Tuesday, 18 July 2017

अनहद नाद - unheard sounds of universe नाटकातील शब्दांमध्ये एवढी ताकत आहे की आपोआप निसर्ग त्याला रीस्पॉन्स करत असतो आणि ते मी अनुभवलय ...

और वहीं से छूटता गया मेरा अनसुना हिस्सा...जिसको मैंने जिन्दगी में कभी सुना नहीं और जिंदगी में जिसको कभी सुना ही नहीं वो कैसे समझू...कैसे इस आकर को लेकर आकारविहीन हो जाऊँ..और निराकार होकर... कैसे.. गुण और सूत्र के रूप में तबदील होकर बैठ जाऊ अपने माँ के गर्भ में और वहाँ से सुनू अपनी अनसुनी आवाजें ...अपने ब्रम्हांड की अनसुनी आवाजें...और अपनी उन अनसुनी आवाजों को सुनने और सुनाने के लिए ..मैं पलट दूँ कायनात के सारे नियम,  सारी परम्पराएं और वक्त के अनुसार मेरे दिल की धड़कन न धड़के.. अपितु मेरी धड़कन के हिसाब से वक्त आगे कदम बढ़ाये "रंग चिन्तक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित बहुभाषिक नाटका मधील हा संवाद आहे ...हा केवळ संवाद नाही आहे ...या संवादामध्ये या शब्दांमध्ये एवढी ताकत आहे की आपोआप निसर्ग त्याला रीस्पॉन्स करत असतो आणि ते मी अनुभवलंय ...
           ऑक्टोबर 2016 , ला मी अहमदाबाद ला मावशी कडे गेलो होतो ...मावशीच्या मुलीचे लग्न झालेलं व ती प्रेग्नेंट होती ...वय 34 च्या वर असल्यामुळे प्रेग्नेंसी ला थोडे कॉम्प्लेकॅशन डॉक्टर ने सांगितले होते  .... त्यामध्ये ताई चा bp अजिबात नॉर्मल होत नव्हता .पहिल्या वेळेला चेक केला त्यावेळी १७५ होता ...त्यात तारीख जवळ आली होती ....जोपर्यंत bp नॉर्मल होत नाही तोपर्यंत टेन्शन असल्याच डॉक्टर सांगत होते ... बर त्यात पण डॉक्टर सांगत होते x -रे मध्ये बाळाची मान हि वरच्या बाजूला आहे.. अश्या मध्ये   मान नाभी च्या नाडी मध्ये गुंतण्याची दाट शक्यता होती ...अजून त्यात  बाळ हव तेवढ्या प्रमाणात रिस्पॉन्स करत नव्हतं .. जोपर्यंत बाळ हालचाल करणार नाही तोपर्यंत मान कशी खाली येणार असे अनेक प्रश्न निर्माण झाले होते ...अशा परिस्थिती मध्ये सर्व घरातली मंडळी डोक्याला हात लावून बसली होती ...यात एकच उपाय होता,  ताईचा bp नॉर्मल करणं व तिला सामावणारे वातावरण निर्माण करणे ....पण, ते वातावरण निर्माण करणार कसे .?...हा प्रश्न डोळ्यासमोर निर्माण झाला ....अनहद नाद नाटक perform केल्यामुळे नाटकातील संवाद माझ्या डोक्यात सतत फिरत होते ...तर , सहज बोलता - बोलता नाटकाच्या प्रक्रियेमधील अनुभव शेयर करू लागलो  व ताई सुद्धा ते झोपून ऐकू लागली ...असंच  बोलता बोलता अनहद नाद नाटकातील संवाद सुरु झाले ...हे संवाद मी बोलत असताना त्याची इंटेनसिटी मोठ्या प्रमाणात वाढली  ...सर्व जन मन लाउन संवाद ऐकत होते ...आणि त्यावेळी बाळाने ताई च्या पोटात  एक लाथ मारली ...अस , जस जसे  संवाद सुरु होत, तस तसेे ताई च्या पोटात बाळ लाथा मारत होते ,व  जसा मी बोलायचा थांबलो कि पुन्हा शांत होऊन जायचे ...अस , ५ ते ६ वेळा लगातार ताईला अनुभव आला, ताई चटकन बोलायची " ये देख इसने पैर मारा " सुरुवातीला एवढे काही मनावर घेतलं नाही ...पण, जस- जसे शब्द बोलायचो त्याप्रमाणे बाळाची हालचाल पोटा मध्ये सुरु असायची ....त्यावेळी त्या शब्दांची व्यापकता मला समजली ...जेव्हा नैसर्गिक आणि सात्विक शब्द ....प्रकृती बरोबर जोडलेले असतात तेव्हा ...आपोआप निसर्ग त्याला प्रतिसाद देत असतो ...कारण , अनहद नाद नाटकाची प्रक्रिया मंजुल भारद्वाज सरांनी निसर्गात आमच्या बरोबर करून घेतली आहे ... त्यामुळे त्यांची व्यापकता हि सर्व व्यापी आहे .....ती या ब्रह्मांडबरोबर जोडलेली आहे ...एक आई तिचा अनुभव सांगत होती ...तू तेरे नाटक के शब्द बोलता है ...! तो  ऐसा लगता है की बात करना चाहता है "! ....इस प्रक्रिया के बाद हम दुसरे दिन डॉक्टर के पास चले गये तो डॉक्टर ने bp चेक किया तो वह १६५ हो गया !' दुसऱ्या दिवशी ताईचं डोक खूप दुखत होतं...आणि अंग गरम झालेलें....मग, त्यावेळी मी जाऊन ताईच्या डोक्यावर हात ठेवला ....५ ते १० मिनिटांमध्ये डोक दुखायचं बंद झाले..व  ताई डोक दुखायचं शांत झाल्यावर बोलली जबसे तुने सरपे हात रखा है तबसे यह पेठ के अंदर उचल कुद कर रहा है !" तू अपने नाटक के संवाद मुझे सुना वह संवाद सुनते वक्त बहुत अच्छा लगता है !...तो मैंने संवाद बोलना सुरु किया और यह भाई पेट के अंदर अपनी ममा को लात मारने लगा!!.
 ..हे संवाद बोलताना मला जाणवत होते माझी ऊर्जा हि दुसऱ्या ठिकाणी वापरली जात आहे ...माहिती नाही कुठे जात होती ..त्याच बरोबर ताईचा चेहरा चमकायला सुरुवात झाली होती ...अनहद नाद चे शब्द ऐकण म्हणजे तिच्यासाठी उर्जेचा स्त्रौत तयार झाला होता .....त्यानंतर तिसऱ्या दिवशी डॉक्टर कडे bp चेक करायला गेलो तर १२१ झाला होता ..नंतर १०१ अशा पद्धतिने तिचे bp नॉर्मल झाले....आणि मुळात बाळाने पोटात हालचाल करायला सुरुवात केली होती ...आणि त्यामध्येही वेगळेपणा .असा की ..साध -- सरळ बोलताना अजिबात काहीच  हालचाल नाही करायचा पण, अनहद नाद चे शब्द आल्यावर याची मस्ती पोटात सुरु व्हायची .....आणि त्या दरम्यान ताईची भीती कमी झाली होती ....अनहद नाद नाटकामुळे  माझ्यामध्ये निर्माण झालेली सात्विक ऊर्जा एक कलाकार आणि व्यक्ती म्हणून मला वेगळा अनुभव देत होती ... नंतर माझ  फ्लाईट च मुंबई च तिकीट होत ...मी त्यावेळी संपूर्ण परिसरला पाहिलं ...आणि मोकळ्या मनाने निसर्गाकडे बोललो ....माझ्यामध्ये असणारी ऊर्जा डिलिव्हरी होई पर्यंत बाळाच आणि आईच रक्षण करेल आणि नंतर ती माझ्याकडे पुन्हा येईल ....थोड्या थोड्या वेळाने मला जाणवू लागले माझी ऊर्जा हि कमी कमी होत चालली आहे ....आणि हेहि जाणवत होते माझ्या छातीतून ऊर्जा निघून जात आहे .....माझ्या चेहऱ्यावरील तेज थोडं कमी झाल होत ... आणि flight मध्ये बसून मुंबई ला पोहोचलो ....एक दिवस मध्ये गेला ....त्यानंतर दुपारी झोपलेला असताना जाणवू लागले माझ्या शरीरात पुन्हा ऊर्जा प्रवेश करते आहे आणि अचानक झोपेमध्ये ताकत वाढत असल्याची जाणीव मला होऊ लागली चेहरा चमकू लागला ...२० मिनिट नंतर मला फोन  आला कि ताईला बाळ झाल ...आणि दोघेही सुरक्षित आहेत ....सीझर झाली पण , कोणालाही धोका झाला नाही .... आणि ते ऐकल्यानंतर डोळे पाणावले ...आणि खरोखरच रंग चिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटकातील संवादामधील ताकत आणि ऊर्जा काय असते याचा अनुभव मला आला .....



रंगकर्मी
तुषार म्हस्के

No comments:

Post a Comment