Tuesday, 6 February 2018

मी एक कलाकार आहे त्याच बरोबर भारताचा एक संवेदनशील नागरिक आहे. ....तुषार म्हस्के


आज ओळख देतो मला हा रस्ता ...चालताना आपलंसं वाटणारा...चालत असताना ... सुंदर वेगळीच ऊर्जा जी सतत या रस्त्यावरून चालताना मला जाणवतेय ... हवेची ताजगी माझ्या शरीरात संचार करते. त्यातच जाणीव मला माझ्या अस्तित्वाची होते. आज पर्वा कोणाची नाही . विश्वास वाढत चाललाय माझ्या विचारांवर....पदोपदी व्यवहारिक जीवन मला challenge करतोय. येणार आवाहन " मी " सहजतेने स्वीकारतोय ...विश्वास वाढत आहे स्वतः वर विचार करण्याचा आणि त्या विचारांना प्रत्यक्षात अनुभवण्याचा...  " थिएटर ऑफ रेलेवन्स राजनैतिक चिंतन रैली " काढण्याचा विचार मनात आला आणि तो विचार जनमानसात पोहचवण्यासाठी केलेला ध्यास..प्रत्यक्षात क्षणा - क्षणाला चिंतन प्रक्रिये मध्ये राहून हा विचार जनमानसात पोहचवण्यासाठी केलेले नियोजन अजूनही मनात प्रेरणात्मक वातावरण निर्माण करून जातोय...

मी एक कलाकार आहे त्याच बरोबर भारताचा एक संवेदनशील नागरिक आहे. सभ्यतेची संस्कृती शिकवणारा समाज आता विसरून गेलाय... तरुणांमध्ये देशाबद्दल भावना ,प्रेम  आणि जबाबदारीची जाणीव निर्माण करायला. काही ठिकाणी तर देशाचे संवेदनशील नागरिक होण्याचे संस्कार दिले ही जात असतील त्यात वाद नाही.  परंतु, 1992 नंतरच्या पिढीबद्दल विचार करायला गेलो. की, संवेदना कुठेतरी कमी झाल्यासारखे दिसून येते.. कारण, ही पिढी ब्रँड वापरणारी पिढी त्यातच , देशाबद्दल संवेदना म्हणजे यांच्या साठी जुनी परंपरा ... ह्या अशा दूषित वातावरणात राजकीय मंडळी स्वतः च हित जोपासण्यात आपलं जीवन उपभोगत आहे. देशात विकासाने सर्वठिकाणी चिखल केले असताना...राजकारण आणि राजनीती बद्दल संवेदना संपत चालल्या आहेत.


देशाची व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी देशाचं संविधान आणि न्याय व्यवस्था सुरळीत राहणे गरजेचं वाटू लागले आहे. त्यातच भारतातील नागरिकांचा  लोकशाही वरचा विश्वास कमी होऊ लागला आहे. हेच लक्ष आहे सध्याच्या राजकारणाचं . भांडवलदार स्वतः चा फायदा करून  खरेदी आणि विक्री करून जनते जवळील धन लुटत आहेत . भांडवल दारांच्या प्रति सन्मान करणारं सरकार ..सामान्य जनतेच हाल करत आहे.. गरज आहे राजनीति बद्दल संवेदना निर्माण करण्याची...
" थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत " जनमानसात कलेच्या माध्यमातून परिवर्तन आणण्यासाठी कार्य करत आहे .



थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांचे जनक मंजुल भारद्वाज  यांनी राजनीति ला पाहण्याची सकारात्मक दृष्टी विश्वाला दिली. ही रचना राजनीति बद्दल सकारात्मक दृष्टी व्यक्ती च्या मनात निर्माण  करत आहे...

राजनीति बद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने जनमानसात आवाज पोहचवण्यासाठी ...मनात संकल्पना आली राजनैतिक चिंतन रैली च आयोजन करूयात... ह्या रैली च आयोजन करत असताना आपल्याकडे असणारे संसाधन आणि आपल्या  मित्र परिवाराचा सहयोग ...
संकल्पना वास्तवात आणण्यासाठीचा संघर्ष
नवीन संकल्पना , नवीन आवाहन घेऊन येत असते त्याच बरोबर आपली नवीन ओळख निर्माण करत असते. असाच हा वेगळा आणि माझी नवीन ओळख करणारा अनुभव मला आला. संकल्पना घेऊन मी माझ्या मित्र परिवारात फिरत असताना ... खूप साऱ्या नकारात्मकतेचा त्रास सहन करावा लागला.  हे कसं होणार, याच्यातून जीवाला धोका आहे. हिंसेच वातावरण सुरू असताना , हिंसा होण्याची शक्यता आहे.  त्यामध्ये काहीही होऊ शकते.. असं वाटू लागले होते. या सर्वांचे ऐकत बसलो तर बाळ जन्माला येण्यागोदरच गर्भ पडून जाईल. पण, मला ह्या संकल्पनेला जन्म द्यायचाच होता . मग, त्याच नियोजन सुरू झाले... एका बाजूला चोही बाजूने येणारी नकारात्मकता माझ्या मनात जिद्द निर्माण करणारी वाटू लागली...ह्या रैली मध्ये काय काय होऊ शकतो त्याची यादी तयार केली ...त्याच बरोबर नियोजन करायला सुरुवात केली.



रैली बोलल्यानंतर  संकल्पना अशी होते की, खूप सारी गर्दी आणि नारेबाजी ...एकीकडे सर्वांचा आक्रोश... ह्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर येत होत्या.. मग, मी थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताच्या दृष्टीने विचार करायला सुरुवात केली .. इथे मला भीड , गर्दी नको आहे. विचार करणारे लोक हवेत... त्यामुळे आता गर्दीचा मुद्दा माझ्या डोक्यातून निघून गेला. दुसऱ्या बाजूला आता आपल्या विचारसरणी मधली माणसे कशी जोडायची हा प्रश्न निर्माण होऊ लागला...संकल्पना मनात आल्या बरोबर ही संकल्पना share करायला सुरुवात केली.. माझ्या समोर  येणारा प्रत्येक व्यक्ती ही संकल्पना ऐकत होता आणि हे कसं होईल ह्या विचारात असायचा दुसऱ्या बाजूला भीती ही मनात त्यांच्या येऊन जायची त्यामुळे एकदा भेटलेला व्यक्ती पुन्हा भेटण्यासाठी टाळाटाळ करत असे ... हीच ती टाळाटाळ माझी हिम्मत वाढवत असे... नाही ! आता तर मी करणारच ... कोण येऊ किंवा येऊ  नये ... ! मी एकटा ह्या रैली ची सुरुवात तर करणार ...


नियोजन बनवलं त्यामध्ये पोलीस परमिशन काढण्याची जबाबदारी एका मित्राला दिली ... काही अंशी तो समोर हो ! हो ... बोलत होता ... पण , त्याच्या आत मध्ये असणारा सभ्य  माणूस त्याला जबाबदारी पासून लांब करत होता ... ह्या रैली मध्ये काय झालं .. तर माझ्या घरातल्या व्यक्तींचं काय होईल ? ... मग, माझ्या मनात दुसरा प्रश्न निर्माण झाला.. ज्यामुळे रैली मध्ये वाद होईल असं काहीही वक्तव्य करायचं नाही . त्यानुसार , नियोजन करायला सुरुवात केली .. मग, जग जाहीर केलं ... आम्ही कोणत्याही व्यक्ती ,राजकीय पक्ष , जात ,धर्म ,पंथ किंवा असं काही करणार नाही ज्यामुळे राजकीय वातावरण बिगडेल ... नारे देताना एकच नारा असेल " हम हैं !" आणि राजनीति ची व्याख्या जी शुद्ध आणि पवित्र आहे. तेच वाचन करत यायचं ...  त्यामुळे वाद होणार नाही याची स्पष्टता आली ...

पोलीस परमिशन काढल्यानंतर माझ्या मनात झालेलं परिवर्तन -


वेळ ठरवल्यानंतर त्या वेळेत काम होणं खूप महत्वाचं आहे . ते नाही झालं की माझ्या मनात चीड - चीड होते . पोलीस परमिशन काढण्याची जबाबदारी माझ्यावर आली. आता काय करायचं  ह्याच्या अगोदर पोलीस परमिशन काढण्यासाठी मी कधी गेलो नव्हतो. मग, पोलीस परमिशन घेण्यासाठी आवश्यक लेटर मध्ये काय काय नमूद असणार ह्याची नोंद मी करून घेतली.. माझ्या नावाने लेटर हेड बनवून मी त्याच्यावर संकल्पना मांडली.  मुद्दे लिहून स्पष्ट शब्दात ते घेऊन पोलीस स्टेशन ला गेलो . लेटर पाहिल्या नंतर पोलिसांचे मिळालेले सहकार्य सकारात्मक ऊर्जा देऊन गेले.
नवीन - नवीन सामाजिक कार्य करणारे ग्रुप , संघटना यांना भेटी देण्यास सुरुवात झाली . नावाला गर्दी करायची नाही आहे हा उद्देश डोळ्यासमोर असल्यामुळे  भेटणाऱ्या व्यक्तीला संकल्पना किती पटत आहे. हे पाहून त्याच्या वैचारिक पातळीला सकारात्मक दृष्टी देत मी विचार करणारा एक - एक व्यक्ती शोधू लागलो.
                                          


Concept स्पष्ट झाली गल्लीचा आवाज दिल्ली पर्यंत मला पोहचवायचा आहे. त्यामुळे रैली निघाली की फेसबुक वर लाईव्ह करायचं आणि नवं चेतना ची तरंग ह्या समाजात सोडायची.

थिएटर ऑफ रेलेवन्स राजनैतिक चिंतन रैली चा परिवर्तनीय काळ - 21 जानेवारी 2018 .सकाळी 7:30 ते 9:00
नक आप्पा पाडा रिक्शा स्थानक ते मालाड रेल्वे स्थानक ..



20 जानेवारी 2018 पर्यंत हृदयात धाकधूक होत होती . राजकीय पहिली पाऊलवाट कशा पद्धतीने निर्माण होईल याच चिंतन सुरू झालं . सकाळी आरशासमोर उभा राहिलो..आरशात पाहून बोललो .." आता मला माझी ही राजकीय भूमिका जगायची आहे" .
सकारात्मक उर्जेनिशी घरातून निघालो. सकाळची येणारी मादक हवा मनाला स्पर्श करत होती..वातावरण तेजोमय झालेले...

अप्पा पाडा रिक्षा स्थानकापासून प्रस्तावना करून चिंतन रैली निघाली . सकारात्मक व्याख्येचे वाचन करत असताना वातारणात कुतुहल निर्माण झालेले . प्रत्येक सहभागी  आपल्या जबाबदारी ने ऊर्जेमध्ये सहभागी झालेले. माझी भूमिका एकाच वेळी चौफेरी होती. रैली च्या आत मध्ये लक्ष देणे , बाहेर रिस्पॉन्स पाहणे, व्याख्येच वाचन करणे.
                        
क्रांतिकारक पतीवर्तनाच्या दिशेने वाटचाल करत आहेत. हे दिसू लागले . रैली चा उद्देश साध्य झाला .. सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला जाणवू लागले . राजनीति पवित्र आहे . मला त्याच्यात सहभाग घ्यायला हरकत  नाही . गर्दी काहीच करत नाही पण, व्यक्तीच्या आत निर्माण झालेला लीडर परिवर्तन स्वतः करतो . त्याचबरोबर समाजात करून घेतो ...
 


थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताने मला दिलेली राजनीति ला पाहण्याची पवित्र दृष्टी त्यातून झालेलं परिवर्तन .. माझ्यातील व्यक्तीला ला परिवर्तनाच्या दिशेने घेऊन जात आहे. त्याचा मला अभिमान आहे..
रंगकर्मी
तुषार म्हस्के

Sunday, 4 February 2018

शासनाने असा त्रास द्यायचा ... अशी व्यवस्था निर्माण करायची की त्याचा सामान्य माणसाला काही उपयोगच होणार नाही..तुषार म्हस्के


सकाळची धावपळ ट्रेन ...पकडण्याची तयारी ...प्लॅटफॉर्म वर असणारी गर्दी ...पब्लिक ब्रिज वरून पाहिलं तर मुंग्यांसारखी दिसणारी गर्दी आणि त्या गर्दी मध्ये श्वास घ्यायला ही जागा नाही ... धावत - पळत गर्दी मध्ये घुसायचं आणि ट्रेन पकडायची ...काय करणार ... सामान्य थकलेला माणूस ...हातात सत्ता असूनही ... कधीही सत्तेला प्रश्न विचारत नाहीत..."भोग आलिया भोगाशी भोगलेच पाहिजे " अशी असणारी मानसिकता ...
सकाळची वेळ गर्दी आणि त्या गर्दी मध्ये एकमेकांना धक्का बुक्की करत एकदाची ट्रेन पकडायची ...ट्रेन मध्ये उभं रहायला जागा मिळणे कठीण ... एकमेकांच्या पायावर पाय देत उभं राहणं ... बसायला मिळणे म्हणजे नशीबच बोलायचं ... चांगलं झालं तरी नशीब आणि नाही झालं तरी नशीब... त्यात सामान्य माणूस विसरून जातो ... इथे नशिबाचा संदर्भ असा काहीच नाही आहे ... हा प्रश्न व्यवस्थेचा आहे...शासनाचा आहे ... पण, बोलणार कोण ?हा पडलेला प्रश्न ...
आजचा प्रवास ह्याच गर्दीतून करत मी मालाड पासून दादर पर्यंत पोहोचलो... ट्रेन मध्ये उतरताना आजिबात कष्ट न घेता आपोआप मागे असणाऱ्या गर्दीने धक्का द्यायचा त्यानुसार एका झटक्यात ट्रेन मधून बाहेर पडायचो... 

ट्रेन मधून उतरल्यावर पाहिलं तर " बंद काचा चकमकीत लोकल ट्रेन .. सम्पूर्ण Air - Condition प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वरून जायला निघालेली बोरिवलीच्या दिशेने...platform वर असणारी गर्दी तशीच...ब्रिज वरून पाहिलं तर श्वास घ्यायला जागा नाही ...ट्रेन प्लॅटफॉर्म वर येते आणि पाहतो तर काय ? ... दरवाजे आपोआप उघडतात.. ट्रेन मधून एकात दुसरा माणूस बाहेर पडतो ... पुन्हा ट्रेन चे दरवाजे बंद होतात ... एकही माणूस चढत नाही ... ट्रेन पुन्हा निघून जाते...त्या ठिकाणी असणारी गर्दी एक तीळ मात्र हालत नाही. विकास बघायचा तर हा बघा ...
शासनाने असा त्रास द्यायचा ... अशी व्यवस्था निर्माण करायची की त्याचा सामान्य माणसाला काही उपयोगच होणार नाही... एक मात्र उद्देश " विकास " फक्त जगाला दाखवणे .. मात्र व्यवहारात विकास आजिबात दिसत नाही...विकासाचा बट्ट्याबोळ झालेली अशीही व्यवस्था ...काय कामाची ...ज्याठिकाणी विकास करायचा आहे ते सोडून नको तिकडे पैसे लावणे ...सध्याची AC लोकल ची असणारी अवस्था म्हणजे सफेद हत्ती पोसण्यासारखे आहे ...तरीही विकास ...

अपेक्षा आहे सामान्य माणूस लिहिलेल्या गोष्टी समजून घेईल आणि आपली संविधानिक भुमीका व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची बजावेल...

रंगकर्मी
तुषार म्हस्के

Friday, 2 February 2018

राजनीतीच असते जी आपल्याला आयुष्यात एक सुखी आणि समाधानी जीवन देऊ शकते ... अश्विनी नांदेडकर




कोण म्हणतं  पॉलिटिक्स साठी पैसाच लागतो ... तुषार माझ्या सहभागीने थिएटर ऑफ रेलेवन्सच्या प्रक्रियेद्वारे हे अनुभवले आणि दाखवले की राजनीतीमध्ये पुढाकार घेण्यासाठी पैसे नाही तुमची इच्छा आणि उद्देश्य स्पष्ट हवा . . "राजनीती शुद्ध आणि पवित्र असते " या मंजूल भारद्वाज यांच्या तत्वाला उद्देश्य ठरवून तुषार आणि स्वाती यांनी मालाड मध्ये राजनैतिक चिंतन रॅली काढली ... त्याच्या या मोहिमेला सुरवात होण्याअगोदर त्याने आम्हा थिएटर ऑफ रेलेवन्सच्या कर्मीना share केले ... त्यावेळी सुरवातीला आश्चर्य वाटले ... कारण जो तुषार आमच्यासोबत परफॉर्म करताना चाचपडत होता ... एकेक शब्दासाठी दहादा ओरडा खात होता ... कोणतेही जबाबदारीचे काम त्याच्यावर टाकताना त्याचा नंबर शेवटी होता ... पण थिएटर ऑफ रेलेवन्सच्या फेस्टिवल पासून त्याची अफलातून growth जाणवायला लागली ... एकेका गोष्टीवर तत्वांवर त्याची पकड मजबूत व्हायला लागली ... आणि थिएटर ऑफ रेलेवन्सच्या प्रक्रियेला त्याने घट्ट पकडून ठेवले ... या आयुष्य देणाऱ्या प्रक्रियेला त्याने आयुष्यात प्रत्यक्ष उतरवायला सुरवात केली ... लिखाण , त्याचा कामातला चिवटपणा , आणि मंजूल सरांचे मार्गदर्शन यामुळे या हिऱ्याला पैलू पडायला सुरुवात झाली ... आपला प्रत्येक अनुभवाची नोंद लिखाणात ठेवली ... प्रत्येक काम पेंडिंग न ठेवता पूर्णत्वाला नेले ... आणि सर्वात मोठा पुढाकार म्हणजे राजनैतिक चिंतन रॅली ... फक्त दोन बॅनर ...सोबतीला सहभागी स्वाती ... ठरवले की मालाड स्टेशन पर्यंत रॅली काढायची आणि जनमानसांत राजनीतीचा खरा अर्थ पोहोचवायचा..
आपल्या मित्रांशी
, राजकारणात इंटरेस्ट असणाऱ्या माणसांशी बोलायला सुरुवात केली ...आपले ध्येय सांगायला सुरुवात केली ... आणि ध्येयाशी लोकांना जोडायला सुरवात केली ... आज राजकारणात असलेल्या काही स्वार्थीलोलुप व्यक्तींमुळे राजनीती ला अर्थहीन बनवणे सुरू झाले आहे .. सुविद्य सज्ञान लोक याकडे पाठ फिरवतात ...this is not my cup of tea म्हणत सरळ सरळ या ignore करतात आणि राजनीतीला एक जंजाळ बनवायला प्रवृत्त करतात ज्यात ते स्वतः कधी फसतात हे कळतही नाही ... म्हणूनच आता वेळ आली आहे की प्रत्येक नागरिकाने राजनीतीचा खरा अर्थ आणि तिची पवित्रता समजून घेणे ... कारण ही राजनीतीच असते जी आपल्याला आयुष्यात एक सुखी आणि समाधानी जीवन देऊ शकते ... पोलीस परमिशन पासून सगळे सोपस्कार करत त्याने आपल्या ध्येयाला पूर्णत्व दिले सकाळी 7.30 ला आपले बॅनर आणि सहभागीनना सोबत घेऊन राजनीतीची खरी व्याख्या वाचत ...




रंगकर्मी
अश्विनी नांदेडकर

    

Thursday, 25 January 2018

थियेटर ऑफ़ रेलेवेंस का राजनीतिक दखल !....धनंजय कुमार



थियेटर ऑफ़ रेलेवेंस के माध्यम से मंजुल भारद्वाज अब राजनीति में भी दखल देने को तैयार हैं. हालांकि सालों से वह कंपनियों, संस्थाओं और विभिन्न एनजीओ के कार्यकर्ताओं और अधिकारियों में लीडरशिप तराशने के लिए वर्कशॉप करते आ रहे हैं, लेकिन पिछले दो एक सालों से राजनीति में उनका सीधा हस्तक्षेप बढ़ा है. योगेन्द्र यादव के राजनीतिक संगठन “स्वराज इंडिया” के लिए उन्होंने कई शिविर किये हैं और कार्यकर्ताओं-नेताओं की राजनीतिक चेतना को धार देने और दृष्टि को लक्ष्य भेदी बनाने में प्रभावी रोल निभाया है. पिछले सप्ताह थियेटर ऑफ़ रेलेवेंस के मुम्बई के साथियों ने मालाड में एक राजनीतिक चिंतन रैली निकाली. हजारों की भीड़ नहीं थी रैली में लेकिन हजारों का ध्यान जरूर खींचा अपनी तरफ. उनके हाथों में पोस्टर और बैनर थे, जिस पर राजनीति का मतलब लिखा था. रैली में शामिल लोगों ने स्वच्छ राजनीति के लिए शपथ ली.


आजादी के सत्तर सालों में राजनीति के विविध रूप देख चुके लोगों को लग सकता है कि बड़े बड़े तीरंदाज आये और राजनीति की धारा में बह गए. राजनीति गंधाती गयी और आज हालत है कि राजनीति बजबजा रही है. जनता बार बार ठगे जाने की वजह से मान चुकी है राजनीति अब और कुछ नहीं पैसा कमाने का जरिया बन चुका है. फिर भी...!
फिर भी जनता को उम्मीद है कोई तो आयेगा जब राजनीतिक हालात बदलेंगे और उनकी भी दुनिया बदलेगी, इसी उम्मीद में आम आदमी अलग अलग पार्टियों और नेताओं में अपने विश्वास को रोपता है और किसी को मुख्यमंत्री और किसी को प्रधानमंत्री की कुर्सी तक पहुंचाता है. लेकिन विडम्बना है कि बार बार मुख्यमंत्री और प्रधानमंत्री आम आदमी के वोट से चुने जाने के तुरंत बाद उसका होने की बजाय उद्योगपतियों और पूंजीपतियों का हो जाता है. उसके वोट से हासिल अकूत ताकत के बल पर, उसी के पैसे से खरीदे गए विमानों पर पूंजीपतियों को बिठाकर विदेश ले जाता है और बिजनेस दिलाता है. आम आदमी ठगा सा रह जाता है. लाल किला से आम आदमी के दुखों को कम करने की बात जरूर की जाती है, लेकिन पूरे साल नेता ख़ास आदमियों की आव भगत और तीमारदारी में लगा रहता है. जनता शोषण की चक्की में पांच साल पिसती है, फिर इलेक्शन का त्यौहार आ जाता है और जनता को ठगने वाले नारे फिर हवा में लहराने लगते हैं. जनता फिर ठगी जाती है, कभी जाति के नाम पर कभी धर्म के नाम पर तो कभी महंगाई और कभी पाकिस्तान के दांत खट्टे करने के नाम पर.
मंजुल कहते हैं इस सूरत को बदलने की जरूरत है. वह पुराने दिनों को याद करते हुए कहते हैं , जब वह थियेटर में आये थे, तब थियेटर सत्ता की मेहरबानी पर पल रहा था. आज मेहरबानी का बजट एक हजार करोड़ रुपये पर आ पहुंचा है, लेकिन थियेटर कहाँ है? उस थियेटर में वो जनता कहाँ है, उसके सरोकार कहाँ हैं, जिसकी मेहनत के पैसे थियेटर के नाम पर बांटे जा रहे हैं. थियेटर सिर्फ मनोरंजन नहीं है, यह जीवन को बदलने का माध्यम है. लेकिन विडम्बना है कि हमारे देश में थियेटर का मतलब आज भी नचनिया गवानिया ही होता है. लेकिन वास्तव में थियेटर का मतलब नचनिया गवानिया नहीं होता, थियेटर हमारी संवेदनाओं को, हमारे विचारों को, हमारे क्रिया कलापों को मांजने और संवारने का काम करता है. थियेटर कर्मी होने के नाते इसीलिये हम अपनी राजनीतिक भूमिका से खुद को अलग नहीं कर सकते. यह विडम्बना है कि गांधी नेहरू और साथियों ने राजनीति की जो संकल्पना की थी, उसके माध्यम से आम आदमी के जीवन में सुधार के जो स्वप्न देखे थे, आज वो क्षत विक्षत हैं. आम आदमी के जीवन को बेहतर बनाने को प्रतिबद्ध राजनीति पूंजीपतियों की गोद में जा बैठी है. इसलिए रोटी से लेकर न्याय तक आम आदमी की पहुँच मुश्किल होती जा रही है. इस राजनीति को बदलने की जरूरत है. और यह बदलाव सिर्फ अलग राजनीतिक पार्टी बना लेने से नहीं आयेगा, बल्कि राजनीतिक चेतना जन जन में जगाने की जरूरत है. और यह काम थियेटर ही कर सकता है.
थियेटर हो या राजनीति, बिना पैसे के कोई चल नहीं चल सकता, यही आम धारणा है, इसीलिये राजनीतिक पार्टियां पूंजीपतियों पर आश्रित हैं और थियेटरकर्मी सरकारी अनुदानों पर. पैसे का मालिक पूंजीपति ही होता है, यही कारण है कि चुनाव जीतते ही नेता पूंजीपतियों की चाकरी में व्यस्त हो जाते हैं और जनता की सुध लेने की उन्हें न फुर्सत मिलती है और न ही जरूरत महसूस होती है. थियेटर कर्मी भी सरकार का यशोगान करते हैं या फिर मनोरंजन के नाम पर तमाशा करते हैं, मदारी बन जाते हैं. लेकिन थियेटरकर्मी मदारी नहीं है.
मंजुल इसी मकसद के तहत राजनीति पर एक नाटक रचने में भी इन दिनों व्यस्त हैं. जिसमें वह राजनीति के नए सन्दर्भ के साथ चाल चरित्र और चेहरा गढ़ रहे हैं.

धनंजय कुमार

Tuesday, 23 January 2018

राजनीतीचा नव्याने संविधानिक जन्म होईल...ही वैचारिक स्पष्टता " थिएटर ऑफ रेलेवन्स च्या राजनैतिक चिंतन रैली" मध्ये मला आली.-स्वाती वाघ.





एक प्रवास स्वतः पासून ऊर्जेच्या दिशेने...राजनीतीच्या दिशेने पहिल्यांदा ठेवलेलं एक डोळस पाऊल...ज्यामध्ये मला माझी व्यक्तिगत पैलूंची सामाजिक जडण घडण होताना दिसली ..भीती निघून गेल्यावर... आत्मविश्वास वाढतो...व आत्मविश्वासाला मिळालेली योग्य दिशा म्हणजे ऊर्जा...याचा अनुभव आला तो " थिएटर ऑफ रेलवन्स" च्या राजनीती चिंतन रैली मध्ये.... विषय सुंदर त्याचबरोबर जबाबदारीची जाणीव करून देणारा एक नागरिक म्हणून आरसा दाखवणारा...

व्यक्तिगत पक्षा पलीकडे... व्यक्तिगत भक्ती पलीकडे... राजनीती आहे... "राजनीती शुद्ध , सात्विक, पवित्र, बौद्धिक, सामाजिक ,आर्थिक, सांस्कृतिक ,आर्थिक पराकाष्ठाओ की स्वामिनी!!! " मंजुल भारद्वाज लिखित व्याख्येचे वाचन केल्यावर डोक्यात राजनीती साठी असलेलं दूषित चित्र हळू हळू नाहीस होऊ लागते...जाणीव होउ लागली , व्यक्तिगत स्वार्थासाठी निरनिराळे पक्ष निर्माण होतात...मग त्याप्रमाणे या जनसमुदायची सुद्धा विभागणी होते... व्यक्तिगत ताकद वापरून... एकमेकांवर शिंतोडे उडवत...मग स्पर्धा जिकण्याची... निवडणुकांची...हे पक्ष तयार होतात...प्रत्येक पक्ष स्वतः चे फोल्लोवर्स करण्याचा आटोकाट प्रयत्न...मग दिवसा सुद्धा चांदण दाखवणं...आणि यात वैचारिक कमी तर आंधळी भक्ती निर्माण होते...

                             


या मध्ये व्यक्ती नागरिक कमी..भक्त जास्त दिसतो...दुसरा या दोघांतील काही नाही झालं तर सभ्यतेची चादर पांघरून वावरत असतो..व या मध्ये गर्दी निर्माण होते ज्याला दिशा नसते आंधळी भक्ती करणारी गर्दी...

मग जाणवलं... राजनीती मुळात वाईट नाही...ती ज्या व्यक्तीच्या हाती जाते त्या प्रमाणे तिची जडण घडण होत जाते...त्या व्यक्तींना आपण राजनेता म्हणून संबोधतो...

व याची जडण घडण कोणाच्या हाती सुपूर्त करायची याचा निर्णय हा "नागरिक" म्हणून आपला असतो...जसे मुलं व्यसनी निघालं म्हणून आईच्या गर्भाला दोष देत नाही...तर त्यासाठी त्याच्या आजूबाजूचं वातावरण व त्याची होणारी जडण घडण कारणीभूत असते...अगदी असंच राजनैतिक डावपेचाचा सापळा रचून राजनीती ला दूषित करण्याचं षडयंत्र हे वर्षानुवर्षं सुरू आहे...तर अश्यावेळी एक नागरिक म्हणून स्वतः ची भूमिका डोळसपणे , निःपक्षपाती पणे ज्यावेळी या देशाचा प्रत्येक व्यक्ती बजावेल...निभावले.. त्या वेळी क्षणोक्षणी राजनीतीचा नव्याने संविधानिक जन्म होईल...ही वैचारिक स्पष्टता " थिएटर ऑफ रेलवन्स च्या राजनैतिक चिंतन रैली" मध्ये मला आली.


दिनांक
21 जानेवारी 2018
स्वाती वाघ.

Saturday, 20 January 2018

" थियेटर ऑफ रेलेवंस राजनैतिक चिंतन रैली "

आता पर्यंत आपण राजनीति ला खूप शिव्या देतो . राजनीती घाणेरडी आहे, गटार आहे, राजनीती मध्ये असणारे व्यक्ती वाईट असतात .... अशा अनेक वाईट उपमा देऊन आपण सभ्य माणसे राजनीति पासून लांब राहतो. राजनीति ला सांभाळणारे "व्यक्ती " वाईट असू शकतात. पण, राजनीति वाईट असू शकत नाही.माणसाच्या जीवनातील सर्व घटना ह्या राजनीति वर अवलंबून आहेत. एका बाजूला राजनीति ला बदनाम करण्याच षड्यंत्र सुरु असताना. दुसऱ्या बाजूला "थियेटर ऑफ रेलेवंस " नाट्य सिद्धांताने राजनीति ची सात्विक व्याख्या जनतेच्या उद्धारासाठी जनमाणसात आणली. " सध्या लोकशाही ला टिकवून ठेवणे हे सर्वात मोठे आवाहन झाले आहे. त्यातच लोकशाही ला सांभाळणारा " भारताचा नागरिक " सभ्यतेची चादर पांघरून बसला आहे. वेळ आली आहे. राजनीति ला समजून घेण्याची ..राजनीती ची व्यापकता जनमाणसात पोहचवण्याची...आवाहन आहे ...लोकशाही ला सांभाळणाऱ्या शिलेदारांना आणि लोकशाहीचे पालन करणार्यांना चला " एकत्र येवूयात " गल्ली पासून चा आवाज दिल्ली पर्यंत पोहोचवूयात...


" थियेटर ऑफ रेलेवंस राजनैतिक चिंतन रैली " दिनांक - 21 जानेवारी 2018, रोजी सकाळी 7:30 वाजता. आप्पा पाडा रिक्षा स्थानक ते मालाड रेल्वे स्थानक पूर्व पर्यंत असणार आहे.

* येणारा व्यक्ती हा रंग, जात , धर्म , कोणताही राजकीय पक्ष यांच्यापलीकडे एक " भारताचा जबाबदार नागरिक " म्हणून येईल हि अपेक्षा...

* " थिएटर ऑफ रेलेवन्स राजनैतिक चिंतन रैली " काढण्याचा उद्देश जनमाणसापर्यंत " राजनीति " ची शुद्ध आणि सात्विक बाजू पोहचवणे. ज्यामुळे राजनीति प्रति आदर निर्माण होईल . त्यातून सामान्य व्यक्ती ची राजनीती बरोबर सहभाग नोंदवेल.

* अति महत्वाची गोष्ट - आपण कोणताही व्यक्ती , राजकीय पक्ष , धर्म ,जात , रंग ह्या अतिसंवेदनशील गोष्टींच्या विरोधात बोलणार नाही.

* ह्या रैली च वैशिष्ट्य - एक व्यक्ती राजनीति ची व्याख्या बोलेल त्याच्या मागे आपल्याला बोलायचं आहे .

* मध्ये मध्ये - फक्त "हम हैं " चा नारा असेल ..

* आप्पा पाडा रिक्षा स्थानक-जिजामाता शाळा-रमेश हॉटेल-स्टेट बँक-संस्कार कॉलेज-कुरार पोलीस चौकी-हायवे सबवे-दफ़्तरी रोड-शिवाजी चौक-मालाड रेल्वे स्थानक* असा असणार आहे.

* सहभागी - सर्व भारतीय जे स्वतःला लोकशाहीचे शिलेदार आणि पालनकर्ता समजतात.

तुषार म्हस्के
9029333147