Sunday, 19 February 2017

वादळाच्या अगोदर असणारी शांतता कधी कोणी पाहिली आहे का ? .

वादळाच्या अगोदर असणारी शांतता कधी कोणी पाहिली आहे का ? ....असा प्रश्न विचारला तर त्यात काहीच वावग नाही आहे ...मनात सतत निर्माण होत असणारी उष्णता, आज सर्वोच्च पातळीला जाऊन फक्त फुटण्याच्या मनस्थितित दिसू लागली...माझ्या जीवनात मला विचारले जाणारे प्रश्न तुला हे नाटकच करायचं होत तर शिकायची काय गरज होती ? आणि या मुलांचे वर्कशॉप घेत असताना जीवन जगायला शिकवतो ....आणि त्यात जीवनात आलेला ,येत असणारा अनुभव म्हणजे आपला अभ्यास .... 


पाठ्य पुस्तकाबरोबर जीवनाच्या पुस्तकात लिहायला आणि वाचायला शिकवतो .....अशीच ही शांतता विदर्भ विद्या मंदिर शा ळेमध्ये पसरली होती ....माझ 7 वी ते 10 वी च शिक्षण याचं शाळेत झालं त्यामुळे जीवन जगत असताना आलेले अनुभव आता ....त्या अनुभवाना सकारात्मक 



दृष्टि देऊन .... आत्म विचार रूपाने अनुभव देत होतो....आजच्या दिवसामध्ये इयत्ता 9 वी ची बैच होती ....सुरुवातीला गड़बड़ करणारे विद्यार्थी आम्ही आज काहीही न बोलता समोर जाऊन उभा राहीलो आणि आम्ही 4 रंगकर्मी नवीन रंग या किशोर अवस्थे मधील बालक आणि बालिका मध्ये पाहत होतो ....10 ते 15 मिनिटे शांत सर्व जन आम्ही 



कोणालाच काहीही बोलत नव्हतो थोड्या वेळाने सर्व जन शांत झाले ....एकदम कोलाहातील शांतता सर्वत्र पसरली होती ....फक्त नजरेने जग बदलता येत हेच डोळ्यात दिसत होते....कुठे ते शांत बस ....शांत बस ...सांगून न एकणारे विद्यार्थी आणि कुठे ते फक्त नजरेच्या खुनेने शांत बसणारे ....या शांततेनंतर या उर्जेचा रूपान्तर आता collective उर्जे मध्ये झालेले दिसलं ...




.आम्ही येण्याअगोदर कोणताही वाद्या चा उपयोग न करता छान अशा रिदम ची निर्मिती केली होती ....मग, त्या उर्जेला दिशा देण्यासाठी सर्वानी एका तालात एका सुरामध्ये रिदम वाजवायला सुरुवात केली ....आणि हे वादळ जे नवीन दृष्टी, कल्पकतेच्या पुढे घेऊन जाणारं दिसलं ...



.एका सुरात आणि एका तालात सर्व जण वाजवू लागले याच बरोबर सर्वांच्या मनात वेग - वेगळे प्रश्न निर्माण झालेले दिसले .....मैत्री म्हणजे कशी असावी यावर नाटक करायला वेळ दिला ....त्याच बरोबर काही गटांनी समाजातील विषमता असं, त्यांनीच विषयाची निवड केली ....आत मध्ये खूप ऊर्जा पण, ज्यावेळी ती वयक्तिक उर्जे मध्ये परावर्तित होत असते त्या वेळी ती दबलेली असते ...



.भीड मध्ये कोणीही येऊन टपली मारून जावं ...पण, समोर उभा राहून बोलणारे कमी मग, त्यांना दिशा देत त्यातून व्यक्ती ला बोलतं केला ...आवाजाचा चढ उतार , त्याच बरोबर आलाप , हमींग करत पळनं....वेगवेगळ्या आकृती मधून शाळा, गाव , शहर, पक्षी झाडे जंगल अशी वेगवेगळी रूपे आकार घेऊन त्वरित imagination मध्ये भर पड़त असताना दिसू लागले .....काहिंचे चेहरे चमकू लागले , काहिजन acitve झाले , काहिजन प्रश्नांची उत्तरे देऊ लागले ...असे हे क्षणा क्षणाला बदल होताना दिसू लागले ....याच उर्जेमध्ये स्वतः ला या उन्हामध्ये तापवून तप करणारे हे स्वतः च्या शोधात धावणारे विद्यार्थी अगदी विशाल 

जीवनाच्या समुद्रात सत्व शोधताना दिसू लागले....जीवनात कधीही नाटक केलं नाही ...असे स्टेज होल्ड करून ठेवायला शिकले ....ही माझ्या विश्वातिल जागा आहे याची जाणीव त्यांना झाली आवाजामध्ये बदल दिसून आला ... नाटकाचं सादरीकरन म्हणजे ,त्यांनी स्वतः च्या विचारांचा केलेला अभिव्यकपणा 
शांतते नंतर ऊर्जेला दिशा ,प्रश्न त्याच बरोबर अभिव्यक्त होणं हे ToR च्या प्रक्रियेतून समोर येत असताना दिसू लागले.

रंगकर्मी
तुषार म्हस्के

Friday, 17 February 2017

प्रेरणात्मक विचार आज पाहायला मिळाले ....

एक शब्द आहे समानता ...मी मुलगा आणि मी मुलगी ....याच्यापलीकडे एकमेकांना पाहणे ....विदर्भ विद्या मंदीर मध्ये होत असणारी कार्यशाळा अगदी विद्यार्थांमध्ये क्षणा क्षणाला बदल घडवून आणत आहे हे जाणवू लागले ...कारण , आपल्या शिक्षण व्यवस्थेत मुले एका बाजूला आणि मुली एका बाजूला अशा रांगामध्ये बसणारे विद्यार्थी ....त्यातच , एकादा मुलींच्या बाजूला बसला तर त्याला चिडवून हैराण करणारी मानसिकता 



...मग , कधी कोणाबरोबर बोलनं नाही ...याच्यातून लांब जाऊन गर्दी मध्ये एकमेकांना ढकलून पुढे ...पुढे ढकलत असताना दिसू लागली ....या दोन दिवसाच्या प्रक्रियेमध्ये हि , मानसिकता कमी होत असताना जाणवू लागली १५ फेब्रुवारी च्या अनुभवामध्ये विद्यार्थ्यांनी लिहिले होते आम्ही ...मुलगा आणि मुलगी हे समान आहेत .पहिल्यांदा एकत्र असल्यासारखे वाटले ....या कार्यशाळेची व्यापकता अगदी स्पष्ट ....



त्या बालक , बालिका आणि शाळेतील शिक्षक वर्ग यांना प्रेरणा देताना दिसू लागले .....छडी ची मानसिकता असणारे विद्यार्थी ...आता माणुसकीच्या वागण्यात परिवर्तन होत असताना दिसू लागले ...एका बाजूला बाहेर ऊण तापवत आहे दुसऱ्या बाजूला .....डोक्यात सुरु असणारे विचार तापवत होते ....जीवन जगणे हि एक कला आहे आणि आपला अधिकार आणि हक्क यामध्ये असणारी माझी भूमिका काय हे स्पष्ट 



नसल्यामुळे ....फक्त एकमेकांचा पाय खेचणारी हि मानसिकता , जेव्हा त्याच कडी ला समोर आणते स्वतः बरोबर झगडून नवीन विचार आणि आयाम ...त्याच बरोबर माझी भूमिका आता निर्णय घेण्याची आहे याची जाणीव झाल्यानंतर त्या मनस्थिती च झालेलं सकारात्मक ऊर्जेमध्ये 



परिवर्तन डोळ्यांना दिसू लागले ....या बालक आणि बालकांना tor ने स्वप्न दिलं ...drop by drop ...नावाचं नाटक केलं ...आणि ते युरोपात जाऊन सादर केलं ...असं तुम्हाला वाटत का कि तुम्ही हि स्वप्न पाहू शकता ....यावर आलेली उत्तरे हि , नाही ...मग, यावर प्रक्रिया करून त्यांना स्वप्न दिलं विचार दिला ......माझी आताची शाळा आणि स्वप्नातील 



शाळा ....आणि हे शाळेच रूप ज्यावेळी आपल्या नाटका मध्ये दाखवलं गेलं ...त्यावेळी चमकत असणारी विचारांची दृष्टी ...नवीन आकृती ...झाडे ,पक्षी ,खेळणारी बालक - बालिका , सुंदर असं मैदान ...काय कल्पना आहे ती .....हेच , आहे स्वप्न निर्माण करण ...जे या बालकांना अगदी त्यांना जगत असताना ध्येय निर्माण करून देणार ....तोड मर्दा तोड हि चाकोरी ....तोड बाई तोड हि चाकोरी ....मुक्तीच गीत गाऊ रात आहे अंधारी ....हे गाण्यातील स्वर ...एक चौकट ....



जी मनामध्ये बनलेली आहे ती तोडून स्वतः च्या अस्तित्वाची आहे ......कमजोर कडी ला पकडून त्याच्या बरोबर प्रक्रिया करण.हि जागा माझी आहे .....हे जीवन माझ आहे .... त्यामध्ये , हे जीवन जगण्याच सूत्र आहे ते म्हणजे विचार ...आणि हा सृजनात्मक विचार या ठिकाणी निर्माण होत असताना दिसू लागले ....४ गटांमध्ये केलेला विभाजन म्हणजे 




वयक्तिगत लक्ष देऊन ....बदलाची प्रक्रिया विचारांमध्ये निर्माण करणे ...... आता , हे विद्यार्थी २ ते ३ तासांमध्ये बोलायला लागले ...आपला जगण्याचा अधिकार मागायला लागले ....ज्यांचा आवाज खूप छोटा आहे त्यांचा आता मोठ्याने येऊ लागला बोलताना शब्द हे वाढू लागले ...शब्दांचा होत असणारा सुंदर उपयोग ....विचारांना फुलवताना दिसू लागाली 



....स्वतःमध्ये झालेलं परिवर्तन ...नाटक रूपाने सादरीकरण करणे व जीवन जगण्याची सूत्र या भीड वाल्या मानसिकते मध्ये निर्माण करण ...त्यातही आता मी एक लीडर आहे ते initiative घेण हे बदल दिसू लागले ....नाटक सादरीकरण होत असताना शिक्षकांना प्रेरणा देत ....त्यांना हि बोलायला लावलेली प्रतीकात्मक आणि प्रेरणात्मक विचार आज पाहायला मिळाले ....



हि यात्रा नवीन - स्वप्नांना जागवते , स्त्री - पुरुषाच्या मानसिकतेतून बाहेर काढते , निर्णय घ्यायला भाग पाडते .....



रंगकर्मी 
तुषार म्हस्के

Wednesday, 15 February 2017

ऊर्जेचा स्त्रोत म्हणजे विद्यार्थी ...

ऊर्जेचा स्त्रोत म्हणजे विद्यार्थी ....हे विध्यार्थी म्हणजे आपल्या राष्ट्राचे भविष्य हिच सुरवात आम्ही थिएटर ऑफ रेलेव्हन्स च्या रंगकर्मीनी केली ...आम्ही एक पुढाकार घेऊन कुरार व्हिलेज , मालाड पूर्व, मुंबई येथील ... विदर्भ विद्या मंदिर विद्यालयात केली...काय आग आहे त्या मुलांमध्ये 




....थोडा वेळ शांत न बसणारे, एकमेकांत मस्ती करणारे , प्लास्टिकने विणलेल्या झोपडीत राहणारे 80% विद्यार्थी ....हे विद्यार्थी म्हणजे आगीचे गोळे... घरामध्ये आई आणि वडील हे दोघे कामाला जाणारे आणि त्यातच यातील बहुतांश मुले हे वाईट संगतीत असणारी..... आजूबाजूच्या वातावरणाचा होत असणारा प्रभाव ...कधीही पुढाकार घ्यायची तयारी नसणारी मानसिकता ...3 तासांमध्ये बोलायला लागली ...प्रश्न विचारल्या नंतर तू पुढे ....तू पुढे ..एकमेकांना टपली मारून ...सारवा सारव करणारी मानसिकता कमी झाली....सुरवातीपासून ते शेवट पर्यंत ऊर्जेचा फ्लो वाढत असताना दिसू लागला..संघर्षामधून जीवन घडत असते आणि



आम्ही कलाकार संघर्ष करून या मुलांमध्ये निर्माण होत असणाऱ्या प्रकाशाच्या झोताला दिशा देण्याचे काम करू लागलो... ....101 विध्यार्थी ...विदर्भ विद्या मंदिर शाळेचं पटांगण ...हॉल... ...सर्वत्र वातावरण अगदी जीवन्त झाल्यासारखे दिसू लागले ....4 गटांमध्ये विभाजन केल्यानंतर ...त्या ग्रुप ला लीड करण... 7 वी आणि 8 वी चे विद्यार्थी ... एकमेकांमधील मारहाण ...टपली मारणे ....चिंमटा काढणे ...एक बोलत असताना दुसर्याने न ऐकणे ....हे सर्व प्रकार घडत होते ....माझ्या डोक्यात आधल्या दिवसाच्या रात्री पासून कसं करायचं ? काय मुलांना द्यायचा ? या गोष्टींचं मनन सुरु तर होतच त्या बरोबर ...राजकीय अजेंडा असा आहे ...या मुलांमध्ये राजकीय पाहण्याची दृष्टी निर्माण करण...हे जीवन माझं आहे ...हि शाळा माझी आहे ....यांचे बीज पेरनेे... ग्रुप बरोबर चर्चा
केल्यानंतर हे मुद्दे स्पष्ट झाले ..हे शब्द बोलत असताना ते initative घेऊन बोलणं .... नंतर शरीरामधून बाहेर काढणे ...gender मध्ये अडकून न जाता ...एक माणूस म्हणून पाहन ...याची चर्चा आणि planning सुरु झाली ....सतत चिंतन आणि मनामध्ये प्रक्रिया सुरु झाल्या होत्या ...थोडा challenging आजचा दिवस ....या कार्यशाळेची प्रस्तावना आणि आमच्या कलाकारांची ओळख मी केली ...पहिल्यांदा सुरुवात केल्याचं समाधान
...त्याच बरोबर नव -नवीन विचारांची मांडणी ..आणि प्रयोगात्मक भूमिका tor ने मला निर्माण करून दिली आहे याची जाणीव बोलता बोलता होत होती ...किती, मनाला समाधान मिळत असत ! ज्यावेळी आपण हसत खेळत संवाद साधतो आणि तो संवाद आपल्या संवादामध्ये सहभागी




असणाऱ्या साथीना समजतो...' माझी शाळा ' यावर नाटक करायला सांगितले ...आणि तो विश्वास निर्माण करण की , हो आम्ही करू शकतो ...आम्ही एकत्र करत आहोत ...हेच केवढ मोठ साध्य आहे ....हि शाळा माझी आहे ....smilyee, 4 ग्रुप ला घेऊन करत होती आणि तो आवाजाचा चढ उतार आणि एकमेकांमधील तो सुप्त संवाद .. एकमेकांच्या विचारांना फुलवत असताना दिसू लागला ...नाटकाची प्रस्तुती होत असताना कधीही न बोलणारी मुले नाटकाच्या माध्यमातून बोलू लागली ...



.आपल्या शिक्षकांसमोर आरसा बनून उभी राहिली ... हम हैं ! चा नारा त्या वातावरणात नवीन द्रुष्टी ,नवीन विचार, एकात्मतेची ताकद ,स्वतः वरचा विश्वास गुंजायमान करू लागला ...


आंतरराष्ट्रीय कलाकार अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर , राष्ट्रीय कलाकार कोमल खामकर ,तुषार म्हस्के आणि tor अभ्यासक , कलाकार स्वाती वाघ यांनी या कुरार मध्ये हा वैचारिक " स्व " च्या जाणीवेचा झेंडा रोवला ....हि दृष्टी दाखवणऱ्या रंगचिंतक - tor उत्प्रेरक मंजुल भारद्वाज यांना सलाम ....

रंगकर्मी 
तुषार म्हस्के

Tuesday, 7 February 2017

दिनांक 7 फेब्रवारी 2017.....अनुभव

आज दिवसाचा अनुभव हा चैतन्यदायी आणि धावपळ करणारा ...सकाळी योगा सेंटर ला जायचं ठरलं होतं, त्याप्रमाणे 11 वाजता दादर ला भेटलो ....आम्ही tor चे 4 रंगकर्मी ,या व्यवहारीकते च्या ओझ्याखाली दबलेल्या जीवांना जणू काही अमृत ...चैतन्य रूपाने पाजून त्यांच्यात वैचारिक अमृत चैतन्य निर्माण करत आहोत हे जाणवले ....


आज हे भाव सहज मनाला समजणारे.....अगदी सोप्या सोप्या शब्दांत आपले रूप वटवणारे ....डोळे बंद करत अनसुनी चे सूर छेडत विशाल या विश्वात स्व केंदित करणारे ....माझा आवाज या ब्रम्हांडात ऐकला जातोय आणि तो मी अनुभवतोय ....याचा प्रत्यय आणणारे ..येणारे अनुभव हे परग्रहावर आहोत की काय ? त्याचा प्रत्यय आणणारे ...हे अनुभव आल्यानंतर आता बोलायचं तरी काय ? हे विचार निर्माण करणारे...
हे शब्दात मांडून न समजणारे फक्त शारीरिक सूक्ष्म हालचालींवरून डोळ्यांना भावणारे ...आपोआप डोळ्यातून पाणी येणं ...आणि मिठी मारून मनमोकळे पणाने रडणं ....आपली स्वतः ची जाणीव करून देत आपला आरसा आणणारे ....चेहऱ्याची प्रतिमा चमकून डोळ्यातील भावना अगदी सहज प्रकट करणारे ....


अनुभवाच्या या महासागरात मी शोध तोय माझ्या असण्याने इथे कोणता वैचारिक बदल होतोय ....इथे कोणती वैचारिक क्रान्ती होतेय....आणि जगण्याचा तो आरसा दाखवत नवीन दृष्टी नवीन सृष्टी चा निर्माण करणारे ...आता , मला बाहेर नाही पहायचं आहे ....मला माझ्यात स्वतः ला शोधायचं आहे ...माझ्यातील न पाहिलेले गुण मला शोधून काढायचे आहेत ...यात फक्त निमित्त हि बाह्य परिस्थिती आहे त्याच्या तुफान ऊर्जेत झोकवणारे....हा क्षण कधीही थांबणारा नसावा हा क्षण फक्त शिकत जाणं स्वताला शोधनंआणि सतत निर्माण करणारा असावा ....असा हा नाद ...जो ...अनह्द नाद आहे....या सात्त्विक अनुभवाच्या विचारात हा योगा क्लास वरील प्रयोग जो नवीन विचार ....सत्त्व आणि शोधण्याची दृष्टी निर्माण करतो...9 ते 10 महिला सहभागी या योगा क्लास मध्ये होत्या अनसुनी चा स्वर गुंजला आणि आत्म चिंतनास सुरुवात झाली ...या आवाजात मी कधी डोळे बंद करून स्वतः चा शोध घेऊन स्व चा सूर शोधणारी....सहभागी साथीचा आलेला अनुभव हा ज्यांना डोळे नाहीत ते कसे जीवन जगतात? याची जाणीव झाली... माझा आवाज ब्रम्हांडात जात आहे ....तुम्ही यात मला ब्रम्हांड दाखवलात.... अशा पद्धतीने येणाऱ्या प्रतिक्रिया ....


आवाज तुमचा मुला सारखा आहे मध्येच असं जाणवलं कोणतरी पुरुष गाणं बोलतोय ....त्यावेळी मला हे जाणवलं म्हणून तो कलात्मक शिव आहे ....जो अर्ध नारेश्वर आहे....तो आवाज स्त्री आणि पुरुषाचा नसून तो मानवाचा आहे कलाकाराचा आहे ....

थियेटर ऑफ रेलेवंस रंगकर्मी 
तुषार म्हस्के 
९०२९३३३१४७

Monday, 30 January 2017

26 जानेवारी 2017 गणतंत्र दिवस माझ्या मध्ये चेतना निर्माण करणारा.....


एक जबरदस्त अनुभव कधीही स्वतःला एवढ्या विचारांच्या ताकदीमध्ये पाहिलेलं नव्हतं....आज पाहिलं आणि ऐकला माझा आवाज मी ....सृजनाच्या माउंट एवरेस्ट वरुन घेतलेली ऊर्जा आज या व्यवहारात उतरवली ... कलाकाराच्या ताकदीने , विचाराने ध्येयाला स्पष्ट केल्याने .....आज माझा performance हा विचारांचा आहे याची मला जाणीव झाली ....तू खुद्द को बदल ....तू खुद्द को बदल तभी तो जमाना बदलेगा ....दर्या कि कसम मौजो कि कसम ये ताना , बाना बदलेगा ....हा स्वता ला प्रश्न विचारणारा संवाद ....स्वतः पासून बदलाची सुरुवात करणारा प्रवास 



....अगदी सहज त्या 150 ते 160 मुलांबरोबर करणं....त्या मध्ये 18 ते 20 साधारणता मान्यवर .... विदर्भ एकता मंडळ संचालित विदर्भ विद्या मंदिर शाळा मालाड पूर्व .....या शाळेत मी 7 वी ते 10 वीत शिक्षण घेतलं....26 जानेवारी 2017 हा दिवस गणतंत्र दिवस म्हणून ओळखला जातो ....संविधान हे भारतात 26 जानेवारी पासून रुजू झाले ....
आणि लोकशाही भारतात रुजू झाली ....संविधान आणि त्याचे तत्व हे पाहताना फक्त वाचनापूरते दिसू लागले व्यवहारीजीवनात त्याचा वापर दिसतो कि नाही हा प्रश्न आहे ....एका बाजूला राजेशाही संपली आहे ....तरीही , त्यांच्या नावावर राजकारण करून लोकप्रिय , समाजरचणीय राजाचा नाव घेऊन भोळी भाबडी जनता फक्त त्या ओघात फक्त शिवाजी जन्माला येईल आणि आम्हांला वाचवेल ...हि मानसिकता दूर करण्यासाठी संविधानातील तत्वांचा माझ्या व्यक्तिगत जीवनात किती फरक पडतो हे मांडणे महत्वाचे वाटू लागले...

.डोक्यामध्ये विचारांचा काहोर निर्माण झाला ....देशाचं भविष्य माझ्या समोर लहान ....किशोरवयीन त्या मुलां -मुलींमध्ये दिसत होते ....त्याच बरोबर भूतकाळ हा मान्यवर मंडळींच्या रूपाने मंचावर बसलेला दिसू लागला....एक विचारांची ज्योत या किशोर आणि किशोरींमध्ये पेटवायची हा विचार ....त्यामध्ये वयस्कर मंडळींना एक ऊर्जा देणं ....30 ते 40 मिनिटे झाली सर्व मंडळी भाषण देण्यात व्यस्त ....त्यामध्ये त्या मुलांच्या चेहऱ्यावर शिक्षा भोगत आहोत असा भाव जाणवू लागला .....त्यामध्ये वक्ता काय बोलतोय आणि ते प्रेक्षकांना काय समजतोय हा प्रश्न निर्माण माझ्या मनात होऊ लागला ....संस्थेकडे 10 ते 15 मिनिटे हक्काने मागून घेतली मी बोलणार .....मनात पहिलाच विचार आला ....यांच्य मध्ये ऊर्जा निर्माण करायची ....दुसरा प्रश्न आला ....आता काय बोलायचं ? संविधानाविषयी बोलताना तथाकथित माहिती सांगायची कि , ते संविधानाचे तत्व जगायला लावायचे ....त्या तत्वांची ताकद दाखवून द्यायची .....मग, एका मागून एक तत्व , विचार काय बोलणार ? काय करणार ? याची रचना माझ्या डोक्यात निर्मान झाली ....मग, उर्जेने भरलेल्या या महासागरात मी उडी मारली .....आणि त्या वातावरणाला बदलायला सुरुवात केली ...पहिला पाऊल टाकलं आणि त्याच बरोबर त्या लहान मुलांनी त्याला साद दिली ....ऊर्जेचा स्रोत म्हणजे लहान मुले


....त्यांना शब्द दिला.... हैं .... त्याच बरोबर ती लहान मुले बोलली आम्हांला हा शब्द माहिती आहे ....मनात झालं अरे , वाह ....छोट्या छोट्या गोष्टी कशा लक्षात ठेवतात हि मुले ....मग , मी शब्द हम घेतला ....आणि त्या वातावरणाला आवाज दिला ....त्याच बरोबर त्या लहान मुलांचा आवाज हा सर्वात जास्त येऊ लागला ....मग, मान्यवर मंडळींना आवाज दिला ...त्यांचा हि आवाज येऊ लागला ....असा त्या संपूर्ण शाळेच्या वातारणामध्ये " हम हैं " गुंजायमान झाला ....त्याचं बरोबर प्रश्न केला ....हि जागा कोणाची आहे ....? मग , त्यांचा उत्तर आला आमची ....मग, त्यांना सांगितले बोला ....हि जागा माझी आहे .....हे जीवन माझं आहे.....विचार करणे माझा अधिकार आहे ....निर्णय घेणे माझा अधिकार आहे .....हे बोलत असताना मुलांची बॉडी langauage बदलली ....आणि ऊर्जा त्यांच्या नसा नसांमधून वाहू लागली ....त्याच बरोबर शिक्षक वर्ग अभिमानाने माझ्याकडे पाहताना दिसू लागला त्यांच्या मनात अभिमानाने छाती फुगून यावी अशी त्यांची प्रतिमा डोळ्यांना दिसू लागली....शेवटी या उर्जेमध्ये उडी मारताना ....जबदस्त ताकद आणि ऊर्जा मला पुन्हा पुन्हा मिळाली ....ती परावर्तित होऊन माझ्याकडे येऊ लागली ....मंजुळ भारदवाज यांच्या थिएटर ऑफ रेलेवन्स या नाट्य सिद्धांताने दिलेल्या तत्वाने ....दिलेल्या सांविधानीक दृष्टीने आज हा सरळ विचार मांडता आला ...असा हा 26 जानेवारी 2017 ला गणतंत्र दिवस माझ्या मध्ये चेतना निर्माण करणारा , माझ्या समाजात चेतना निर्माण करणारा ....जाणवू लागला


रंगकर्मी 
तुषार म्हस्के

Wednesday, 18 January 2017

चैतन्याच् चैतन्य हे विचारांत असतो ..

चैतन्याच् चैतन्य हे विचारांत असतो ....अणि अशीच एक यात्रा जी वेगळी आहे ....जी सकाळी सूर्य उगवण्याआधी सुरु होते ....योगा ....अनहद नाद चा योगा बरोबर काय संबंध आहे ....?.... आपल्या राष्ट्राची विरासत म्हणजे अध्यात्म ....अनहद नाद ची यात्रा ही माणसाला त्याच्या स्वताच्या अंतरंगासोबत जोड़ते ....आणि हा अनुभव 4 जानेवारी 2017 मलाड पूर्व ....या ठिकाणी आला ...सकाळी आम्ही कलाकार योगा 



करणाऱ्या वर्गाला भेटलो ...tor टीम ची ओळख ...अगदी सहज आणि 
साध्या शब्द प्रणाली मध्ये करून दिली ...त्यातच शब्दांमध्ये येत असणारी लचक व पहिल्यांदाच बोलताना मी माझे शब्द ऐकत आहे ही जाणीव ...माझ्यासाठी मला आत्मीक समाधान मिळवून देणारी आहे ...आंतरराष्ट्रीय कलाकार सायली पावसकर यांनी योग करणाऱ्या साथीना व्यवस्था बदलण्याचे आवाहन केले त्यामध्ये त्यांच्या बरोबर संवाद साधत अगदी सहज रित्या त्या साथींनी गोल सर्कल केला ...आपले बसण्याचे आसन घेऊन वर्तुळात बसले ....त्यानंतर 



राष्ट्रीय tor कलाकार कोमल खामकर ....यांनी मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक " अनहद नाद - unheard sounds of universe "मधील शेवटचा गाणं ऐकवलं ...डोळे बंद करून एकदम स्वतःला स्वताशी संघर्ष करून त्यांनी आपल्या मनावर ताबा मिळवला ....त्यांच्यासाठी डोळे बंद करणे हेच एक मोठं आव्हान होते...आणि अपनी अनसुनी आवाज सूनो ....बरोबर एका वेगळ्या विश्वात त्यांना तो सूर घेऊन गेल्याचा अनुभव त्यांनी सांगितला ....स्वताचा आवाज जो आतापर्यंत दाबून ठेवला आहे तो आवाज मला ऐकायचा आहे ....माझं एक वेगळं अस्तित्व आहे ...याची जाणीव झाली ...या प्रकारे त्यांचा प्रतिसाद आम्हाला समृद्ध करत होता ....मी आणि माझी सखी ...दोघेही या प्रक्रिये बरोबर " बाबा साळवी "


 मैदानात एकरूप झालेलो ....या प्रक्रियेनंतर एक सुर छेडला ....तारा रा रा ...तारा रा रा रा ....ता रा रा रा ...ता रा रा रा ..ता रा रा रा रा....आणि त्याच सर्कल मध्ये निरागस अशा लहान बाळाच्या भूमिकेत सर्व सोबती ....गोल गोल फिरू लागले ....पायांची गम्मत अशी होती की लेफ्ट राईट ....लेफ्ट ...परेड गाण्याच्या सुरु होता ....एवढं निरागसतेने लहान जिज्ञासू मुलां / मुलीं बरोबरोबर ...प्रवास सुरू होता ...म्हणजे जास्तीत जास्त वयोगट 60 



असणारे साथी आता 6 वर्षाचे वाटू लागले ...मंजुळ भारद्वाज ....आपल्या कुटीमधून हा सूर ...संपूर्ण ब्रम्हांडात सोडत आहेत ...आणि तो सुर तो आवाज मला त्यावेळी डोळे बंद केल्यावर मिळाला ....या अनह्द नाद च्या तेजोमय नादात संपूर्ण मैदानात चैतन्य निर्माण झालेले आणि त्या चैतन्याचा सूर घेऊन ...एक मैत्रिचं नातं घेऊन आम्ही पुन्हा परतीचा प्रवास केला....


रंगकर्मी 
तुषार म्हस्के

Wednesday, 11 January 2017

मी शोधतोय माझ्या समाजात “ सावित्री "......

मी शोधतोय माझ्या समाजात “ सावित्री “... मंजुळ भारद्वाज यांच्या नाटकामधील हा संवाद आणि हाच संवाद आहे जो सावित्रीबाई फुले यांचे विचार जिवंत ठेवतो ....आणि त्या सावित्रीची दृष्टि समाजात शोधतो ....मना मध्ये ध्येय  आणि ते ध्येय साध्य करण्यासाठी केलेला प्रण म्हणजे आपली साधना ही साधना चेहऱ्या वर तेज वाढवते .....

तुषार, या कार्यक्रमानंतर तू एकदम चमकत आहेस ...ती शांतता तुझ्या चेहऱ्या वर दिसत आहे .....असं माझी सखी मला बोलली ...त्याच बरोबर मी तिच्याकडे पाहिलं ...तिच्या चशम्यामधून तिचे डोळे चमकताना जाणवले ...आणि तिचे शब्द आठवले ..... I am proud that...I am girl …. “ मैं औरत हूँ ” ...याच्यापेक्षा मोठं समाधान काय असणार ? ....म्हणजे केलेले कार्य संपन्न झाल्यासारख वाटले ....त्याच रस्त्याने चालत मी घरी आलो ...आणि घरामध्ये पाहिलं ..तर वातावरण प्रसन्न वाटलं रात्रीच जेवून झोपायला गेलो ....त्याच बरोबर १० दिवसाची यात्रा डोळ्यासमोर आली ....एक – एक  चित्र डोळ्यासमोर उभे राहू लागले ....काय झालं ? कसं झालं ? ....हि यात्रा डोळ्यासमोर उभी राहिली .... राजनैतिक अजेंडा घेऊन मी राजकारणी लोकांना भेटायला सुरुवात केली ....व्यक्तीचं समजामध्ये असणार रूप ....त्याची समाजात असणारी ओळख ...आणि त्याच्याबरोबर मी त्याला ओळखतो असा दृष्टिकोन ...त्यामध्ये त्याची असणारी प्रतिमा ... एका बाजूला काही नेते हे भांडवल दारांचे गुलाम झालेले ...दुसऱ्या बाजूला बिल्डरांनी त्यांना विकत घेतलय ....आणि ते नेते आपल्या विभागात काम न करता उगाचचं मोठ मोठ्या गुंड् मंडळींचा वापर करून घाबरवण्याची कामे करत त्यांच्या समोर जायचं ...कि , नोटबंदीच्या नावाखाली सामान्य लोकांचे हाल करून भांडवलदारांना मोकाट सोडणाऱ्या ...पक्षाकडे जायचं ....कि , जे नेते आपल्या खिशातून पैसे टाकून लोकांच्या समस्या सोडवणार्यांकडे जायचं ....असा प्रश्न मला पडला ...त्यावर माझ्या मनामध्ये एक आशेची किरण जागी झाली ...ती म्हणजे समस्या सोडवणाऱ्या लोकांकडे जाण्यास सुरुवात केली ...जाऊन भेटलो ...स्वताची ओळख करून दिली...माझी फाईल दाखवली ...आणि राजनैतिक चर्चा सुरु केली ... प्रश्नांना उत्तर आणि नवीन प्रश्न ....त्यातून होणारी चर्चा याने माझी एक तटस्थ राजनैतिकाराची भूमिका थियेटर ओफ रेलेवंस नाट्य सिद्धांतामध्ये तयार झालेली जाणवली ...त्यामध्ये बदल जाणवला तो म्हणजे ...व्यक्तीकेंद्रित राजसत्तेला विरोध त्याच बरोबर ...संविधानिक सत्ता सुरु ठेवण्याचे सूत्र शोधणारी माझी मानसिकता ....या गोष्टी बोलताना मी कलाकार असल्याची सामाजिक जाणीव .... त्याच बरोबर, हे जाणवू लागले आपल्याला समाजामध्ये बदल घडवण्यासाठी आपल्या आई ला म्हणजेच ...महिलांना सक्षम करणे त्यांच्या मनात असणाऱ्या पितृसत्तात्मक विचारांना थांबवणे ...बरं , आता हि मोहीम कशी सुरु करणार .... मंजुळ भारद्वाज लिखित नाटक “ मैं औरत हूँ ” या नाटकाचा प्रयोग आपण   कुरार मध्ये ठेवणार ...त्याच्यामागची भूमिका स्पष्ट होती ...कोणी बघायला आलं तर उत्तमच आहे आणि नाही आलं तर माझी मम्मी हे नाटक बघणार  हे ठरलं|

                            

 ....आता ,  राजकारणी लोकांना भेटण्याची मोहीम सुरु केली ...त्यांना सांगितलं ३ जानेवारी २०१७ ला कार्यक्रम ठेवायचं आहे त्या मध्ये आमचे अंतरराष्ट्रीय कलाकार येणार आणि नाटक सादर करणार त्याच्यासाठी तुम्ही काय करणार ? ....मुळात, ७ दिवस बाकी होते ३ जानेवारीला आता पहिला म्हणजे हे ऐकूनच सर्वांची बोलती बंद झालेली कि , हे नाटक बघायला कोण येणार ? ...हे असं वैचारिक नाटक चालत का ? या सर्व मनाच्या आत मधल्या गोष्टी होत्या ...हा कार्यक्रम फ्लोप होईल ... त्यामुळे समाजामध्ये negativity पसरेल ..... मी शांत ऐकत होतो ....थोड्या वेळात सर्व ऐकून घेतलं आणि मी बोललो ...तुषार म्हस्के कार्यक्रम लावणार तुम्ही येणार कि नाही ....या ठिकाणच्या महिला येणार कि नाही ? ...थोडं हवेतील उत्तरे मिळाली .... आता नवीन संकल्पना
मांडत असताना ...मला माहिती होत कि हि कशा पद्धतीने सादर करायची आणि त्याच्यासाठी मला काय करायचं आहे ? ....आणि खरोखरच ती एक जिद्द मनात निर्माण झाली कि आता मी काहीही करून प्रयोग हाऊसफूल करणार ...? ....लगेच , कामाला सुरुवात केली ....ताबडतोब चर्चा करण्यास सुरुवात केली आणि ...मला भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बोलू लागलो ...३ तारखेला मालाड मध्ये “ मैं औरत हूँ ” चा प्रयोग आहे क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले दिना निमित्त ...तुमच्या आजूबाजूला सर्व महिलांना सांगा ....माझ्या विचारांप्रमाणे डोळ्यासमोर असणारी परिस्थिती बदलू लागली .....त्याच्या मध्ये एक सूत्र हातात घेतले ... आपल्याला प्रत्येक दिवशी मंजुळ सरांबरोबर बोलायचं आहे त्याच बरोबर टिम बरोबर संवाद करायचा आहे त्यासाठी प्रत्येक दिवशी यांच्या संपर्कामध्ये राहिलो ... मग, निमित्त साधून सरांना फोन करणे ...त्यांना फोन वर अपडेट करणे ...त्याच बरोबर टिम बरोबर बोलणे यामुळे एक उर्जा निर्माण होण्यास सुरुवात झाली ... आणि एक खास गोष्ट जाणवली ती म्हणजे ...थोडाही निराश झाल्यावर मंजुळ सरांना फोन करणे ...फोन लावण्या अगोदरच एक सकारात्मक ऊर्जा माझ्या जवळ येत असताना जाणवायची ... माझ्या समोर कामे एका मागून एक अशी रांगेत उभी होती ....त्यांना संपवत - संपवत पुढे जायचं ... हे सूत्र माझ्या आत मध्ये आग लावत नवीन विचारांना जन्म देऊ लागले ....एका event म्हणजे आता पर्यंत फक्त त्रासच अंगावर ओढावून घेतला होता .....हा event करत असताना अजिबात त्रास नव्हता ..... या होणाऱ्या वैचारिक क्रांती बद्दल मी बाहेर बोलायला सुरुवात केली ...त्याच बरोबर आमच्या शाळेच्या सेक्रेटरी यांनी याला प्रतिसाद दिला कार्यक्रम निश्चित झाला ...एक पाउल पुढे टाकत मी घेतलेला निर्णय पूर्ण करण्याची हि वेळ माझी आहे हे जाणवू लागले ...सावित्री बाई फुले दिनानिमित्त हे सादरीकरण करण्याचे ठरले ...वेळ सायंकाळी ५ वाजता ची ठरली .... थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य
सिद्धांतामध्ये प्रेक्षक हाच मोठा आणि सशक्त रंगकर्मी आहे ....त्यानुसार मी या कार्यक्रमासाठी माझ्या मम्मी पासून चाळीतील महिलांना सांगायला सुरुवात केली ...त्यामध्ये बचत गट ज्यांचे आहेत अशा महिला ....त्यानंतर जो व्यक्ती भेटेल त्याला या कार्यक्रमाबद्दल सांगाणे ...प्रत्येक क्षणाला त्याची चर्चा करणे ....आणि ज्या ठिकाणी राजकीय चर्चा होतील अश्या ठिकाणी ....४ ते ५ चाळींमध्ये मित्रांच्या घरातल्यांना या कार्यक्रमाबद्दल सांगितले आणि एक वातावरण , एका वातावरणाची निर्मिती करत याचा प्रचार आणि प्रसार करत होतो .. कार्यक्रम शाळेत

असल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापकांना भेटून विचारणा केली ... त्यावेळी जाणवले त्यांनी या कर्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांच्या पालकांना सांगायला सांगितले ...दुसऱ्या banner २  लावले , पोस्टर चे २५  ते ३० प्रिंट आउट चाळींमध्ये मित्रांना लावायला प्रेरित केले .... हे एक टिम वर्क आहे ...आणि माझ्या अंगा मध्ये एक टिम कार्य करत आहे हे जाणवू लागले ....आणि एक जाणीव या मध्ये सतत दिसली ...ज्याला सद्सद विवेक बुद्धी दिसली ती म्हणजे हा कार्यक्रम माझा आहे आणि याचे आयोजन मला करायचा आहे ... आणि कोणासाठी नाही माझ्या  मम्मी साठी हा प्रोग्राम करायचा आहे ... त्यामुळे कोण या कार्यक्रमाला येईल याची चिंता मनात आलीच नव्हती ... हि तयारी सुरु असताना एका मागून एक संसाधने निर्माण होऊ लागली ..मी फक्त निसर्गामध्ये आता मला काय हवय त्याचा विचार केला तर , आपोआप माझ्यासमोर त्या गोष्टी येऊन उभ्या राहत होत्या .... त्यामुळे त्याचं एक समाधान मला मिळू लागले ....

३ जानेवारी २०१७ , सकाळी ५ वाजता मी आणि माझी सखी आम्ही दोघे चैतन्य अभ्यास करण्यासाठी निघालो कार्यक्रमाच्या आयोजनाबद्दल


तिच्याबरोबर चर्चा केली... माझ्या घेतल्या जाणाऱ्या निर्णयाबद्दल तिची नेहमीच प्रेरणा दायी सहमती मला मिळते   ... दिवसभरात काम काय करायचं आहे ?  याची आखणी केली ....विचारांच्या वेगात ....माझा स्पीड मी वाढवला ...लगेच शाळेत जावून काय सुरु आहे काय त्याची आखणी आहे ....किती माणसे बसतील कसे बसतील ? त्यामध्ये प्रेक्षक जास्त झाल्यावर काय करता येईल ? याचे प्रतिबद्ध नियम बनवले ...जाऊन स्वताहून पाहणी केली ....नाटक गांभीर्य त्याचं बरोबर कलाकार कोण आहेत त्यांची माहिती शाळेतील शिक्षकांना दिली ....आणि मनामध्ये एक माझ्या कालाकारांबद्द्ल एक स्थान आहे त्या पद्धतीने त्या वातावरणामध्ये त्यांची या वर्षांमधील साधना प्रसार केली ...मग ,ड्रोप बाय ड्रोप वाटर ,छेड छ्याड का ? ...अनहद नाद ,गर्भ ...त्यामध्ये माझे कलाकार आहेत ...त्यामुळे त्यांचा आदर आणि त्यांची ओळख यांच्याकडे मी प्रत्यक्ष लक्ष केंद्रित केले ....माझ्या छोट्या भावाला कलाकारांना घेऊन येण्यासाठी पाठवले त्यांना काय हवय नकोय ? याची संपूर्ण जबाबदारी त्याच्याकडे .....कार्य क्रमाची जबाबदारी माझी ....घरामध्ये कलाकार आल्यानंतर त्यांना काय हवय नकोय त्याची जबाबदारी माझ्या घरातल्यांनी घेतली ....कार्यक्रमाच्या ठिकाणी लागणाऱ्या सर्व वस्तूंची , आणि आयोजनाची जबाबदारी शिक्षक आणि शाळेचे सेक्रेटरी घेऊ लागले .....एक गोष्ट जाणवली पितृसत्तात्मक समाजामध्ये महिला शिक्षक वर्ग या कार्यक्रमाचं आयोजन करताना दिसला ....कारण, हा महिलांचा कार्यक्रम आहे ... आणि हिच समाजव्यवस्था आहे ...ज्या ठिकाणी महिला आणि पुरुष एकात्मतेची विचार धारणा करत असताना आपण किती त्यांना सहकार्य करतोय ...? हा हि एक प्रश्नच आहे .....कार्यक्रमाच आयोजन सुरु असताना तयारी सुरु होतीच ...बरोबर वेळ धावू लागली ...५ ते ५.१५ ला कार्यक्रम सुरु होण्याची वेळ घरातून कलाकार निघाले ....४.५५ पर्यंत फक्त ५ ते ७ महिला hall मध्ये बसल्या होत्या ...हृदयाचे ठोके ...वाढू लागले ...कोण येणार कि नाही हा प्रश्न ? त्याच बरोबर स्वताला सावरले ...हा कार्यक्रम कोणासाठी नाही आहे... हा माझ्या आईसाठी मग, काहीच टेन्शन नाही ...एक दम शांत मुद्रेत hall बाहेर जाऊन उभा राहिलो आणि येणाऱ्या प्रेक्षकांना ..नमस्ते , नमस्ते ..नमस्ते करायला सुरुवात केली ...मग, शाळेत शिकणारा मुलगा पाल्य असेल ...महिला असतील आणि वयस्कर महिला असतील ....आणि हे स्वागत करणे ...शिक्षक आणि त्या प्रेक्षकांना नवीन ताजगी देत होत ....एक सुंदर वातवरण निर्मिती त्यातून होऊ लागली ....कलाकार आले ...आणि मी आयोजनामध्ये थोडा दंगच राहिलो .
कलाकारांच स्वागत केलं ...मग , प्रेक्षक कोण आहेत यांच्या बद्दल सांगितलं ....त्याचं बरोबर मी शाळेच्या पटांगनामध्ये पाहिलं तर ताजगी फिरत होती ....त्याचं बरोबर प्रेक्षक आत मधून येण्यास सुरुवात झाली होती ... म्हणजे इकडे मी पाहत होतो ...आमचे कालाकार आले त्याचं बरोबर प्रेक्षक हि येऊन बसले होते १०० प्रेक्षक बसणार त्या ठिकाणी जवळ ..जवळ ३५० महिला प्रेक्षक बसल्या होत्या ...वाह ..क्या
बात ....है ? ...लहान विद्यार्थी ...त्याच बरोबर त्याचे पालक ....दूसऱ्या बाजूला महिला ...असं ...संपूर्ण सभागृह भरलं .. “ मैं औरत हूँ ” मंजुल भारद्वाज लिखित नाटकाची सुरुवात झाली आवाज करत असणारी मुले शांत झाली ....महिला शांत झाल्या ...अचानक वातावरनामध्ये शांतता पसरली कलाकारांनी वेळेला हातात पकडून ठेवलय हे जाणवू लागले मी शांत पणे जाऊन सर्वात मागे उभा राहिलो ...
८० % महिला हुंदके देऊन रडताना पाहिल्या ..डोळे पाणावलेले तरीही घट्ट मुठी आवळून ते सादरीकरण पाहत होत्या ...टाळ्यांचा आवाज त्या विदर्भ विद्या मंदीर शाळेच्या आवारात गुंजू लागला ....अश्रूंनी गहिवरलेल्या महिला जाणवू लागल्या स्वताला त्या मंचावर पाहत आहेत ...स्वतःची कहाणी ऐकत आहेत ....२० मिनिटे स्वतःचा शोध सुरु झाला .....नाटक संपल्यावर त्या गहिवरलेल्या डोळ्यांना पाहून मनाला वाटले तुषार सार्थक झाले ...कार्यक्रम त्याचे आयोजन आणि त्याची दखल तुला मिळाली ...आम्ही शोधतोय सावित्री


..माझ्या मध्ये असणारी ...आणि मी शोधतोय हि सावित्री जी समजामध्ये आहे ती माझ्या डोळ्यासमोर असणारी ....या कार्यक्रमाला आलेल्या राजनेत्या आमदार , माजी नगरसेवक ..एकदम गहिवरून गेल्या होत्या ....न बोलणारया महिला आज बोलू लागल्या ..या नाटकामधून प्रेरणा मिळाली ...हे माझ्या डोळ्यांना दिसू लागले होते ...या कलाकृतीच सादरीकरण ....अंतरराष्ट्रीय कलाकार अश्विनी नांदेडकर आणि सायली पावसकर राष्ट्रीय कलाकार कोमल खामकर ....यांनी केलं ...



थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांताने मला उन्मुक्त केलं ...एका बाजूला महिलांनचा आदर कधी मी केला नव्हता ..आणि आता तीन वर्ष थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांताने मला हि दृष्टि दिली कि मी महिलांचा आदर करतोय ..आणि त्यांच्या पितृसत्तात्मक विचारांपासूनच्या मुक्ती साठी मी कार्य करतोय ... आणि हाच माझ्या असण्याचा अर्थ मला या प्रयोगाच्या आयोजनातून जाणवला ......
--------------------------------
थियेटर ऑफ रेलेवंस रंगकर्मी – तुषार राजेश्री तानाजी म्हस्के