Tuesday, 10 February 2015

५ दिवसात रंगमंचावर उभा राहिलो ……




मनात एक स्वप्न घेऊन रंगभूमीच्या शोधात पाऊल टाकण्यास सुरुवात …… मनाला शांत केल … आपलं अस्तित्व निर्माण करायचं …. मग, ते कसं करायचं ? … . महाविद्यालयात ( degree college )  काही नाटक केली … पुढे कॉलेज संपल्यावर मनात नाटक करण्याची आस …. industry  मध्ये  येवून नाटक करायचं तर कोणताच ग्रुप नाही …… कसं करायचं ? काहीच माहिती  नाही …. मनात  तडप  …. vibration   …… theater  करण्याची   …… अश्विनी  नांदेडकर  बरोबर संपर्क …  ‘मी म्हणालो ‘’नाटक करायचं  आहे ‘’. काय करायचं ? कस करायचं ? याचा शोध … तिच्याशी संवाद साधता मी कळत  नकळत ‘थियेटर ऑफ रिलेवन्स ‘’ मध्ये  आलो …. तिच्याशी संवाद साधता साधता आपलेपणाची भावना निर्माण झाली ……… साधारणता मार्च महिन्याच्या शेवटी तिला भेटलेलो सप्टेंबर मध्ये माझ्या जीवनात पहिला workshop  ६ महिन्याचा कालावधी …… मन बेधुंद …. आपल्या जीवन जगण्याच्या शोधात …… स्वताच अस्तित्व शोधत स्वतामध्ये पाहत …… पहिल्या शिबिरात जबरदस्त अनुभव …’’  मी’’ थियेटर ऑफ रिलेवन्स व मंजुळ हा माझ्या जीवनाचा एक भाग …… नोव्हेंबर मध्ये कोल्हापूर मध्ये भारतीय महिला फेडरेशन च ‘’गर्भ ‘’ नाटकाची प्रस्तुतीसाठी शिबीर …… 


३१ ऑक्टोबर २०१४ पासून शिबिराची सुरुवात … मंजुळ भारद्वाज यांनी लिहिलेला ‘’गर्भ ‘’ या हिंदी play  मध्ये काम करण हा अजेंडा …… गर्भाचा शोध …… हि जंग माझ्या तत्वांची …… प्रत्येक क्षणी आईच्या गर्भात  आहे …. प्रत्येक क्षणी त्या घडणाऱ्या क्षणाशी भांडण …प्रत्येक क्षणी रडण … मन आणि शरीर एकमेकांत गुंतले …।प्रत्येक क्षणाची समज …… ‘’ मी समजत आहे’’  ….  मंचावर उभ राहण्यास सुरुवात होत असल्याची जाणीव…… हे जीवन माझ आहे …… ते मी जगात जगत आहे … 


मी माणूस आहे ……. मी कोणत्या धर्माचा नाही… माझ्या जन्मानंतर सभ्यता लादण्यासाठी धर्माचा वापर …मला conditioned केला आहे माझ्या विचारांना दाबून …… 


मला जगू द्या माझ्या अस्तित्वात … होणारा त्रास माणूस म्हणून जगण्याचा …. मला संवेदन हीन करून टाकलंय …माझ्या काही संवेदनाच नाहीत … मी फक्त मशीन म्हणून या जगात का म्हणून जगायचं ? …


मला माझ अस्तित्व शोधायचं आहे मी नाही जगू शकत कोणाच्या हाताखाली …… हृदयात होणारी हालचाल ……. श्वासात एक चाहत ……. हाता पायांमध्ये लागलेली आग ……. माझ्या डोळ्यातून वाहू लागले अश्रुंमधून ………आता मी जगणार …… माझ अस्तित्व शोधणार …… तत्वानेच राहणार …….तत्व समजण्यास सुरुवात …प्रत्येक क्षण वेगळीच नशा देवून जात आहे ……


अंगात एक बळ घेवून …… विचारातील चैतन्य …… मन शांत आणि पसन्न होत आहे २४ वर्षा मध्ये असा शो मी कोल्हापूर मध्ये ५ नोव्हेंबर २०१४ ला सांयकाळी ५ वा. केला …… नाटक संपल्यावर  लाभलेला समाधान …… अवर्णनीय … ३५ ते ३६ वयोगटातील  एका  गृहस्थानी मारलेली मिठी ……प्रत्येक क्षणी  अनमोल  अस्तित्व ……… then , i  am being  celebrity ......


…सर्व डोळ्यासमोर घडतंय आणि मी शांत सर्व पाहतोय ……. काहीच कळत नाही आहे ……… काय होतंय  माझ्याबरोबर …फक्त हसू चेहऱ्यावर हसू येत  आहे …… मनाला खूप शांत आणि प्रसन्न करून ……. मंजुळ  भारद्वाज सरांनी माझ्या जीवनात रंगकार्मीच सत्त्व मला मिळाले …… फक्त ५ दिवसात मी वैश्विक रंगमंचावर नाटक करण्याच तेज घेवून थियेटर ऑफ रिलेवन्स  रंगकर्मी  म्हणून जगू लागलो आहे …

1 comment: