Friday, 10 November 2017

अशी आहे ही कलात्मक यात्रा...तुषार म्हस्के

अशी आहे ही कलात्मक यात्रा ,
जी कलाकारांना त्यांच्या विचारांनी जगण्यास प्रेरणा देते ,
जी प्रेक्षकांना रंगकर्मी बनवून जीवन सकारात्मकतेने जगण्यासाठी दिशा दाखवते ,
तरुणांच्या विचारांना गती देते ,

अशी आहे ही कलात्मक यात्रा ,
जी बालमजुरांना शिक्षण घेण्याचा मार्ग दाखवते,
जी मुंबईतील 1992 च्या सांप्रदायिक " दंगली " मध्ये शांततेचे प्रतिक बनते ,
आपल्या कलात्मक प्रयोगाने हिंसेचे हत्यार त्यागायला लावते आणि मानवतेची सृजनात्मक हुंकार बनते ,


अशी आहे ही कलात्मक यात्रा ,
जी साता समुद्रा पलीकडे जाऊन खाजगीकरणाच्या गडावर
सार्वजनिक नैसर्गिक संपत्तीचे जतन करण्याचा धडा शिकवते ,
ज्याच्यातून पाण्याचं खाजगीकरण काही काळ थांबवले जाते,

अशी आहे ही कलात्मक यात्रा ,
जी घरातून सुरू होते ,
गल्लीतून, शहरातून , राज्यांतून ,देश आणि वैश्विक
पातळीवर सकारात्मक परिवर्तनासाठी प्रतिबद्ध करते,
जी व्यक्तिगत,सामाजिक हिंसा थांबवण्यासाठी कलेतून कार्य करते,

अशी आहे ही कलात्मक यात्रा ,
जी राजनेत्यांना दिशा दाखवण्यासाठी ,
राजनीती चा शोध घेते ,
राजनीती चा खरा अर्थ काय ते शोधून काढते ,
राजनीतीची शुद्ध आणि पवित्र बाजू दाखवते ...

अशी आहे ही कलात्मक यात्रा ,
जी सम भावाने जगण्यास प्रेरित करते,
स्त्री आणि पुरुष यांच्यातील भेद संपवते ,
एक माणूस म्हणून जगण्याची दिशा दाखवते ...

अशी आहे ही कलात्मक यात्रा ,
जी कलाकारांना कलेसाठी जिवंत ठेवण्यासाठी कार्य करते ,
जी रंगचिंतनाचा नवा इतिहास लिहिते ,
जी व्यक्ती आणि कलाकाराला ताठ मान ठेवून जगायला शिकवते ,
असा हा थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताचा 25 वर्ष कलात्मकतेचा प्रवास ,

रंगकर्मी
तुषार म्हस्के
#थिएटरऑफरेलेवन्स_फेस्टिव्हल
15,16,17 नोव्हेंबर 2017
#श्रीशिवाजीमंदिरनाट्यगृहदादर
सकाळी 11 वाजता

No comments:

Post a Comment