मनातील भाव आणि भावना या बाहेर येत होत्या …सकाळ होऊन माझ्या आयुष्यात सूर्याचा उगम झाला होता …डोळे बंद करून धुकांची चादर घेतलेल्या जमिनीवर डोळे बंद करून आवाज ऐकू लागलो …थोडा श्वास होल्ड केला …जाणवण्यास सुरुवात झाली …… शरीरातील हृदय आणि त्याची एक संगत असलेली चाल …. धक …. धक … धक …धक …डोळे उगडले आकाशाला पाहिले …… पुन्हा श्वास घेतला …आता लाल लाल माझ्या हृदयाची प्रतिमा डोळ्यांना दिसत आहे ……डोळे बंद करून हमिंग करण्यास सुरुवात केली …थोड्या वेळाने डोळे उघडले …समोर आकाशामध्ये …माझा audience मला पाहत आहे .....
…… माझ्या मनातील भाव त्यांनी ओळखले होते …थियेटर ऑफ रीलेन्वंस च्या नाट्य प्रणाली मध्ये कधी audience ची कमतरता वाटत नाही …थोडा वेळ माझ्या सुराला हाताने दिशा देत …कमी जास्त करत होतो …हात आकाशाकडे गेल्यावर आवाज फ्री force मध्ये बाहेर येत होता …
त्या सुराबरोबर माझी दृष्टी स्थिर केली …… थोडा वेळ शांत होवून उभा राहिलो …… आलेले पक्षी दिसेनासे झाले … पुन्हा हमिंग केली …. त्याच बरोबर पुन्हा ते पक्षी आले ….
आणि या वेळी खूप साऱ्या त्यांच्या मित्रांना घेवून आले …हमिंग चा आनंद घेत …तेही वेग वेगळे आकार घेत …त्याला सूर देत भरारी घेत आहेत … त्यांचा ताल आणि रिदम सूर्यासारखा मला जीवन जगण्यासाठी प्रेरणा देत आहे ….
No comments:
Post a Comment