ही कलात्मक यात्रा ,
जी घरातून सुरू होते ,
गल्लीतून, शहरातून , राज्यांतून ,देश आणि वैश्विक
पातळीवर सकारात्मक परिवर्तनासाठी प्रतिबद्ध करते,
जी व्यक्तिगत,सामाजिक हिंसा थांबवण्यासाठी कलेतून कार्य करते,

अशी आहे ही कलात्मक यात्रा ,
जी राजनेत्यांना दिशा दाखवण्यासाठी ,
राजनीती चा शोध घेते ,
राजनीती चा खरा अर्थ काय ते शोधून काढते ,
राजनीतीची शुद्ध आणि पवित्र बाजू दाखवते ...

अशी आहे ही कलात्मक यात्रा ,
जी सम भावाने जगण्यास प्रेरित करते,
स्त्री आणि पुरुष यांच्यातील भेद संपवते ,
एक माणूस म्हणून जगण्याची दिशा दाखवते ...

अशी आहे ही कलात्मक यात्रा ,
जी कलाकारांना कलेसाठी जिवंत ठेवण्यासाठी कार्य करते ,
जी रंगचिंतनाचा नवा इतिहास लिहिते ,
जी व्यक्ती आणि कलाकाराला ताठ मान ठेवून जगायला शिकवते ,
असा हा थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताचा 25 वर्ष कलात्मकतेचा प्रवास ,

रंगकर्मी
तुषार म्हस्के
#थिएटरऑफरेलेवन्स_फेस्टिव्हल
15,16,17 नोव्हेंबर 2017
#श्रीशिवाजीमंदिरनाट्यगृहदादर
सकाळी 11 वाजता

Thursday, 9 November 2017

चला जगूया हा क्षण ...तुषार म्हस्के

चला जगूया हा क्षण ...
आवाज ऐकुया आपल्या मनाचा ...
चिंता , त्रास , वैताग यातून पडूया बाहेर आता ...
याचं जगात राहुनी जगू स्वत:च्या अस्तित्वाचा आता ...

शोध घेऊया स्वत: चा ...
मनात निर्माण झालेल्या  प्रश्नांच्या भिंतींचा ...
शरीरासाठी तर आपण जगतच आहोत ..
विचारांसाठी जागुयात आता ....

पाहूयात कलाकारांच्या कलेचा नाद ...
सोडवूयात प्रश्नांची उत्तरे आता ...
आपल्या विचारांच्या गर्भातून डोकावून पाहूयात ...
कलेच्या अनहद नादाला जागुयात ...
एक न्याय सांगत व्यवस्थेसाठी "न्याय के भंवर में भवरी " पाहुयात,


थियेटर ऑफ़ रेलेवंस नाट्य सिद्धांताच्या २५ वर्षाच्या कलात्मक प्रवासाला
आता अनुभवूयात ...
त्यातून व्यक्तिगत येणाऱ्या अनुभवाला या विश्वात अमृतासारखे प्रसारित करूयात ..
मानवतेच्या सकारात्मक विचारांनी या विश्वाला आता आपण बनवूयात ....
आपल्या रंगभूमीला विचारांनी आता सक्षम करूयात...

रंगकर्मी
तुषार म्हस्के
#थिएटर_ऑफ_रेलेवन्स_फेस्टिव्हल
15,16,17 नोव्हेंबर 2017
#श्रीशिवाजीमंदिर_नाट्यगृह_दादर
सकाळी 11 वाजता

Wednesday, 8 November 2017

एक पाऊल रंगभूमीसाठी ...तुषार म्हस्के

एक पाऊल रंगभूमीसाठी
रंगभूमीला सक्षम करण्यासाठी ...
नवीन विचारांना जन्म देण्यासाठी ...
आपली कला , कलेच्या जोरावर सादर करण्यासाठी ...
नवीन संकल्पना निर्माण करण्यासाठी ...
कलाकारांना त्यांच्या कलेच्या जोरावर जगण्यासाठी ...



रंगभूमीला तिच्या तत्वाने आणि सत्वाने मजबूत करण्यासाठी ...
मानवी जीवनाला सकारात्मकतेने जगण्याची दिशा दाखवण्यासाठी ...
नवीन येणाऱ्या कलाकारांना " कलेच " चिंतन प्रक्रिया देण्यासाठी ...

कलेला एक विचार म्हणून जगण्यासाठी ....
कोणतही compromised न करता कलेच्या जोरावर काम निर्माण करण्यासाठी ....
नवीन  स्वप्नांना त्यांच्या आवडीच काम करण्यासाठी ...
थियेटर ऑफ रेलेवंस 25 वर्ष कलासाधनेचा पूर्णत्वाचा कलामहोत्सव ...
कला व कलाकाराच्या पाठीच्या मणक्याला ताठ ठेवण्यासाठी .....

रंगकर्मी
तुषार म्हस्के
#थिएटर_ऑफ_रेलेवन्स_फेस्टिव्हल
15,16,17 नोव्हेंबर 2017
#श्रीशिवाजीमंदिर_नाट्यगृह_दादर
सकाळी 11 वाजता
 

Tuesday, 7 November 2017

SPARK खूप महत्त्वाचा ....

SPARK खूप महत्त्वाचा ....
नवीन संकल्पना , नवीन आयडीया ज्यावेळी येतात त्यावेळी काही क्षणासाठी आनंद होऊन जातो . थोड्या वेळानंतर त्या स्पार्क ला व्यवहाराच्या ओझ्याखाली आपण दाबून टाकतो . भीती वाटते कसं होणार ,काय होणार ? आपली आयडीया त्याच ठिकाणी लोप पावत जाते.





एकंदरीत काय भीती वाटून जाते . कारण , नवीन संकल्पना येते त्यावेळी नवीन आवाहनही घेऊन येत असते. ते आवाहन आनंदाने स्वीकार केल्यावर नवीन मार्ग मिळत जातात .आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतो .
संकल्पनांचे येणारे स्पार्क कसे आनंदाने स्वीकारायचे याचं विश्लेषण रंगचिंतक मंजुल भारद्वाज करुन
देत होते. यामध्ये १. स्पार्क आल्यानंतर आपण त्याला कसं घेतो ? आलेल्या स्पार्क ला आपण कसं application मध्ये घेऊन येतो . "अनहद नाद - Unheard Sounds of Universe " या नाटकाच्या संकल्पनेचा स्पार्क आल्यानंतर त्याला रंगमंचावर आणण्यासाठी केलेलं नियोजन ,
हे नाटक करण्यामागचा उद्देश , याला सादर करणारे कलाकार आणि यामुळे कलाकार आपल्या कलेच्या जोरावर कलेसाठी आपलं आयुष्य कलात्मकतेने जगू शकेल .
 
 याच्यासाठी केलेलं चिंतन आणि त्या प्रवासातून घडत असणारा मी ..रंगमंचावर उभं राहण्यापासून , ते एक - एक शब्द बोलत असताना केलेला प्रवास ...एक कलाकार म्हणून थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांत मला उभं करत असताना माझ्यातील व्यक्तीला त्याच्या विचारांनी मजबूत करु लागले . त्याच बरोबर जीवनात वेगळी ओळख निर्माण करायची असेल तर तत्वाने जगण . माझ्या जगण्याची तत्व काय आहेत ती ओळखण . जीवनात सुरु असणारा लपंडाव थांबवण आणि एक विचार म्हणून स्वत:चा शोध घेण्यास सुरुवात करण्याचा प्रवास सुरु झाला .
एक स्पार्क आणि त्यातून निर्माण झालेली कला एक व्यक्ती आणि कलाकार या दोघांना एकाच वेळी दोघांना निर्माण करत आहे. याचा येत असणारा प्रत्यय.

रंगकर्मी
तुषार म्हस्के
#अभिनय कार्यशाला
3-7 नोव्हेंबर ,2017,मुंबई (पनवेल)
Facilitated by #मंजुलभारद्वाज
#मुंबईनाट्योत्सव #थिएटरऑफ़रेलेवंस नाट्य दर्शनाचे 25 वर्ष पूर्ण