स्वत: ची वेगळी अशी ओळख असावी असे प्रत्येक व्यक्तीला वाटत असते . ही , वेगळी ओळख म्हणजे नेमकं काय हे शोधण खूप महत्वाचे असते .नाहीतर व्यक्ती फक्त वेगळं जगतोय याच नादात स्वतः च आयुष्य संपवून टाकतो . या सामान्य माणसाच्या ..सामान्य अशा चक्रामध्ये अडकून जातो . ज्या ठिकाणी फक्त जीवन जगण्यासाठी पोटभरण्यासाठी जीवन जगण्याचा ध्यास सुरू होतो . आपली ओळख सामान्य होऊन जाते ती विशेष अशी होत नाही .
थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत मधील हे महत्वाचं शिबीर जे 6 ते 10 ऑक्टोबर 2017 मध्ये शांतीवन, पनवेल. इथे झाले . या शिबिराच वैशिष्ट्य म्हणजे या शिबीरात कलाकाराच्या व्यक्तीमत्वावर काम सुरू झाले . थिएटर ऑफ रेलेवन्स ची ही वेगळी प्रक्रिया महत्वाची वाटली . रंगभूमीवर कोणता असा दिग्दर्शक मी पाहिला नाही . जो कलाकाराच्या व्यक्तीमत्वावर काम करण्यासाठी चिंतन करेल . रंगचिंतक मंजुल भारद्वाज हे एकमेव रंगकर्मी आहेत जे कलाकारांच्या व्यक्तिमत्वावर नेहमी काम करत असतात . ते चिंतन व प्रक्रिया या माध्यमातून कलाकारांना त्यांच्या भोवती निर्माण झालेल्या कोशातुन बाहेर काढण्यासाठी कार्यरत असतात .
एक व्यक्ती म्हणून त्याला खंबीरपणे उभ केल्यावर कलाकाराची व्याप्ती वाढते . अशा वेळेस व्यक्ती मजबूत होतो . तत्वाने जगू लागतो आणि आपली एक वेगळी छाप पाडत असतो .
या कार्यशाळेत झालेलं वेगळं पण म्हणजे , ओळख आपण निर्माण करायला सुरुवात करतो . त्यावेळी आपण नक्की काय करतो ? नक्की कुठे अडकतो ? या प्रश्नावर मंजुल सरांनी अभ्यास करायला सांगितले . स्टेज वर एका रांगेत एक - एक खुर्ची ठेवायला सांगितले . त्यामध्ये, प्रत्येक खुर्ची ठेवत असताना तिला प्रस्थापित रंग भूमीवर लागणाऱ्या घटकांना नाव दिले .
नंतर त्या खुर्च्या रांगेत लावलेल्या होत्या एक नाटक पाहत असताना कोण - कोणते घटक त्याच्यात समाविष्ट असतात . ते सर्व दिसू लागले . त्यामध्ये , लेखक , दिगदर्शक, लाईट्स ,म्युजिक, प्रोड्युसर, कलाकार आणि प्रेक्षक मग, हे सर्व घटक एक आपली ओळख करून बसलेत. माझी ओळख कशी निर्माण होईल हा प्रश्न सरांनी विचारला त्यामध्ये , एक तर या खुरच्यांनच्या एकदम पुढे खुर्ची ठेवून बसने नाहीतर , त्या सर्व खुरच्यांच्या वर जाऊन बसने . पण , जे प्रस्थापित आहेत वर्षानुवर्षे , ते मला बसून देतील का ? नाही देऊ शकणार ...कारण, व्यवस्था बनलेली असते . बनलेली व्यवस्था तोडून नवीन व्यवस्था बनवत असताना ..ज्यांनी व्यवस्था बनवली आहे ती लोक शांत तर नाही बसू शकत ती लोक त्याला पुढे जाऊन देत नाहीत ....रंगभूमीवर ज्यावेळी रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांनी आपली ओळख निर्माण करायला सुरुवात केली . त्यावेळी प्रस्थापित रंगभूमीवर लेखक, दिगदर्शक, कलाकार, नैपथ्य ,म्युजिक ,प्रेक्षक या सर्व भूमिका होत्या ..

मग, वेगळे पणा म्हणजे नेमक काय ? काय वेगळी ओळख करता येईल या चिंतनात ... मंजुल भारद्वाज यांनी या रंगभूमीवर चिंतनाची भूमिका आणली .. वेगळी ओळख - नवीन दृष्टी कलाकारांसाठी दिली . ही वेगळी ओळख म्हणजे " रंगचिंतक " आहे .
प्रस्थापित रंगभूमीवर लेखक, दिगदर्शक, कलाकार,नैपथ्य, म्युजिक ,प्रेक्षक या सर्वांच्या भूमिके मध्ये बसून त्या त्या खुर्ची ची व्याप्ती आणि खोलवर भूमिका जगल्यानंतर एक चिंतकाची भूमिका निर्माण होते . जेथे रंगचिंतक रंगभूमीवर केवळ एकाच भूमिकेतून न पाहता तो रंगभूमीसाठी कोणता विचार देतोय ,रंगभूमीच्या विकासासाठी काय करतोय , एक राष्ट्रव्यापी कलाकार म्हणून आपल्या राष्ट्रात घडत असणाऱ्या होत असणाऱ्या राजनैतिक , आर्थिक आणि सामाजिक स्तरावर आपले कर्तव्य समजतो ...आणि त्या कर्तव्यांवर जगतो . सतत चिंतन आणि मनन प्रक्रिये मध्ये असतो आणि सकारात्मक बदलासाठी या जनमाणसात नवीन कलाकृती घेऊन येतो . त्याचबरोबर , एक कलाकाराच्या भूमिकेत असताना एक व्यक्तिमत्व म्हणून सहजतेने जगतो . ही रंगचिंतनाची दृष्टी मंजुल भारद्वाज यांनी या रंगभूमीला दिली ..त्याचबरोबर रंगचिंतकाची भूमिका या रंगभूमीवर जिवंत राहण्यासाठी ते सतत ती दृष्टी आपल्या कलाकारांमध्ये निर्माण करत असतात ...वेगळी ओळख म्हणजे केवळ स्वतःची ओळख न ठेवता त्याला विश्वव्यापी करणे आणि त्यातून एक वेगळी ओळख निर्माण करण्याची दृष्टी मंजुल भारद्वाज यांनी दिली ...

क्रमशः1....
रंगकर्मी
तुषार म्हस्के
No comments:
Post a Comment