Saturday, 14 March 2015

थियेटर ऑफ रिलेवंस म्हणजे ‘ इस पल को जी ‘


थियेटर ऑफ रिलेवंस म्हणजे ‘ इस पल को जी ‘ माझ्या बरोबर  असलेला प्रत्येक क्षण  त्यामध्ये सुख ,दुख ,राग,तिरस्कार, प्रेम , मोह ,लोभ ,विद्रोह इ. … परिस्थिती जगून त्या परिस्थितीला अंगीकारून  ते सादर करण ….. श्वास घेऊन सोडण  जेवढ सोपं आहे …. या प्रवाहातून जाताना माझ्या अवतीभोवती मला प्रेरणा देणारी परिस्थिती निर्माण झाली .



या परिस्थितीला निर्माण करणारे  फक्त ‘ विचारच ‘ कारणीभूत दिसत होते . प्रत्येक सेकंदाला माझ्या मनात एक वादळ निर्माण होऊन एक ‘ विशिष्ट ‘ परिस्थिती दिसतेय   . या मध्ये  मी स्वताला संघर्ष करताना पाहतोय … कधी कधी तर या परिस्थितीतून पळवाट ही  काढण्याचा प्रयत्न करतोय . त्यामध्ये हृदयाचे ठोके वाढत आहेत……  मनामध्ये एक तुफानी वातावण निर्माण झाले  आहे  ……. आणि काय मजा आहे  ना मी निर्माण केलेल साम्राज्य आगी मध्ये जळताना  दिसत आहे तेवढीच आग  माझ्या शरीरातील बाह्य अंगाला लागली आहे …..आगी मध्ये जळताना मी बनवलेल माझ अस्तित्व ही मेणासारख वितळताना दिसत होत  …. … तोच एक क्षण माझ्या जीवन जगण्याच्या आणि मरणाच्या दारात घेऊन जातो … एका क्षणाला जीवन तर दुसऱ्या क्षणाला मृत्यू …. काय ते क्षण ? मनाला गोंधळात टाकणारे….
…… मग शेवटी एकांतात जाऊन शांतपणे बसतो डोळे शांत ठेवून श्वास घेतो छातीला फुलवतो त्यातून समाधान ही मिळण्यास सुरुवात होत  आहे  . हे चित्र  डोळ्यासमोर निर्माण होताना पाहतोय ……   एका  विशिष्ट काळानंतर परिस्थिती बरोबर खेळण्यास सुरुवात झाली ……  एक प्रश्न मनाला विचारला कि atleast एवढ तरी  समजल  माझी स्वताची व इतरांशी वागण्याची पद्धत काय आहे ? मी कशा पद्धतीने इतरांशी संवाद साधायला हवेत ? त्याचे संदर्भ काय लागतात ? विचारांची गहरी तीव्रता जाणवू लागली  यावर मी खुश झालो…….   आनंदी होतोय खूप छान बोलून समाधानी होतोय …मानव म्हणून जगत असताना या गोष्टी खूप महत्वाच्या  जाणवल्या. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर त्यावर डोस देतो ते डोस देण्यासाठी तो आजार काय आहे हे समजून घेवून मग त्यावर डोस दिल्याने आजार बारा होतो ….


माझा प्रवास हा शोध घेण्याचा प्रवास जाणवू लागला ….  पावसात भावनेच्या ओघात वाहणारी नदी आता स्थिरावली होती …. तिने आता आपल्या तळातून जाण्यासाठी ….  स्वताला सुखवले होते… ती कोरडी पडली होती . त्यातून ती दाखवते  कि ‘’’या माझ्या गहिऱ्या प्रवाहातून चालत जा … नदीत असलेल्या गार गोट्यांचा आनंद घेत जा …. आपले सत्व ओळखा आवाज ओळखा …. बघा त्या आवाजातून निर्माण झालेला ध्वनी त्यातून तुम्हाला तुमचा रिदम मिळतोय का ? …… हा प्रवास मोक्ष प्राप्तीचा आहे …. हे मान्य आहे …. जीवन जगायला सुरुवात केलेला क्षण …मोठ  मोठ्या डोंगरातून ज्यावेळी छोट्या छोट्या झर्यांना घेऊन प्रवास सुरु केला …. जाता जाता रस्त्यात मिळणारा प्रत्येक थेंब आणि  झरे यांना आपलस करत …माझ राज्य वाढवत जात आहे मधेच येणारे मोठ मोठे दगड  समजातील ठेकेदारांसारखे उभे तटस्त आहेत …ते जागेहून हलण्याचा नाव ही  नाही घेत आहेत  ….  मी दगडांना तोडलं नाही …आजूबाजूच्या  परिस्थितीला … माझ्या जवळ केल दगडांना तोडलं नाही, फोडलं नाही …. फक्त त्यांच्या चहु बाजूनी रस्ता काढत पुढे गेलो आणि काय गंमत आहे ना दगड जागेवर त्यांच्या रुबाबात आहेत …. आपल्याच धुंदीत …. त्याच भ्रमात मी रस्ता नाही दिला मी माझ्या जागेवर कायम उभा आहे … मी जोरात जोरात हसू लागलो …अरे वेड्या  तू माझ्या जीवनाचा एक भाग होऊन बसला आहेस …. तुझ्या मुळे माझ सौंदर्य खूप छान दिसत आहे …… त्या दरम्यान माझी व्यापकता वाढू लागली होतो …… सपाट पृष्ठभागावर गेल्यावर तिकडच्या प्राण्यांना , माणसाना , पक्षांना ,झाडांना …. समता , बंधुता ,समाधानाचं  पाणी पाजून पुढे प्रवास कायम ठेवला त्या दरम्यान  रस्त्यात येणारा प्रत्येक विचारांचं निवारण करत पुढे चालत राहिलो …. एक डोंगर पार करून गेल्यावर मिळालेला समाधान शांतपणे आत्मसात करत होतो …  


हा प्रवास करताना मी घेतलेला अनुभवाच प्रोसेस करण्यास सुरुवात केली माझ्या आयुष्यातील बाल्य अवस्था मी सहज पार केली . त्यामागे संदर्भ शोधण्यास सुरुवात केल्यावर मला समजल . त्यावेळी त्याक्षणी माझ्या डोळ्यासमोर घडणारी घटना ही नवीन होती तरीही ती घटना घडत असताना मी आनंदात त्या परिस्थितीशी समरूप होऊन जात होतो …. घडणाऱ्या क्षणाला मी कुतुहलाने जगत होतो …. त्यावेळी पडलेले प्रश्न खूप मजेदार असायचे …. मी कोण आहे ? तू कोण आहे ? एकदम बालिश प्रश्न होते सर्व  …त्या प्रश्नांना उत्तरे सहज मिळत होती …… आणि तशा पद्धतीची प्रतिमा डोळ्यासमोर निर्माण होत होती …. कधी कधी तर  नकळत घरातले लोक बोलायचे  ‘’ बाळा , मस्ती नको करू नाहीतर देव बापा कान कापेल ? ‘’ त्यातून भीती वाटण्यास सुरुवात झाली आणि माणसाने त्याची मूर्ती बनवली …. आता त्यामागची परिस्थिती ही  वेगळी असेल आई - वडिलांना मी विचारलेल्या प्रश्नाच उत्तर त्या क्षणी देता नसेल आल …. मग कदाचित देवाचा कोप होईल या भीती ने तरी त्यावेळी मी शांत झालो …. ते बाहेरून …. मनातून नाही ….त्याच क्षणी माझ्या मनात खूप साऱ्या प्रश्नांनी जागा घेतली होती …. देव कुठे आहे ? तो कसा दिसतो ? तो कुठे राहतो? …त्याला शोधण्यासाठी संघर्ष …. काय गंमत आहे ना …ज्याच अस्तित्व नाही आहे त्याला शोधण …. त्या क्षणापासून माझ्या मनातील भाव …. मी हरवून बसलो…  वाहत गेलो …. देवाला शोधण्यासाठी …बाल्य अवस्थेतून मी मोठा मोठा होत गेलो . त्याच प्रामाणे माझ्या मनातील कर्म करण्यापेक्षा कर्मकांड याकडे वाहू लागलो …त्या मध्ये माझ अस्तित्वच हरवून बसलो …. हे हरवलेले क्षण जगण्यासाठी वयाच्या २४ वर्षी पुन्हा त्या प्रश्नांकडे वळलो …त्यावेळी रात्री एकटा बाहेर पडताना वाटलेली भीती आता नाहीशी  झाली … आता ती रात्र नव्हती ती  माझ्या संवादाची रात्र ठरत होती …एकदम शांत वातावरण रात् किड्यांचा येणारा आवाज …त्या आवाजांना चंद्राची मिळालेली शीतलता ….माझ्या मनाला शृंगार करत होती … आता ती romantic रात्र वाटत होती मनाला शांतता आणि शितलता देत होती …. त्या मध्ये मी फक्त चंद्राशी बोलताना दिसत होतो ….  
 सकाळी उठल्यावर चैतन्य अभ्यास करण खूप आनंद आणि उस्ताही वातावरण निर्माण करत होतो … ‘’ त्यामागे सरांनी गायलेले गाणे  ‘’ पंची बनू उडता फिरू …उंची गगन में … ‘’ सकाळी  पक्षांसारख उडताना जाणवत होतो …. ते बेधुंद पणे आकाशात संचार करत आहेत …. सूर्य येण्याची चाहूल लागल्याने ते त्याच्या स्वागतासाठी त्याला आपल्या एकीचे सामर्थ्य दाखवत आहेत … वेगवेगळे आकार घेऊन …. वेगवेगळ्या dimension मध्ये जात आहेत … तेही आपल्या सुरामध्ये …. त्यामागे उडताना सर्वच दिसत आहेत …. प्रत्येकाची आपली एक style आहे ती दाखवत मिरवत आहेत ….




मिळालेल्या अनुभवाला decoding  करून त्यांना रंगमंचावर उतरवत होतो …. एक  कलाकार ज्यावेळी कॉन्क्रेठ आणि मकनिकल जगामध्ये वावरत असतो त्यावेळी तो त्या डांबरी रस्त्यावरून चालताना त्याला ठेस लागते …. तोच कलाकार ज्यावेळी डोंगरांमध्ये जातो …आपला सृजनशील मार्ग शोधतो …त्यावेळी रात्री पडलेल्या अंधारालाही अनुभवून तो त्याच रुपांतर आपल्या कलेमध्ये करतो … आणि त्याला रस्ता दाखवण्यासाठी सुकलेली गवतही सोन्या सारखे चमकू लागते …. जमिनीवर सोनेरी चादर अंथरून त्याचे स्वागत करताना दिसते …. कलाकार हा शेतकऱ्यासारखा आपल्या कलेच बीज सुंदर विचारांच्या मातीत ठेवतो …. त्याला वेग वेगळ्या वातावरणात त्याची निगाह राखतो त्याच्या अंत करणातील कलाकाराला जिवंत ठेवतो ….तो कलेचा शेतकरी नेहमी आनंदी खुश …. 
बहरून जीवन जगतो त्याला  पैश्यांसाठी गुलामी करावी लागत नाही …. तो आपल्या मनाचा राजा आहे …. आणि त्याची कला ही  त्याची सार्थ अभिवादन करताना दिसते … मातीतील कलाकार हा नेहमी त्याच्या कलेची साधना करत असतो …. तो नेहमीच काळजी घेतो माझ्या कलेसाठी कोणते  वातवरण अनुकूल आहे …. तो जाणतो त्याच्या मनातील सत्व …कालपर्यंत ज्या ठिकाणी रस्ता संपल्याचा भाव होता …. खड्यातून वर चढताना एका वेलीच्या आधाराने वर चढून गेल्यावर मिळालेलं सुख अगदी गगनाला भिडणारे जाणवत होते …. ज्याठिकाणी काजूची झाड उभी आहेत आपले आधारस्तमभासारखे …ते मला दाखवत आहेत तू  एवढा वर चढून आलास त्याचा आनंद घे …आस्वाद घे …. आनंदित हो प्रफुल्लीत हो …. त्यांच ते तेज घेवून नदीच्या प्रवाहात उतरल्यावर नदी तीच होती या ठिकाणी  तीच पात्र ओलसर मऊ आणि romantic दिसत होते  …मनाला  खूप मोहित करत होती ती जवानी  …त्याची सुंदरता  हळूच येणारी हिरवीगार हवा …त्या वाटेहून चालताना जरा जपून जपून चालत पुढे जात होतो जमीन ओलसर होती …त्या वातावरणात वाहून न जात त्याचा आनंद घेत जपून जपून पाय टाकत पुढे चालत राहिलो …. पुढे चालत गेल्यावर नदीचा पाणी रोखण्यासाठी ‘’ ति  ‘’ ची गती कमी करण्यासाठी , तिला conditioned  करण्यासाठी , तिला आपल्या पद्धतीने वापरण्यासाठी मध्ये समाजातील ठेकेदांसारखा सिमेंट ने बनवलेला बांध होता …. तो पार करून जाताना थोडी भीती तर वाटत होती पडण्याची … भीती ला विसरून मनात एक भाव आला हा तर माझ्या जगण्याचा एक भाग मग काहीच प्रश्न नव्हता  … त्याला हसत खेळत त्याला  पार केला … त्याच एक वेगळच समाधान मनाला जाणवत होत …शांतीवन मध्ये जस जसा फिरत होतो त्या पद्धतीने दृष्टी निर्माण झाली होती …आता बाहेरून दिसणारा माझ बिंब हे पेरूच्या फळासारखं  भासू लागले सुंदर …. त्याच क्षणी मी स्वताला अंतःकरणातून  पाहू लागल्याने मला त्या सुंदरतेसाठी त्या झाडाने केलेला त्याच्या फांद्यांचा विस्तार हा खूप मजबूत होता त्याच स्थाराखालील जमीनीच्या आत मध्ये असणारी त्यांची मुळे  ही  मनात येणाऱ्या सुंदर विचारांसारखी मना मध्ये रुतलेली दिसत होती ….


या मनात रुतलेल्या विचारांमुळे त्या झाडाने आपल सौंदर्य खुलवले होते ……माझ्यातील कलेचा विस्तार …मनातील भाव समजण्यासाठी केलेली विचारांची यात्रा …… यात्रा करताना आलेला अनुभव …जीवनात मिळालेले नव नवीन आयाम ….रंगपंचमीच्या दिवशी …… शांतीवन मध्ये केलेली आगळीवेगळी रंगपंचमी …आज अनुभवलेले भाव …माझ्यातील कलाकाराला कलेचा माध्यमातून नवीन दिशा देत…


अनुभवांना एकत्र घेवून मंचाच्या स्वाधीन झालो …… पक्षांसारखे उडण्यास सुरुवात केली …… नदीची गती आत्मसात केली …. त्याच क्षणी नदीची शीतलता घेवून …… मदमस्त होवून रंगांची साधना केली …

चंद्र ,सूर्य,तारे ,सितारे यांच्यासोबत रात्र काढली …कलाकाराचा शृंगार करून …त्याच्याशी स्वाधीन केला …त्याने हि माझ्या कलेला दृष्टी दिली , विचार दिला , आकार दिला ………  माझ्यातील  कलेच सत्व आणि  जाणीवेतून …. मी कलाकाराला अनुभवला …जगलेला प्रत्येक क्षण डोळ्यासमोर आणला  आणि मन बोलू लागले ……’’ जी इस पल को जी ‘



No comments:

Post a Comment