थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांताला २५ वर्षे
पूर्ण झाली ...त्या निमित्य मुंबई ला ३ दिवसीय नाट्य फेस्टिवल श्री. शिवाजी मंदिर ,
दादर ला आयोजित करण्यात आले . आता पर्यंत ऐकण्यात आलेलं कलाकार फक्त येऊन आपली कला
सादर करतात आणि आपलं मानधन घेऊन निघून जातात. त्यांचा आयोजनाशी काहीही संबंध नसतो.
थियेटर ऑफ रेलेवंस हे नाट्य सिद्धांत कलाकाराना समग्रतेने काम करण्याची दिशा आणि
मार्ग दाखवते .
“ श्री. शिवाजी मंदिर “ हे नाव ऐकल्यानंतर
...डोळ्यासमोर अनेक वेगवेगळ्या कलाकारांची नावे येतात.
या रंगमंचाने कलाकाराना निर्माण केले . त्यांच्या व्यक्तिगत जीवनात सक्षमतेची पाठराखण
केली. नाव, पैसा , आपली स्वत:ची ओळख ह्याच रंगमंचाने निर्माण करून दिली....ह्याच श्री.
शिवाजी नाट्य मंदिरात थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांत रंगभूमीला “ वैचारिक
“ रंगभूमी बनवण्यासाठी सातत्याने कलात्मक
नाटकांचे प्रयोग करत आहे . नवीन वैचारिक प्रेक्षक वर्ग रंगभूमीला थियेटर ऑफ
रेलेवंस ने दिला आहे. नाटक “ अनहद नाद – unheard sounds of universe “ या मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित
नाटकाने केलेली हि कलात्मक सुरुवात आता रंगभूमीवर येणारी नाटके हे अनहद नाद
नाटकाच्या समांतर असल्याचे दिसून येत आहेत.
थियेटर ऑफ रेलेवंस चे
हे फेस्टिव्हल एक विश्वास आहे कलाकारांसाठी ....कि , हो आम्ही आमच्या कलेच्या जीवावर
आपली कला सादर करण्यासाठी ”अर्थ “ निर्माण करू शकतो. कारण, रंगभूमीवर एक नाटक
ज्यावेळी येते . त्यावेळी त्याला लागणारा खर्च ज्याला प्रोडक्शन कॉस्ट बोलतात ती
जास्त लागते . थियेटर ला लागणारा खर्च आणि इतर लागणारा खर्च यांची किंमत जास्त
असते. या कारणास्तव नाटकाना येणारा खर्च हा अवाक्या बाहेरच असतो ... कलाकारा बद्दल
बोलायचे झाले तर ते फक्त जातात आणि आपली सादरीकरणाची भूमिका बजावून येत असतात. त्यामध्ये
, मग प्रोड्युसर असेल तर तो खर्च करतो आणि नसेल तर मग , नाटक रंगभूमीवर येतच नाही.
आणि जरी नाटक रंगभूमीवर आले तरी त्यामध्ये काम करणारे कलाकार हे ठरलेले असतात. त्यामुळे,
नवीन कलाकार रंगभूमीवर येण हि कठीणच होऊन जाते. मग , नवीन कलाकार आपल्या कलेला
दाबून ठेवून कोणता तरी वेगळा मार्ग स्वीकारतात आणि कलेला हृदयात दाबून ठेवतात. थियेटर
ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांत एकमेव तत्व आहे . जे नवीन कलाकारांना आपल्या commitment च्या जोरावर आपल्या नाटकांमध्ये काम करण्याची
जागा नेहमीच देत आहे . अनहद नाद च्या यात्रे मध्ये पाहिलं तर , मला आलेला अनुभव
आहे ... अनहद नाद च्या प्रवासात जे प्रेक्षक नाटक पाहण्यासाठी आले त्यापैकी ,
काहींनी स्टेज वर येण्याचा अनुभव घेतला आहे. “ अर्थ ” निर्माण करण्यासाठी आपल्या
कलेला जिवंत ठेवण्यासाठी अनहद नाद मध्ये असणारे आम्ही कलाकार सातत्याने स्वबळावर
आणि प्रेक्षकांच्या सहयोगाने सतत नाटकांचे प्रयोग करत आहोत ... जसं अनहद नाद
नाटकाला कोणीही प्रोड्युसर नसताना त्याचे आता पर्यंत आम्ही १३ प्रयोग लावले आहेत ...
थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांतामध्ये प्रेक्षक हा पहिला आणि सशक्त रंगकर्मी
आहे. त्यामुळे, हा रंगकर्मी कलाकारांना जिवंत ठेवण्यासाठी नेहमीच आपल्या
सहकार्याच्या भूमिकेत मी पाहिला आहे ....
थियेटर ऑफ रेलेवंस रंगभूमीच्या
नव्याने कलात्मक निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये ...
थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांताच्या नाटकांमधील संकल्पना प्रेक्षकांना
रंगभूमीच्या जवळ आणत आहे. हा धागा विश्वासाचा आहे कलात्मकतेचा आहे. नवीन विचार आणि
संकल्पनांचा आहे... ज्यामध्ये कलाकार आपल्या कलेसाठी प्रतिबद्ध असतात आणि प्रेक्षक
हे जीवनात आपली भूमिका उन्मुक्त्तेने जगण्यासाठी प्रेरित करत असतात . प्रेक्षकांना
नाटकातील संवाद हे स्वत: बद्दल विचार करण्यासाठी प्रेरणा देतात ... या धावपळीच्या
जगामध्ये ज्या ठिकाणी एकही क्षण शांतता राहिलेली नाही त्याच ठिकाणी आपल्या
अस्तित्वाच्या शोधात ज्यावेळी प्रेक्षक या कलाकृतींना पाहत असतो त्यावेळी मनातील
चलबिचल काही काळ थांबते आणि स्वत: बद्दल विचार करण्याची प्रक्रिया सुरु होते ..
नाटकातील संवाद हे प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्यातील गुंता दाखवतात आणि मग, तो
गुंता सोडवण्यासाठी चे असणारे मार्ग हि, या नाटकांमध्ये अनुभवायला मिळतात.
नाटक गर्भ ची
रंगभूमीवर झालेली प्रस्तुती... ( दिनांक – १५ नोव्हेंबर २०१७ ,सकाळी – ११.०० वा. )
मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक “ गर्भ “ सात्विक विचार ...जीवनाकडे
पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन या नाटकामुळे कलाकार व प्रेक्षकांना अनुभवायला
मिळतो ...श्री. शिवाजी नाट्य मंदिर मध्ये ज्यावेळी गर्भ नाटकाची प्रस्तुती झाली
त्यावेळी वेळ हि सकाळी ११.०० वाजताची होती. एवढ्या सकाळी शिवाजी मंदिर , मध्ये आलेला
प्रेक्षक वर्ग हा वैचारिक असल्याचे जाणवले. कलाकृती पाहून भारावलेला आणि स्वत: च्या
अंतकरणात डोकावून पाहत या कलाकृतीचे वर्णन करत ... त्यांना जीवनात मिळालेले अनुभव
त्या ठिकाणी दिसू लागले... प्रेक्षकांचे आलेला रिस्पोंस – नाटकामध्ये असणाऱ्या
मुद्रा ह्या खूपच वेगळ्या आहेत... मनाला भावणाऱ्या आहेत ...लेखक , दिग्दर्शक –
मंजुल भारद्वाज यांनी शोधून काढलेल्या आहेत ... आता पर्यंत पाहिलेल्या नाटकांमध्ये
कधीही पाहिलेल्या नाहीत ...आणि एकदम मनाला भावणाऱ्या मुद्रा आहेत... नाटकाच वैशिट्य
म्हणजे हे नाटक सादर करणारे कलाकार – अश्विनी नांदेडकर , सायली पावसकर , कोमल
खामकर , योगिनी चौक आणि तुषार म्हस्के अगदी सामान्यता जड वाटणारे शब्द अगदी सहज
सादर करतात... हे नाटक सादर करत असताना मला जाणवले ... कि, ज्यावेळी मी रंगमंचावर
येतोय त्यावेळी मला काहीच आठवत नाही आहे आणि त्या भावामाध्येही मी माझी मुद्रा
योग्य घेतोय. योग्य ठिकाणी सहज जाऊन बसतोय आणि विंगेत आल्यावर एकदम सामान्य होऊन
जात आहे ..त्यातच , मला नाटकातील म्युजिक हि करायचं असल्यामुळे स्टेज वर कलाकार
आणि विंगेत टेक्निकल अशी गंमत अनुभवत आहे.. थोडा वेळही “ मी “ माझ्या ध्येयापासून
लांब न जाता दोन्ही भूमिका सहजतेने
बजावताना दिसत होतो....
नाटक कधी सुरु झालं
आणि कधी संपल हेच समजले नाही ..म्हणजे , हा काळ मोठा होता पण , सादरीकरण करत
असताना छोटा वाटत होता .म्हणजेच , रंगमंचावरील माझी भूमिका मी जगत होतो.
नाटक अनहद नाद – unheard sounds of universe ची प्रस्तुती ( दिनांक – १६ नोव्हेंबर २०१७ ,सकाळी
– ११.०० वा. )
मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक “ अनहद नाद - unheard sounds of universe ” हे नाटक व्यक्तीच्या आत मध्ये असणाऱ्या
कलाकाराला जिवंत करतो. हे नाटक पाहिल्यानंतर व्यक्तीच्या आत असणारा कलात्मक नाद
तोंडातून बाहेर येऊ लागतो ...चेहऱ्यावर शांतता पसरलेली असते. प्रेक्षक त्याच्या
आतील आवाजाला ऐकल्यानंतर पवित्र आणि सात्विक मनाने ...मनात असणारे सात्विक भाव
बोलू लागतो ..थोड्या वेळाने बोलतो जीवन जगलो मी आता ..हे नाटक पाहिल्यानंतर
प्रेक्षक असेही बोललेत ...या धकाधकीच्या जीवनात एवढा वेळ कुठे आहे ..कि आपण , स्वत:चा
आवाज ऐकू शकतो ... मनात असणाऱ्या सर्व दुनियादारीच्या विचारांनी घेरल आहे त्याच
ठिकाणी अनहद नाद पाहिल्यानंतर मनाला शांतता मिळाली आहे ... हे नाटक सादर करत
असताना मला आलेला अनुभव हा फारच वेगळा होता ...intuition , impulse आणि vibrations यांना
घेऊन कलाकार पेर्फोमंस करत असतो. डोळ्यासमोर प्रेक्षकांच्या मनात असणाऱ्या भिंती
काही वेळ जाणवू लागल्या डोकं एकदम जड झालेलं... थोड्या वेळाने स्वत: ला सावरले आणि
अनहद नादच्या संवादाकडे लक्ष दिले आपो आप फोकस वाढत असल्याचे जाणवू लागले.
थकलेले
शरीर आपोआप शांत झाले. शरीर उभं नाही माझ्यातील लागलेली आग ...म्हणजे चेतना
पर्फोर्मंस करत आहे... विंगेत आल्या नंतर छातीला हात लावल्यानंतर माझी छाती गरम
झाल्याची मला जाणवली...
नाटक “न्याय के भंवर में भंवरी” च सादरीकरण (
दिनांक – १७ नोव्हेंबर २०१७ ,सकाळी – ११.०० वा. )
नाटक “ न्याय के भंवर में भंवरी ” हे नाटक मंजुल भारद्वाज यांनी लिहिलेलं आणि
दिग्दर्शित केलेलं नाटक . न्याय संगत
व्यवस्थे मध्ये स्त्री आणि पुरुष या दोघांना समान अधिकाराने जीवनामध्ये जगण्याची
हुंकार आहे . या नाटकामध्ये असणाऱ्या कलाकार ह्या सुप्रसिद्ध अभिनेत्री बबली रावत
आहेत ...नाटकाच सादरीकरण सुरु होत आणि एका प्रेक्षकाच्या भूमिकेत मी बसलेलो असताना
माझ्या मनात येणारे प्रश्न माझ्या आत सुरु असणारी एका माणसाची आहे कि पुरुषाची आहे
याचं बिंब दाखवते.... प्रश्न उभी करते आणि माणूस बनण्याच्या प्रक्रियेत घेऊन
जाते... मनात होणारी हि प्रक्रिया अनुभवून खूप – खूप समाधान मनात निर्माण झाले ...
१२ ऑगस्ट १९९२ ला रंगचिंतक
– मंजुल भारद्वाज यांनी सुरु केलेलं रंग आंदोलन आज समाजामध्ये सकारात्मक दृष्टीकोन
निर्माण करत आहे ... जीवनाचा सुंदर मंत्र दिला आहे आपण वस्तू नाही आहोत आपण
व्यक्ती आहोत .. एक माणूस आहोत, हे सुंदर जीवन आपलं आहे....
या फेस्टिव्हल च
आयोजन थियेटर ऑफ रेलेवंसचे अभ्यासक आणि शुभचिंतक यांनी केलं आहे ....
कलाकार – बबली रावत , अश्विनी नांदेडकर , योगिनी चौक , सायली पावसकर , कोमल खामकर
आणि तुषार म्हस्के आहेत .
प्रकाश योजना – शिवाजी आणि निखील
बॉक्स ऑफिस कलेक्शन – स्वाती वाघ
आयोजक – तुषार म्हस्के
स्थळ – श्री. शिवाजी नाट्य मंदिर, दादर ( प ), मुंबई
दिनांक – १५ ते १७ नोव्हेंबर २०१७
वेळ – सकाळी ११.०० वाजता.
Photo created by Rohit Kasar
आपल्या शरीराची रचना हि पाच तत्वांनी झालेली आहे ....त्याच पद्धतीने रंगभूमीच्या ”
वैचारिक कलात्मक निर्मितासाठी ” आम्ही ५
कलाकार कार्य करत आहोत ..
रंगकर्मी
तुषार म्हस्के
९०२९३३३१४७