Friday, 17 July 2026

बदलाच्या प्रवाहात मी – रंगकर्मी, तुषार म्हस्के

बदलाच्या प्रवाहात मी – रंगकर्मी, तुषार म्हस्के  मी माझी भूमिका शोधत आहे... मी नेहमी बाहेरच्या सिस्टमबद्दल बोलतो. समाज, व्यवस्था, परंपरा, राजकारण, संस्कृती या सगळ्या बाहेरच्या सिस्टम मला दिसतात. पण माझ्या आत जी एक सिस्टम आहे, तिचं काय?  मी बदलाच्या प्रक्रियेत आहे. मी बदलत आहे. पण बदलताना अनेकदा असं वाटतं की बाहेरची सिस्टम मला बदलू देत नाही. मात्र, हा आरोप करण्यापेक्षा मला स्वतःलाच एक प्रश्न विचारायला हवा. माझ्या आतल्या सिस्टमला बदलण्यासाठी मी काय करत आहे?  माझी सिस्टम म्हणजे माझं विचार करणं, वागणं, जगणं; माझ्या सवयी, माझे पूर्वग्रह, माझ्या भीती आणि परंपरांना धरून ठेवणारी माझी मानसिकता. मी स्वतःमध्ये बदल घडवत नाही, पण बाहेरच्या सिस्टमवर दोष टाकून मोकळा होतो.  अशा वेळी एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून माझी भूमिका आणि जबाबदारी काय आहे? हा प्रश्न मला खरोखर पडतो का? की मी तो टाळतो? की माझ्या संवेदना हळूहळू मृत होत जातात?  ८ ते १२ जुलै २०२६ रोजी थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या 'रंगभूमी : सृजन आणि संवर्धन' या निवासी कार्यशाळेत, मंजुल भारद्वाज उत्प्रेरित चैतन्य अभ्यासातून मला एक महत्त्वाची जाणीव झाली. मला सर्वप्रथम माझ्या आतल्या सिस्टमला बदलायचं आहे.  हा बदल एका दिवसात होणार नाही. त्यासाठी मला सातत्याने प्रवाहित राहायचं आहे पाण्यासारखं.  पाण्याचा स्वभाव मला हे शिकवतो. पाणी कधीच थांबत नाही. डोंगरमाथ्यावरून खळखळत वाहणारं पाणी स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतं. सततच्या प्रवाहातून ओहोळ तयार होतो, ओहोळातून ओढा, आणि कालांतराने नदी जन्म घेते. त्या नदीचा मार्ग तिच्या सातत्याचा पुरावा असतो. पाणी त्या क्षणी असो वा नसो, त्याने निर्माण केलेली वाट चारही ऋतूंमध्ये दिसत राहते.  रंगभूमीसाठी आम्ही थिएटर ऑफ रेलेव्हन्सचे रंगकर्मीही असाच एक प्रवाह निर्माण करत आहोत. हा प्रवाह केवळ आजसाठी नाही; तो येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे, जेणेकरून रंगकर्म जिवंत राहील, संवेदनशील राहील आणि सतत प्रवाहित राहील.  माझी दृष्टी प्रज्वलित ठेवायची आहे त्यासाठी  माझं ध्येय अधिक व्यापक करणं आवश्यक आहे. माझं ध्येय केवळ माझ्यापुरतं किंवा माझ्या कुटुंबापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. त्याची व्याप्ती समाजापर्यंत, संस्कृतीपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सतत पुढाकार घेत राहणार

मी माझी भूमिका शोधत आहे... मी नेहमी बाहेरच्या सिस्टमबद्दल बोलतो. समाज, व्यवस्था, परंपरा, राजकारण, संस्कृती या सगळ्या बाहेरच्या सिस्टम मला दिसतात. पण माझ्या आत जी एक सिस्टम आहे, तिचं काय?

मी बदलाच्या प्रक्रियेत आहे. मी बदलत आहे. पण बदलताना अनेकदा असं वाटतं की बाहेरची सिस्टम मला बदलू देत नाही. मात्र, हा आरोप करण्यापेक्षा मला स्वतःलाच एक प्रश्न विचारायला हवा. माझ्या आतल्या सिस्टमला बदलण्यासाठी मी काय करत आहे?

माझी सिस्टम म्हणजे माझं विचार करणं, वागणं, जगणं; माझ्या सवयी, माझे पूर्वग्रह, माझ्या भीती आणि परंपरांना धरून ठेवणारी माझी मानसिकता. मी स्वतःमध्ये बदल घडवत नाही, पण बाहेरच्या सिस्टमवर दोष टाकून मोकळा होतो.

बदलाच्या प्रवाहात मी – रंगकर्मी, तुषार म्हस्के  मी माझी भूमिका शोधत आहे... मी नेहमी बाहेरच्या सिस्टमबद्दल बोलतो. समाज, व्यवस्था, परंपरा, राजकारण, संस्कृती या सगळ्या बाहेरच्या सिस्टम मला दिसतात. पण माझ्या आत जी एक सिस्टम आहे, तिचं काय?  मी बदलाच्या प्रक्रियेत आहे. मी बदलत आहे. पण बदलताना अनेकदा असं वाटतं की बाहेरची सिस्टम मला बदलू देत नाही. मात्र, हा आरोप करण्यापेक्षा मला स्वतःलाच एक प्रश्न विचारायला हवा. माझ्या आतल्या सिस्टमला बदलण्यासाठी मी काय करत आहे?  माझी सिस्टम म्हणजे माझं विचार करणं, वागणं, जगणं; माझ्या सवयी, माझे पूर्वग्रह, माझ्या भीती आणि परंपरांना धरून ठेवणारी माझी मानसिकता. मी स्वतःमध्ये बदल घडवत नाही, पण बाहेरच्या सिस्टमवर दोष टाकून मोकळा होतो.  अशा वेळी एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून माझी भूमिका आणि जबाबदारी काय आहे? हा प्रश्न मला खरोखर पडतो का? की मी तो टाळतो? की माझ्या संवेदना हळूहळू मृत होत जातात?  ८ ते १२ जुलै २०२६ रोजी थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या 'रंगभूमी : सृजन आणि संवर्धन' या निवासी कार्यशाळेत, मंजुल भारद्वाज उत्प्रेरित चैतन्य अभ्यासातून मला एक महत्त्वाची जाणीव झाली. मला सर्वप्रथम माझ्या आतल्या सिस्टमला बदलायचं आहे.  हा बदल एका दिवसात होणार नाही. त्यासाठी मला सातत्याने प्रवाहित राहायचं आहे पाण्यासारखं.  पाण्याचा स्वभाव मला हे शिकवतो. पाणी कधीच थांबत नाही. डोंगरमाथ्यावरून खळखळत वाहणारं पाणी स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतं. सततच्या प्रवाहातून ओहोळ तयार होतो, ओहोळातून ओढा, आणि कालांतराने नदी जन्म घेते. त्या नदीचा मार्ग तिच्या सातत्याचा पुरावा असतो. पाणी त्या क्षणी असो वा नसो, त्याने निर्माण केलेली वाट चारही ऋतूंमध्ये दिसत राहते.  रंगभूमीसाठी आम्ही थिएटर ऑफ रेलेव्हन्सचे रंगकर्मीही असाच एक प्रवाह निर्माण करत आहोत. हा प्रवाह केवळ आजसाठी नाही; तो येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे, जेणेकरून रंगकर्म जिवंत राहील, संवेदनशील राहील आणि सतत प्रवाहित राहील.  माझी दृष्टी प्रज्वलित ठेवायची आहे त्यासाठी  माझं ध्येय अधिक व्यापक करणं आवश्यक आहे. माझं ध्येय केवळ माझ्यापुरतं किंवा माझ्या कुटुंबापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. त्याची व्याप्ती समाजापर्यंत, संस्कृतीपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सतत पुढाकार घेत राहणार

अशा वेळी एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून माझी भूमिका आणि जबाबदारी काय आहे? हा प्रश्न मला खरोखर पडतो का? की मी तो टाळतो? की माझ्या संवेदना हळूहळू मृत होत जातात?

८ ते १२ जुलै २०२६ रोजी थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या 'रंगभूमी : सृजन आणि संवर्धन' या निवासी कार्यशाळेत, मंजुल भारद्वाज उत्प्रेरित चैतन्य अभ्यासातून मला एक महत्त्वाची जाणीव झाली. मला सर्वप्रथम माझ्या आतल्या सिस्टमला बदलायचं आहे.

बदलाच्या प्रवाहात मी – रंगकर्मी, तुषार म्हस्के  मी माझी भूमिका शोधत आहे... मी नेहमी बाहेरच्या सिस्टमबद्दल बोलतो. समाज, व्यवस्था, परंपरा, राजकारण, संस्कृती या सगळ्या बाहेरच्या सिस्टम मला दिसतात. पण माझ्या आत जी एक सिस्टम आहे, तिचं काय?  मी बदलाच्या प्रक्रियेत आहे. मी बदलत आहे. पण बदलताना अनेकदा असं वाटतं की बाहेरची सिस्टम मला बदलू देत नाही. मात्र, हा आरोप करण्यापेक्षा मला स्वतःलाच एक प्रश्न विचारायला हवा. माझ्या आतल्या सिस्टमला बदलण्यासाठी मी काय करत आहे?  माझी सिस्टम म्हणजे माझं विचार करणं, वागणं, जगणं; माझ्या सवयी, माझे पूर्वग्रह, माझ्या भीती आणि परंपरांना धरून ठेवणारी माझी मानसिकता. मी स्वतःमध्ये बदल घडवत नाही, पण बाहेरच्या सिस्टमवर दोष टाकून मोकळा होतो.  अशा वेळी एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून माझी भूमिका आणि जबाबदारी काय आहे? हा प्रश्न मला खरोखर पडतो का? की मी तो टाळतो? की माझ्या संवेदना हळूहळू मृत होत जातात?  ८ ते १२ जुलै २०२६ रोजी थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या 'रंगभूमी : सृजन आणि संवर्धन' या निवासी कार्यशाळेत, मंजुल भारद्वाज उत्प्रेरित चैतन्य अभ्यासातून मला एक महत्त्वाची जाणीव झाली. मला सर्वप्रथम माझ्या आतल्या सिस्टमला बदलायचं आहे.  हा बदल एका दिवसात होणार नाही. त्यासाठी मला सातत्याने प्रवाहित राहायचं आहे पाण्यासारखं.  पाण्याचा स्वभाव मला हे शिकवतो. पाणी कधीच थांबत नाही. डोंगरमाथ्यावरून खळखळत वाहणारं पाणी स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतं. सततच्या प्रवाहातून ओहोळ तयार होतो, ओहोळातून ओढा, आणि कालांतराने नदी जन्म घेते. त्या नदीचा मार्ग तिच्या सातत्याचा पुरावा असतो. पाणी त्या क्षणी असो वा नसो, त्याने निर्माण केलेली वाट चारही ऋतूंमध्ये दिसत राहते.  रंगभूमीसाठी आम्ही थिएटर ऑफ रेलेव्हन्सचे रंगकर्मीही असाच एक प्रवाह निर्माण करत आहोत. हा प्रवाह केवळ आजसाठी नाही; तो येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे, जेणेकरून रंगकर्म जिवंत राहील, संवेदनशील राहील आणि सतत प्रवाहित राहील.  माझी दृष्टी प्रज्वलित ठेवायची आहे त्यासाठी  माझं ध्येय अधिक व्यापक करणं आवश्यक आहे. माझं ध्येय केवळ माझ्यापुरतं किंवा माझ्या कुटुंबापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. त्याची व्याप्ती समाजापर्यंत, संस्कृतीपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सतत पुढाकार घेत राहणार

हा बदल एका दिवसात होणार नाही. त्यासाठी मला सातत्याने प्रवाहित राहायचं आहे पाण्यासारखं. पाण्याचा स्वभाव मला हे शिकवतो. पाणी कधीच थांबत नाही. डोंगरमाथ्यावरून खळखळत वाहणारं पाणी स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतं. सततच्या प्रवाहातून ओहोळ तयार होतो, ओहोळातून ओढा, आणि कालांतराने नदी जन्म घेते. त्या नदीचा मार्ग तिच्या सातत्याचा पुरावा असतो. पाणी त्या क्षणी असो वा नसो, त्याने निर्माण केलेली वाट चारही ऋतूंमध्ये दिसत राहते.

रंगभूमीसाठी आम्ही थिएटर ऑफ रेलेव्हन्सचे रंगकर्मीही असाच एक प्रवाह निर्माण करत आहोत. हा प्रवाह केवळ आजसाठी नाही; तो येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे, जेणेकरून रंगकर्म जिवंत राहील, संवेदनशील राहील आणि सतत प्रवाहित राहील.

बदलाच्या प्रवाहात मी – रंगकर्मी, तुषार म्हस्के  मी माझी भूमिका शोधत आहे... मी नेहमी बाहेरच्या सिस्टमबद्दल बोलतो. समाज, व्यवस्था, परंपरा, राजकारण, संस्कृती या सगळ्या बाहेरच्या सिस्टम मला दिसतात. पण माझ्या आत जी एक सिस्टम आहे, तिचं काय?  मी बदलाच्या प्रक्रियेत आहे. मी बदलत आहे. पण बदलताना अनेकदा असं वाटतं की बाहेरची सिस्टम मला बदलू देत नाही. मात्र, हा आरोप करण्यापेक्षा मला स्वतःलाच एक प्रश्न विचारायला हवा. माझ्या आतल्या सिस्टमला बदलण्यासाठी मी काय करत आहे?  माझी सिस्टम म्हणजे माझं विचार करणं, वागणं, जगणं; माझ्या सवयी, माझे पूर्वग्रह, माझ्या भीती आणि परंपरांना धरून ठेवणारी माझी मानसिकता. मी स्वतःमध्ये बदल घडवत नाही, पण बाहेरच्या सिस्टमवर दोष टाकून मोकळा होतो.  अशा वेळी एक कलाकार म्हणून, एक व्यक्ती म्हणून माझी भूमिका आणि जबाबदारी काय आहे? हा प्रश्न मला खरोखर पडतो का? की मी तो टाळतो? की माझ्या संवेदना हळूहळू मृत होत जातात?  ८ ते १२ जुलै २०२६ रोजी थिएटर ऑफ रेलेव्हन्सच्या 'रंगभूमी : सृजन आणि संवर्धन' या निवासी कार्यशाळेत, मंजुल भारद्वाज उत्प्रेरित चैतन्य अभ्यासातून मला एक महत्त्वाची जाणीव झाली. मला सर्वप्रथम माझ्या आतल्या सिस्टमला बदलायचं आहे.  हा बदल एका दिवसात होणार नाही. त्यासाठी मला सातत्याने प्रवाहित राहायचं आहे पाण्यासारखं.  पाण्याचा स्वभाव मला हे शिकवतो. पाणी कधीच थांबत नाही. डोंगरमाथ्यावरून खळखळत वाहणारं पाणी स्वतःचा मार्ग स्वतः तयार करतं. सततच्या प्रवाहातून ओहोळ तयार होतो, ओहोळातून ओढा, आणि कालांतराने नदी जन्म घेते. त्या नदीचा मार्ग तिच्या सातत्याचा पुरावा असतो. पाणी त्या क्षणी असो वा नसो, त्याने निर्माण केलेली वाट चारही ऋतूंमध्ये दिसत राहते.  रंगभूमीसाठी आम्ही थिएटर ऑफ रेलेव्हन्सचे रंगकर्मीही असाच एक प्रवाह निर्माण करत आहोत. हा प्रवाह केवळ आजसाठी नाही; तो येणाऱ्या पिढ्यांसाठी आहे, जेणेकरून रंगकर्म जिवंत राहील, संवेदनशील राहील आणि सतत प्रवाहित राहील.  माझी दृष्टी प्रज्वलित ठेवायची आहे त्यासाठी  माझं ध्येय अधिक व्यापक करणं आवश्यक आहे. माझं ध्येय केवळ माझ्यापुरतं किंवा माझ्या कुटुंबापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. त्याची व्याप्ती समाजापर्यंत, संस्कृतीपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सतत पुढाकार घेत राहणार

माझी दृष्टी प्रज्वलित ठेवायची आहे त्यासाठी  माझं ध्येय अधिक व्यापक करणं आवश्यक आहे. माझं ध्येय केवळ माझ्यापुरतं किंवा माझ्या कुटुंबापुरतं मर्यादित राहून चालणार नाही. त्याची व्याप्ती समाजापर्यंत, संस्कृतीपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मी सतत पुढाकार घेत राहणार

Thursday, 16 July 2026

"रंगभूमीसाठी... विचार, मनन, चिंतन आणि दिवसातील २४ तास फक्त रंगकर्म !

 "रंगभूमीसाठी... विचार, मनन, चिंतन आणि दिवसातील २४ तास फक्त रंगकर्म ! 

नाशिक येथील चिखलवाडी येथे ८ ते १२ जुलै २०२६ या कालावधीत "रंगभूमी: सृजन आणि संवर्धन कार्यशाळा" संपन्न झाली. ही कार्यशाळा रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी उत्प्रेरित केली.

रंगभूमी हा सृजनेचा जिवंत झरा आहे. ती कलाकारांना जीवनदान देते आणि समाजाला नवी दिशा दाखवते. रंगभूमी ही खरंतर विचारांची भूमी आहे. अनेक कलाकार या रंगभूमीवर येतात; रंगभूमी त्यांना नाव देते, त्यांचे अस्तित्व निर्माण करते आणि त्यांना एका विशिष्ट उंचीवर घेऊन जाते. कलाकाराला नाव, पैसा, प्रसिद्धी हे सगळं रंगभूमीमुळेच मिळतं. पण जेव्हा हे कलाकार मोठे होतात, तेव्हा ते या रंगभूमीला काय परत देतात? रंगभूमीच्या निर्मितीसाठी आणि ती निरंतर कार्यान्वित राहण्यासाठी ते काय करतात? हे महत्त्वाचे प्रश्न आज समोर उभे ठाकले आहेत.

गेल्या ३४ वर्षांपासून 'थिएटर ऑफ रेलेवंस' हा नाट्य सिद्धांत रंगभूमीला जिवंत ठेवण्यासाठी सृजनेचा झरा बनला आहे. रंगभूमी जनमानसात पोहोचवण्यासाठी या माध्यमातून सातत्याने प्रयोग होत आहेत. रंगभूमीच्या निर्मितीसाठी सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे 'प्रेक्षक'. समाजातील तळागाळातील वर्ग, मध्यमवर्ग आणि उच्च वर्ग अशी कोणतीही भिंत न ठेवता, प्रेक्षक-संवादाच्या माध्यमातून सर्वांना एका मंचावर, एका समपातळीवर आणण्याचे काम हा सिद्धांत करतो; त्यांच्यामध्ये माणुसकीचा बोध निर्माण करतो आणि त्यांचा विवेक जागृत करतो.

रंगकर्मी हा स्वतः जगलेले क्षण किंवा समाजात घडणाऱ्या घटनांना पुन्हा जिवंत करून, एक व्यापक दृष्टी ठेवून कला सादर करत असतो. आपल्या कलेचा हाच बोध त्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा असतो. या प्रक्रियेसाठी कलाकाराने सतत जागरूक राहून निरीक्षण (Observation) करणे आवश्यक आहे. ते क्षण जगत असताना कलाकाराच्या आत निर्माण होणारे भाव, त्यातून घडणारी कृती (Action) आणि मिळणारा बोध हे समजून घेणे गरजेचे असते.

"रंगभूमीसाठी... विचार, मनन, चिंतन आणि दिवसातील २४ तास फक्त रंगकर्म !

या कार्यशाळेच्या पहिल्याच दिवशी आम्ही एका ओढ्यात गेलो. पाण्यात पाय ठेवताना होणारा पाण्याचा स्पर्श आणि अंगावर आलेले शहारे, हे माझे नैसर्गिक भाव जागृत करत होते. हे भाव मला माझ्या स्वतःशी जोडत होते, मला एकरूप करत होते. संपूर्ण पाण्यात बुडताना होणारा तो स्पर्श माझ्यातील व्यक्तीला आणि कलाकाराला 'प्रवाहित' राहण्याचा संदेश देत होता. निसर्गाचा हा प्रवाह कधीच थांबत नाही, तो नेहमी प्रवाही असतो. मग मी माझ्या भावनांचा आणि विचारांचा प्रवाह का थांबवला आहे? निसर्गाप्रमाणे मी स्वतःला प्रवाही का ठेवत नाही? हा प्रश्न मला पडला आणि क्षणात माझ्यातील 'अहं' गळून पडला. मी स्वतःहून पुढाकार घेऊन परफॉर्म करू लागलो. या सादरीकरणाच्या प्रवासात एक कलाकार म्हणून मला जे महत्त्वाचे सूत्र गवसले, ते म्हणजे "निरीक्षण आणि स्पर्श" (Observation and Touch).

जन्म ते मुक्ती हा प्रवास आपण सगळेच करतो, पण तो करताना आपल्याला त्याची खरी जाणीव असते का? कारण हाच प्रवास आपल्या अस्तित्वाची पायवाट निर्माण करतो, जी येणाऱ्या पिढ्यांना रस्ता दाखवते. चैतन्य अभ्यास करण्यासाठी आम्ही निसर्गाच्या सानिध्यात गेलो. तिथे जाण्यापूर्वीचा रस्ता, वाटेत येणाऱ्या अडचणी आणि आव्हानांना तोंड देताना मी घेतलेली काळजी... या सगळ्यावरून मला एक जाणवले की, मी आयुष्यात फक्त पळतोय की या प्रवासाचा आनंद घेतोय? आयुष्यातील चढ-उतार, वळणे आणि खाचखळग्यांतून जाताना येणारा अनुभव मी खऱ्या अर्थाने जगत आहे, याची तीव्र जाणीव मला नदीच्या पात्रातून चालताना झाली. दगडांवरून चालताना पाय घसरत असतानाही अत्यंत सावधपणे टाकलेली पावले मला जीवनातील अडथळ्यांवर मात करण्याचा मार्ग दाखवून गेली. एखादा मोठा दगड समोर आला तरी त्याला भेदून पाणी जसे पुढे निघून जाते आणि नदी आपली वाट निर्माण करते, तसेच आपल्यालाही पुढे जायचे आहे.

सतत प्रवाहित राहणं म्हणजेच अधात्म आहे. 

नदीच्या पात्रात झोपल्यावर मला जाणवले की, सुरुवातीला थंड वाटणारे पाणी काही काळाने उबदार भासू लागले. डोळे बंद करून आकाशाकडे तोंड करून झोपलो असताना मला वाटले की, मी संपूर्ण आकाश माझ्या डोळ्यांत सामावून घेतले आहे. बंद डोळ्यांसमोर लाल रंगाचा रक्ताचा प्रवाह दिसत होता. पाण्याच्या त्या उबेमुळे मला मी आईच्या गर्भात असल्याचा भास झाला, जणू तिच्या पोटातूनच मी हे संपूर्ण जग पाहत होतो.

माझ्यातील उदासीनता दूर होऊन मोकळी हवा माझ्या शरीरात संचार करू लागली आणि माझ्यातील भावना तरंगू लागल्या. आयुष्याचा एकेक टप्पा पार करताना एक व्यक्ती आणि कलाकार म्हणून मला स्वतःला अधिक भक्कम करायचे आहे. टेकडी चढून वर गेल्यावर एक असा टप्पा आला, जिथे मोकळ्या हवेने मला वेढले. मी स्वतःशी पूर्णपणे एकरूप झालो. मोकळ्या आकाशात पाहताना ढग जमिनीवर चालत असल्याचा भास होत होता. ढगांच्या आडून येणारी सोन्यासारखी किरणे थक्क करत होती आणि निसर्गाचे बहुआयामी रूप दाखवत होती. हिरवा, पिवळा, निळा, जांभळा, पांढरा, केशरी, पोपटी, तपकिरी अशा विविध रंगांची उधळण मला तिथे दिसली. रंगभूमी देखील अशीच विविध रंगांनी बहरलेली आहे, याची अनुभूती मला आली.

त्या माळरानावर मोठी झाडे का नाहीत, हा प्रश्न जेव्हा पडला, तेव्हा मला दोन उत्तरे मिळाली—एक म्हणजे हवेचा तीव्र वेग आणि दुसरे म्हणजे मातीच्या थराखाली असलेला कठीण खडक. आयुष्यातही कधीकधी आपण अशा टप्प्यावर असतो, जिथे जीवन मर्यादित असते आणि आपण एकांतात असतो. पण त्या उंचीवरून जेव्हा आपण जमिनीकडे पाहतो, तेव्हा माणसांचे व्यवहार स्पष्ट दिसतात. ती उंची माणसाला स्वतःच्या गुंत्यातून बाहेर पडण्यासाठी प्रेरित करते. आयुष्यात येणाऱ्या प्रसंगांकडे तटस्थपणे, बाहेरून पाहता यायला हवं , हा मोठा धडा मला निसर्गाने आणि रंगभूमीने दिला.

स्वतः जगलेले क्षण जेव्हा मी एकट्याने परफॉर्म केले, तेव्हा ते सहज करता आले. एका सहकलाकारासोबत परफॉर्म केले, तेव्हा ते क्षण अनुभवता आले, जगलेला अनुभव आणि दृष्टी मांडता आली. परंतु, जेव्हा ग्रुपसोबत परफॉर्म करण्याची वेळ आली, तेव्हा माझ्यासमोर जुनी, साचेबद्ध तालीम आडवी आली. मी जगलेला तो मुक्त प्रवास आणि मला मिळालेली दृष्टी ग्रुप परफॉर्मन्समध्ये मांडताना अडचण येत होती. प्रत्येकाचे इनपुट आणि सहभाग घेऊन दृश्य उभे करताना मला माझ्यातील कलात्मक दृष्टी कमी पडत असल्याची जाणीव झाली. संपूर्ण ग्रुपला अलाईन (Align) करून परफॉर्म करणे हे एक मोठे आव्हान वाटू लागले. पण हिंमत न हारता, टिकून राहणे महत्त्वाचे होते. नुसते उभे राहून उपयोग नव्हता, तर माझ्यातील चेतना मला जागृत ठेवायची होती. अखेर आठ तासांच्या अथक परिश्रमानंतर एक दृश्य तयार झाले, जे एक मोठी संकल्पना देऊन गेले—"जीवनचक्राच्या प्रवासात जे बाहेर पडते ते जीवन, आणि जे सतत फिरत राहते ते चक्र!"

या कार्यशाळेत येण्यापूर्वी मी माझ्या व्यक्तिगत कोषात अडकलो होतो. 'मी का करू?', 'कशासाठी करू?' हा अहंकाराचा डोंगर माझ्यात उभा होता. पण आज तो डोंगर वाहून गेला आहे. आता मला जाणवू लागले आहे की, मी रंगभूमीसाठी पूर्णपणे प्रवाही झालो आहे.

रंगकर्मी

तुषार म्हस्के

Sunday, 11 January 2026

मुंबईच्या प्रकृतीला निरोगी ठेवण्यासाठी मुंबईकरांच्या मेंदूत विचारांच झाड लावण्याचा संकल्प घेऊन आम्ही मुंबईकरांना भेटत आहोत... संवाद करत आहोत...- तुषार म्हस्के

#मुंबई 

आज मालाड ते दादर ट्रेन ने प्रवास करत असताना... ट्रेन चा येणारा आवाज... ट्रेन च्या आत मध्ये असणारी माणसे... त्यांच्या होणाऱ्या गप्पा... विस्तारलेले मुंबई शहर... प्रत्येकाची स्वप्न पूर्ण करणारी मुंबई... पोटा - पाण्याच्या शोधात आलेले चाकरमानी, अस्तित्व निर्माण करण्यासाठी आलेले कलाकार... पैसे कमावण्यासाठी मुंबईत आलेली माणसे... मुंबई सगळ्यांना बघते... प्रत्येकाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मुंबई ही ती जागा प्रत्येक व्यक्तीला देते... जगाच्या कानाकोपऱ्यातून माणसे येतात... आणि आपली ओळख निर्माण करतात...? 

मुंबई  स्वप्न बघणाऱ्यांचे  स्वप्न पूर्ण करते... आणि आपण मुंबईला काय देतोय...  ? अशुद्ध हवा, कचऱ्याचे डोंगर, स्वतः च्या स्वार्थासाठी जंगलांची तोड, समुद्र किनारपट्टीवर मुंबईचे रक्षण करणारे झाडे ( mangroove ) तोडतो.. एकदा तरी विचार करतो का ? ज्या मुंबईने आमची स्वप्न पूर्ण केली आहेत त्या मुंबईला स्वतःच्या स्वार्थासाठी संपवत आहोत ? ज्या भूमिपुत्रांच्या जमिनीवर मुंबईकर राहत आहेत... त्यांना बेघर करतोय ? अशा अनेक प्रश्नांनी मनात एकच वादळ निर्माण केले... 

मंजुल भारद्वाज रचित नाटक द... अदर वर्ल्ड ची प्रस्तुती आम्ही 24 जानेवारी 2026, सकाळी 11.00 वाजता . श्री शिवाजी मंदिर, दादर येथे करणार आहोत... प्रेक्षक संवादाच्या माध्यमातून... मुंबईच्या प्रकृतीला निरोगी ठेवण्यासाठी मुंबईकरांच्या मेंदूत विचारांच झाड लावण्याचा संकल्प घेऊन आम्ही मुंबईकरांना भेटत आहोत... संवाद करत आहोत.... 

हम हैं !
रंगकर्मी तुषार म्हस्के

Thursday, 8 January 2026

मत देताना विचार करा....

 मत देताना विचार करा....

जल ... जंगल ... जमीन 

नैसर्गिक संसाधन यांना स्वार्था साठी वापरायचे आहेत... 

याचे परिणाम काय होतील त्याचा विचार करा... विकासाच्या नावाखाली नैसर्गिक संसाधनांवर डल्ला मारणं सुरू आहे... गल्ली पासून दिल्ली पर्यंत सत्तेच्या केंद्र बिंदू मध्ये असणारे सत्ताधिश जनतेची दिशाभूल करत आहेत... जनतेला भावनिक गोष्टींचा खुराक देऊन सत्तेत यायचं आणि नैसर्गिक संसाधन आणि नैसर्गिक ठेवा ... भांडवल दाराच्या घशात टाकायचा... नक्की हे प्रकरण काय सुरू आहे... ? याचा भारतातील मालकांनी म्हणजेच जनतेने विचार करायला हवा... पण, अर्थात माणसाच्या भावना ह्या शून्य झाल्यात... स्वतःच मत, स्वतःची  भूमिका राहिली नाही... हा निसर्ग आणि पर्यावरण राहिला नाही तर आपण श्वास कसा घेणार ? 

आपला नाहीतर पुढच्या पिढी चा विचार करा... तुम्ही ज्यांना निवडून देता त्यांचा विचार नका करू ... त्यांच्या नावाने विदेशात घर आहेत... जागा आहे... त्यांची मुलं तिकडे शिफ्ट होतील... मात्र आमची मुलं श्वास घेण्यासाठी तरसतील... 

विचार करा ....! 

https://www.esakal.com/vidarbha/tadoba-tiger-reserve-wildlife-corridor-mining-project-approved-despite-opposition-maharashtra-government-spb94?fbclid=IwY2xjawPMt9pleHRuA2FlbQIxMABicmlkETFFUml6TEJGY2t4QnlqNU9Qc3J0YwZhcHBfaWQQMjIyMDM5MTc4ODIwMDg5MgABHm_2Ufl4Ws-tspLkVL6WXzv8c4VoOdU_db0LMpRdQlQzTG_bJjkhzZxuVZ32_aem_VzjWPJEBtY8wOE9qwinPxg

तुषार म्हस्के 

प्रेक्षक संवादाच्या माध्यमातून आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी...

आज , दादर मध्ये 

मुंबई सर्वसामान्य माणसांची...आज दादर मध्ये चालत असताना आठवणी जाग्या झाल्या... श्री शिवाजी मंदिर,  मध्ये पाय ठेवल्यावर संपूर्ण 2015 पासूनचा इतिहास आठवला... मंजुल भारद्वाज रचित नाटक "  अनहद नाद - Unheard Sounds of Universe" या नाटकाने रंगभूमीची दिशा बदलली... तो प्रवास होता.. रंगभूमीला घडवण्याचा... रंगभूमीला  घडवण्यासाठी आवश्यक आहे ते म्हणजे  प्रेक्षक... 

प्रेक्षक संवादाच्या माध्यमातून आम्ही थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी... शोध घेत निघालो प्रेक्षकांचा... अगदी समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलो... एक - एक व्यक्तीला भेटत संवाद करत आम्ही लोकांमध्ये नाटकाविषयी आदर, जबाबदारी, प्रेम, जाणीव निर्माण केली... त्या छोट्याशा रोपट्याचे आज वट वृक्षामध्ये रूपांतर झालेले आम्ही अनुभवत आहे... सर्व सामान्य माणूस नाटकाकडे पुन्हा वळत आहे... तो आवर्जून विचारतो...  " यावेळी, तुमचं कोणतं नाटक आहे... ! " आम्हाला पहायचं आहे... आम्ही नाटक पहायला येणार आहे... 

यावेळी, आम्ही मंजुल भारद्वाज रचित नाटक द... अदर वर्ल्ड ची  प्रस्तुती श्री शिवाजी मंदिर येथे करणार आहोत... येत्या 24 जानेवारी 2026, सकाळी 11.00 वाजता...

आम्ही आता मुंबई मध्ये प्रेक्षक संवादासाठी सज्ज आहोत... भेटुयात, बोलुयात, संवाद  साधूयात ... माणसाच्या आतील निसर्ग जागृत करुयात... माणसाच्या मेंदूत एक झाड लावुयात...

हम हैं !

रंगकर्मी
तुषार म्हस्के 

Saturday, 23 August 2025

पुरोगामी महाराष्ट्र ...

 पुरोगामी महाराष्ट्र ...

पुरोगामी महाराष्ट्र ...

मी इतिहासात वाचलेला, ऐकलेला महाराष्ट्र 

इथे भय नाही प्रश्न विचारण्याला, 

इथे भीती नाही सत्तेच्या खाली नतमस्तक होण्याची,

थोर संतांचा वारसा असणारा माहाराष्ट्र, 

इथे आजिबात वाव नाही खोटारडेपणाला, 

याच भूमीत जन्मले छत्रपती शिवाजी महाराज, 

छत्रपती संभाजी माहाराज, दिले स्वतंत्र त्यांनी आपल्याला, 

शिव, शाहू, फुले आंबेडकारांचा माहाराष्ट्र 

लेखणी घेतली सावित्रीने हातात आणि शिक्षणाचे द्वार उघडले मुली, महिलांसाठी

नजीकच्या काळात १०६ हुतात्त्म दिले, महाराष्ट्राच्या निर्माणासाठी ,

महाराष्ट्र समतेची भूमी निर्माण करणारा, माणसामाणसातील भेद संपवणारा,

निधड्या छातीने उभा असणारा महाराष्ट्र, देशाची आर्थिक राजधानी असणारा महाराष्ट्र... 

अभिमान वाटतो... या महाराष्ट्राचा .... 

पण, आता लेखणी एकाच बाजूने आपली स्टोरी लिहीत आहे.. 

पाठीचा कणा आता पत्रकारांचा ताठ नाही आहे... 

ती सत्तेची भाषा बोलत आहे ... कलाकार सत्तेकडून award घेण्यात व्यस्त आहेत... 

जणमाणसाबरोबर संवाद राहिलेला नाही... 

" खोटं बोला आणि ते रेटून बोला " वास्तवाला ते भ्रमित करून 

भ्रमाचे जाळे निर्माण करत आहेत... 

जनता लोकशाही मध्ये राजेशाही शोधत आहे... 

त्यांना आपल्या मताची किंमत हि फक्त पैशाने मोजत आहे... 

मग, सत्ताधारी हा धर्माच्या नावावर राजकारण करून, भांडवलदारांना देशाची संप्पती लुटत असो 

त्याचे  त्यांना काहीच फरक पडत नाही... 

आज सत्ताधार्यांना प्रश्न विचारण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही... 

शोकांतिका आहे शब्दासाठी जागणारे मावळे आज राहिलेले नाहीत... 

एकतर्फी जुलमी राज्य या महाराष्ट्रात निर्माण झाले आहे... 

आज फतवे निघत आहेत... मुलींनी घराच्या बाहेर पडू नये... 

जी मुलगी घरातल्या जाचाला कंटाळून बाहेर पडते तिच्या चरित्रावर हल्ले करून 

चार भिंतीत बंद केले जाते... रक्षक भक्षकांच्या भूमिकेत आले आहेत... 

कसा टिकणार हा पुरोगामी महाराष्ट्र ... कसं टिकवणार आपलं अस्तित्व ... 

हि मनाला लागलेली धास्ती आहे... 

इथे भूमिका माझी आहे...

माझी लेखणी अजून कमजोर झालेली नाही... 

माझ्या साहित्यातून मी मांडणी वास्तवाची करत आहे...

मी चित्रकार माझ्या चित्रांमधून शोषणाला विरोध करत आहे...

मी सृजनकार माझ्या कलेतून माणसाचं  अस्तित्व टिकवत आहे...

पुरोगामी महाराष्ट्राला ... माझ्या कलाकृतीतून जिवंत ठेवत आहे...

जय महाराष्ट्र .... पुरोगामी महाराष्ट्र ... 

@ तुषार म्हस्के

Thursday, 17 November 2022

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक : गोधडी संस्कृतीचा आत्मशोध ! थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत नाटक "गोधडी"

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक : गोधडी संस्कृतीचा आत्मशोध !

थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत नाटक "गोधडी"

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक : गोधडी संस्कृतीचा आत्मशोध !  थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत नाटक "गोधडी"

कुठे : श्री शिवाजी नाट्य मंदिर, #दादर 

कधी : 19 नोव्हेंबर 2022 , शनिवार रोजी, सकाळी 11.00 वाजता

कलाकार :

अश्विनी नांदेडकर,सायली पावसकर,कोमल खामकर, प्रियंका कांबळे, तुषार म्हस्के,संध्या बाविस्कर, तनिष्का लोंढे, प्रांजल गुडीले,आरोही बाविस्कर हे आहेत.

नाटक: गोधडी

 रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित “नाटक गोधडी संस्कृतीचा आत्मशोध आहे. संस्कृती, काळ, माती आणि निसर्गासोबत विविध समाजातील सण, प्रथा, चालीरीती, परंपरा यांचा शोध घेऊन मानवी विवेकाचा नवा धागा विणते.”

"गोधडी" भारताचा आत्मा आहे.भारताची विविधता हे नाटक स्पंदीत करते आणि आपल्यातील विवेकशीलतेला जागवते.या गोधडीत सामावले आहे आपले सारे जग. मनुष्याचे पाखंड आणि विकृतीला समूळ नष्ट करत मानवाच्या मूळ संस्कृतीचा शोध घेते. वर्चस्ववादी शोषणचक्राच्या मुळाशी जाऊन हिंसाचाराच्या विकृतीला आपल्या दृष्टीने अहिंसेची, मानवीय संवेदनांची आणि नैसर्गिकतेची संस्कृतीला उलगडण्याचा ध्यास आहे नाटक "गोधडी" .!

प्रत्येक मानवामध्ये दोन महत्त्वाचे पैलू आहेत, एक म्हणजे आत्मबळ आणि दुसरे आत्महीनता. आत्महीनतेमुळे जगातील वर्चस्व, मक्तेदारी, हुकूमशाही निर्माण होते ज्यामुळे जगातील मानवता नष्ट होते. आत्मबळातून विचार जन्माला येतात, ते जगातील विविधता, सर्वसमावेशकता, मानवता, न्याय आणि समतेला स्वीकारतात व निर्माण करतात.विचार आणि विकाराच्या संघर्षात जेव्हा विचार विकाराला मिटवतो व मानवी जाणिवेने जिवंत होतो, त्याच बोधाला 'कला' म्हणतात.

सत्ता व्यवस्था बनवू शकते परंतु माणसाला माणूस बनवू शकत नाही. मनुष्याला मनुष्य बनवते 'कला'. 'रंगकर्म' सर्व कलांना जन्म देते. रंगकर्मात सर्व कलांचा समावेश आहे.कारण रंगकर्म वैयक्तिक असूनही सर्वभौमिक आहे.मानवतेचे तत्व म्हणजे रंगकर्म !! तत्वाशिवाय माध्यम म्हणून ते अपूर्ण किंवा केवळ दिखावा आहे.

 रंगकर्म हे केवळ एक माध्यम नव्हे तर मानवतेची संपूर्ण दृष्टी आहे, दर्शन आहे.

मनुष्याच्या या अधोगतीचे कारण म्हणजे त्याच्या सांस्कृतिक चेतनेचा मृत्यू. इतिहास साक्षी आहे की,कोणी कितीही सामर्थ्यशाली, पारंगत, सर्वज्ञ माणूस, समाज, सभ्यता किंवा साम्राज्य असले तरीही जेव्हा त्यांची सांस्कृतिक चेतना भ्रमिष्ट झाली, तेव्हा त्यांचा विनाश झाला. सांस्कृतिक चेतना म्हणजे "जी चेतना माणसाला अंतर्गत आणि बाह्य वर्चस्वातून मुक्त करते, त्याच्या मूल्यांना उत्क्रांतीच्या मार्गावर उत्प्रेरित करते आणि प्रकृती माणसाचे स्वायत्त अस्तित्व घडवते" मात्र विज्ञानाला फासावर लटकवून त्यातून निघालेल्या एकाधिकारवादी तंत्रज्ञानाने प्रकृतीशी युद्धाची घोषणा केली आणि संपूर्ण मानव संस्कृती धुळीस मिळवण्यास सज्ज झाले आहे.आज जग युद्धात आहे आणि अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील, जेव्हा संपूर्ण राजनैतिक व्यवस्था विकली गेलेली आहे. सत्य-असत्याच्या पुढे जाऊन आणि निरंतर खोटे पसरवून समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या विकारांपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.

 थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत:

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य तत्व मागील 30 वर्षांपासून आपल्या नाट्य प्रस्तुतीतून निरंतर कलात्मक सृजन प्रक्रियांना उत्प्रेरीत करत आहे. सृजनशील विचारांच्या, कलासत्वाच्या, तात्विक प्रतिबद्धतेच्या आणि विवेकशील प्रतिरोधाच्या हुंकारने विश्वाला सुंदर आणि मानवीय बनवण्यासाठी समर्पित आहे.

मागील 30 वर्षांपासून ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या नाटय़ सिद्धांताने सतत कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली कलेप्रति जबाबदारी आणि कर्तव्ये निभावली आहेत. प्रेक्षक सहभागाच्या आधारावर मुंबईपासून मणिपूरपर्यंत हे ‘रंग आंदोलन’ सुरू आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ ने जीवनाला नाटकाशी जोडून आपल्या कलात्मक  नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ लढत आहे !

रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्याविषयी :

लेखक - दिग्दर्शक "थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार "थिएटर ऑफ रेलेवन्स" च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट जन-माणसांसमोर ठेवतात. गेल्या 30 वर्षांपासून, म्हणजे एक चतुर्थांश शतकाहून अधिक काळ, थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाटय सिद्धांताचे रंगकर्म करून जिवंत आहे. कोणतीही सत्ता, कॉर्पोरेट किंवा राजनैतिक पार्टीच्या आश्रयाविना भारतभर रंग आंदोलनाला उत्प्रेरित करत आहे. जगातील अनेक देशांमध्ये 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' नाटय सिद्धांतावर आधारित कार्यशाळांसोबत नाटकांची प्रस्तुती केली आहे.

….

Tuesday, 25 October 2022

5 नोव्हेंबर : मराठी रंगभूमी दिनानिमित्त थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक "गोधडी"

 5 नोव्हेंबर : मराठी रंगभूमी दिनानिमित्त

थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक "गोधडी"

कुठे : वासुदेव बळवंत फड़के नाट्यगृह, पनवेल

कधी : 5 नोव्हेंबर 2022 ,

शनिवार रोजी, सकाळी 11.30 वाजता

कलाकार : अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियांका कांबळे, तनिष्का, प्रांजल आणि अन्य कलाकार.

नाटक: गोधडी

रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित “नाटक गोधडी संस्कृतीचा आत्मशोध आहे. संस्कृती, काळ, माती आणि निसर्गासोबत विविध समाजातील सण, प्रथा, चालीरीती, परंपरा यांचा शोध घेऊन मानवी विवेकाचा नवा धागा विणते.”

"गोधडी" भारताचा आत्मा आहे.भारताची विविधता हे नाटक स्पंदीत करते आणि आपल्यातील विवेकशीलतेला जागवते.या गोधडीत सामावले आहे आपले सारे जग. मनुष्याचे पाखंड आणि विकृतीला समूळ नष्ट करत मानवाच्या मूळ संस्कृतीचा शोध घेते. वर्चस्ववादी शोषणचक्राच्या मुळाशी जाऊन हिंसाचाराच्या विकृतीला आपल्या दृष्टीने अहिंसेची, मानवीय संवेदनांची आणि नैसर्गिकतेची संस्कृतीला उलगडण्याचा ध्यास आहे नाटक "गोधडी" .!

प्रत्येक मानवामध्ये दोन महत्त्वाचे पैलू आहेत, एक म्हणजे आत्मबळ आणि दुसरे आत्महीनता. आत्महीनतेमुळे जगातील वर्चस्व, मक्तेदारी, हुकूमशाही निर्माण होते ज्यामुळे जगातील मानवता नष्ट होते. आत्मबळातून विचार जन्माला येतात, ते जगातील विविधता, सर्वसमावेशकता, मानवता, न्याय आणि समतेला स्वीकारतात व निर्माण करतात.विचार आणि विकाराच्या संघर्षात जेव्हा विचार विकाराला मिटवतो व मानवी जाणिवेने जिवंत होतो, त्याच बोधाला 'कला' म्हणतात.

सत्ता व्यवस्था बनवू शकते परंतु माणसाला माणूस बनवू शकत नाही. मनुष्याला मनुष्य बनवते 'कला'. 'रंगकर्म' सर्व कलांना जन्म देते. रंगकर्मात सर्व कलांचा समावेश आहे.कारण रंगकर्म वैयक्तिक असूनही सर्वभौमिक आहे.मानवतेचे तत्व म्हणजे रंगकर्म !! तत्वाशिवाय माध्यम म्हणून ते अपूर्ण किंवा केवळ दिखावा आहे.

रंगकर्म हे केवळ एक माध्यम नव्हे तर मानवतेची संपूर्ण दृष्टी आहे, दर्शन आहे.मनुष्याच्या या अधोगतीचे कारण म्हणजे त्याच्या सांस्कृतिक चेतनेचा मृत्यू. इतिहास साक्षी आहे की,कोणी कितीही सामर्थ्यशाली, पारंगत, सर्वज्ञ माणूस, समाज, सभ्यता किंवा साम्राज्य असले तरीही जेव्हा त्यांची सांस्कृतिक चेतना भ्रमिष्ट झाली, तेव्हा त्यांचा विनाश झाला. सांस्कृतिक चेतना म्हणजे "जी चेतना माणसाला अंतर्गत आणि बाह्य वर्चस्वातून मुक्त करते, त्याच्या मूल्यांना उत्क्रांतीच्या मार्गावर उत्प्रेरित करते आणि प्रकृती माणसाचे स्वायत्त अस्तित्व घडवते" मात्र विज्ञानाला फासावर लटकवून त्यातून निघालेल्या एकाधिकारवादी तंत्रज्ञानाने प्रकृतीशी युद्धाची घोषणा केली आणि संपूर्ण मानव संस्कृती धुळीस मिळवण्यास सज्ज झाले आहे.आज जग युद्धात आहे आणि अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील, जेव्हा संपूर्ण राजनैतिक व्यवस्था विकली गेलेली आहे. सत्य-असत्याच्या पुढे जाऊन आणि निरंतर खोटे पसरवून समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या विकारांपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य तत्व मागील 30 वर्षांपासून आपल्या नाट्य प्रस्तुतीतून निरंतर कलात्मक सृजन प्रक्रियांना उत्प्रेरीत करत आहे. सृजनशील विचारांच्या, कलासत्वाच्या, तात्विक प्रतिबद्धतेच्या आणि विवेकशील प्रतिरोधाच्या हुंकारने विश्वाला सुंदर आणि मानवीय बनवण्यासाठी समर्पित आहे.

मागील 30 वर्षांपासून ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या नाटय़ सिद्धांताने सतत कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली कलेप्रति जबाबदारी आणि कर्तव्ये निभावली आहेत. प्रेक्षक सहभागाच्या आधारावर मुंबईपासून मणिपूरपर्यंत हे ‘रंग आंदोलन’ सुरू आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ ने जीवनाला नाटकाशी जोडून आपल्या कलात्मक नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ लढत आहे !

रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्याविषयी :

लेखक - दिग्दर्शक "थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार "थिएटर ऑफ रेलेवन्स" च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट जन-माणसांसमोर ठेवतात. गेल्या 30 वर्षांपासून, म्हणजे एक चतुर्थांश शतकाहून अधिक काळ, थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाटय सिद्धांताचे रंगकर्म करून जिवंत आहे. कोणतीही सत्ता, कॉर्पोरेट किंवा राजनैतिक पार्टीच्या आश्रयाविना भारतभर रंग आंदोलनाला उत्प्रेरित करत आहे. जगातील अनेक देशांमध्ये 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' नाटय सिद्धांतावर आधारित कार्यशाळांसोबत नाटकांची प्रस्तुती केली आहे.

Wednesday, 18 May 2022

नाटकासाठी परिवाराचा मिळणारा सपोर्ट माझ्यासाठी प्रेरणा देणारा आहे...तुषार म्हस्के

रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक लोक-शास्त्र सावित्री
माझ्यासाठी प्रेरणा आहे. घर- परिवारामध्ये एक  नवीन ओळख निर्माण करत आहे. नाटक सादरीकरण प्रस्तुति एक भाग आहे. त्यापलीकडे नाटकाच्या प्रयोगासाठी परिवाराचा पुढाकार हा तेवढाच महत्वाचा आहे. " थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताची " ही प्रक्रिया घर परिवाराला एकत्र जोडणारी आहे. त्यामुळे, नाती केवळ भावनिक राहत नाही तर नात्यामध्ये एक वैचारिक स्पष्टता निर्माण होते. नाटक केवळ मनोरंजनासाठी राहत नाही . नाटक हे जीवनाला दृष्टी देणारे होऊन जाते. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधील दरी संपते आणि प्रेक्षक हे नाटकासाठी आपली भूमिका बजावू लागतात.

 लोक- शास्त्र सावित्री नाटकाचा प्रयोग हा पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिर ला 29 एप्रिल 2022 रोजी , सायंकाळी 5:30 वाजता प्रस्तुत झाला . नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी, नाटक पुणे येथे प्रस्तुत होणार होत... थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताची मूळ प्रक्रिया आहे प्रेक्षक संवाद ... 14 ते 18 एप्रिल 2022 ला  थिएटर ऑफ रेलेवन्स ची कार्यशाळा सुरू होणार होती. त्या नियोजनामध्ये संवाद करत असताना 29 तारखेला प्रयोग सुनिश्चित झाला. 

सकाळी 7 ते दुपारी 1 मध्ये निळू फुले कला अकादमी मध्ये कार्यशाळा असायची त्यानंतर आम्ही प्रेक्षक संवाद करायचो. परिवार आणि कुटुंबासाठी स्वाती चा एक पुढाकार मला आणि टीम ला खूप आवडला..  तिने नाटक संपूर्ण फॅमिली ला म्हणजेच, तिच्या मामाकडच्या परिवाराला दाखवण्याचे ठरवले. हा पुढाकार म्हणजे मोठं पाऊल होतं... परिवाराला वैचारिक पातळीवर एकत्र जोडण्याचं... याच पुढाकाराला प्रतिसाद म्हणून स्वाती च्या मामी ने घेतलेला पुढाकार हा तेवढाच महत्वाचा होता. थिएटर ऑफ रेलेवन्स च्या संपूर्ण टीम ला घरी येऊन जेवणाचं दिलेलं निमंत्रण माझ्या साठी खूप महत्वाचे होते... यावेळी, प्रेक्षक संवाद प्रक्रियेला सुरुवात माझ्याकडून झाली याचं एक वेगळचं समाधान मला जाणवत होते... माझ्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी फोन करून त्यांना भेटण्याचे नियोजन करत होतो... 

पुण्यात असणारी ओळखीची माणसे मला त्याबद्दल चांगलाच रिस्पॉन्स देत होते... यामध्ये , मला एक क्षण जो मी माझ्या हृदयात कोरुन ठेवला आहे तो म्हणजे, माझी टीम लीडर अश्विनी ताई बोललेली यावेळी, पुण्यामध्ये प्रेक्षक संवादाची सुरुवात तुषार ने केली... खूप छान आणि प्रेरणादायी वाटले... चंद्राचा पडलेला प्रकाश आणि पुण्यामध्ये सरकारी गेस्ट हाऊसच्या गच्चीवर आम्ही टीम म्हणून  संपूर्ण दिवसाची शेअरिंग करत असताना असलेला हा क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता..त्यावेळची  मिळालेली ऊर्जा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली...

प्रेक्षक संवाद करत असताना नव - नवीन संकल्पना घेऊन पुण्यात उतरलो होतो. स्वातीच्या मामी चा पहिला पुढाकार सर्व टीम ला जेवायला बोलावणं... त्याच बरोबर त्यावेळच्या पुढाकाराला मंजुल सरांनी दिलेली दृष्टी मामी मध्ये असणारे नेतृत्व गुण आणि सर्वांना एकत्र आणणारा स्वभाव... महत्वाचा होता...नाटकाच्या प्रकियेसाठी आम्ही पुण्यातील प्रत्येक व्यक्तीला भेटत होतो... संवाद करत होतो..मला जाणवत होते... आपल्याला पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतीबा फुले यांच्या विचारांना पुण्यामध्ये पुन्हा जागृत करायचं आहे... त्यानुसार, प्रत्येक व्यक्तीला त्या विचारांबरोबर जोडत होतो... 

स्वातीचे आजोबा साधारणतः 75 ते 80 वय असेल परंतु, नवीन विचारांना समजून घेणारे आणि प्रक्रियेला पुढे घेऊन जाणारे जाणवले... संकल्पना सांगितल्या नंतर त्या संकल्पनेला कसं करता येईल त्यासाठी , त्यांची होत असणारी धावपळ त्यासाठी , एवढं वय असतानाही त्यांचा असणारा पुढाकार खूप मोलाचा आहे माझ्यासाठी..प्रेक्षक संवाद करायला जात असताना कोणाला कधी , केव्हा भेटायचं यांविषयी असणारा त्यांचा अनुभव हा जबरदस्त जाणवला... 

पुण्यामध्ये संवाद करत असताना येत असणारा अनुभव हा खूप मोलाचा होता... नाटकाची संकल्पना आणि थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताची प्रक्रिया एका नगरसेवकांना सांगितल्या नंतर प्रेक्षक म्हणून त्यांनी त्यांच्या विभागात नाटकाचे बॅनर लावले ... आणि त्यांचं वाक्य " तुम्ही हे करत आहात ते कार्य आम्हांला करायला हवं ते तुमच्या कडून होतंय त्याबद्दल आमच्याकडून ह्या सदिच्छा ! प्रत्येक माणसापर्यंत कशा पद्धतीने पोहचता येईल...? आणि नाटक कसं पोहोचेल यासाठी प्रेक्षक स्वतः हुन पुढाकार घेत असताना दिसू लागले होते... स्वातीचे आजोबा हे त्यांच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नाटकाविषयी सांगत होते... " आमचे नात जावई ह्या नाटकात आहेत , आणि बरं का ते सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंच्या विचाराला घेऊन नाटक करत आहेत, अशा विचारांसाठी कमी लोक काम करतात .." आपल्याला ह्या कार्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे...ही भूमिका मनाला खूप भावणारी होती...

कोरोना काळानंतर  दुसरा फेज  संपल्यानंतर एक उदासीनता निर्माण झालेली होती... माणसा - माणसांमध्ये असणारे माणुसकीचे धागे हे कमकुवत झालेले..नैराश्य निर्माण झालेलं .... अशा वातावरणात नाटक लोक- शास्त्र सावित्रीचा प्रयोग पुण्यामध्ये होणारा हा प्रयोग म्हणजे पुणेकरांसाठी  जीवन जगण्यासाठी असणारा आशेचा किरण जणू जाणवू लागला... 

दुसरा महत्वाचा पुढाकार म्हणजे माझ्या मामाच्या लहान मुलीचा अक्षया चा  नाटकाची संकल्पना आणि नाटकाची तारीख सांगितल्यानंतर तीने सम्पूर्ण तिच्या परिवाराला नाटक दाखवण्याचा केलेला  निर्धार हा खूप महत्वाचा होता... त्यामुळे, स्वातीच्या आणि माझ्या मामा कडील परिवार हे नाटकाच्या निमित्ताने एकत्र समोरासमोर आले होते... तेही सकारात्मक पुढाकरासाठी ...  

नाटकाची प्रस्तुति झाल्यानंतर परिवाराचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदललेला होता... एक वेगळीच ऊर्जा आणि वलय आणि वाढलेली वैचारिक उंची मला माझ्या आत जाणवत होती... यावेळी, रंगभूमीवर कलाकार म्हणून माझी भूमिका जगत असताना मला जाणवले... प्रत्येक भूमिका ही माझ्या अंतकरणातून येत आहे... नाटकातील संवाद हे केवळ संवाद नाहीत ते शब्द मी पहिल्यांदा बोलत असल्याचे मला जाणवू लागले... विशेष म्हणजे ज्योतिबा फुलेंचे चरित्र performe करत असताना सम्पूर्ण शरीरामध्ये अचानक मुंग्या आल्यात आणि मी  संवाद बोलत आहे ते संवाद माझ्या मुखातून आपोआप येत आहेत... मला एका क्षणात जाणवले... मी आता नाटक सादर नाही करत आहे... मी स्टेज वर आहे पण, स्टेज वर नाही मी त्या पुण्यातील फुले वाड्यात आहे आणि संवाद बोलत असताना माझ्यासमोर सावित्रीबाई आहेत आणि मी त्यांना शिकवत आहे... खूप अदभूत हा अनुभव मला जाणवला ... त्या सीन नंतर मी विंगेत आलो काही क्षणासाठी मी विसरून गेलो. आता नक्की काय सीन आहे... ? आणि कोणता सीन आहे...? थोडा वेळ स्वतः ला सावरलं आणि नाटकावर फोकस केलं...मला पुढे काय सीन आहे हे आठवत नव्हते... परंतु, योग्य वेळी ,योग्य संवाद , ढोल वाजवत असताना ते अगदी सहज येत होते... 

नाटक लोक- शास्त्र सावित्री चा पुण्यातील प्रयोग हा केवळ माझ्यासाठी प्रयोग नव्हता तर, एक कलाकार आणि व्यक्ती यांना एका वैचारिक उंचीवर घेऊन जाणारा आहे...

:- तुषार म्हस्के

आता ,

रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक  " लोक-शास्त्र सावित्री " चा प्रयोग 
28 मे 2022 रोजी , सकाळी 11:30 वाजता .
श्री. शिवाजी नाट्य मंदिर, दादर येथे प्रस्तुत होणार आहे..

Thursday, 24 March 2022

On World Theatre Day 27th March, at 11.30 AM Manjul Bhardwaj’s play ‘Lok –Shastra Savitri’ will be performed at Savitribai Phule Natayagruh, Dombivali !

Manjul Bhardwaj’s play ‘Lok –Shastra Savitri’ – is a process of self & collective interrogation leading to emancipation! – Dr Putul Sathe 

I choose to call this dialogue as Savitri and Me. I also acknowledge my thanks to Kusum Tripathi well known feminist & writer for introducing me to the play. So when I was told by Kusum that a play titled ‘Lok –Shastra Savitri’ was to be performed at Gadkari in Thane, on March 6, 2022, I eagerly looked forward to the experience of watching the play. I did not pay close attention to the title of the play and presumed that this play would add to my existing repertoire on anti-caste readings. However, once inside the auditorium, when the Director initiated the dialogue, a dialogue which would continue even after I left the auditorium. The introductory remarks challenged the concept of a well made play and professional theatre and thus broke the fourth wall. The stage was “ the minds of the audience” and the minds of the audience was the patriarchal society marked by gender inequality. The stage for the Savitribai Phule was caste-ridden colonial society and the Phules, the first anti-caste intellectuals challenged Brahminical patriarchy. The broad sweeping vision of Phules has been invoked in the play and the epithet ‘Lok Shastra’ resonated with Phule’s rejection of the Divine Truth or the revealed truth. The play invokes and celebrates the critical oppositional consciousness and therefore ‘Shastra’,  was now the philosophy of Humanism and was to be produced by ‘Lok’, the common human being- Savitri. 

The play therefore initiates a dialogue with the audience to create a new vocabulary to understand the legacy of Savitribai Phule, the anti-caste feminist. The play does not indulge in deification of Savitribai Phule and therefore what unfolds before the audience is a dialogue in liberatory politics. The task is daunting and three women characters are the working class woman, the urban middle class professional woman and the actress, who defies any class and caste identification. It is interesting that none of the characters have any name and therefore are representative of certain gender role embedded in certain social, cultural and economic location. The working class woman and the urban middle class professional woman portray the manner in which patriarchy collides with class to create a particular gender regime. Here we come across certain stereotyping which is disturbing. Alcoholism is not confined to working class only, nor is domestic violence. The exploitative relationship between the two women has been camouflaged by how gender based subordination is maintained today. The character of the actress is above gender politics and point to a culture of androgyny, where masculinity and femininity have to be dismantled as oppressive structures. However gender ideology is redefined by globalization and growing fundamentalism. What would Savitri say to Natasha Narwal or the women protesting at Shaheen Bagh? 

  Manjul’s Theatre of Relevance has defined theatre as the site of liberatory politics. Gender inequality is part of larger canvas and therefore the process of interrogation is the beginning of emancipation.

...

Tuesday, 2 November 2021

मराठी रंगभूमी दिनानिमित्त,आम्ही मराठी रंगभूमीच्या वैचारिक प्रगतिशीलतेची प्रतिबद्धता साजरी करीत आहोत, नाटक "लोक-शास्त्र सावित्री" नाटकाने ! - थिएटर ऑफ रेलेवन्स रंगकर्मी

मराठी रंगभूमी दिनानिमित्त,आम्ही मराठी रंगभूमीच्या वैचारिक प्रगतिशीलतेची प्रतिबद्धता साजरी करीत आहोत, नाटक "लोक-शास्त्र सावित्री" नाटकाने ! - थिएटर ऑफ रेलेवन्स रंगकर्मी

मराठी रंगभूमी दिनानिमित्त                          
- माणुसकी
रा - रंग
ठी- ठेव
माणुसकीच्या रंगाची
ठेव आहे मराठी !
मर्म रहस्यांनी नटलेली
ठेव आहे मराठी !
ममत्वच्या रसाने उमटलेली
संस्कृती आहे मराठी !
रंग म्हणजे विचार
विचारांचा इंद्रधनुष आहे रंगभूमी !
माणसांमध्ये रंगाची उधळण करते रंगभूमी
माणसाला माणूस म्हणून घडवते रंगभूमी !
- मंजुल भारद्वाज

178 वर्षे पूर्ण झाली आहेत मराठी रंगभूमीच्या वाटचालीला, तरीही मराठी रंगभूमीच्या वैचारिक प्रगतीशीलतेची प्रतिबद्धता कुठे आहे ? जी रंगभूमी कधीकाळी आपल्या कलात्मक प्रगतीशिलतेतुन संपूर्ण देशाला सार्थक रंगकर्मासाठी प्रेरित करीत होती, त्याच रंगभूमीवर आज "वैचारिक नाटक चालत नाही" हे सावट का पसरले ?  रंगकर्मींनी हे समजून घेणे आवश्यक आहे की रंगकर्माची भूमिका ही समाजमनाची मशागत करण्याची आहे, त्यांच्यात मनुष्य असण्याची चेतना पेटवण्याची आहे. ना की समाजाच्या प्रश्नांपासून पळवाट काढण्याची !

पशु पासून माणसाला वेगळं करते ती त्याची वैचारिक क्षमता. म्हणूनच "वैचारिक नाटक चालत नाही !" या भ्रमाला हा नाट्य सिद्धांत आपल्या अनेक प्रस्तुतीतून गेले 29 वर्ष खोडत आला आहे. सातत्याने रंगभूमीवर विचारांचे नाटक प्रस्तुत करून प्रेक्षकांना माणूस म्हणून सृजित करणे आवश्यक आहे. इथे रंगचिंतक मंजुल भारद्वाज म्हणतात "विचार करण्याची क्षमता माणसांना जनावरांपासून वेगळी करते. जी लोकं हे म्हणतात की वैचारिक नाटक चालत नाही ते प्रेक्षकांना काय समजतात ?" दिवसभर कामाच्या रगाड्यातून बाहेर पडल्यावर परत वैचारिक नाटक बघण्यास कंटाळा येतो असे म्हणत प्रेक्षकांच्या वैचारिक चेतनेला नाकारणे समाजाला चेतनाहीन बनवणे आहे. प्रेक्षकांना विचारांनी मिळालेले आत्मिक समाधान त्यांच्या रोजच्या आयुष्यात एक नवचैतन्य भरते. आणि आयुष्य कंटाळवाणे न राहता जगण्याची नवदृष्टी प्रदान करते.  नाटक म्हणजे क्षणिक आनंद नाही तर आयुष्यभराची सात्विक ठेव आहे. माणसाला माणूस बनवते ती कला. कला जी प्रत्येक मानसिकता, सीमा तोडून मानवाला उंच भरारी देते.

    या मराठी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीचे वारसदार म्हणून आम्ही रंगभूमीला जिवंत ठेवण्यासाठी लॉकडाऊन च्या काळातही दोन नवीन नाटक मराठी रंगभूमीला दिले आहेत ते म्हणजे संविधानाचे मूल्य वाचवण्यासाठी धनंजय कुमार लिखित आणि मंजुल भारद्वाज अभिनित व दिग्दर्शित नाटक "सम्राट अशोक" आणि स्वतःतील सृजनकाराचा शोध घेण्यासाठी , सावित्रीच्या विचाराला घेऊन माणूस म्हणून अस्तित्व घडवणारे आणि  गाजवणारे मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक "लोक-शास्त्र सावित्री" !

    कलेची नुमाईश - म्हणजे केवळ कलेचे प्रदर्शन करणे. रंगकर्माला केवळ प्रदर्शनाच्या साच्यात बसवल्याने, रंगकर्माची व्यापकता , त्याचा प्रभाव आणि प्रगतिशील प्रवाहाच्या कक्षा अरुंद होतात.  
 समाजाच्या उन्नतीसाठी रंगभूमीला प्रस्थापित दुराग्रह मोडुन काढणे आवश्यक आहे आणि आम्ही मागील 29 वर्षांपासून सातत्याने रंगभूमीला पुनरुज्जीवन देत आहोत.
या संकटकाळात जिथे अखंड समाज, अखंड विश्व थांबले होते तिथे "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य सिद्धांताच्या रंगकर्मींनी  आपल्या रंगभूमीला श्वास दिला, प्राण दिला आहे !

      बाजारावादी मानसिकतेत अडकलेला समाज खरेदी आणि विक्रीच्या पलीकडे जात नाही तिथे आम्ही रंगकर्मी केवळ "नफा कमावण्यासाठी नाटक नव्हे तर माणुसकीची दृष्टी जागवण्यासाठी नाटक" या दृष्टी स्पष्टतेने रंगकर्म करत आहोत.
नाटक म्हणजे चेतना , विवेक आणि विचार पेटवणे. रंगभूमीला घडवणारे आम्ही प्रतिबद्ध रंगकर्मी रंगभूमीला घडवण्यासाठी रंगकर्माच्या तत्वाला जगतो, आणि ते म्हणजे कलेच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून समाजाला एक रचनात्मक दिशा देत माणसाला माणूस म्हणून जगण्यास उत्प्रेरीत करणे. मूर्च्छित झालेल्या समाजाला विचारांनी जिवंत करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत.

संवाद म्हणजे आपल्या मतांचे, विचारांचे केलेले प्रवाही चिंतन. मग ते आत्म संवाद असू दे किंवा दोन स्वतंत्र व्यक्तीं मधील संवाद असू दे. संवादाचे अनन्य साधारण महत्व आपल्या जीवनात आहे. पण आजच्या या काळात अनेक संवाद माध्यम असूनही संवाद हरवत चालला आहे. संवाद म्हणजे केवळ शब्द बोलणे नाही तर संवाद एक अनुभूती आहे. आणि म्हणूनच "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य सिद्धांताच्या रंगकर्मींची ताकद आहे कलात्मक "रंग संवाद". नाटकाच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संवाद करत नाटकाच्या व्याप्तीची आणि रंगभूमीच्या स्पर्शाची जाणीव आम्ही करून देत आहोत. आज समाज संवादहीन झालेला आहे, वाद - विवादात अडकलेला आहे, तिथे आम्ही रंगकर्मी आपल्या कलात्मक पुढाकाराने प्रत्येक प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना या कलात्मक रंगआंदोलनात सामील करत आहोत, त्यांची सहभागीता सुनिश्चित करत त्यांना प्रक्रियेशी जोडत आहोत. आपल्या रंगभूमीसाठी वैचारिक नाटकांना पाठिंबा देणारे प्रेक्षक निर्माण करत आहोत !

आम्ही "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी मराठी रंगभूमीच्या वैचारिक प्रगतिशीलतेची प्रतिबद्धता साजरी करीत आहोत. रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित  "लोक-शास्त्र सावित्री" नाटकाच्या प्रस्तुतीने!
मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने नाटक "लोक-शास्त्र सावित्री " 7 नोव्हेंबर 2021,रविवारी, सकाळी 11.30 वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली येथे प्रस्तुत होणार आहे.