Thursday, 4 October 2018

बाबासाहेब फक्त स्मारकापर्यंत मर्यादित नाहीत ...तुषार म्हस्के

माननीय फडणवीस साहेब आपण भाषणात काय बोलत आहात याचं थोडं तरी भान ठेवा ...डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही राज्य , देश गहाण ठेवण्याची गोष्ट केली नाही. आपण तर , बाबासाहेबांच्या स्मारकासाठी राज्य गहाण ठेवण्याची भाषा वापरता ... बाबासाहेब  आंबेडकरांनी कधीही स्वतः ची वाहवा आणि अस्मिता उंचावण्यासाठी राज्य गहाण ठेवण्याची भाषा वापरली नाही... मात्र , आपल्या बोलण्यामध्ये एवढंच दिसत आहे. 


सामान्य जनतेची मन जिंकण्यासाठी आपण आपल्या मनाला वाटेल ते शब्द बोलता ... ज्या व्यक्तीने संविधान सम्मत देश निर्माण करण्यासाठी ... संविधानाची निर्मिती केली ... ते काही राज्य गहाण ठेवून आपले स्मारक बांधण्यासाठी नाही... हो, आम्हांला बाबासाहेब आंबेडकरांचा आदर आहे ... कारण, त्यांना आम्ही विचार मानतो... न्यायसंगत व्यवस्था , संविधान सम्मत व्यवस्था निर्माण करण्यासाठी आंबेडकरांनी काळाला बांधले आणि संविधान देशासाठी दिले ... जन्माच्या संयोगाला आवाहन करून त्यांनी जातीभेद संपवला ...बाबासाहेब फक्त स्मारकापर्यंत मर्यादित नाहीत .. ते प्रत्येक भारतामध्ये राहणाऱ्या व्यक्तीच्या मनात विचारातून जिवन्त राहणे गरजेचे आहे... तुम्ही स्मारक कितीही बनवा त्याच्यात आम्हांला वाद नाही ... फक्त लोकांचे मन आकर्षित करण्यासाठी आपण ज्या शब्दांचा उपयोग करत आहात. ते बाबासाहेब आंबेकरांच्या विचारधारणेच्या विरुद्व आहे... बाबासाहेबांनी गुलामगिरी संपवली आणि प्रत्येक शोषित व्यक्तीला त्याच्या मनात मान ,सन्मान मिळवून दिला ... आपण , पुन्हा महाराष्ट्र्र गहाण ठेवू अशी भाषा वापरता तेही बाबासाहेबांचा नाव घेऊन ते पुन्हा गुलामगिरीत घेऊन जाण्यासारखे आहेत ... 
कोणताही राजकीय नेता ज्याने देशासाठी आपलं जीवन अर्पण केलं . ते केवळ त्यांचे स्मारक निर्माण व्हावेत म्हणून नाही तर समाजामध्ये असणारा भेद संपावा  आणि एक आदर्श समाज आणि व्यवस्था निर्माण व्हावी. त्यामुळे, प्रत्येक ठिकाणी आपली प्रसिद्धी व्हावी म्हणून जे आपण भाषण करत आहात त्याच्यात आम्हांला विरोध नाही . पण, त्या राजकीय चरित्राच्या विचारांच्या विरुद्ध असू नये.  आता याचा जनतेनेही जरा विचार करावा . 
राजकारण , कधीही वाईट नसते ...राजकीय व्यक्ती आपली जबाबदारी आणि विचारधारा यांना विसरून स्वहितासाठी भाषण करून वाहवा  मिळवतात ... आणि राजकारण, त्यात घाण होत जाते . आता , वेळ आली आहे जनतेने राजकीय व्यक्तींना प्रश्न विचारण्याची ... 
जनहितार्थ जारी ... 

तुषार म्हस्के 

No comments:

Post a Comment