Friday 5 October 2018

संविधानिक व्यवस्था निर्माणासाठी राजनैतिक परीदृश्य बदलण्याची चेतना प्रेक्षकांमध्ये जागवते मंजुल भारद्वाज लिखित व दिग्दर्शित नाटक "राजगति" - कुसुम त्रिपाठी (प्रखर नारीवादी आणि सांस्कृतिक आंदोलनांची अध्येता)



2 ऑक्टोबर ला मी शिवाजी नाटय मंदिर दादर येथे, मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक "राजगति" पाहायला गेले.
"थिएटर ऑफ रेलवन्स" रंगदर्शनाचे नाटक "राजगति"
समता..न्याय..मानवता आणि संविधानिक व्यवस्था निर्माणासाठी राजनैतिक परीदृश्य बदलण्याची चेतना प्रेक्षकांमध्ये जागवते. 90 मिनिटे हे नाटक प्रेक्षकांना उत्तेजित आणि उद्वेलीत करते. सामान्य माणसाला विचार करण्यास प्रेरित करते. 

नाटक देशातील सामान्य माणसापासून सुरू होते, शेतकरी, विद्यार्थी, कामगार, महिला..सर्व वर्गातील लोकं राजनीतीला वाईट म्हणतात आणि सर्व राजनीती पासून दूर राहण्याची गोष्ट करतात. सामान्य व्यक्ती लोकशाहीचा अर्थच समजून घेत नाही, सामान्य जनतेला ठाऊक नाही त्यांच्या एका मताने सरकार बनते. मंजुल यांनी नाटकात स्वातंत्र्याच्या आधीचा काळ आणि स्वातंत्र्या नंतरची सद्य स्थिती अगदी वाखाणण्याजोगी दर्शवली आहे. मंजुल यांनी चार धारा म्हणजे गांधी, भगत, आंबेडकर आणि कार्ल मार्क्स यांच्या आंदोलनांना दाखवले आहे. देश स्वतंत्र होतो, अहिंसा..शांती...न्याय...समता या आधारांवर आणि संविधानिक व्यवस्थेच्या आधारावर देश पुढे वाटचाल करतो. नंतर 90 च्या दशकात देशात मंडल... कमंडल...व भूमंडल ची राजनीती चालवली जाते.

मुळात देशात रोजगारच नाहीत आणि स्वर्ण वर्णीय युवा समजतात की आरक्षणा मुळे आम्ही बेरोजगार आहोत. या मुद्यावरून दोन समुदायात दंगल होते आणि याच दरम्यान भूमंडलीकरण सरकारी नोकऱ्या कमी करत आहे. गिरण्या - कारखाने बंद केले जात आहेत, शेतकरी विरोधात नीती लागू केल्या जात आहेत. या सगळ्यात दलित समुदाय (राजनीती) विस्कळीत होतो, कम्युनिस्ट पक्षाचे अयशस्वी होणे, जनतेचा मोहभंग... भूमंडलीकरणाच्या नफा आणि नफा यावर आधारित अर्थ व्यवस्थेने उपभोक्तावादी संस्कृतीला जन्म दिला, परिणाम स्वरूप कामगार, शेतकरी यांचे शोषण, 
महिलांवर अत्याचार वाढणे, बलात्कार वाढणे... एका बाजूला महिलांना विश्व सुंदरी बनवायचे तर दुसऱ्या बाजूला 'बेटी बचाव बेटी पढ़ाओ' असा तथाकथित नारा... शेतकऱ्यांची आत्महत्या...सरकार ची हुकूमशाही मनोवृत्ती..लूट-खसोट वर आधारित अर्थतन्त्र...लोकतंत्राचा गळा दाबला जात आहे.
या सगळ्यांमध्ये जनतेला लोकतांत्रिक अधिकाऱ्यांचे सकारात्मक उपयोग करण्याचे मार्गदर्शन केले आहे. 
सगळे कलाकार अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, स्वाति वाघ, हृषिकेश पाटिल, प्रियंका कांबळे, प्रसाद खामकर आणि सचिन गाडेकर यांनी उत्कृष्ट रित्या आपली जबाबदारी निभावली आहे. 
मंजुल भारद्वाज यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन !


कुसुम त्रिपाठी 

(प्रखर नारीवादी आणि सांस्कृतिक आंदोलनांची अध्येता)

No comments:

Post a Comment