Friday, 1 September 2017

थियेटर ऑफ रेलेवंस ने २५ वर्षाच्या कलात्मक उत्सवात स्थापन केली. ‘’ थियेटर ऑफ रेलेवंस ” ची रंगभूमी..... तुषार म्हस्के .

इतिहास बनवण्यासाठी त्याची पाळंमूळं ही वर्तमानात रोवावी लागतात , म्हणजे वर्तमानातील  ध्येय,  त्याकरता एक निष्ठने केलेली  वाटचाल , सार्थक परिश्रम व  योग्य नियोजन,  हे घटक  आपली एक प्रतिमा  समाजासमोर  निर्माण करत जातात.असाच हा एक ऐतिहासिक क्षण ....
इतिहासात नाव नोंदविण्याचा हा प्रवास ...आता पर्यंत कधीही न केलेला ...स्वतःची एक वेगळी प्रतिमा बनवणारा व एक राष्ट्रीय कलाकार म्हणून माझी ओळख निर्माण करणारा ..माझ्यात निर्माण होत असणारा कलाकार आणि जगाकडे पाहण्याची एक दृष्टी मिळवून देणारी साधना . 3 वर्षां पासून सतत स्वतःशी संघर्ष करून या प्रवाहात टिकून राहण्यासाठीचा हा अट्टाहास . कारण , विचार नसतात व आपण  जीवन जगत असतो . त्यावेळी का जगतोय ?असा प्रश्न पडतो ..व  या सर्वांच्या पलीकडे मंजुल भारद्वाज यांनी मांडलेले तत्व  ( philosophy ) थिएटर ऑफ रेलेवन्स या अंतर्गत स्वतःमध्ये  कलेसाठी व कलेच्या  निर्मिती केलेली सकारात्मक यात्रा जी पाहत असताना मला प्रेरणा मिळते ...
थिएटर ऑफ रेलेवन्सचा  25 वर्ष पूर्णत्वाचा  कलात्मक उत्सव दिल्ली मध्ये सादर झाला 10, 11 ,12 ऑगस्ट 2017. देश आणि विदेशात हे तत्व ( philosophy ) जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने जगायला शिकवते .



 आयुष्यात नाटक नका करू आयुष्य जगा नाटक रंगमंचावर करा . परिवर्तनाच्या दृष्टीने 1992 पासून थिएटर ऑफ रेलेवन्स ही वाटचाल करत आहे .
एक कलाकार म्हणून, मला , थिएटर ऑफ रेलेवन्स प्रक्रिये मध्ये निर्माण झालेल्या क्लासिक नाटकांमध्ये परफॉर्म करता  आलं.
सर नेहमी सांगत असतात हे एक युद्ध आहे .त्यावेळी मला काहीच कळले नाही हे युद्ध म्हणजे नेमकं काय  आहे ?आणि फेस्टिवल झालं तरीही कळलं नाही नेमकं युद्ध काय आहे .आणि गम्मत काय या युद्धामध्ये एक योद्धा म्हणून मी लढलो..हो पण, जाणीव पूर्वक ... आणि त्याचा अर्थ मला आता काळतोय हे युद्ध म्हणजे नेमकं काय ? प्रस्थापित रंगभूमीवर स्वताची ओळख निर्माण करणे आणि स्वताची ओळख निर्माण करण्यापर्यंत मर्यादित न राहता थिएटर ऑफ रेलेवन्स च्या रंगभूमीची स्थापना करणे. हे युद्ध आहे . जिथे वर्षानु वर्षे हजारो,लाखो संकल्पना आपल्या कलेतून कलाकार जगाला सुंदर बनवण्यासाठी आणि मानवीय विष पिण्यासाठी समर्पित असणार ,आणि ते मानवीय विष पिऊन नव्या जगाची निर्माण करणार. हो , हे युद्ध आहे.
युद्ध होतं त्याची कारणे वेगवेगळी असतात.
1. आपलं सम्राज्य वाढवण्यासाठी
2. आपली सत्ता स्थापन करण्यासाठी
 3.सध्याची असणारी सत्ता बदलण्यासाठी आणि नवीन सत्ता नवीन व्यवस्था बनवण्यासाठी युद्ध होत असतात . हे आता पर्यंत इतिहासात आपण ऐकलं आहे .
पुस्तकात वाचलं आहे .यात आम्ही लढत असणारे युद्ध हे कलात्मक प्रतिब्धतेचे  आहे . जी कलाकाराच्या अस्तित्वाची ओळख आहे . जी समाजामध्ये परिवर्तनाचे काम करते .कलाकार आपली कला सादर करतात आणि सादर केलेली कला जागतिकीकरणात भ्रमित झालेल्या प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करतात त्याच बरोबर विचार करायला प्रेरित करतात व सकारात्मक बदलाचे नवीन मार्ग दाखवतात,  या कलेच्या महासागरात कलात्मक अनुभव त्यांना  देत असतात. एक उन्मुक्त प्रवास करण्यासाठी कलाकारांना प्रोत्साहित करतात. कलेच्या सादरीकरणा नंतर प्रेक्षकांना कलाकार बनवून जीवनात सकारात्मकतेने जगण्याची कमिटमेंट देण्यास प्रेरणा देतात .
आयुष्य खूप छान आहे " इस पल को जी .. हर पल को जी "

मुंबई ते दिल्ली चा प्रवास...

आता पर्यंत मराठी रंगभूमी पर्यंत सीमित आपली ओळख होती . दिल्ली पर्यंतचा प्रवास म्हणजे एक उंच भरारी आहे . कारण दिल्ली हे राजधानीचं शहर आणि या ठिकाणी जाऊन आपली कला सादर करणे म्हणजे खूप मोठं धाडस आणि जिगरीच काम , कारण , या ठिकाणी असणारा प्रेषक वर्ग उदासीन आहे. म्हणजेच एक तर नाटक बघायला कोणी येत नाही . म्हणजेच मोजकाच प्रेषक वर्ग आणि या ठिकाणी छोट्या - छोट्या गोष्टी हा प्रेषक वर्ग टिपत असतो. त्यामध्ये थोडीही चूक झाली म्हणजे काय खरं नाही .. अशी धारणा मी आता पर्यंत ऐकली होती..आणि या सर्व गोष्टींमध्ये मुंबई ते दिल्ली ला जाणं , अगदी सावधानतेने व त्याठिकाणी आपल्या कलेचा झेंडा रोवून यायचा व या मधून एक राष्ट्रीय कलाकार म्हणून आपली ओळख बनवायची हे आम्हा कलाकारांच्या डोक्यात होते. दिल्ली रेल्वे स्टेशन ला सकाळी 10.00 वा . 9 ऑगस्ट 2017 ला आम्ही कलाकार पोहचलो. त्याठिकानाहून आम्ही  पहिल्यांदा मुक्तधार ऑडिटोरियम ला पोहोचलो.

 
तिकडे जाऊन  आम्ही हॉल ची पाहणी केली . ज्याप्रमाणे युद्ध भूमीवर जाण्याअगोदर ती भूमी काय आहे त्याची आखणी सैनिक करत असतात . परफॉर्म करण्याची जागा काय ? एन्ट्री exit कशी करायची . त्यानंतर music आणि लाईट्स चा क्यू कुठे असेल हे पहायचं यावेळी  मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिगदर्शित नाटक  " गर्भ " चे music मलाच करायचे होते.  त्यामुळे त्याचे क्यू मला लक्षात ठेवायचे होते . त्याच बरोबर कलाकारांबरोबर मला त्याची सांगड घालायची होती . थोडं टेन्शन तर आलेलं पण , मनात ठरवलं होतं हे मला व्यवस्थित करायचं आहे टेन्शन आजिबात घ्यायचं  नाही . त्यानुसार मी माझ्या मनाची तयारी केली व  म्युझिक करून झाल्यानंतर लगेच विंगेत जाऊन मला उभा राहायचं होतं,  त्यात  एका मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावर  2 ते 3 मिनिट लागत होते . त्यानुसार वेळेचं नियोजन आणि कशापद्धतीने सहज कोणाला disturb न करता अलर्ट होऊन मी जाऊ शकतो त्याच माईंड मॅपिंग केलं. हे ऑडिटोरियम पाहिल्यानंतर एक अंदाज आला आता मला कुठे जायचे आहे आणि काय करायचे आहे .हे ऑडिटोरियम पाहून झाल्या नंतर आम्ही म.. भारतीय ऑडिटोरियम लोधी एस्टेट.


ला गेलो हे ऑडिटोरियम पाहिल्यानंतर एक दम भारताच्या बाहेर आपण आहोत असं वाटलं . एक दम टकाटक व चमकदार,  दुसऱ्या बाजूला स्टेज वर लाईट reflect  होत होते काही क्षणासाठी वाटले"  यार , ह्या स्टेजवर थोडा वेळ एकरूप होऊन जावे. एक कलाकार म्हणून वाटलं या स्टेज ला मिठी मारावी आणि आपली कला सादर करावी... हे ऑडिटोरियम पाहून झाल्यानंतर आम्ही स्मृती राज च्या घरी गेलो . स्मृती राज म्हणजे आमच्या फेस्टिव्हलचे  दिल्ली

मध्ये आयोजन करणारी एक तरुण योद्धा. एका बाजूला तरुण मंडळी आपलं आयुष्य फक्त खरेदी आणि विक्री मध्ये झोकून देतात , त्याच ठिकाणी स्मृती राज कलात्मकतेची एक नवीन ओळख या जगासमोर आणून देते . जी कलात्मक सत्व आणि कलेसाठी काम करते या फेस्टिव्हल च्या माध्यमातून...

स्मृती राज च्या बंगल्यावर आम्ही पोहोचलो जिथे घराचा प्रत्येक कोपरा,ठिकाण थिएटर ऑफ रेलेवन्स मय झालेलं . आम्हा कालाकारासाठी उन्मुक्त असं हे ठिकाण . याच घरामध्ये कलेचा इतिहास थिएटर ऑफ  रेलेवन्स च्या माध्यमातून रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिहीत होते .
कलाकारांची मीटिंग,  प्रत्येक अपडेट ,व नियोजन या घरामध्ये होऊन जायचे . नाटकाची तालीम ,शब्दांचा अभ्यास नाटकाचे शब्द वाचत असताना, त्याचा योग्य उच्चार व कलेसाठी आम्ही कलाकार एकत्र आहोत याची शपथ आम्ही याच ठिकाणी घेतली ... सकाळी उठल्यावर शब्दांचा अभ्यास याच घरामध्ये आम्ही करायचो ...मंजुल भारद्वाज कमी आवाजात कशा पद्धतीने शब्दांचा सूर बिघडू नये म्हणून स्वतः मध्ये बोलायला लावायचे हे अजूनही चित्र डोळ्यासमोर येत आहे ...अशी आम्हां कलाकारासाठी ही ऐतिहासिक वास्तू.... 


आम्ही घरी पोहचलो त्यावेळी रुहानी आणि सुहानी बरोबर भेट झाली ... या दोघी म्हणजे बालक्रांतिकारी कलाकार काय ऊर्जा आहे त्यांच्या मध्ये बापरे बाप ! आणि यांची ओळख म्हणजे या बबली रावत आणि मंजुल भारद्वाज सरांच्या मुली .. आता पर्यंत ऐकलं होतं यांच्या बद्दल आता प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर वेळ जगत होतो .. या दोघींनी मला शिकवलं  लहान बाळ होऊन त्यांच्यासोबत  संवाद साधायला .. सतत हसत राहायला .. पहिल्यांदा भेटलो आणि दोघींनी माझी परेड च घेतली " हवामान " उठ जाओ ... ' ऐसे आवाज करो , हात उपर करो , आणि त्यातच मी दोघींबरोबर जोडला गेलो.
बबली रावत म्हणजे एक क्रांतिकारी कलाकार म्हणजे मॅडम बद्दल आता पर्यन्त एकलेले .. खूप स्ट्रीक आहेत... आणि त्यासोबत  थियेटर ऑफ रेलेवन्स च्या 1992 पासून च्या कलाकार .. त्यांचा performance पाहून तर अंगावर काटा येऊन जायचा एकदम प्रेक्षकांच्या डोळ्यात पाहून संवाद बोलायच्या " न्याय के भंवर में भंवरी " नाटकाची रिहर्सल करत होत्या त्यावेळी मी बसलेलो आणि
त्यांनी ज्यावेळी संवाद बोलायला सुरुवात केली , माझ्याकडे बघून माझ्या डोळ्यातून पाण्याची गंगा वाहत होती .आणि त्यातच पितृसत्तात्मक विचार डोळ्यातील पाण्यावाटे माझ्या व्यक्तित्वातून निघून जात होते.आणि एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून मला निर्माण करत होते.बबली मॅडम म्हणजे एक अस व्यक्तिमत्व जे  शब्दांनी तुलना नाही करता  येत ...

व्यक्तिला भावनिक आधार जेवढा देतात त्याच पद्धतीने तत्वाने बोलतात त्यासोबत  हजर जबाबी असतात , सतत शिकण्याचा आणि समजून घेण्याचा भाव त्यांच्यात असतो कधीही परिस्थितिला हार मानत नाहीत ...

गर्भ नाटकाचा प्रयोग...

मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिगदर्शित नाटक गर्भ


या नाटकाच्या प्रयोगासाठी आम्ही तयारी केली होती. एन्ट्री exit आणि नाटकातील संवाद व्यवस्थित लक्षात होते . वेळेच्या अगोदर आम्ही मुक्तधारा ऑडिटोरियम ला पोहोचलो त्याच्यानंतर त्या ठिकाणी पहिल्यांदा मी music चं काम करायला गेलो मोबाईल audio system ला connect केला . Music व्यवस्थित प्ले होत आहे की नाही याची काळजी घेतली ... त्याच बरोबर स्वतःला विश्वास दिला ,हो मी व्यवस्थित   music प्ले करू शकतो . आज माझी भूमिका दुहेरी होती .


एकतर music वाजवायचे आणि दुसरा स्टेज वर येऊन performance करायचे त्याच पद्धतीने मनाची तयारी झाली होती . संकेत आवळे प्रकाश योजनेचा काम करत आहे. त्याचे काम पूर्ण होईपर्यंत मी music व्यवस्थित सेट करून घेतले. भीती फक्त एकाच संवादाला वाटायची"  एक  टुकड़ा चाँद, एक टुकड़ा आसमान , वायु ,माटी  हे जे क्यू होते ते सलग
एका मागून एक होते .यामध्ये गडबड म्हणजे संवादाचा impact कमी होऊन जाईल .आणि अस होऊ नये म्हणून स्वतःला फोकस केले व मनात ठरवले , आपल्याला एकदम काळजी पूर्वक music वाजवायची आहे . कुदरत ची पहिली लाईट संकेत ने दिली आणि त्यानुसार माझे हात आणि डोके आपोआप सुरू झाले मोबाईल मध्ये लक्ष त्याच बरोबर मंचावर कलाकारांकडे पाहून त्यानुसार काळजी पूर्वक music वाजवणे.श्वास काही काळ रोखुन ठेवला होता.
अंगावर गर्भ नाटकाचा ड्रेस आणि फोकस " तुषार म्हस्के " म्युजिक करताना मी स्वताला पहिल्यांदा पाहत होतो . म्युजिक देऊन झाले आणि लगेच खाली आरामात काळजी पूर्वक उतरलो व  स्टेज जवळ आलो व वेळ बघून मी alert होऊन विंगेत जाऊन उभा राहिलो . माझे कलाकार विंगेत  माझी वाट पाहत होते योगिनीने विंगेतून इशारा केला . हात दाखवून इशाऱ्याने very good बोलली,  म्हणजे मी माझं काम व्यवस्थित केला आहे त्याची पावती मला मिळाली . लगेच , माझी भूमिका बदलून मला आता  मंचावर परफॉर्म करायचा आहे . हे ठरवून स्वतःला स्टेज च्या स्वाधीन केले . थोडा वेळ डोळे बंद केले आणि


 

शांत राहिलो .. माझी एन्ट्री आली त्यानुसार मंचा कडे आपोआप खेचला गेलो व  सहज शब्दांबरोबर perform करु लागलो .. नाटक सुरु कधी झाले आणि कधी संपले काहीच कळले नाही शरीर , नाटकातील विचार , action एकाच वेळी सर्व होत होते...

नाटकातील संवाद जगल्यासारखे वाटू लागले आता अस वाटू लागले हे संवाद संपूच नयेत . .. सुंदर आणि प्रसन्न  ..नाटक झाल्यानंतर प्रेक्षकांचा येणारा प्रतिसाद एकदम मनाला समाधान मिळवून देणारा होता . इतिहासाच्या पानांमध्ये नाव लिहिलेला दिसू लागले . हा प्रेषक वर्ग एकदम समजदार आणि कलेला समजून घेणारा होता . नाट्य सादरीकरणामध्ये प्रेक्षकांना आलेली अनुभूती त्यांच्या शब्दांवाटे बाहेर पडत होते .कोण बोलत होते थोडे शब्द उच्चार असे हवे होते तर दुसरा बोलला नाही हे शब्दांच्या पलीकडे आहे ... हे


 
शब्दांच्या पलीकडे असणारे नाटक आहे .. या ठिकाणी प्रेक्षकांच्या मनातून आलेले उच्चार म्हणजे कलाकारांचे समाधान आणि दिल्ली मध्ये चांगलाच प्रेषक  वर्ग आलेला दिसला...  मंजुल भारद्वाज हे नवीन ओळख करून देत होते ... ज्या ठिकाणी कलाकार सरकारी अनुदानावर जिवंत आहे त्याच ठिकाणी आम्ही कलाकार आमच्या कलेच्या जीवावर जिवंत आहोत ... हीच ओळख आता दिल्ली मध्ये स्थापन झालेली होती ....

https://www.youtube.com/watch?v=17gP9h2Skq0&t=6s

गर्भ नाटकाची प्रस्तुती झाल्यानंतर आम्ही गाडी मध्ये बसून पुन्हा घरी जायला निघालो त्यावेळीच मंजुल सरांनी सांगितले आता हा अनुभव जगा आणि गाडीतून उतरल्यावर हे नाटक सादर केलेले हे विसरून जा . कारण दुसऱ्या दिवशी अनहद नाद परफॉर्म करायचं होतं ... त्यानुसार आपले अनहद नाद चे सुर पुन्हा लक्षात आणायचे होते ... कारण , एक कलाकार एका भूमिकेतून दुसऱ्या  भूमिकेत जाणार होता ... त्यामुळे अनहद नाद नाटकाचे सूर हे वेगळे आहेत आणि ते सूर पकडून perform करण्यासाठी..

नाटक "अनहद नाद - unheard sounds of universe " प्रस्तुती...


अनहद नाद च्या प्रस्तुतीचा दिवस उजाडला
सकाळची वेळ आणि चैतन्य अभ्यास त्यामध्ये अनहद नाद  नाटकातील संवादातील  सूर मंजुल सरांनी ठीक केले ... आम्ही अनहद नाद चे संवाद धावत धावत बोलत होतो .. त्यानंतर आवाजाचा अभ्यास केला . नंतर शरीराचा अभ्यास केला .. अनहद नादचे सूर आणि ते परफॉर्म करण्याची उत्सुकता मनात वाढली होती . आम्ही ऑडिटोरियम ला वेळेत पोहोचलो.. आम्ही आमच्या entry ,exit आणि संवादांचा अभ्यास केला . आवाज शेवटच्या टोकापर्यंत पोहोचत आहे की नाही याची काळजी घेतली..

लाईट आणि कलाकारांची जागा यांची योग्य तालीम झाली. अनहद नाद चे कपड़े घालत असताना एक सुंदर फील आला ... आणि अस वाटू लागले हे कपड्यांचे रंग किती उन्मुक्त आहेत ...थोड्या क्षणासाठी डोळे स्थिर झाले असे वाटू लागले आता हे युद्ध जिंकायचे आहे ..  जे आपलं अस्तित्व निर्माण करणार आहे ..विंगेत येऊन उभा राहिलो आम्ही कलाकार एक मेकांना भेटलो आणि सांगितले

 
आपल्याला पानिपत करायचा नाही आहे . एकमेकांकडे  परफॉर्म करताना पाहायचे आहे ...प्रत्येक कलाकार एक मेकांना शब्दांतून ऊर्जा देत होता ..त्यामुळे अंगात ताकत वाढल्यासारखी वाटू लागली होती .आप - आपल्या जागेवर येऊन उभा राहिलो . रंगमंचाकडे पाहिले आणि मंचावर एक पाय ठेवून बसलो कलाकारांकडे पाहिलं अश्विनी,योगिनी,कोमल, सायली आणि मी असे विंगेत उभे असताना दिसलो . डोळ्यातून आपोआप पाणी येऊ लागले .  माहिती नाही पण, कुठून हवेची झुळूक आली आणि जाणवू लागले हेच तुझं स्वप्न होतं रंगकर्म जे आता तू करत
आहेस .

डोळ्यातून पाण्याचा एक थेंब खाली पडला ..आणि त्याच क्षणाला जाणवू लागले हे स्टेज नाही आहे ही त्या शेतातील जमीन आहे ,    हे सम्पूर्ण शेत आहे असे वाटू लागले ,इथे आम्ही आमची कला सादर करणार आहोत . अनसुना ... चा आवाज कानावर पडला आणि वाटू लागले , हे आयुष्य जगतोय ....त्याच क्षणाला शरीर प्रेक्षकांंच्या भूमिकेत perform करतंय. संवादानुसार हालचाली शरीरात होऊ लागल्या एक - एक कलाकाराचे संवाद जबरदस्त रीत्या सादर होत होते ... प्रत्येक जन एकमेकांना प्रत्येक संवादांमधून प्रेरणा देत होते


 

...आज पहिल्यांदा वाटत होते योगिनी चौक या अनहद नादाला जगत आहे ... तिने तर स्वतः ला  या मंचावर झोकून दिले होते ... तिच्यातील कलाकार जबरदस्त रीत्या परफॉर्म करत होता . अश्विनी चा जननी चा संवाद तर ब्रम्हांडामध्ये सादरीकरण घेऊन जात होता ... आज पहिल्यांदा कोलंबस चा संवाद बोलत असताना जूनूनी असल्याचं जाणवत होते .कारण, मनात प्रेक्षकांकडे बघितल्यानंतर आलं की मी कोणाशी बोलतोय हे नक्की समजणार आहे का ? आणि याच विचाराने माझा संवाद बळकट झाला . त्यामुळे बोलत असताना ती आत्मीयता मला मिळत होती हे सादर केल्यानंतर मिळालेले समाधान म्हणजे शांतता फक्त काहीच न बोलणारी ... हा क्षण जगत असल्याची जाणीव करून देणारी ... मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिगदर्शित नाटक अनहद नाद चा सादरीकरण झालं 

https://www.youtube.com/watch?v=vJ8ItmLLmWk&t=2s


 ... त्याचबरोबर प्रेक्षक बोलायला लागला आयुष्यात आपण किती मुखवटे लावतो ? मी फक्त ऐकत असल्याचं दाखवतो पण , कधी ऐकतो का ? तर , नाही...  आपल्यातील अनहद नाद चा नाद ऐकल्यावर मिळालेलं समाधान व येणारी परिस्थिती आपण बदलू शकतो ...हे जाणवले..
अनहद नादच्या प्रयोगातून मिळालेली ऊर्जा जबदस्त होती त्या उर्जेला परावर्तित न्याय के भंवर में भंवरी या  नाटकात केले.

नाटक " न्याय के भंवर में भंवरी " सादरीकरण...
मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिगदर्शित नाटक " न्याय के भंवर में भंवरी "



या नाटकात परफॉर्म करणारे कलाकार बबली रावत आहेत . हे नाटक बबली मॅडम एकट्याच सादर करणार आहेत त्यांसाठी तयारी सुरू झालेली अनहद नाद चा सादरीकरण झाल्यानंतर आम्ही कलाकार रात्री उशिरापर्यंत बबली मॅडम बरोबर रिहर्सल करत बसलो होतो .
त्यावेळी पाहत होतो बबली मॅडम मन लावून  संवाद लक्षात ठेवत होत्या .. आणि सादरीकरण हे म ल भारतीय ऑडिटोरियम लोधी एस्टेट. ला होणार होते . या प्रयोगामध्ये नियोजन करण्यात आले सर्व कलाकार विंगेत बसून  music देणार होते , व माझ्यावर जबाबदारी होती रुहानी आणि सुहानी ला सांभाळण्याची .. लहान मुलं म्हणजे ऊर्जेचा स्रोत बापरे एका जागेवर कधी थांबत नाहीत .. इकडून तिकडून उड्या मारत असतात . या दोघींमध्ये असणारी ऊर्जा ही सर्वात जास्त ,..बबली मॅडम performance करणार,  त्यावेळी सर प्रेक्षकांमध्ये उभे असणार , दुसऱ्या बाजूला सर्व कलाकार विंगेत ...आणि रूहानी , सुहानीला सांभाळने म्हणजे बापरे बाप खूप ऊर्जा आणि सतत हसत राहणं.. आम्ही ऑडिटोरियमला लवकर पोहोचलो ... मॅडम स्टेज वर



रिहर्सल करत होत्या व मी आणि सृष्टी आम्ही रुहानी सुहानी ला सांभाळत होतो ... या दोघी मस्त पैकी धावायच्या एकदम स्पीड मध्ये न थांबता त्यांच्या मागे मी धावायचो ... मग, त्यांच्या बरोबर गाणी बोलायला सुरुवात केली . त्यांच्या बरोबर हसायला लागलो ... आणि या तीन ते चार दिवसात दोघींबरोबर मी चांगलाच जमलो होतो . यांच्याबरोबर मी मिसळून गेलो होतो त्यांच्या मधलाच एक होऊन गेलो . कारण, मॅडम घरी रिहर्सल करत असताना या दोघी माझ्याबरोबर खेळायच्या त्यामुळे तसा काही त्रास नव्हता पण, मध्येच " मम्मी " आठवण झाली तर हट्ट करू नये हा अट्टहास होता .


त्यामुळे मोबाईल मध्ये वेगवेगळी लहान मुलांची गाणी ठेवली होती . कधी काय झालं तर ते कार्टून लावून देणं . रिहर्सल झाल्यानंतर  स्टेज जवळ आम्ही गेलो .. त्यावेळी सुरुवातीला रुहानी , सुहानी गाणी बोलत होत्या आणि मी रेकॉर्ड करत होतो मोबाईल मध्ये . या सर्व प्रकिये मध्ये एक समजलं लहान मुलांना शांत बसवण्यासाठी त्यांच्याच सारख व्हावं लागतं . त्यांच्याबरोबर तश्याच त्यांच्या अवस्थेत मिसळून जावं लागत . Performance सुरु झाला आणि या दोघींना घेऊन मी आणि सृष्टी बसलो मॅडम चा परफॉर्मन्स सुरू झाला ..तसे रुहानी चे  शरीर गरम होऊ लागले . 

मॅडम चा संवाद सुरू होता . एक वेळ अस जाणवू लागलं मी आई च्या भूमिकेत आहे . रुहानी थोड्या वेळाने झोपून गेली सुहानी थोडी चलबिचल करत होती पण, थोड्या वेळाने तीही शांत झाली आणि परफॉर्मन्स होई पर्यंत दोघीही शांत होत्या ..माझ्या डोळ्यातून पाणी वाहत होते आणि दोन पोरी बाजूला होत्या . परफॉर्मन्स झाल्यानंतर थोडा शांत वाटलं कारण ही आई ची भूमिका मी जगलो होतो .


https://www.youtube.com/watch?v=QzCD9RCiYpI&t=90s



प्रेशकांच्या आलेल्या प्रतिक्रिया समाधान कारक होत्या .कलाकार परफॉर्म करत असताना वाटत होते की आम्ही त्या नाटकाचा एक भाग आहोत .. अशा जबरदस्त फेस्टिव्हल सादरीकरणाच यश आम्हांला मिळाले होते .
हे फेस्टिव्हल म्हणजे एक युद्ध आहे .. आणि या युद्धात आपल्या असण्याची जाणीव ... या भूमीला आम्ही करून दिली होती ते आपल्या परफॉर्मन्स मधून ....अशाच सुवर्ण काळात आम्ही चमकत्या दिल्ली ला डोळ्यांनी पाहिले काल पर्यंत जगलेली यात्रा आता काळाने लिहिलेली होती...


आणि त्या काळाला आम्ही लिहिले होते....
या काळाला लिहिण्याचे कार्य - कलाकार अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक ,सायली पावसकर ,कोमल खामकर आणि तुषार म्हस्के यांनी केलं .
प्रख्यात कलाकार - बबली रावत यांनी " न्याय के भंवर में भंवरी " नाटकाच सादरीकरण केले .
या नाटकांमध्ये प्रकाश योजना संकेत आवळे यांनी केले
या फेस्टिव्हल च आयोजन स्मृती राज यांनी केले


थियेटर ऑफ रेलेवंस अभ्यासक , शुभचिंतक आणि प्रेक्षकांचा पाठींबा घेऊन थियेटर ऑफ रेलेवंस च्या रंगभूमीची स्थापना केली.
रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी सुरू केलेला जनआंदोलन थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत म्हणून जग प्रसिद्ध आहे , आणि याचा एक शिलेदार मी असल्याचं समाधान मला आहे.






रंगकर्मी
तुषार म्हस्के.

3 comments:

  1. Great writing with visual impact..
    Wonderful Tushar..Keep it up..

    ReplyDelete
  2. Written in detail ... Very well picture designing.. great

    ReplyDelete