Sunday, 23 December 2018

" सरकारचा दुटप्पीपणा ...तुषार म्हस्के "

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब जरा विचार करा ..” शेतकऱ्यांनी ऊस लावू नका, साखरेचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. ती आणखी जास्त झाली तर ती समुद्रात टाकण्याशिवाय पर्याय उरणार नाही असे सांगली येथे बोलताना केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान ह्या देशात साखर जास्त झाल्यामुळे पाकिस्तानने साखर भारतात निर्यात केली . पण, आपल्या भारतात असणार प्रकरण उलट आहे. इथे उत्पन्न झाल्यावर शेतकऱ्यांना उत्पन्न बदलण्याचा सल्ला  आपण देतात.

एका बाजूला हिंदू राष्ट्रवाद , दुसऱ्या बाजूला पाकिस्तान हा दुश्मन आणि मागून हात मिळवणी. चांगल आहे जनता आपली मुर्खासारखी राष्ट्रभक्ती च्या नावाखाली एकमेकांच्या मानेवर सुरी आणि चाकू ठेवते.



साखरेच प्रमाण जास्त होणारच ना !  गडकरी साहेब कारण  , केंद्र सरकारने जास्त प्रमाणात साखर पाकिस्तान हून मागवली आहे. म्हणजे बळीराजाच्या हक्काच्या नावाने अनेक योजना आणायच्या दुसऱ्या बाजूला शेतकऱ्याच पिक व्यवस्थित झाल्यावर बाहेरच्या देशातून भारतात माल मागवायचा म्हणजे शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हामि भाव कसा मिळेल. पिक चांगल येत नाही म्हणून मारामार आणि पिक चांगलं झाल्यावर सरकारचा मार .

साखरेचा साठा मोठ्या प्रमाणात झाला हि , काही शेतकऱ्यांची चूक नाही  . ह्यावेळी , शक्य होत साखरेला योग्य भाव मिळेल.केंद्र सरकारने साखर  पाकिस्तानातून आणण्याची गरज नव्हती. सर्जिकल स्ट्राईक चा वर्धापन साजरे करणारे सरकार पुन्हा पाकिस्तानातून साखर निर्यात करते. जनतेची राष्ट्रवादाच्या नावाखाली दिशाभूल करायची आणि मित्रता शासनाने जोपासायची.

दिनांक २३ डिसेम्बर, २०१८ ला सांगली येथे झालेल्या नितीन गडकरी यांच्या भाषणात आलेला साखरे बाबत विषय हा न पटणारा वाटतो . कारण ,  शासनाची जबाबदारी आहे भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण. इथे , भूमिपुत्र राहतात बाजूला आणि सल्ले मिळतात कारण नसताना ....

रंगकर्मी 
तुषार म्हस्के

Tuesday, 18 December 2018

आयुष्यात जगलेल्या क्षणांना पुन्हा त्यांच्यातील सूत्र शोधण्याची दृष्टी थिएटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांताने मला दिली.. तुषार म्हस्के

                                         

मी माझ्या guts  फीलिंग ला घेऊन स्वतः च अस्तित्व निर्माण करण्याचा प्रश्न   माझ्या डोळ्यासमोर आणला.. जगावेगळं जगण्याचा विचार करणारे कमी असतात .. अशा ह्या खडतर वाटेवर चालण्याचा निर्णय मी  घेतला. माहिती नव्हतं रस्ता काय आहे? हा रस्ता मला कुठे घेऊन जाणार आहे . काय होणार आहे माझ्या सोबत ... काहीच नव्हतं माहित मला त्या क्षणी ...
नाही .. मला जगायचं आहे .. मला माझे अस्तित्व निर्माण करायचं आहे... माझी ओळख मला बनवायची आहे...खानदानात कोणी केलं नाही ते काम मला करायचं आहे... माझं व्यक्तिमत्व मला निर्माण करायचं आहे. काय होतं त्यावेळी माझ्याकडे , जिद्द ? हो  फक्त आणि फक्त जिद्द !!!... तो madness
वेड्या सारखा स्वतःचा शोध घेण्याची सुरवात झाली... बेधुंद काम करत असताना ... एवढंच माहित होत... रंगकर्म मला येत नाही... ह्याचा अर्थ मला ते आयुष्यभर तसेच न येत असल्याचा शिक्का तर लावायचा नाही... मला उठायचं आहे. मला करायचं आहे . मला शोधायचं आहे...मला माझं अस्तित्व निर्माण करायचं आहे..
प्रस्थपित सत्तेला आवाहन देत ...स्वतःच्या आत असणाऱ्या रंगांना शोधण्यात माझं ध्येय माझ्या डोळ्यासमोर येऊन उभे राहिले...
" हो मी मान्य करतो मला काहीच येत नव्हतं ... रंगमंचाची ओळख मला काहीच माहित नव्हतं...



ती रात्र आठवते... त्या रात्री मी गहिवरलेल्या डोळ्यांनी  मंचावर प्रवेश केला ...माझ्या कानावर आवाज येऊन पडला " स्वागतम , सुस्वागतम .... या विश्वाच्या रंगमंचावर तुझं स्वागत आहे... अरे , वेड्या बघतोस काय .. चल पाऊल टाक पुढे ... डोळ्यातून एक - एक थेंब पाणी पडत होते... पुन्हा आवाज येऊ लागला  मी इकडे - तिकडे पाहू लागलो.. अरे, वेड्या इकडे - तिकडे पाहतोस काय... हा रंगमंच तुझं स्वागत करतोय " काय होता तो आवाज ... कोणाचा होता तो आवाज ... जो माझ्यातील कलाकाराचं स्थायी अस्तित्व टिकवून ठेवतोय ...जो सतत मला निष्क्रिय क्षणाची जाणीव करून देतोय. जो तेवत ठेवतोय ज्योत माझ्यातील कलेची ,  माझ्या अस्तित्वाची !!! हो , मी शोधतोय माझ्यातील ... कलागुण ... माझ्यातील साधना ... ज्या साधनेने माझ्यातील व्यक्ती आणि कलाकार ह्या दोघांना निर्माण केले.. प्रेरणेंच्या झोतात निर्माण केलेल्या माझ्यातील विचारांना ... Decode करतोय माझी लाईफ जी मी जगलेलो... शोधतोय ते सूत्र ज्या सूत्रांनी माझ्यातील अस्तित्व निर्माण केलेलं...
आयुष्यात जगलेल्या क्षणांना पुन्हा त्यांच्यातील सूत्र शोधण्याची दृष्टी थिएटर ऑफ  रेलेवंस नाट्य सिद्धांताने मला दिली..




दिनांक 15 ते 17 डिसेंम्बर ,2018
युसूफ मेहरअली सेंटर, पनवेल
उत्प्रेरक :- मंजुल भारद्वाज

तुषार म्हस्के

Monday, 3 December 2018

रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य तत्वज्ञानाने मराठी रंगभूमीवर वैचारिक मूल्यांचा रचला पाया!
- योगिनी चौक


मराठी रंगभूमीवर विविध नवनवीन प्रयोग सातत्याने होत असताना 'वैचारिक मूल्य' रुजवणारी व्यावसायिक नाटके असावीत हे स्वप्न मी चार वर्षांपूर्वी पाहिले... 



मी व्यावसायिक नाटकांत काम करत असताना आजूबाजूलाकॉमेडी नाटकेच चालतात”, “फेस व्हॅल्यू असणारे कलाकारच हवेत”, “वैचारिक वगैरे ते प्रायोगिक वाले बघून घेतील, आपण धंदा पाहावाअशा विचारसरणीचे वातावरण दिसले. नाटकांचे विषय देखील बहुतांशी नवरा, बायको, लग्न, दारू... याच विषयांभोवती फिरत होते, नाटकांत, प्रामुख्याने व्यावसायिक पातळीवर वैचारिक दर्जा कसा निर्माण करता येईल आणि तो टिकून कसा राहिल या विचारातूनच मराठी रंगभूमी वर रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित "अनहद नाद - Unheard Sounds Of Universe" हे बहुभाषिक नाटक आले आणि गेल्या साडे तीन वर्षांपासून सतत या नाटकाचे प्रयोग होत आहेत.


सतत साडे तीन वर्षे सातत्याने मराठी व्यावसायिक रंगभूमीवर वैचारिक नाटकांचे प्रयोग करून मराठी रंगभूमी वरील पाच प्रतिबद्ध युवा कलाकारांनी हे शिवधनुष्य कोणत्याही निर्मात्याची मदत घेता किंवा कोणतीही सरकारी वा निमसरकारी ग्रांट घेता, कुठलीही स्पॉन्सरशीप स्वीकारता केवळ जनसहयोगाने नाट्य प्रयोग सुरु ठेऊन कला उद्योजकतेचा नवा पाया रचला आहे.



थिएटर ऑफ रेलवन्स या नाट्य तत्वाला 25 वर्षे पूर्ण झाल्या निमित्ताने रंगचिंतक मंजुळ भारद्वाज लिखित दिग्दर्शित नाटकांचा नाट्य महोत्सव संपूर्ण वर्षभर उत्सव स्वरूपात साजरा करण्यात आला. देशाची राजधानी दिल्ली पासून सुरू झालेला हा नाट्य महोत्सव आर्थिक राजधानी मुंबई ते ठाणे व्हाया पनवेल सांस्कृतिक राजधानी पुणे असा प्रवास करत सुरू आहे.
सगळ्यात महत्वाचे म्हणजे नुसतं एखाद दुसरा प्रयोग करून ही नाटके थांबली नाहीत तर सतत सातत्याने या क्लासिक नाटकांचे प्रयोग होत आहेत आणि नुसते प्रयोगच नाही तर नाट्य महोत्सव साजरे होत आहेत

पूर्वी होत असलेल्या आणि आता लोप पावत चाललेल्या वेळेचा सदुपयोग ही या महोत्सवाच्या काळात करण्यात आला तो म्हणजे मुंबई तील दादर शिवाजी मंदिर येथील नाट्य महोत्सवात तिन्ही दिवस लागोपाठ सकाळी 11वाजता नाट्य प्रयोग सादर झाले आणि ते देखील शनिवार रविवार नसताना मधल्या दिवसांत! आणि या महोत्सवात तिन्ही दिवस प्रेक्षक उपस्थित होते

वेळ सकाळची असो, दुपारची असो वा प्राईम टाइम प्रत्येक स्लॉट वापरून पाहिला आणि उत्तम वैचारिक नाटक पाहण्यासाठी कोणताहीस्लॉटमहत्वाचा नसूनविचारमहत्वाचा आणि तो ऐकण्यासाठी सकाळी 7 च्या प्रयोगाला ही वेळेवर हजर राहणारे प्रतिबद्ध प्रेक्षक आम्हांला लाभले.




नाटकाचा प्रयोग संपल्यानंतर प्रेक्षक संवाद या प्रक्रियेत असताना प्रेक्षक व्यक्त होत की, “ही नाटके म्हणजे वैचारिक औषध आहे.” आणि औषध घ्यायला आपण मेडिकल मध्ये जसे रात्री 2 वाजता ही जातो तसे हे वैचारिक औषध सकाळच्या प्रयोगातून घेतल्यास दिवसभर त्या विचाराचे मनन होत राहते दुसऱ्या दिवशी त्या विचारला पुढे नेणारी श्रुंखला अनुभवायास मिळते. अशा प्रकारे हा तीन दिवसीयवैचारिक नाट्य डोसमाणूस म्हणून जगण्याचे विचार पेरण्यास प्रतिबद्ध असतो. “ही नाटके काळाची गरज आहे ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहेअसेही मत एकमताने समोर आले.
दिल्ली, मुंबई आणि पुणे येथील महत्वाच्या व्यावसायिक नाट्यगृहात थियेटर ऑफ रेलेवन्स या नाट्य तत्वावर आधारित तीन दिवसीय नाट्य महोत्सवात लागोपाठ तीन वैचारिक आणि क्लासिक नाटकांचे प्रयोग झाले

गर्भ, अनहद नाद आणि न्याय के भंवर में भंवरी!

1. आजच्या यांत्रिकीकरणाच्या युगात मनुष्य रुपी देहांत 'माणुसकीला' शोधणारे नाटकगर्भ

2. खरेदी आणि विक्री च्या काळात कलाकारांना वस्तुकरणातून उन्मुक्त करणारे नाटक
अनहद नाद – Unheard Sounds of Universe”
आणि 
)अर्ध्या लोकसंख्येचा आवाज. पितृसत्तात्मक व्यवस्थेच्या शोषणा विरुद्ध हुंकार, न्याय आणि समतेची गाज, नाटक आहे, “न्याय के भंवर में भंवरी”!

या कलात्मक मिशनाला आपल्या कलेने मंचावर साकार करणारे कलाकार आहेत अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, बेट्सी एंड्रयूज आणि बबली रावत!
या प्रतिबद्ध युवा कलाकारांनी मराठी रंगभूमीवर वैचारिक नाटकांची नवी मुहूर्तमेढ रचली आणि त्याचे प्रयोग संवाद आणि कला उद्योजकतेच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहचवले. प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संवाद करून त्यांना नाट्य संकल्पनेची पूर्वकल्पना दिल्याने प्रेक्षकांना पुन्हा नाटकाकडे आणि ते ही वैचारिक नाटकांकडे वळवण्यास आम्ही यशस्वी झालो आणि प्रेक्षक संवादातुन प्रेक्षकांची नाटक पाहण्याची आवड़ काय? त्यांना कशा पद्धतीचे नाटक पाहण्यात interest आहे हा एक प्रकारे सर्वे झाला आणि त्यात वैचारिक नाटक पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुकच नाही तर तिकिट घेऊन पाहायला तयार आहेत हे प्रेक्षकांनीच दाखवुन दिले आणि हजेरी लावली!
या नाट्य महोत्सवला सामान्य प्रेक्षकांपासून ते जाणकारां पर्यंत अनेक मान्यवरांनी हजेरी लावली .


९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झालेले ज्येष्ठ नाटककार आणि लेखक प्रेमानंद गज्वी हे थिएटर ऑफ रेलवन्स च्या कलात्मक नाट्य महोत्सवाचे कौतूक करताना लिहितात, “तीन दिवस मी अनुभवले सर्वांग सुंदर अनुभव, माणूस म्हणून उन्नत झालो, माणूस म्हणून माझी कर्तव्य काय याचं बोधीज्ञान, knowledge मला मिळालं आणि हाच तर कलेचा हेतू!”
कला ही केवळ मनोरंजना इतकीच मर्यादित पाहता मनोरंजन ते परिवर्तन असा प्रवास थिएटर ऑफ रेलवन्स तत्वज्ञानावर आधारित मंजुळ भारद्वाज लिखित नाटके करत असतात आणि कोणत्याही राजाश्रयावर अवलंबून राहता संवादाच्या माध्यमातून जन सहयोगाने ही नाटके समाजात नवं परिवर्तन घडवून आणत आहेत !