Wednesday, 6 September 2017

“ मैं औरत हूँ ” हे नाटक म्हणजे स्त्री ला तिच्या अस्तित्वाची ओळख निर्माण करण्यास प्रेरित करते ...



शब्द पुन्हा पुन्हा तेच होते पण, त्या मागे असणारा भाव मात्र वेगळा होता . ते शब्द ऐकत असताना जाणवले.   ती मात्र शब्द बोलत नाही, शब्दांच्या पलीकडे असलेले आपले भाव आणि त्या शब्दांच्या पलीकडून येणाऱ्या
भावना आपल्या शब्दांवाटे सांगत होतीे. शरीर बोलताना कापत होते , मात्र बोलताना ती धैर्य ठेऊन बोलत होती.

 “ मैं औरत हूँ ” मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक . या नाटकाची प्रस्तुति दिनांक ४ सप्टेंबर २०१७ रोजी नाटकवाला पोलीस लाईन , बोरीवली येथे झाली . प्रयोगाचं सादरीकरण झाल्यानंतर त्याठिकाणी असलेल्या प्रेक्षकांचा प्रतिसाद  , एका महिलेला सक्षमतेकडे घेऊन जाणारा वाटला .मनात दाबून ठेवलेले भाव घेऊन ज्यावेळी ती महिला मंचावर आली आणि समोर बसलेल्या १४० ते १६० प्रेक्षकांसमोर जाऊन नाटक पाहिल्यानंतर अनुभवलेले आपलं मत मांडले . एका नाटकाची ताकद त्यातून दिसायला लागली,कि कला जनमानसात

परिवर्तनाचे काम करत आहे .... आता पर्यंत चूल आणि मुल सांभाळणारी महिला ज्यावेळी १४० ते १६० जनमानसासमोर येऊन आपलं मत मांडते . म्हणजेच , नाटकाने व्यक्तीतील व्यक्तिमत्वाला जागवलं, याचा हा आलेला प्रत्यय.
"थियेटर ऑफ रेलेवंस" हा नाट्य सिद्धांत रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी १९९२ साली मांडला. नाटक फक्त मनोरंजनापर्यंत सीमित न राहता ते व्यक्ती मध्ये परिवर्तनाच्या सकारात्मक विचारांचे बीजारोपण करत आहे . “ मैं औरत हूँ ”  हे नाटक म्हणजे स्त्री ला तिच्या अस्तित्वाची ओळख निर्माण करण्यास प्रेरित करते . या समाज व्यवस्थेमध्ये ज्या ठिकाणी संविधान स्त्री – पुरुष या दोघांना समान अधिकार देते . 


त्याच ठिकाणी परंपरागत चालत आलेली समाज व्यवस्था . महिलांना फक्त संस्कृती-रक्षणाच्या नावाखाली पितृसत्तात्मक विचारांच्या मानसिकते खाली दाबून ठेवते. तिला तिचे निर्णय घेण्याची अनुमती देत नाही तिच्या बद्दलचे निर्णय हा समाज घेत असतो." तू किती वाजता – घरी यायच , किती वाजता घरातून बाहेर निघायचं, कोणा बरोबर बोलायचं कोणाबरोबर नाही बोलायचं". सारी बंधनं आणि सर्व परंपरा या त्यांच्यासाठीच बनलेल्या या समाजामध्ये दिसतात आणि फक्त समाज आणि संकृतीच्या नावाखाली पती ला परमेश्वर मानून त्याच्यासाठी असंख्य उपवास करायला लावतात .या  व्यवस्थेमध्ये आपली जीवनसाथी, आपली अर्धांगिनी हिला स्वतः सोबत समान पातळीवर न पाहता, तिला डावलून तुच्छ पातळीवर पाहिले जाते आणि हे काही लांब घडत नाही. माझ्या घरा पासून सुरु होते आणि प्रत्येकाच्या घराघरात ही मानसिकता पहायला मिळते. 


हा प्रयोग नाटकवाला पोलीसलाईन कॉलनीमध्ये होता. नाटक सुरु होण्याच्या कालावधीत ४० ते ६० प्रेक्षक वर्ग उपस्थित  होता आणि नाटक संपेपर्यंत १४० ते १६० खुर्च्या भरलेल्या होत्या . २५ ते ३० प्रेक्षक उभे राहून नाटक पाहत होते . लहान मुलांपासून ते महिला आणि पुरुष अशा पद्धतीचा प्रेक्षक वर्ग, त्याच बरोबर प्रत्येकजण बसलेला प्रेक्षक कुठे ना

कुठे पोलीसांसोबत जोडलेला होता . कारण, पोलीस वाला कॉलनी आणि प्रत्येक घरातील व्यक्ती हा पोलीस क्षेत्रात होता . त्यामुळे हा प्रयोग  वेगळा  होता . कलाकारांच्या कलाकृतीला पाहताना हा प्रेक्षक वर्ग स्वतः मध्ये हरवलेला दिसला . या भयान अशा कल्लोळात ..स्वत:च्या आत – अंतर मनात स्वतःच्या अस्तित्वाचा शोध सुरु झालेला. मन लावून ही कलाकृती प्रेक्षक पाहत होता . 
नाटकाचं सादरीकरण झाल्यानंतर आलेला प्रतिसाद मनाला भावणारा होता. सुरवातीला उठून एकही व्यक्ती आपलं मत मांडत नव्हती .शांतता पसरली होती, थोड्या वेळानंतर एक महिला उठून बाहेर आली आणि आपलं मत मांडू लागली “ फक्त मुलींना असं बसा असं करा , हे करू नका असं करू नका हे सांगण्यापेक्षा त्यांना काय करायचं आहे ,याचा विचार करूया, घरामध्ये मुलीला संस्कृती शिकवण्यापेक्षा मुलांना संस्कार शिकवूया". अशा पद्धतीच्या प्रतिक्रिया प्रेषकांच्या येत होत्या. कधीही कोणासमोर न बोललेल्या महिला देखील पहिल्यांदा आपलं मत मांडत होत्या .

 
"थियेटर ऑफ रेलेवंस " नाट्य सिद्धांताची ही प्रक्रिया आहे, जी प्रेक्षकांना कला सादरीकरण झाल्यानंतर आपल्या अभिव्यक्तीद्वारे आपली ओळख निर्माण करायला शिकवते . 
 “ मैं औरत हूँ “ नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी केलं आहे . या कलेला सादर करणारे कलाकार अश्विनी नांदेडकर , सायली पावसकर आणि कोमल खामकर आहेत. 

रंगकर्मी 
तुषार म्हस्के 
9029333147

2 comments:

  1. सुंदर... प्रेरीत करणारा अनुभव...माझ्या शुभेच्छा संपूर्ण TOR टीम ला...हम हैं!!

    ReplyDelete
  2. धन्यवाद ! स्वाती जी हम हैं ...💐

    ReplyDelete