Saturday, 10 August 2019

'थिएटर ऑफ़ रेलेवंस’ नाट्य सिद्धांताच्या 28 वा सूत्रपात दिवसानिमित्त “विचार, विविधता, विज्ञान, विवेक आणि संविधान सम्मत” राजनैतिक पिढी घडविण्याचा संकल्प करत असून शिवाजी नाट्य मंदिर,दादर मुंबई मध्ये 12 ऑगस्ट ला होणार नाटक राजगति चे सादरीकरण !





नाटक : राजगति नाटकाची प्रस्तुती
कधी : 12 ऑगस्ट, 2019,
 सोमवारी, सकाळी 11 वाजता
वेळ :120 मिनिटं
कुठे : श्री शिवाजी मंदिर, दादर (पश्चिम), मुंबई
लेखकदिग्दर्शक : रंगचिंतक मंजुल भारद्वाज

कलाकार : अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के ,स्वाति वाघ, प्रियंका कांबळे, सचिन गाडेकर, सुरेखा साळुंखे, अन्य कलाकार।


उद्देश्य : 27 वर्षांआधी म्हणजे 12 ऑगस्ट, 1992 रोजीथिएटर ऑफ़ रेलेवंसनाट्य सिद्धांताचे सूत्रपात झाले होते. त्यावेळी जागतिकीकरणाचा अजगर प्राकृतिक संसाधनांना गिळंकृत करण्यासाठी आपला फणा जगभरात पसरवत होता. भांडवलशाही ने जगाला  खरेदी आणि विक्रीपर्यंत मर्यादित केले होते. भांडवलशाही सत्तेच "जागतिकीकरण" हेविचाराला कुंद, खंडित आणि मिटवण्याचे षड्यंत्र आहे. तंत्राच्या रथावर स्वार होऊन विज्ञानाच्या मूळ संकल्पनांचा विनाश करण्याचा कट रचत आहे. मानव विकासासाठी पृथ्वी आणि पर्यावरणाचा विनाश, प्रगतिशीलतेला केवळ सुविधा आणि उपभोगामध्ये बदलण्याचा खेळ आहे. फॅसिस्ट ताकदीचे परिणाम आहे जागतिकीकरण ! लोकतंत्र, लोकतांत्रीकरणाच्या संविधानिक परंपरांची खिल्ली म्हणजेजागतिकीकरण! अशा भयावह काळात माणुसकी टिकवणे एक आव्हान आहे... या आव्हानासमोर उभे आहेथिएटर ऑफ रेलेवंसनाट्य सिद्धांत.
मागील 27 वर्षांपासून सांप्रदायिक मुद्द्यावरदूर से किसी ने आवाज़ दी, बाल मजुरी वरमेरा बचपन, घरगुती हिंसेवरद्वंद्व, आपल्या अस्तित्वाचा शोध घेत अर्ध्या लोकसंख्येचा आवाजमैं औरत हूँ , ‘लिंगनिदानया विषयावर नाटकलाडली , जैविक आणि भौगोलिक विविधतेवर बी- , मानवता आणि निसर्गाच्या प्राकृतिक संसाधनांच्या खासगीकरणाच्या विरोधातड्राप बाय ड्राप : वॉटर, मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठीगर्भ , शेतकऱ्यांची  आत्महत्या आणि शेतीच्या होणाऱ्या विनाशावरकिसानों का संघर्ष , कलाकारांना कठपुतली बनवणाऱ्या आर्थिक तंत्रापासून कलाकारांच्या उन्मुक्ततेसाठी नाटकअनहद नाद-अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स , शोषण आणि दमनकारी पितृसत्ततेच्या विरुद्ध न्याय, समता आणि समानतेची हुंकारन्याय के भंवर में भंवरी , समाजात राजनैतिक चेतना जागवण्यासाठीराजगतिनाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी लढत आहे !

मागील 27 वर्षांपासून सतत कुठल्याच सरकारी, नीम सरकारी, कॉर्पोरेटफंडिंग किंवा कोणत्याही देशीविदेशी अनुदाना शिवाय आपली प्रासंगिकता आणि आपल्या मूल्यांच्या बळावर हे नाट्यतत्व देश विदेशात आपले अस्तित्व दाखवत आहे आणि बघणाऱ्यांना आपल्या असण्याचे औचित्य सांगत आहेत. सरकारच्या 300 ते 1000 करोडच्या अनुमानित संस्कृति संवर्धन बजेटच्या विरुद्ध प्रेक्षक सहभागितेने उभे आहे आमचे रंग आंदोलन ... मुंबई पासून मणिपूर पर्यंत!
जागतिकीकरण आणि  फॅसिस्टवादी शक्तीस्वराज्य आणि समताया विचारांना उद्धवस्त करून समाजात विकार निर्माण करतात ज्याने संपूर्ण समाजआत्महीनतेनेग्रासित होऊन हिंसक होऊन जातो. हिंसा मानवतेला नष्ट करते आणि कला मनुष्यातमाणुसकीचाभाव जागृत करते. कला, जी माणसाला माणुसकीचा बोध देतेकला ती, जी माणसाला माणूस बनवते !
 


संपूर्ण जगात आता अवकळा पसरली आहे. जागतिकीकरणाच्या अफुने तर्काला नष्ट करून माणसाला आस्थेच्या पुढ्यात नेऊन ठेवले आहे. निर्मम आणि निर्लज्ज भांडवलशाही सत्ता मानवतेला पायाखाली चिरडत आहे. विकास पृथ्वीला गिळत आहे. विज्ञान तंत्राच्या बाजारात देहविक्री सम विकले जात आहे. भारतात याची उदाहरणे टोकावर आहेत आणि समजण्या पलीकडे आहेत. चमकणाऱ्या तापमानामुळे लहान मुलांच्या मृत्यूची सुनामी आणि चंद्रयानाची भरारी. दहा लाखाचे सूट आणि वस्त्रहीन समाज. लोकतंत्राच्या सुंदरतेला कुरूप करणारे गर्दीतंत्र आणि धनतंत्र. न्यायासाठी दारोदारी भटकणारा समाजातला खालचा वर्ग आणि आपल्या अस्तित्वासाठी लढणारे सुप्रीमकोर्ट. संविधानामूळे स्वतःचे पोट भरणारे कर्मचारी आज आपल्या कर्माने राजनेत्यांची लाथ खाण्यासाठी शापित आहेत. चौथी आर्थिक महासत्ता आणि बेरोजगारांची गर्दी. जेव्हा जेव्हा मानवाचे तंत्र असफल होते, तेव्हा तेव्हा अंधविश्वास आस्थेची चादर ओढून विक्राळ रूप धारण करत, समाजाला गुंडाळून घेतो. लंपट गर्दीच्या जोरावर सत्तेत येतात आणि मीडिया पीआरओ बनते. समाज एकाफ्रोजन स्टेटमध्ये जातो. ज्याला तोडण्यासाठी माणसाला आपल्या विकारांपासून मुक्तिसाठीविचार आणि विवेकाला' जागवणे आवश्यक आहे. वैचारिकतेचे पेटंट ठेवणारे वामपंथी, जडत्व आणि प्रतिबद्धतेचा फरक नाही समजून घेत. टीकेच्या नावाखाली मारक्या बैलांसारखे उधळतातगांधीचा राजनैतिक विवेकशील वारसा मातीत कोसळला आहे. संविधान आणि मानवी मूल्यांना वाचवण्यासाठी राजनैतिक परिदृश्याला बदलण्याची आवश्यकता आहे.


याच क्रमाप्रमाणे सुप्रसिद्ध रंग चिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटकराजगतिसमता, न्याय, मानवता आणि संवैधानिक व्यवस्थेच्या निर्माणासाठीराजनैतिक परीदृश्याला' बदलण्याची चेतना जागवते.
 


नाटक "राजगति" सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीती' ची गति आहे. राजनीति ला पवित्र नीति मानत आहे. राजनीति घाणेरडी आहे, या भ्रमाला तोडून राजनीति मध्ये जन सहभागितेची मागणी करते. ‘माझे राजनीतीशी घेणं देणं काय' सामान्य जनतेच्या या अवधारणेला दिशा देते. सामान्य जनता लोकशाहीचे पहारेकरी आहेत आणि पहारेकरी आहेत तर सामान्य जनतेचा सरळ सरळ राजनीतीशी संबंध आहे. नाटक 'राजगति' समता,न्याय,मानवता आणि संवैधानिक व्यवस्थेच्या निर्माणासाठीराजनैतिक परिदृश्याला' बदलण्याची चेतना जागवते. ज्याने आत्महीनतेचा  भाव उध्वस्त होऊनआत्मबळाने' प्रेरितराजनैतिक नेतृत्वाचा' निर्माण व्हावा.

अशा वेळी "थिएटर ऑफ रेलेवन्स" चे कलाकार समाजाच्याफ्रोजन स्टेटला तोडण्यासाठी विवेकाच्या मातीत विचारांचे अंकुर लावण्यासाठी प्रतिबद्ध आहेत .


Thursday, 21 March 2019

23 मार्च 2019 शहीद दिवस च्या निमित्ताने थिएटर ऑफ रेलेवन्स चे रंगकर्मी " कला ते क्रांती !" हा विचार घेऊन , विचार प्रेरणा नाट्य जागर साजरा करत आहेत.


स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला गेला, आणि स्मरणात राहिला
भारतातील स्वातंत्र्य संग्राम! जाज्वल्य देशप्रेमाने सारा देश त्याकाळी भारून गेला होता. “आम्हाला स्वातंत्र्य हवेच या प्रेरणेने सारे भारतीय एक होऊन इंग्रजांविरुद्ध लढत होते.
प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांच्या हौतात्म्याला त्यांच्या विचारांना स्मरण्याचा दिवसशहीद दिवस या दिवशी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी स्वतंत्र भारतातील सूर्योदय पाहण्याकरिता, आपल्या देशासाठी हौतात्म्य स्वीकारले होते.
या लढ्यात भारतीय स्त्रियाही मागे नव्हत्या. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताच्या कानाकोपऱ्यांतून असंख्य अनामिक स्त्रिया भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यास सज्ज झाल्या. या असंख्य क्रांतिवीरांच्या योगदानाला आम्हा रंगकर्मींचा सलाम !

 त्या अमर क्रांतिवीरांच्या लढाईचा संघर्ष जसा व्यापक आहे , तसाच समाज निर्माण साठी सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांचे योगदान ही महत्वपूर्ण आहे.
त्यांच्या जगण्याचा उद्देश एकच , मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळावा... या एकाच ध्येयाने झपाटून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाज निर्माणासाठी समर्पित केले. आज आम्ही शोधली आहे सावित्री आमच्या आत.आम्ही शोधला भगतसिंह आमच्या आत, भगतसिंहने  जीवनात वैचारिक क्रांतिची जी मशाल पेटवली, ती घेऊन आम्ही प्रत्येकात कलात्मक चेतना जागवत आहोत. कलेच्या माध्यमातून आम्ही सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे घेऊन जात आहोत. जीवनासाठी कला, परिवर्तनासाठी कला या ध्येयाने आम्ही कलाकार समाजातील विभिन्न स्तरांतील मुद्यांवर - समस्यांवर कलेच्या म्हणजेच नाटकाच्या माध्यमातून प्रस्तुती करतो आणि परिवर्तनासाठी प्रेरित करतो.

3 जानेवारी 2019 , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती आणि 23 मार्च 2019 शहीद दिवस  च्या निमित्ताने थिएटर ऑफ रेलेवन्स चे रंगकर्मी " कला ते क्रांती  !" हा विचार घेऊन , विचार प्रेरणा नाट्य जागर साजरा करत आहेत.


या नाट्य जागरात दिनांक 22 मार्च 2019 रोजी दुपारी 2.00 वाजता वैश्विक रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या मार्गदर्शनासह,  हिंदुस्तान अँटीबायोटिक्स स्कुल, पिंपरी पुणे येथे " थिएटर ऑफ रेलेवन्स शैक्षणिक चिंतन कार्यशाळा".आयोजित होणार आहे आणि " मैं औरत हूँ " हे नाटक प्रस्तुत होणार आहे.
 
रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक – “मैं औरत हूँ !” – आपल्या असण्याची , त्याला स्वीकारण्याची आणि आपल्या "अस्तित्वाला" विभिन्न स्वरूपात पडताळण्याची , शोध घेण्याची एक यात्रा आहे. नाटकमैं औरत हूँ!’ पितृसत्तात्मक भारतीय समाजाची मानसिकता , बंधन , परम्परा , समज यांना मुळापासून नाकारते आणि त्यांना खुले आवाहन देऊन स्वतःचेस्वतंत्र मानवीय अस्तित्व स्वीकारते . हे नाटक महिला पुरुषाला बरोबरीच्या आरशात पाहतास्त्री च्यास्वतंत्र मानवीय अस्तित्वाला' रेखांकित आणि अधोरेखित करते. हे नाटककलाकार आणि प्रेक्षकां साठी आत्म मुक्ततेचं माध्यम आहे. नाटकात अभिनय करतानाजेंडर समानता च्या संवेदनशीलतेशी कलाकार एकरूप होतात आणि नाटक बघतानाप्रेक्षकजेंडर बायस या अविर्भावा पासून मुक्त होतात . नाटकमैं औरत हूँ कलाकार आणि प्रेक्षकांवर अद्भुत प्रभाव पाडते. ‘नारी मुक्ति का बिगुल बजा त्याला आपल्याअधिकारा साठी संघर्ष करण्यासाठी प्रेरित करूनसक्षम करते .

थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांत हे "नाटकाने परिवर्तन येते " ह्याची जिवंत प्रयोगशाळा आहे. भारतीय दृष्टीकोनांमध्ये पितृसत्तात्मक समाज , रुढीवाद , धार्मिक कट्टरवाद धारण केलेला वर्ग समाजाच्या प्रत्येक भागात स्तरात अस्तित्वात आहे. थिएटर ऑफ रेलेव्हन्स ने या आव्हानांचा एक योजनाबद्ध पद्धतीने सामना केला आहे. रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक "मैं औरत हूँ" ने स्त्री अस्तित्वावर भाष्य करून कितीतरी महिलांना स्वतः बद्दल, स्वतःच्या अस्तिवा बद्दल  विचार करण्यासाठी प्रेरित केले. वेगवेगळ्या स्तरांवरील महिलांना - मुलींना जगण्याचा नवीन दृष्टिकोन दिला

पितृसत्तेच्या व्यवस्थेला या नाटकाने आव्हान दिले, आपल्या अस्तिवाला शोधणा-या अर्ध्या लोकसंख्येचा आवाज बुलंद करणाऱ्या ' मैं औरत हूँ' नाटकाचे 1998 पासून ते आतापर्यंत 1000 हुन जास्त प्रयोग संपूर्ण भारतात झाले आहेत. या नाटकाच्या माध्यमातून सामाजिक स्तरांवर नवनवीन संकल्पना मांडल्या आहेत. "मैं औरत हूँ " नाट्यप्रयोगाने सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत, आपले सणांना उत्सवांना एक कलात्मक आणि वैचारिक दृष्टी प्रदान केली आहे. या नाटकाने सामाजिक उत्सवानिमित्त जनतेला (प्रेक्षकांना) ज्ञानात्मक बोधात्मक मंच उपलब्ध करून दिला ज्यानेमैं औरत हूँ नाटकाने सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचे स्वरूप प्राप्त केले.

कार्यशाळां मध्ये एखादा विषय अजून सखोलतेने शिकवायचा असेल तर तो विषय आम्ही नाटकाच्या माध्यमातून सहभागीं समोर प्रस्तुत करायचो आणि मग त्याचे विश्लेषण व्हायचे. असाच एक अनुभव 'Gender Sensetisation' या विषयाला अनुसरून आम्ही मंजुल भारद्वाज लिखित "मैं औरत हूँ" या नाटकाची प्रस्तुती करायचो.
एकदा झाले असे की, नाटकाच्या प्रयोगानंतर दाढी मिशी असलेले पुरुष सहभागी या नाटकाच्या प्रस्तुती नंतर ओक्साबोक्शी रडला. त्यांचे मनोगत त्यांनी व्यक्त केले की, "आतापर्यंत आम्ही स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली. अगदी बाहेर समाज कार्य करून घरातील स्त्रीची कुचंबणा केली" पण आताच्या क्षणापासून आम्ही पितृसत्तात्मक भारतीय समाजाची मानसिकतेला नकारतो. या नाट्य प्रस्तुतीतून आम्ही त्यांच्या समोर विचार तर मांडायचो, पण त्याही पलीकडे  एक महिला म्हणून जिथे स्त्रीकडे पाहण्याची एक कट्टर मानसिकता आहे अशा गावांमध्ये आम्ही एक माणूस म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली

सक्षमतेची सुरुवात आधी स्वतःपासून होते...एक स्त्री जेव्हा सक्षम होते तेव्हा परिवार ही सक्षम होतो आणि परिवारासोबत समाज ही सक्षम होतो.. आणि जसजसा समाज आपल्या नवीन सकारात्मक आणि रचनात्मक निर्माणाच्या दिशेने मार्गक्रमण करतो देश आपोआप सक्षम होऊन जातो. म्हणून हे अनिवार्य आहे की देशातील स्त्रियांनी सक्षम होणे, कारण जेव्हा स्त्री प्रगतिशील असते तेव्हा तो देश खऱ्या अर्थाने प्रगत आणि विकसित होतो.

समाजाचे रचनात्मक परिवर्तन आणि न्यायसंगत व्यवस्थेची निर्मिती आपल्या कलात्मक प्रतिबद्धतेने साकारणारे कलाकार अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर , योगिनी चौक , कोमल खामकर , तुषार म्हस्के.


आम्ही कलाकारांनी समाजात परिवर्तनासाठी पुढाकार घेऊन आपल्या परिवारासाठी, समाजातील अर्ध्या लोकसंख्येचा आवाज उठवण्यासाठी हा नाट्य जागर आयोजिला आहे, तरी आम्ही कलाकार आवाहन करत आहोत की, सामाजिक - वैचारिक परिवर्तनासाठी या नाट्य जागरात आपण पुढाकार आणि सहभाग घ्यावा.