वर्क्शोप चा agenda : - १. माझ्या अस्तित्वाचा शोध
२. how , beautiful i am ?
दिनांक :- ५ जानेवारी २०१५ ते ९ जानेवारी २०१५
सकाळी ४:३० वाजताच जाग आली नंतर एकवेळ सर्व गोष्टींचा शांतपणे विच्यार केला नंतर कि,मी वर्क्शोप ला जातोय तर ‘’ मागे काही राहिला नाही आहे ना ! ‘’ का मला वर्क्शोप मध्ये कोणत्याच गोष्टींच disturbance
नकोय सर्व गोष्टींच नियोजन केल pc चालू करून fb व बाकी सोशियल मिडिया sites वर update केला ‘’ कोल्हापूरच्या जबरदस्त अनुभवानंतर पुन्हा थियेटर ऑफ रिलेवन्स च्या वर्क्शोप ला जातोय सर online smileys पाठवत होते तेही हसण्याची मी अगोदरच chat मध्ये माझ वर्क्शोप ला येण्यामागचा agenda पाठवला होता . मग सकाळी सरांनी विचारला अंधेरीला भेट ‘’ माझी हवा tight झाली आता पुन्हा मार बसणार bag pack करायची होती ती १० मि . केली जोगेश्वरीला आलो सरांना msg केला सर पुढे जा नंतर बघितला तर ट्रेन ७:४० ची होती ticket काढाल आणि धावत ट्रेन पकडली सराना फोन करणार तर सर समोरच बसलेले दिसले सरांनी आवाज दिला व मी त्यांच्या बाजूला जाउन बसलो . त्यावेळी सर दिपू शी संवाद सादत होते मग मला खूप छ्यान आणि वेगळा अनुभव मिळत होता आम्ही संवाद साधला त्यावेळी सर दीपु ला correct करत होते नकळत मला हि जाणवत सर दिपू ला नाही मला सांगत आहेत . प्रश्न व्यवस्थित समजून घेवून त्याला साजेस cognitavive उत्तर द्याव साध्या सरळ समजेल अशा शब्दात आणि त्याच वेग वेगळ सार त्या उत्तरात असावेत या गोष्टींची पडताळणी डोक्यात सुरु झाली आणि observation च नवीन dimesion मला मिळाल .
सर्वजण बोलतात त्यावेळी similar प्रश्न असतो त्याचवेळी माणसे हि वेगवेगळी असतात म्हणजेच वैचारिक पातळीनुसार उत्तरे दिली जातात आम्ही शांतीवन मध्ये येता येता मी खूप शांत आणि alert झालो आता सायली येत नसल्यामुळे मी माझ management ओळखल पुढे मी त्या पद्धतीने management action मध्ये
उतरलं सरांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी पाणी नंतर उठण बसण alert राहाण या आत्मसात केल्या नंतर ग्रुप मध्ये बसून आमचा व ग्रुप चा पाच दिवसाचा agenda एकत्र केला . हि प्रोसेस नवीन होती आणि त्या प्रोसेस मध्ये मला कळल कि शब्दांना एकत्र करताना खूप शांत आणि चाप्लायीने कराव लागत नाही तर शब्दांत गडबड गडबड होते . माणसिकता एक होती त्यामुळे आम्ही शब्दांची मिश्रण हि पटापट केली माल्या mily वर perform करायची वेळ आली त्या अगोदर मी माझी पहिल्या वर्कशोप च्या अनुभवाची मिली वाचण्यास सुरुवात केली जणू काही त्या आठवणी मी पुन्हा जगतोय माझ्या अस्तित्वाची निसर्गाची ओढ ,माझ मन वाचताना तयार झालेला माहोल जबरदस्त तेज देत आहे . प्रफुल्लीत मन झाल मग पुढे आम्ही आपली ओळख काय आहे ? ती ओळख आपण बनवली कि , आपल्याला मिळाली आहे मग त्यावर लिखाण लिहिण्यास प्रारंभ केला पहिला प्रश्न मनाला विचारला मी काय आहे ? माझ्या व्यक्तिमत्वाचे dimesion काय आहेत . वैच्यारिक पातळीवर स्वत: बददल विचार करण्यास सुरुवात झाली माझ्या अस्तित्वाचे सौंदर्य डोळ्यासमोर आले . मी सिद्धांत , विनय आणि दिपू आम्ही मिळून स्वत:च्या ओळखी बद्दलचे विचार मांडण्यास सुरुवात केली आम्ही लिहिलेला वाचायचो पुढे जायचो आणि एकमेकांत मिसळून जायचं जबरदस्त नवीन form एस्तब्लिशेद होत आणि त्यामुळे अस जाणवलं कोणतही शब्द सुटत नाही आहे खूप नैसर्गिक आहेत. म्हणजेच natural आणि नैसर्गिक हे सर्वव्यापी आणि सुंदर कृती आहे . त्याचा जो अंतर्गाभा होता तो नाभी पासून होता म्हणजेच त्यामधला जीव जाणवला
आम्ही चैतन्य अभ्यास करण्यासाठी शेतात गेलो सर जबरदस्त रित्या नवीन नावण्यापूर्ण गोष्टी स्वत: करत होते आणि त्यांच्या करण्यात आणि आमच्या करण्यातील फरक जाणवलं ते ज्ञान देत होते त्यांचा ‘’ ब्राम्ह्गाभा ‘’ हा सर्व व्यापी होता आम्ही शेतात झोपल्यानंतर चा मिळालेला ‘’ आत्मचिंतन ‘’ यामधून स्वत: चा सूर हा गीतार मधून निघालेल्या सुराचा बेस बनवत होता येताना जाणवलं मी माझ्या मनातील भावना दाबत ठेवत मला प्रेम करावस वाटतय आणि त्याच्यामध्ये पण येतोय . त्याचबरोबर निसर्गातील सुखालेल्या गवतात , रांफुलांत आणि मध्येच हिरवीगार पानात संध्याकाळच्या वातावरणात माझ अस्तित्व मिळतंय त्यामध्ये सूर्यासारख तेज आहे पृथ्वी सारखी गिरकी आणि चंद्राची शितलता आहे माझ अस्तित्व एवढ च्यान आणि सुंदर मला त्या दिवसापासून पहायला मिळाल . रात्री mily वाचताना भावनिक होत होतो . हा पण , त्यावेळी instant जाणवलं ‘’ कंट्रोल तुषार ‘’ तू वाचावस आणि त्यातून समजल भावनांना योग्य ठिकाणी थांबवता येत आहे आणि भावनांच्या ओघात वाहत जात असताना जाणवतंय नाही मी वाहतोय मला थांबायचं आहे हे माझ्या शरीरात नवीन वैच्यारिक आणि मानसिक बदल होत आहेत .
रात्री light नव्हती त्यामुळे आमच काही थांबल नाही आम्ही मेणबत्ती लावून battery च्या उजेडात स्क्रिप्ट च १० वेळा पहील्यां ३ पानांचं वाचन केला ‘’ unheart sounds of universe ‘’ . त्या दरम्यान प्रश्न निर्माण होण्यास सुरुवात झाली . मला unheart चा अर्थ अर्थ काय मिळतोय . हा नक्की मला यात काय शोधायचं आहे . unheart हे नक्की शब्दामध्ये आहे कि मनामध्ये कि , आपण पाहतोय सजतोय, आपल्याला ते जाणवतोय ते unheart त्या दरम्यान खूप मनात विचार येवू लागले त्यातून एक समजल मला माझा तिसरा डोळा उघडायचा आहे आणि तो डोळा third person म्हणून काम करेल म्हणजे घडत असणाऱ्या गोष्टीला शेपातून पाहणार.
राक्री झोपेतून जाग आली रूम मधून बाहेर पाहिलं तर खिडकी च्या काचेभोवती उजेड होता वाटल सकाळ झाली आहे बाहेर जाव बाहेर आल्यावर समजल ‘’चंद्र हा गोलाकार स्थितीत होता आणि आक्शाच्या मध्यभागी होता खूप सुंदर तेज जे प्रसन्न करून सोडत होता त्याच्या छटा हा माझ्या अवतीभोवती पडणाऱ्या उजेडात दिसत होत्या मग १५ ते २० मि . बाहेर परिसराचा आनंद घेतला आणि निर्मल स्थितीत मी पुन्हा रूम मध्ये आलो त्यावेळी समजल रात्रीचे ३.३० वाजलेत ‘’अरे वा ….!!!! छ्यान आहे आणि चंद्राला कुशीत घेवून झोपलो .
सकाळी ६:३० वाजता उठलो थंडी जाणवत होती आम्ही ६:५० वा. चैतन्य अभ्यास करण्यासाठी बाहेर पडलो सरांनी एक सूचना दिली आपला गळा झाकून घ्या आणि पंचेंद्रिये काय काय बोलतात आपल्या रफ्तार मध्ये सर आम्ही त्यांच्या मागोमाग धावत गेलो . प्रत्येक क्षणी alert करत होते त्या क्षणी जाणवत होत कि सर संकेत देत आहेत ‘’ सकाळची पहाट निसर्गाची आदभूती प्रिथ्वीची सुंदर्य ता वत्सलता प्रेम हे एखाद्या सुंदर स्त्री आपल अस्तित्व जपत आहे तशी ती वसुंधरा आपल्या अस्तित्वाची जतन करत होती . पुढे मी चालत गेल्यानंतर मानवी वस्ती लागली . ( बोर्डिंग) मनुष्य किती घाणेरडा असतो ना १०० मि. लांब पर्यंत राहत असतो तिकडून त्या ठिकाणाहून आपली दुर्गंधी सोडतो … त्याच ठिकाणी निसर्ग आपल सौंदर्य जतन करून मिरवत असतो वेगवेगळ्या रस्ता हून आम्ही नदीच्या पात्रात प्रवेश केला तीच नदी होती आपल अस्तित्व कायम ठेवलेली पावसाळ्यात आपल वर्चस्व दाखवणारी आणि उन्हाळ्यात कोरडी पडलेली , पाण्यासाठी तडफडणारी नदी आम्ही सूर्याकडे पाहत होतो सूर्य हा नवीन तेने दिसत होता . आज ढगाळ वातावरण नव्हते . एकदम शांततेने तो उगवला . त्याकडे पाहत पाहत झोपलो . सतत मन दुसरीकडे जात होते …. आणि त्याला पुन्हा मी बोलावलं इथे ‘’ य ‘’ काय आहे दुसर्या ग्रहावर पुन्हा पन्ह अस केल्यानंतर हमिंग करताना सर्व शांत झाल ,मन शांत, हसण्यास सुरुवात केल्यानंतर ‘’seduce ‘’ झाल्यासारखं वाटल प्रेयसी बाजूला झोपलेय मी तिच्या बाजूला तिच्या कमभ्रेवर हात ठेवलाय तिच्या गालावरून हात फिरवून तिच्या कुशीत आहे आणि ती भावना हि मोर बाजूला नाचतोय आणि बाजूला मी माझ अस्तित्व जगतोय पुढे चालत जाताना माल्ररानातून खाली उतरत असताना एक पाय ढगावर आणि दुसरा पाय पृथ्वीवर म्हणजे माझ अस्तित्व हे ब्रम्हाडात आहे आणि माझ आस्तित्व हे त्यात सामावलेला आहे पावसाळ्यात पाण्याच्या अस्तित्वाने निसर्गातील सजीवामध्ये जीव येतो . नदी , गवत माती जी productive होते तेच जीवन आहे हे आयुष्य जगत असताना आपल्या सभोवतालच्या परीस्थ्तीला मान्य करून जगन हे आपल अस्तित्व टिकवण दुसर्याच्या अस्तित्वाला धक्का न लागण . त्यामध्ये स्वत:च्या तत्व जपत सभोवतालच्या परिसरात नव चैतन्य व उमेद भरण मग तो रस्ता खडतर नाही आहे तो माझ्या जीवन जगण्याचा मार्ग आहे …….
आता हि झुंज नव्हती माझ्या तत्वांची हि तर चाहूल होती माझ्या आपलेपणाची unheart मी एकूण न ऐकलेले मी ऐकत आहे , मला जाणवत नाही आहे म्हणजे माझ्या समोर आहे त्या परिस्थितीशी मी comfortble नाही आहे. असून नसन नसून असण तेच आवाज ऐकल्यानंतर भीती वाटते , भीती कोणाची ? ती गोष्ट सामान्य नाही आहे तिच अस्तित्व आहे ते अस्तित्व एकांतात असल्यावर मला जाणवतंय ते माझ्या बरोबर मी त्या च्याशी बोलन सोडून मी त्यापासून दूर पळतोय भीती वाटते त्याच अस्तित्वाला मी नाकारतोय मी का नाकारतोय ते अस्तित्व ‘’ माझ अस्तित्व आहे तर त्याच हि अस्तित्व आहेच न, आणि ते नाकाराव ते ऐकून समजू लागल्यावर माझ्या मनाशी एकरूप झालो माझ्या अंतकरणातील आवाज एकू लागलो ‘’ माझ शरीर या शरीरातील अवयव समजत आहेत . माझे पंचेंद्रिये माझ्याशी बोलत आहेत
डोळे - परिश्तिती ( परिसर ) पाहत आहेत .
नाक - परिस्थीचा सुगंध शोधत आहेत
कान - परिस्थिती जाणीवपूर्वक ऐकत आहेत
जीभ - ‘’ चव’’ त्याचा आस्वाद घेत आहेत
त्वचा - त्या सहवासाचा स्पर्श देत आहेत
scene बसवण्यास घेतले मी शांत सूत्र शोधतोय unheart म्हणजे सरांच्या disscussion मध्ये जाणवत होत formless आहे त्याच्या boarder नाही आहेत आता विचार डोक्यात सुरु झालाय त्य दरम्यान अशीविनी, विनय , दिपू , सिद्धांत नवीन form develop करत होते . मी हि मधून इनपुट देत होतो मध्ये गर्भ चे scene डोकावत होते. तरीही आम्ही स्वत:ह त्या मध्ये तबदील झालो . चैतन्य अभ्यास करण्यासाठी गेल्यावर समजल नव - नवीन वाटा , नवीन मार्ग . शांत हमींग करत होतो आपोआप सूर सर्वांनी पकडला सर्वजण एकत्र झाले कालच्या अनुभवात मी सांगितले होते एक पाय जमिनीवर अ दुसरा पाय ढगामध्ये त्याच जमिनीचा सरांनी अभ्यास केल्यानंतर सांगितलं पावसाळ्यात हि जमीन दलदलीची आहे . म्हणजे,,यावरून समजल कि, निसर्ग आपल्या ऋतूनुसार अस्तित्व बदलतो कारण ,तो खतरनाक आणि सौम्य हे फक्त असणाऱ्या परिस्थितीची समोरोपता असते . नदीच्या दिशेने चालत गेलो चैतन्य अभ्यास करण्यासाठी माळरानावर झोपलो . जमिनीला शांत केले मी आणि त्याच बरोबर माझे मन शांत झाले . शांत डोळे बंद करून हमिंग करत असताना शांत होत होतो . ‘’ जाणवल माझ्या शरीरात हमिंग करत असताना मघ्ये आवाज अडकला ( कफ ) आल तर ते दुसऱ्या हमिंग मध्ये रिलीज होत आहे आम्ही discussion करत असताना सरांनी पन्हा एक भविष्यवाणी केली ‘’ आनेवाले समय मे बहुत अच्छे artist बनोगे हिसका कोई तोड नही होगा ‘’ हर फ्रेम right फ्रेम होगा … हर एक character तुम्हारा होगा … शांत वाटल . नंतर सरांनी मला आणि प्रियांकाला एकमेकांच्या पायावर काम करायला सांगितले . मी observation सुरु केले त्या अगोदर प्रश्न पडला ‘’ दोन अडाणी ‘’ एकमेकांना काय सांगणार सुरुवात तर केलीच प्रियांकाच्या पायांकडे पाहिलं कि त्या बरोबर मी alert पणे माझ्या पायाकडे बघून काळजी घेत नंतर तिला सांगत होतो . आम्ही आल्यानंतर unheart बसवण्यास घेतलं जाणवलं मी alert आहे . perform केल खुप easily होत आहे . सकाळी उठून चैतन्य अभ्यास करण्यासाठी गेलो आज रस्ता वेगळा होता जंगलात होतो वाट हि बदलत होती सतत चालत चालत असलेली वाट क्वचित जात असताना समोर असलेली वाट ……. खूप वेगळे पण होत माझ unheart चा शोध हा त्याचा agenda होता. spider जाल विणून हवेत लटकत होता त्यासाठी त्याने जाळ विणल होत ते सूक्ष्म आहे . आपल्याला हवेत असणारे बेस घेवून उभे होते आपल्या सोयीप्रमाणे पुढे चढ लागला, शेत त्यातून चालत जात असताना तलावात उतरलो एकदा डोळ्यांनी अंदाज घेतला आणि स्पीड मध्ये तलावात उतरलो ओळी ओळी होती जमीन नंतर एका रफ्तार मध्ये पायांमध्ये ग्रीप आणून एकदम सहजतेने चढलो ‘’ परिस्थितीच्या सामोरे जाउन त्याची गहराई पाहून परिस्थितीशी ताळमेळ घालून घेतलेली ग्रीप खूप सहजतेने ध्येयाकडे घेऊन जाते
‘’ बिलांकडे पाहताना समजल जमिनीच्या आत मध्ये आहेत आपल जगतात ते unheart ‘
’’ माझ्या शरीरा बाहेरील आणि शरिराअतमधिल होणारी हालचाल म्हणजे unheart का ? ‘’
‘’ विश्वात आहेत दिसत आहेत म्हणजे त्यामागे घडत असतात आणि आपण पाहून त्याकडे लक्ष नाही देत ‘’
‘’ जीवन जगत असताना माझ्या अवतीभोवती वातावरण आहे ते सामाजिक , राजकीय , आर्थिक , सहजतेने जीवन जगत आहेत . जीवन जगण्याला सोडून आपण बनवलेल्या आपल्या सोयींसाठी बंधनात मी अडकून घेतलंय त्यामध्ये माझा आवाज , माझी चाल , माझ मन नाही आहे ते एकू येण्याची प्रोसेस नवीन वाटते त्याची भीती वाटते . ती परिस्थिती सोडून मी किडयानसारख जीवन जगणाऱ्या सामान्य माणसात शिरतो. माझ अस्तित्व विसरतो …. ते जीवन जगत असताना मला माझ्या अस्तित्वाची जाणीव होते व मी माझ्या अंतकरणाशी बोलतो ते ‘’ unheart ‘’
‘’ रस्ता हा न संपणारा ,
आपल्या दृष्टीकोनातून आपल अस्तित्व कायम ठेवणारा,
आपली ओळख हि उपयोगितानुसार बदलणारा ,
अनुभव ऋतूनुसार अस्तित्वाची जाण ठेवणारा,
नवीन पालवी,
नवीन सुगंध,
नवीन अस्तित्व,
नवीन दृश्य,
नवीन सहवास,
दुर्मिळ रस्ता,
चंद्राची कळी , त्याची शीतलता
पावलो पावली त्याचा आकार बदलणारा मी …।
प्रत्येक क्षणी नवीन अनुभव घेत मी शांतीवन मध्ये नवीन जीवन जगात आहे अस जाणवू लागल पुढे institution बद्दल सरांनी सांगितलं ज्यावेळी आपण बाहेर जात असतो त्यावेळी आपण लीड करत असतो . त्यावेळी माझ्याकडून दोन चुका घाला होत्या . पाणी पिण्याची सरांची बॉटल हि माझ्याकडे होती ती मी सिद्धांत कडे दिलेली आणि त्यातल पाणी संपल होत त्यावेळी जबाबदारी पासून मी लांब गेल्यामुळे गडबड जाणवली नंतर पुढे त्याच्यावर विचार करण्यास सुरुवात केल्याने जाणवलं मी माझ रोल मोडल ओळखायला हवा माझ्याकडे असणारी त्याची कार्यक्षमता आणि माझा ध्येय नंतर आम्ही आल्यानंतर पुन्हा एक प्रकार घडला शांतिवन मध्ये आम्ही राहत होतो तिकडे पाणीच नव्हते मग मी जाउन पाण्याचा बघायला सुरुवात केली आणि त्या गोष्टींसाठी वेळ गेला पाणी सर्व ठिकाणी येत होत तिकडेच नव्हत येत खूप धावपळ केली त्या दरम्यान दीदी चे दोन फोन येवून गेले नंतर शेवटी विचार केला आता मी नाही थांबत मला आता जाव लागेल आणि डॉक्टर ला सांगून निघालो हा निर्णय मी अगोदर घ्यायला हवा होता तो नंतर घेतला आणि त्यामुळे सर्वांना खूप त्रास झाला . दुसऱ्या दिवशी unheart चा शो होता . मला माझी चुकी समजली पुढे आणि आम्ही रात्री पुन्हा सीन बसवण्यासाठी घेतले आम्ही blocking केली नव्हती ती सरानी सांगितली . चैतन्य अभ्यास करण्यासाठी क्जात असताना स्वत: ला शांत आणि alert केल .
मन शांत स्वत: च्या शोधात
कळत नकळत मी unheart मध्ये प्रवेश केला ,
curacity नवीन पाहण्याची ,
स्वत ला शोधण्याची
पहिली पाउल वाट माझ्या जगण्याची ,
पाय वर टाकत चढत जाताना ,
जीवन जगण्याचा मार्ग शोधू लागलो ,
एक पाउल टाकल्यावर दुसरा सहज टाकतो,
मी जीवन जगण्यास सुरुवात केली,
श्वास मान वर करून घेतला शांत झालो ,
पाउल वाट मातीनुसार अस्तित्व बदलू लागली ,
वाट जीवन जगण्याची होती ,
परिस्थिती बदलत होती त्याप्रमाणे
मानसिकता बदलण्यास सुरुवात झाली
आज शांतीवन बोलतंय ‘’ माझ्या अवतीभोवती वावरणाऱ्या माणसांना सांगा कि , माझ्याशी बोला त्यांना माझ्याशी connect करा . प्रात्यक्ष / अप्रत्यक्ष पाने संवाद साधून राहणाऱ्या माणसांना स्वत:हुन संवाद केला .
माध्यम वेगळी असतात connection घडवून आणता नाही येत नैसर्गिक ( natural ) झाल्यावर जुळतात .
खिडकी वर आलेला पक्षाला खान देवून conditioned करू नये त्याच्या संवेदना जाणाव्यात ।
गर्भाची धारणा हि आईच्या पोटात होते ,
सृजनशील विचारांची धारणा हि Theatre of Relevance च्या प्रोसेस मध्ये होते …
चैत्यन्य अभ्यास
माझा चेहरा हा तेजस्वी झाला आहे त्यामध्ये मला माझ अस्तित्व झळकत आहे
नदीच्या पात्रातून निघणाऱ्या वाफा या पाण्याच् अस्तित्व कायम ठेवत , आपल आकार विहीन अस्तित्व निर्माण करून अनंतात विलीन होऊन जातात ……
दुपारी जेवून आल्यानंतर आम्ही scene बसवण्यास घेतले संध्याकाळी ‘’ शो ‘’ आहे याची जाणीव होती आम्ही सर्वजण खूप alert पणे काम करत होतो . सर्वांनी मिळून झोकून दिल होत स्वत: ला बघता बघता वेळ आली आणि तोपर्यंत आम्ही सर्व जन तयार झालो होतो आता मी जाणीव पूर्वक alert राहत होतो मग , एक मुलगा आम्हाला नेण्यासाठी आला आम्ही सर्वजण बोर्डिंग कॅम्प कडे चालत गेलो त्यादरम्यान आम्हाला रस्ता तोच जाणवत होता . फक्त परिस्थिती वेगळी होती चालत जाताना युद्धासाठी जात आहोत असा पायांचा आवाज येत होता . त्या ठिकाणी पोहचल्यावर सरांनी वातावरण निर्मिती खूप विचार पूर्वक आणि जबरदस्त रित्या केली
त्यावेळी समजल एका कलाकाराला आपल्या कलेच दर्शन आणी व्यापक्ता समजावयाची आहे . मग पहिल्यांदा त्या कलेसाठी वातावरण निर्मिती करून त्याकलेच दर्शन घडवावे .
‘’ परिस्थितिनुसार वातावरण निर्मिति करुण निर्माण केलेली कला पोहचवण्यासाठी आपल्या कले
च्या शोभतेसाठी जाणीव पूर्वक निर्माण केलेली परिस्थिति हे कलेच महत्व , दर्जा आणि शोभा वाढवते .
‘’ परिस्थिती बदलल्यानंतर वातावरण त्या परिस्थिती जनक वातावरण निर्माण करण्याच भान हि एक आर्ट आहे ‘’’
माझी कला हि बाजारात विकत घेन्याएतकि सोपी नाही आहे आहेत ते तत्व जाणावेत मग पुढे बोलू ….
ध्येय समोर आहे वातावरण कितीही बंडखोर आहे अशा परिस्थितीतून मार्ग काढणारा एक ‘ खलाशी ‘ हा एकच आहे
सहजतेने आकार घेणे इतके सोपे आहे कि , माझ्या शरीरातील dmension आणि fold जाणीवपूर्वक अभ्यास करून सादर कारण म्हणजे एक art आहे .
आम्ही त्याठिकाणी हून पुन्हा आलो आपले अनुभव सांगण्यास सुरुवात केली खूप छ्यान आणि प्रसन्न वाटत होत आम्ही रात्री झोपलो सकाळी उठलो आणि सकाळीच चैतन्य अभ्यास करण्यासाठी बाहेर पडलो . तिकडून आल्यानंतर चा अनुभव जबरदस्त जाणवत होता . सकाळी ९. ३० वा . आमचा शो लहान मुलांसोबत होता . एक लहान मुल म्हणजे ५ समजदार माणसे एवढ प्रत्येक जन चपळ होते पाहिलं सरांनी त्यांच्या साठी वातावरण निर्मिती केली . आणि ती जबरदस्त होती .
‘’फुलांना आपल्या सुगंधाची , आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देन हे सूर्य आपाल्या मंजुळ स्पर्शाने करतो ‘’
खडतर मार्ग ,नवीन रस्ता किचकट वाटेवर चालल्यानंतरचा मिळणारा अनुभव व त्या जगलेल्या अनुभवाचे सोने फक्त ध्येय प्राप्तीच्या सुखापेक्षा ,मनस्पर्श , अनुभवी आणि शांत असतो .
‘’ सांस्कृतिक क्रांती , सांस्कृतिक चेतना देणारा योगी हा नेहमीच सत्तेतील विचारांची बंडखोरी करतो आणि आपल्या तत्वांनी जीवन जगायला शिकवतो त्याची व्यापकता हि निर्मल आहे ‘’
‘’ सृजनतेचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येक क्षणी लहान बाळ व्हावे लागतेय ‘’
‘’ मी आणि माझ बालपण पडणाऱ्या धुक्यांत , फुलांतील दवबिंदू वर मला पहायला मिळते ‘’
‘’audience नेहमी कलाकाराला alert राहण्यास शिकवतो ‘’
माझ्या कलेची व्यापकता हि निसर्गातील फुलांत , खेळणाऱ्या मुलांत ‘’ सुकून गेलेल्या आजोबांच्या डोळ्यांत , निसर्गातील चराचरात, मानवी जीवनात पहायला मिळते आणि त्यांच्या मनातील अस्तित्वाचा शोध म्हणजे माझ्या कलेच सार्थक झाल्याचे समाधान जाणवते ‘’
आज शांतीवन बोलू लागले निसर्गातील आणि माणसातील नात तयार होवून ऐकण्याच्या प्रक्रियेत सहभागी झाला ‘’ माझ मन हसू लागले , बोलू लागले , नाचू लागले , खेळू लागले , आनंदात आपल्या आत्माचा सहभाग करून गावंडे गुरुजींच्या माध्यमातून प्रस्थापित करू लागले आपली संवेदना - कला आणि कलेची सृजनशीलता दवबिंदू सारखी चमकवू लागली ‘’ माझ्या मनातील अस्तित्व स्वत:ह संगे वाऱ्या सारखे भ्रमण करू लागले , माझ्या अस्तित्वा बाहेरील अस्तित्व माझी ताकत दाखवून सोबत राहून फिरून मला परिस्थीची जाणीव करून शेपटी हलवून नाचत पुढे जात आहे . भ्रमण आणि परिस्थीची सामारोप्ता आपल्या डोळ्यात भरून मानवी सभ्यतेचे आकार त्याच पलीकडे नदीत असणार्या पाण्यातून निघालेली वाफ हि सूर्याच्या किरणाच्या लयात सूर्याची व्यापकता दाखवण्याचा भास करत वसुंधरा नृत्य करत स्वत:ची प्रतिमा मिरवत होती . अस्तित्वाची जाणीव होण्यास सुरुवात होऊ लागल्याने नकळत शंभरकर आपल्या मनातील भावना ह्या ओल्या करत होता . कळत नकळत vibration स्वत: मध्ये ठेवून डोळ्यात न आणता शांत आपल्या विचारातून स्वत : ला शोधण्यास सुरुवात करताना जाणवला निसर्गात भ्रमण करताना स्वत: मधील artist चा विस्तार body movement मध्ये fold ची जाणीव झाडाचे आकारमान त्याची प्रसन्नता त्याच्या फांद्या आणि बुंध्याचा विस्तार हा वर खोकला असला तरीही तो खूप जाणीवपूर्वक परिस्थीचा आनंद घेत होता . ओल्या शेवालावरून चालताना पायांची रफ्तार जाणीवपूर्वक पाय टाकत होती भावना ह्या पाण्यासारख्या आहेत त्या परिस्थितीनुसार आपला रंग आणि त्याची चालण्याची पद्धत बदलत असतात पुरामध्ये त्या एकदम तीव्र असतात. पूर ओसरून गेल्यावर आपल्या रिदम वर वाहू लागतात . हिवाळ्यात शांत असतात आणि कोणीही नसताना त्या कोरड्या पडतात मग ते सूर्याला व चंद्राला आपलस करून घेतात हे बांबूच्या बेटातून दिसू लागले आपले भूतकाळ हे काळानुसार पुढे येतात त्यांना भूत समजू लागतो . माझ्या अस्तित्वाची जाणीव हि याच वातावरणात मला पहायला मिळते , तेच अस्तित्व हे machanikal जगात आणि माझ्या ग्रहांच्या जगात ज्या ठिकाणी मी माझ्याशी बोलत असतो जिथे कोणीही नाही माझ मन आणि मी ‘’ आत्म साक्षात्कारच अनुभव ‘’ घेत असतो याच अनुभवांच्या शोधात मी जंगलातून माझ्या विचारांच्या प्रभावातून त्याचा आनंद घेत मी पुढे निघालो माझा लय पकडत , माझ्याच धुंदीत ज्याठिकाणी सूर्य आणि चंद्र हे एकाच वेळी दिसतात . ‘’ this is beauty of earth ‘’ आणि creadit पितृसात्तात्म्क विचार घेतात चंद्र आणि सूर्याप्रमाणे त्याठिकाणी त्याच वातावरणात माझा मी प्रवास करत आनंदात स्पर्श करत झाडांना , पक्षांना , जमिनीला माझ्या हृदयाला जिथं माझ मी मानतो त्याठिकाणी ते माझ नाही आहेत ते कोणाच तरी फार्म house आहे आणि असे विचार ते ज्याची सीमा नव्हती ते माझ होण्यासाठी ते विचारांचं गेट उघडून मी माझा आस्वाद घेत जीवनाचे नवचैतन्य , नव उमेद , माझा रिदम घेवून परीस्थितीसोब्त प्रवास करण्यास सुरुवात केली आहे