शरीराचा योग्य उपयोग आपल्या कलेच्या माध्यमातून दाखवण्यासाठी थियेटर ऑफ रेलेवंस प्रतीबद्ध आहे . १९९२ पासून सुरुवात झालेला कलात्मक क्रांतीचा आंदोलन समाजात परिवर्तन करत आहे .हे दृश्य प्रभावी पणे माणसाच्या हृदयाला भिडणारे आपला विचार हा कृतीच्या माध्यमातून नाट्य रूपाने मंचावर मांडताना दिसते आणि त्यावेळी मनात कुतूहलाची थाप पडते ...
आम्ही नाटकात शरीराचा उपयोग नैपथ्य म्हणून करतो मानवी कलांनी सजलेली कलाकाराची आकृती नैपथ्य म्हणून दिसते ..मानवाच्या शरीराचे आकार हे अगदी सहजपणे आपला विचार दाखवत असतात ....
कलाकार मंचावर भूमिकेमध्ये प्रवेश करतो ...त्यावेळी तो आपल्या आकारातून आपला विचार पोहोचवतो ....नाटकामध्ये दृश्य एकदम मनाला भिडणारे वाटत असतात ...नदीच्या पात्रातील दगड दाखवायचे झाले तरी ...ते मंचावर आल्यानंतर दगडाच्या भूमिकेत आणि प्रेक्षकही ते समजून जातात कि हे दगड आहेत ... नाटकामध्ये नदीचा दृश्य आल्यानंतर खरोखरच नदी वाहत असल्याची जाणीव नाटक पाहत असताना होत असते ...
आणि प्रेक्षक स्वतःला त्या नदीच्या किनारी बसलेला पाहत असतो ..थियेटर ऑफ रेलेवंस नाट्य सिद्धांतामध्ये तयार झालेली नाटके ही प्रेक्षकांच्या मनाला भिडणारी जाणवतात ...कारण , नाटकामध्ये विचार असतात ...त्याच बरोबर दृश्य रचना ...कलाकाराला आपली कलाकृती सादर करण्यासाठी उन्मुक्ततेने आपल्या शरीराचा उपयोग करुन केलेला उन्मुक्त प्रवास आणि त्याचं सादरीकरण पाहयला मिळत ...
कलाकार भूमिकेतील विचाराना पकडतो आणि आपली भूमिका सादर करत असतो ... दृश्य रचनेमध्ये गाव दाखवायचं झाल तर ते गाव डोळ्याना दिसत ...गावात असणारे घरे ...झाडे , पक्षी , रस्ता आणि डोंगर आणि त्या गावात काम करणारी माणसे हि ,दृश्य रचनेत बोलू लागतात ...शहरांच्या दृश्या मध्ये हि , आपल्या भूमिकेमध्ये असणारे कलाकार आपल्या शरीराच्या विविध आकाराने तयार केलेली आकृती हुबेहूब दाखवतात ...
रंगचिंतक - मंजुळ भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक म्हणजे एक क्रांती आहे . जी १९९२ पासून सुरु झाली आणि थियेटर ऑफ रेलेवंस सिद्धांत म्हणून जग प्रसिद्ध आहे ...जे नाविन्यासाठी प्रतिबद्ध आहे ....
रंगकर्मी
तुषार म्हस्के
तुषार म्हस्के
No comments:
Post a Comment