Sunday 7 October 2018

रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांचे " राजगति " हे नाटक माझ्या मनातील अवस्थेचे बोलके स्वरूप वाटले .....विरेंद्र गुल्हाणे



२ ऑक्टोबर २०१८ च्या आधी माझ्या आयुष्यात अनेक वर्षे गांधी जयंती व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंत्या बघितल्या परंतु या वर्षीचा अनुभव काही निराळाच होता . बऱ्याच वर्षापासून समाजात असलेली विषमता याबाबत मनामध्ये बरीच खदखद आहे . " राजगति " हे नाटक या माझ्या मनातील अवस्थेचे बोलके स्वरूप वाटले . मी पन्नास टक्के कर्णबाधित असून सुद्धा ,सर्व रंगकर्मींनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांचा आशय माझ्या पर्यंत पोहचला.


आयुष्यात खुप कमी प्रसंग आले की जिथे मी भावुक झालो . नाट्यगृहातील हे नव्वद मिनिटे त्या प्रसंगामध्ये समाविष्ट झालो. या नव्वद मिनिटाला प्रत्येक क्षण हा अंतर्मुख करणारा होता. मनातील खदखद दृश्यरूपाने समोर दिसत होती. परंतू मार्क्सच्या अर्धवट सिद्धांताप्रमाणे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिली.याबाबत सखोल चिंतनाची व मार्गदर्शनाची गरज मनाला भेडसावू लागली . 
" राजागति " नाटक सादर करण्यामागची आपली भावना व हेतू साध्य झाले पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा !




विरेंद्र गुल्हाणे





No comments:

Post a Comment