रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक लोक-शास्त्र सावित्री
माझ्यासाठी प्रेरणा आहे. घर- परिवारामध्ये एक नवीन ओळख निर्माण करत आहे. नाटक सादरीकरण प्रस्तुति एक भाग आहे. त्यापलीकडे नाटकाच्या प्रयोगासाठी परिवाराचा पुढाकार हा तेवढाच महत्वाचा आहे. " थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताची " ही प्रक्रिया घर परिवाराला एकत्र जोडणारी आहे. त्यामुळे, नाती केवळ भावनिक राहत नाही तर नात्यामध्ये एक वैचारिक स्पष्टता निर्माण होते. नाटक केवळ मनोरंजनासाठी राहत नाही . नाटक हे जीवनाला दृष्टी देणारे होऊन जाते. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधील दरी संपते आणि प्रेक्षक हे नाटकासाठी आपली भूमिका बजावू लागतात.
लोक- शास्त्र सावित्री नाटकाचा प्रयोग हा पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिर ला 29 एप्रिल 2022 रोजी , सायंकाळी 5:30 वाजता प्रस्तुत झाला . नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी, नाटक पुणे येथे प्रस्तुत होणार होत... थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताची मूळ प्रक्रिया आहे प्रेक्षक संवाद ... 14 ते 18 एप्रिल 2022 ला थिएटर ऑफ रेलेवन्स ची कार्यशाळा सुरू होणार होती. त्या नियोजनामध्ये संवाद करत असताना 29 तारखेला प्रयोग सुनिश्चित झाला.
सकाळी 7 ते दुपारी 1 मध्ये निळू फुले कला अकादमी मध्ये कार्यशाळा असायची त्यानंतर आम्ही प्रेक्षक संवाद करायचो. परिवार आणि कुटुंबासाठी स्वाती चा एक पुढाकार मला आणि टीम ला खूप आवडला.. तिने नाटक संपूर्ण फॅमिली ला म्हणजेच, तिच्या मामाकडच्या परिवाराला दाखवण्याचे ठरवले. हा पुढाकार म्हणजे मोठं पाऊल होतं... परिवाराला वैचारिक पातळीवर एकत्र जोडण्याचं... याच पुढाकाराला प्रतिसाद म्हणून स्वाती च्या मामी ने घेतलेला पुढाकार हा तेवढाच महत्वाचा होता. थिएटर ऑफ रेलेवन्स च्या संपूर्ण टीम ला घरी येऊन जेवणाचं दिलेलं निमंत्रण माझ्या साठी खूप महत्वाचे होते... यावेळी, प्रेक्षक संवाद प्रक्रियेला सुरुवात माझ्याकडून झाली याचं एक वेगळचं समाधान मला जाणवत होते... माझ्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी फोन करून त्यांना भेटण्याचे नियोजन करत होतो...
पुण्यात असणारी ओळखीची माणसे मला त्याबद्दल चांगलाच रिस्पॉन्स देत होते... यामध्ये , मला एक क्षण जो मी माझ्या हृदयात कोरुन ठेवला आहे तो म्हणजे, माझी टीम लीडर अश्विनी ताई बोललेली यावेळी, पुण्यामध्ये प्रेक्षक संवादाची सुरुवात तुषार ने केली... खूप छान आणि प्रेरणादायी वाटले... चंद्राचा पडलेला प्रकाश आणि पुण्यामध्ये सरकारी गेस्ट हाऊसच्या गच्चीवर आम्ही टीम म्हणून संपूर्ण दिवसाची शेअरिंग करत असताना असलेला हा क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता..त्यावेळची मिळालेली ऊर्जा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली...
प्रेक्षक संवाद करत असताना नव - नवीन संकल्पना घेऊन पुण्यात उतरलो होतो. स्वातीच्या मामी चा पहिला पुढाकार सर्व टीम ला जेवायला बोलावणं... त्याच बरोबर त्यावेळच्या पुढाकाराला मंजुल सरांनी दिलेली दृष्टी मामी मध्ये असणारे नेतृत्व गुण आणि सर्वांना एकत्र आणणारा स्वभाव... महत्वाचा होता...नाटकाच्या प्रकियेसाठी आम्ही पुण्यातील प्रत्येक व्यक्तीला भेटत होतो... संवाद करत होतो..मला जाणवत होते... आपल्याला पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतीबा फुले यांच्या विचारांना पुण्यामध्ये पुन्हा जागृत करायचं आहे... त्यानुसार, प्रत्येक व्यक्तीला त्या विचारांबरोबर जोडत होतो...
स्वातीचे आजोबा साधारणतः 75 ते 80 वय असेल परंतु, नवीन विचारांना समजून घेणारे आणि प्रक्रियेला पुढे घेऊन जाणारे जाणवले... संकल्पना सांगितल्या नंतर त्या संकल्पनेला कसं करता येईल त्यासाठी , त्यांची होत असणारी धावपळ त्यासाठी , एवढं वय असतानाही त्यांचा असणारा पुढाकार खूप मोलाचा आहे माझ्यासाठी..प्रेक्षक संवाद करायला जात असताना कोणाला कधी , केव्हा भेटायचं यांविषयी असणारा त्यांचा अनुभव हा जबरदस्त जाणवला...
पुण्यामध्ये संवाद करत असताना येत असणारा अनुभव हा खूप मोलाचा होता... नाटकाची संकल्पना आणि थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताची प्रक्रिया एका नगरसेवकांना सांगितल्या नंतर प्रेक्षक म्हणून त्यांनी त्यांच्या विभागात नाटकाचे बॅनर लावले ... आणि त्यांचं वाक्य " तुम्ही हे करत आहात ते कार्य आम्हांला करायला हवं ते तुमच्या कडून होतंय त्याबद्दल आमच्याकडून ह्या सदिच्छा ! प्रत्येक माणसापर्यंत कशा पद्धतीने पोहचता येईल...? आणि नाटक कसं पोहोचेल यासाठी प्रेक्षक स्वतः हुन पुढाकार घेत असताना दिसू लागले होते... स्वातीचे आजोबा हे त्यांच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नाटकाविषयी सांगत होते... " आमचे नात जावई ह्या नाटकात आहेत , आणि बरं का ते सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंच्या विचाराला घेऊन नाटक करत आहेत, अशा विचारांसाठी कमी लोक काम करतात .." आपल्याला ह्या कार्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे...ही भूमिका मनाला खूप भावणारी होती...
कोरोना काळानंतर दुसरा फेज संपल्यानंतर एक उदासीनता निर्माण झालेली होती... माणसा - माणसांमध्ये असणारे माणुसकीचे धागे हे कमकुवत झालेले..नैराश्य निर्माण झालेलं .... अशा वातावरणात नाटक लोक- शास्त्र सावित्रीचा प्रयोग पुण्यामध्ये होणारा हा प्रयोग म्हणजे पुणेकरांसाठी जीवन जगण्यासाठी असणारा आशेचा किरण जणू जाणवू लागला...
दुसरा महत्वाचा पुढाकार म्हणजे माझ्या मामाच्या लहान मुलीचा अक्षया चा नाटकाची संकल्पना आणि नाटकाची तारीख सांगितल्यानंतर तीने सम्पूर्ण तिच्या परिवाराला नाटक दाखवण्याचा केलेला निर्धार हा खूप महत्वाचा होता... त्यामुळे, स्वातीच्या आणि माझ्या मामा कडील परिवार हे नाटकाच्या निमित्ताने एकत्र समोरासमोर आले होते... तेही सकारात्मक पुढाकरासाठी ...
नाटकाची प्रस्तुति झाल्यानंतर परिवाराचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदललेला होता... एक वेगळीच ऊर्जा आणि वलय आणि वाढलेली वैचारिक उंची मला माझ्या आत जाणवत होती... यावेळी, रंगभूमीवर कलाकार म्हणून माझी भूमिका जगत असताना मला जाणवले... प्रत्येक भूमिका ही माझ्या अंतकरणातून येत आहे... नाटकातील संवाद हे केवळ संवाद नाहीत ते शब्द मी पहिल्यांदा बोलत असल्याचे मला जाणवू लागले... विशेष म्हणजे ज्योतिबा फुलेंचे चरित्र performe करत असताना सम्पूर्ण शरीरामध्ये अचानक मुंग्या आल्यात आणि मी संवाद बोलत आहे ते संवाद माझ्या मुखातून आपोआप येत आहेत... मला एका क्षणात जाणवले... मी आता नाटक सादर नाही करत आहे... मी स्टेज वर आहे पण, स्टेज वर नाही मी त्या पुण्यातील फुले वाड्यात आहे आणि संवाद बोलत असताना माझ्यासमोर सावित्रीबाई आहेत आणि मी त्यांना शिकवत आहे... खूप अदभूत हा अनुभव मला जाणवला ... त्या सीन नंतर मी विंगेत आलो काही क्षणासाठी मी विसरून गेलो. आता नक्की काय सीन आहे... ? आणि कोणता सीन आहे...? थोडा वेळ स्वतः ला सावरलं आणि नाटकावर फोकस केलं...मला पुढे काय सीन आहे हे आठवत नव्हते... परंतु, योग्य वेळी ,योग्य संवाद , ढोल वाजवत असताना ते अगदी सहज येत होते...
नाटक लोक- शास्त्र सावित्री चा पुण्यातील प्रयोग हा केवळ माझ्यासाठी प्रयोग नव्हता तर, एक कलाकार आणि व्यक्ती यांना एका वैचारिक उंचीवर घेऊन जाणारा आहे...
:- तुषार म्हस्के
आता ,
रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक " लोक-शास्त्र सावित्री " चा प्रयोग
28 मे 2022 रोजी , सकाळी 11:30 वाजता .
श्री. शिवाजी नाट्य मंदिर, दादर येथे प्रस्तुत होणार आहे..
No comments:
Post a Comment