Thursday, 21 January 2016

सृजनशील जीवन जगणं हेच मंजुल भारद्वाज यांचे बहुभाषिक नाटक 'अनहद नाद - Unheard Sounds of Universe' चा ध्येय आहे. - म. झिं. गावंडे




शांतिवन 20 जानेवारी 2016

आज शांतिवनात श्री. मंजुल भारद्वाज यांचे बहुभाषिक 'अनहद नाद - Unheard Sounds of Universe' हे सव्वा तासाचे नाटक पाहण्यात आले . या पूर्वी पण त्यांचे एक नाटक मी पाहिलं आहे.श्री. मंजुल भारव्दाज स्वतः लेखक, कवी, दिग्दर्शक व निर्माते ही आहेत. त्यांची नाटके कलात्मक, सृजनात्मकवसकारात्मक असतात. ही कलाकृती मांडतांना त्यांचा गल्लाभरु दृष्टीकोन मुळीच नसतो.नाटकासाठी विषय निवडतांना तो जीवनाशी किती निगडीत आहे याचा ते विचार करतात. अशाच विषयात ते हात घालतात.
' वाँर अँड पिस ' हा विषय मांडतांना लिओ टाँलस्टाँय यांनी हाच विचार जगासमोर मांडला. जगाला शांततेची गरज आहे. मरते वेळी डाँ. मार्टिन लुथर किंग यांनी सुद्धा शांततेचाच संदेश दिला.
जग झपाट्याने विनाशाकडे जात आहे. पर्यावरण बिघडले. उत्पादन व पैशांच्या चढाअोढीत आम्ही स्वतः च स्वतः ला खाईत ढकलत आहोत. हीच गोष्ट श्री. मंजुल भारद्वाज यांना खटकते आणि तशी नाटकं त्यांच्या लेखणीतून उतरतात.
झाडं तुटली. डोंगर सपाट झाले. रेती, वाळू, दगड या खनिज संपत्तीचा ह्रास होत आहे. काँक्रीटची जंगलं वाढली. स्वार्थ ! निव्वळ स्वार्थ ! ही बाब जनतेच्या गळी उतरावी हाच भारद्वाज यांचा प्रयत्न आहे. कदाचित तो खारीचा ' इवलासा ' वाटा असेल पण तो अधिक महत्वाचा आहे.
सृजनशील जीवन जगणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे. विनाशाकडे जाणा-या स्वार्थी जगाला सावरण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. यासाठी त्यांना आणि त्यांच्या कलाकारांना हार्दिक शुभेच्छा !












आपला
म. झिं. गावंडे
आनंदयात्री (अमरावती )

No comments:

Post a Comment