Thursday, 27 August 2015

हे शिबीर माझ्यासाठी आत्मिक बळ देणारं .......

कोल्हापूर mily १४ ऑगस्ट २०१५ ते १८ ऑगस्ट २०१५

लेखक हा आपल्या विचारांतून सृष्टी निर्माण करत असतो... नाट्य लेखन हे समाजाला नवीन दृष्टी देऊन चेतना जागृत करत असतं… नाट्यलेखन कार्य शाळा मंजुळ भारद्वाज यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर या ठिकाणी झाली... या कार्य शाळेच आयोजन मेघा पानसरे यांनी केल होत या. ५ दिवसीय कार्य शाळेत मी अनुभवलेली माझी यात्रा …

१३ ऑगस्ट २०१५ ला दिवसभरात कामाची आवरा आवर करून दुपारी ३. ३० वाजता घर सोडलं. तब्बेत ठीक नसल्यामुळे शारीरिक weakness जाणवत होता.  मी ५ वाजता CST ला पोहोचलो…अनघा आणि योगिनीची वाट पाहत होतो. ट्रेन सुरु झाली आणि माझ्या प्रवासाची सुरुवात झाली. अनघा आणि कोमल या tor च्या प्रक्रियेत कोल्हापूर ला पहिल्यांदा येत होत्या. मी ‘गर्भ ‘या नाटकाच्या प्रस्तुतीवेळी आलो होतो…. ट्रेन मध्ये बसल्यानंतर सुखद आणि explorative प्रवास करताना कुतूहल वाटत होत. खिडकीच्या बाजूला बसल्याने समोर धावत असणारी local train आणि मी ज्या ट्रेन मध्ये बसलो होतो ती सह्याद्री express.... खूप छान प्रवास सुरु होता ...local कडे बघताना गर्दी जाणवत होती…

पण, express मध्ये seat reserved असल्यामुळे तशी त्याच्यात पुरेशी जागा हि होतीच आणि माझा एकदम आरामात सुखदायी प्रवास सुरु झाला. आज शिबिरात जाण्याचा अजेंडा होता कि राजकारण हा विषय समजून घ्यायचा आहे…कारण, राजकारण हा जीवनाचा एक गाभा आणि healthy राजकारण म्हणजे नेमक काय ते मला समजून घ्यायच आहे. Healthy राजकारणाची व्याख्या मला माझ्या जीवनात अमलांत आणायची आहे आणि सर्वांना दाखवून द्यायचं आहे कि राजकारण वाईट नाही आहे …. सतत मनात एक तळमळ आहे कि येणाऱ्या काळात भारताची राजनीती हि तरुणांच्या हाती यावी …. और जो बुजुर्ग बैठे है मलाई खाने उनको बोलना है…. आप हमे जीवन मे मार्गदर्शन करो …। राजनीती राजकारण हम खेलेंगे…और हमारा प्रधानमंत्री एक सच्चा युवक होगा …. जो जनहितार्थ काम करेगा … हे राजकारणाच abstract चित्र काढताना मी दिसतोय …. येणाऱ्या सततच्या दृश्यांना आता प्रत्यक्षात उतरवण्याची हीच वेळ आहे हे लक्षात आलं …. त्याच विचार चिंतनामध्ये मी कोल्हापूर ला पोहचलो … हि आमची युरोप टूर होती .या टूर मध्ये आम्हाला आमच्या वस्तूं पासून ते वेळेवर पोहचण या बाबतीत नियोजन करायचं ध्येय दिलं होतं ....हे समजून घेण्याची हि प्रत्यक्ष दर्शी वेळ होती. मी, कोमल आणि अनघा आम्हा तिघांची मिलिंद कदम यांच्या घरी राहण्याची व्यवस्था केली होती …त्या ठिकाणी आम्ही पोहचलो साधारणता ६:३० पर्यंत... मिलिंद कदम यांच्या घरी पोहचलो आणि ८:३० पर्यंत आम्हाला तयार राहायचं आहे हे सांगण्यात आलं. त्यानुसार आम्ही तिघांनी आपली तयारी केली आणि ८. १५ पर्यंत तयार झालो... आतापर्यंत आम्ही वेळेच्या बाबतीत धावपळ करणारे आज ८.३० वाजले आणि वाट पाहत बसलो होतो निघायची.... प्रियांका राउत ८.३० वाजता येणार होती तिची वाट पाहतोय.पण त्याच वेळी डूलका लागला आणि काही वेळानंतर प्रियांका आल्याचा तिच्या आवाजावरून समजल. मग उठलो आणि घड्याला मध्ये पाहिलं तर त्यावेळी ९.३० वाजले होते अरे बापरे आता काय करणार आता सर्वांची चंपी... मी नाश्ता केला आणि आम्ही वोर्क्शोपच्या ठिकाणी पोहचलो. आणि गपचूप जाउन बसलो त्यावेळी सर वस्तू आधारीत economy, सेवा आधारीत आणि विचार आधारीत economy या बद्दल सांगत होते वस्तू आधारीत हि व्यवस्था मराठी रंगभूमीची आहे.....ना त्यामध्ये विचार आहे, ना त्याच्यात तत्व आहे …. सेवा आधारीत व्यवस्था हि अक्टिंग आधारीत आहे …. आणि विचार आधारीत व्यवस्था हि आणि ती नेहमी संसाधन निर्माण करते आणि निरंतर कालापर्यंत सुरु राहते … 
नाट्यलेखनालाची आगळी वेगळी प्रक्रिया सुरु झाली.... लेखक आपले विचार आणि त्याला दाखवायची संकल्पना घेऊन बसला होता आणि आम्ही त्या नाटक लेखनातील पात्र होतो … सरांनी सांगितले चला रंगमंचावर जा आणि सगळे रंगमंचावर फिरा … आम्ही रंगमचावर फिरण्यास सुरुवात केली त्यावेळी लेखनाची नवीन दृष्टी सर आम्हांला देऊ लागले ... रंगमंचावर वावरत होतो... नंतर मंचावर झोपायला सांगितलं आम्हाला….लागेल तेवढी जागा घेतली होती ...त्यावेळी प्रत्येकजण आपल्या व्यक्तिमत्वाचे पैलू दाखवत होता …. आणि तिकडून सामान्य विचारसरणी सुरु झाली आणि सामान्य माणूस आपल्या जबाबदारी पासून लांब जाताना दिसत होता …. मला एवढीच जागा पुरेशी आहे … माझी लायकी नाही आहे … मला एकट्यासाठी एवढी जागा पुरेशी आहे …. नाही जमणार …. अशा पद्धतीने सर्व सामान्य पळ काढताना दिसत होते... वाटत होत पूर्वीच्या काळी आपल्या कर्तव्यापासून लांब पळाल्यामुळे कोणा एका व्यक्तीची महत्वकांक्षा जागी झाली आणि त्याला जोड स्वार्था ची मिळाली आणि त्यातून राज्य निर्माण करण्याची इच्छा निर्माण झाली आणि तेव्हा पासून भांडवलशाही आणि सामंत शाही उदयास आली... नाट्य लेखनाच्या या कार्यशाळेत मनात असलेल्या राजकारणाविषयीच्या संकल्पना समजत होत्या आणि त्याच क्षणी मंचावर उभा राहून आपलं character समजून घेत होतो...
साम्यवादी विचार म्हणजे काय? हा प्रश्न गेले कित्तेक दिवस मनामध्ये आपली जागा निर्माण करून बसला होता ….एखादा व्यक्ती आहे त्यानुसार त्याला accept करण त्याचा स्वीकार करण … कारण प्रत्येक व्यक्तीच एक अस्तित्व असतो आणि त्यानुसार त्या व्यक्तीचा स्वीकार करण खूप महत्वाच आहे आणि निसर्गात दिसणार्या सर्व वेगवगेळ्या पद्धतीचे झाडे, वृक्ष , वनस्पती याना आपण आहेत त्या पद्धतीने स्वीकार करतो . त्याच पद्धतीने आपल्या आजूबाजूला असणारी परिस्थिती ला स्वीकार करण हि साम्यवादी व्यवस्था शिकवून जाते … आणि त्यामध्ये एका विशिष्ट्य फलाच आणि झाडाच पिक आपण त्याच्या फायद्यानुसार घेतोय तर त्या ठिकाणी भांडवल शाही व्यवस्था होवून जाते... आणि साम्यवादी व्यवस्था हि सर्वांच्या हिताच काम करते …. त्याच वेळी मनात एक प्रश्न आला हि साम्यवादी व्यवस्था पहिली भारतात असेल का? …. जर होती तर मग आता साम्यवादी नाव काढल्यानंतर फक्त कार्ल मार्क्स च नाव घेतल जात आणि आपल्या देशातील लेकाना ते मान्य आहे … पण, अभ्यास केल्यानंतर असा समजत हि व्यवस्था भारतात पूर्वी होती …. मग एका व्यक्तीच्या नावाने हि व्यवस्था घेतल्यामुळे या व्यवस्थेला राजकारणाचा रंग चढतो आणि त्यातून मग राजार्णातील पक्ष समोर येतात आणि त्याच्यातून याला वेगळीच दिशा मिळते …. सर्वाना समान अधिकार आहेत आणि तेच समान अधिकार रुजवण्याच काम साम्य वादी व्यवस्था करून देते.. त्यावेळी साम्य वादी व्यवस्था आणि त्या व्यवस्थेच म्हत्व मला समजले …. 
सामुहिक बसून स्क्रिप्ट लिहण त्याच्यातून thought बरोबर सतत राहता आल ….नाट्यलेखन करताना precise होन खूप गरजेच आहे कि मला आता यामधून काय दाखवायचं आहे.… ती चौकट शोधन आणि त्या चौकटीत दिसणार चित्र आपल्या शब्दांनी रेखाटन …. आणि सृजनात्मक काम करताना relax राहिल्यामुळे ध्येयाकडे लवकर पोहचता येत….. 
एकाच वेळी पाहत होतो कि लेखक आपले विचारांना कशा पद्धतीने दिशा देत आहे …. तर समोरील बाजूला असणारे कलाकार आपली भूमिका समजत आहेत.  मंचाचा वापर करण्याची दृष्टी लेखक पाहत होता. तर दुसर्या बाजूला नाट्य लेखनाच शिल्प विकसित करत होता …. Character म्हणून उभा असताना काही वेळा लेखकाच्या मनातील संवाद आपोआप तोंडातून येत होते …. त्यामुळे विचारांच्या पायावर निर्माण होणारी स्क्रिप्ट हि आपली तात्विक बाजू सहज मांडताना दिसत होती... स्क्रिप्ट जशी वेगात पुढे जात होती त्या पद्धतीने मनात विचारही पुढे जाताना दिसत होते आणि लेखकाच्या बाजूने विचार केल्यानंतर लेखक हा काळाला बांधत असतो त्यानुसार त्याची जबाबदारी त्याने समजून दिशा देण्याच काम करणे गरजेच आहे …. त्याच वेळी नाटकातील एक दृश्य उभा राहिला आणि समजल ‘’ yes….that is change…. आणि त्याच वेळी नाटकातील पात्राने आपली जागा घेतली आणि अभिमानाने अन्यायाच्या विरोधात उभा राहून आपलं कुरुक्षेत्र निर्माण केला आणि त्या कुरुक्षेत्रामध्ये त्याने निर्णय घेतला आणि आपल अभिव्यक्त स्वातंत्र त्याने मिळवल … आपल स्वातंत्र त्याने मिळवल … आणि चालत आलेली संस्कृती आणि परंपरा त्या पात्राने मोडल्या…आपला निर्णय घेवून एक प्रेरणा बनली …. त्याच वेळी मन एकदम शांत झाल होत …. आणि दर्शक म्हणून आम्ही समोर बसलो होतो त्यावेळी माझ्या मनात प्रश्न निर्माण झाले आणि त्या प्रश्नांमध्ये एक नवीन विचार ठोस झाला हे नाटक एक जनआंदोलन आहे …. हि नाट्य लेखनाची प्रक्रिया खूप वेगळी आणि चेतना जागृत ठेवणारी भासू लागली …. आता पर्यंत अशी नाट्य लेखन पद्धती मी पहिल्यांदा पाहिली होती …. संध्याकाळी ६ वाजे पर्यंत सर्व दृश्य हे उभे राहिले ...एवढ्या कमी वेळात घडणारा हा बदल लेखनाच्या बाबतीत खूप अविस्मरणीय भासू लागला …. त्याच बरोबर मनामध्ये एक संघर्ष तर सुरूच होत होता ….

दरम्यान अनहद नाद मधील जननी चा performance, कितनी मातये आणि कोलंबस चे performance होत होते आणि ते मला रंगमचावर perform  करण्यासाठी empower करत आहेत हे सतत जाणवत होत ... होणारा प्रत्येक performance  हा नाविन्य पूर्ण जाणवत होता कारण performer मंचावर उभा राहिल्यानंतर एक positive vibration  निर्माण होताना सतत जाणवत होत... मंच दर वेळी बदलत होता त्याच बरोबर त्याची सौंदर्यता हि खूप वेगळी आणि प्रफुल्लीत करणारी जाणवत होती ....कोल्हापूरला आम्ही shopping करण्यासाठी गेलो... बाजारामध्ये असणार  महालक्ष्मी च मंदिर... लागलेली भक्तांची लाइन आणि त्याच बरोबर देवीच्या दर्शानासाठी उभे राहणारी लोकांची गर्दी हि खूप वेगळी भासत होती … कारण लक्ष्मी मातेच मंदिर आणि मंदिराच्या गाभार्यात मातांना प्रवेश नाही …. हो मनाला नाही पटत तरीही ते सत्य आहे नाटकामधील एक दृश्य तेच होत... मंदिराच्या गाभार्यात स्त्रीला प्रवेश नाही आणि आपण मातेच मंदिर म्हणतो तर त्यांना आत प्रवेश का नाही …. म्हणजेच.., हा प्रश्न कोणाला विचारला तर …. नाही ते पूर्वी पासून असंच चालत आलय … हे असंच चालणार …नाट्यलेखन करताना पडलेला प्रश्न होता स्त्रीला आपण माता म्हणतो आणि मातेच्या मंदिरात मातांना प्रवेश नाही हे काही पटत नाही … म्हणजे, माता बोलून नक्की दाबून ठेवत तर नाही ना!…. असा प्रश्न डोळ्यासमोर निर्माण झाला …बाजार पेठांच्या पुढे एक तलाव होत त्या ठिकाणी संध्याकाळची वेळ आणि लहान, मोठे , तरुण , तरुणी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी जमले होते …

                                             

             एका बाजूला मनात विचार आला 'बाजूला असलेल्या मंदिरात जे समाधान मिळत नाही ते निसर्गात गेल्यानंतर सहज मिळतं आणि निसर्ग नेहमी आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत असतो' …दुसऱ्याबाजूला असंही वाटत होत कि आता जो विकास होतोय तो विकास समाधान देऊ शकत नाही...आणि समाधाणासाठी लोक समुद्र किनारी, नदीच्या किनारी आणि समुद्राच्या ठिकाणी जातात आणि ज्याठिकाणी सूर्य चंद्र दिसेल अस ठिकाण …. मग, विकास करून काही फायदा आहे का? आणि कशाचा विकास? Development झाल्यानंतर देखील समाधान मिळत नाही आहे तर अशा विकासाला काही अर्थ आहे का ? …. हा प्रश्न मनामध्ये निर्माण होऊ लागला.… 
सकाळी ६.३० वाजता आम्ही मेघा पानसरे यांच्या घरी भेटलो आज आम्ही चैतन्य अभ्यास करण्यासाठी जाणार आणि चैतन्य आभ्यासाच चैतन्य नेहमीच स्वतःला स्वतःशी जोडत असतं …. मी या चैतन्य अभ्यासाला नाव दिल नाटककाराच्या चैतन्य अभ्यासाचं चैतन्य … कोल्हापूर university चा campus खूप मोठा होता त्या campus मध्ये आम्ही जायला निघालो … रस्त्याचा आकार आणि त्याची उपयोगिता यांचा शोध घेण्यास सुरुवात केली …. मानवनिर्मित रस्त्यावर ते जाणीवपूर्वक बांधले होते … ते काटकोन त्रिकोणामध्ये दिसत होते पण रस्त्याची व्यवस्थित बांधणी न केल्यामुळे येजा करणाऱ्या वाहनांमुळे उडणारी धूळ यांमुळे होणारा त्रास खूप भयानक वाटत होता …. पुढे चालत गेल्यानंतर मानवाने बांधलेली मोठ - मोठे बंगले होते ...एक बंगल्यावर लिहील होत ’’ प्रसन्न ‘’ परंतु बंगल्याकडे पाहताना असं वाटत नव्हत कि तो प्रसन्न आहे. बंगल्याकडे पाहिल्यानंतर एकही अशी गोष्ट नव्हती जी मनाला सुख आणि समाधान मिळवून देत आहे …. काही बंगल्यांच्या बाहेर लिहील होत कुत्र्यांपासून सावध रहा …. माणूस एवढा प्रगती करत आहे कि त्याला माणसाचीच भीती वाटत आहे …नक्की विकास करतोय कि माणुसकी विसरतोय आणि माणुसकी सोडून नक्की कशाच्या मागे जातोय? हा प्रश्न मनात निर्माण झाला …university च्या बाहेरच NSS चा कॅम्प लागल होत आणि त्या ठिकाणी रणगाड्या आणि युद्धाची ट्रेनिंग देण्यासाठी तो कॅम्पस होता …. ज्याठिकाणी विद्या आहे त्याठीकाणी रणगाड्यांचा प्रशिक्षण? ....खूप वेगळ आणि मनाला न पटणार दृश्य डोळ्यांसमोर दिसत होत … विद्यापीठामध्ये आल्यानंतर दोन रस्ते होते एक म्हणजे डांबरी रस्ता आणि दुसरीकडे असणारी पायवाट... त्यावेळी मेघा ताईंनी सांगितल या पायवाटेने मी प्रवास करते … मग आम्ही त्या रस्त्याने चालत आतमध्ये प्रवेश केला …

 समोर धावत असणारे मोर …. आपल्या आवाजाने ते आम्हाला बोलावत होते … वातावरण एकदम नादमय वाटत होतं... हिरवगार गवत त्यातच पक्षांचा येणारा आवाज हा खूप आगळा वेगळा आणि करणारा वाटत होता … शांतीवन मध्ये फिरत असल्याचा भास …निसर्ग नेहमीच आपलसं करत असतो आणि जस जस त्याच्या मध्ये मी जात होतो तेवढच समाधान मला मिळत होतं…

आज निसर्ग हा माझ्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आणि घटक होऊन बसला आहे … गवतावर पडलेले दवबिंदू चमकत होते … पुढे चालत आल्यानंतर एक गृहस्त चालत येताना दिसले आणि त्यांच्याशी सहज सरांचा संवाद झाला आणि ते सांगू लागले या campus मध्ये मी काही झाडे लावली आहेत ...इतकं बोलून ते पुढे निघून गेले …. लाजाळूची काही झाडे होती त्यांना हात लावल्या नंतर ती झाडे आपली पाने पटकन मिटत होती ….पुढे गेल्यानंतर झाडांनी घेतलेल्या वेगवेगळ्या आकारांना पाहत होतो नंतर आम्ही जाउन झाडाच्या पायथ्याशी बसलो …


जणू झाडांनी आपल्या फांद्यांनी आम्हाला बसण्यासाठी मांडव तयार केला होता आणि आम्ही खाली बसलो होतो....शांत आणि थंडगार असलेली जमीन, येणारी थंडगार हवा मनाला प्रसन्न करत होती …. मला जाणवत होतं मी आनंद घेत नाही आहे ...सतत जाणवत होत.... कारण, मनात येणारे विचार मला त्यांच्या मध्ये गुंग करून ठेवत आहेत अस भासत होत.… काही क्षणाला मी त्याचा अनुभव घेत होतो तर काही क्षणाला मी शांत होऊन जात होतो माझ्याच विचारांत …. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी शरीराने असणं आणि मानसिक दृष्ट्या त्या ठिकाणी नसणं ….त्याच प्रश्नाच उत्तर शोधत आहे हे माझ्या लक्षात येत होत … पुढे आल्यानंतर मानवनिर्मित तलाव होता पण त्याठीकाणी पाणीच नव्हत आणि ज्या ठिकाणी पाणी होत त्या जागेचं योग्य पद्धतीने नियोजन केल नव्हत.... त्यातून एवढ समजत होत कि, आता पर्यंत शासन जी कामे करतोय त्याच्या मध्ये व्यवस्थित अस नियोजन नसल्यामुळे नको त्या ठिकाणी पैसा लाऊन फक्त टेंडर पास करून दलालानी आणि मंत्र्यांनी फक्त पैसे खाल्ले आहेत …. पुढे चालत आल्यानंतर आम्हाला जाताना भेटलेल्या युवकाने सरांना आवाज दिला आणि ‘’ ओ भाऊ इकडे या ‘’ काय पाहिलत?

   त्याच्यानंतर संवाद साधण्यास सुरुवात झाली … आणि कलाकार आपल्या कवितांचा नजराणा आमच्या समोर मांडत होता …. मनातील सर्व भाव, दुख:, त्रास आणि असणारी तळमळ त्याने कवितेत मांडली होती …. त्याने आपल नाव सांगीतल … कलाकार म्हणून सरांनी त्याच स्वागत केल …त्याच्या कलाकार वृत्तीला सरांनी स्वीकारलं...त्यातच त्याच विद्रोहाच रूप हि दिसत होत... त्या रुपाला न हात लावता त्याला सरांनी दिशा देण्याच काम केलं… त्याला एक दृष्टी दिली आणि अनहद नादचा त्यांच्यासाठी performance करण्याच ठरलं … हा संवाद vibrational जाणवत होता…. रंगकर्मी ज्यावेळी निसर्गात आपला शोध घेत असतो त्यावेळी प्रेक्षक समोरून बोलावतो आणि त्याचा अनुभव सांगत असतो आणि त्यामध्ये तल्लीन होऊन जातो … आणि रंगकर्मी हा आपल्या विचारांतून त्याला दिशा देत असतो...जगण्याची नवीन दृष्टी देत आपल रंगकर्म करत असतो आणि हि प्रक्रिया मी फक्त थियेटर ऑफ रिलेवन्स नाट्य सिद्धांता मध्येच पाहिली आहे …. पुढे आनंदात उड्या मारत आम्ही चालत पुढे आलो आणि समोर दिसणारा रस्ता हा आकाशात उडताना दिसला …. जाणवत होत हा विमानांचा runway आहे आणि abroad ला आम्ही जाण्यासाठी तयार आहोत …. त्यातून मनाला कुतूहल जाणवत होत …. University च्या गेट बाहेर आल्यानंतर दोन मुली रस्त्याच्या बाजूला बसल्या होत्या … त्यावेळी सरांनी त्याना alert केल …. आणि public place मध्ये बसल्यानंतर आपण आजूबाजूच्या परिस्थितीवर लक्ष देत आणि जाणीवपुर्वक बसायला हवं ह्याची जाणीव करून दिली … कारण त्यावेळी आपल्या आजूबाजूची परिस्थिती हि आपल्याला नेहमी alert राहण्यास सांगत असते …. 


प्रेस conference होती...आम्ही अनुभवलेली प्रक्रिया आणि नाट्यलेखन प्रक्रिया सांगायची होती.. त्याची तयारी आणि अनुभवलेले अनुभव यांच मनात चिंतन होत …. पत्रकार आले प्रेस conference सुरु झाली मेघा ताईंनी प्रस्तावना केली …माझ्या जीवनातील पहिली conference होती त्यामुळे मी खूप शांत बसलेलो …. 



जीवनातील स्वप्नात कधी पाहिलेले क्षण एका वर्षापासून सतत डोळ्यासमोर येत आहेत घडत आहेत आणि ते क्षण पाहताना अस वाटत कि हे स्वप्नात तर घडत नाही ना????…एका वर्षापासून मनात रुजवलेले बीच आता हळू हळू अंकुरायला लागले आहेत याच मनात एक समाधान आहे …आता प्रश्न फक्त एकच आहे जो मला सोडवायचा आहे …. मनात येणारे विचार आता आत्मसात करून त्यांना आमलात आणणं…. या नाट्यलेखन शिबिरात जाणवत होत अनहद नाद च exploration सुरु आहे …. आणि शिबिरामध्ये आलेल्या प्रत्येक कलाकारामध्ये एक ताजगी निर्माण झाली आहे …. मनातील भाव घेऊन जगत आहेत …. प्रत्येक जण स्वतःशी संघर्ष करत आहे …तत्वांना घेवून निर्माण झालेली हि संरचना विश्वव्यापी असल्याने त्यातील प्रत्येक घटक या स्क्रिप्टशी जोडलेला आहे ….



TOR च्या प्रोसेस मधील कोल्हापूर मधलं हे शिबीर माझ्यासाठी आत्मिक बळ देणारं ठरलं …

Tuesday, 11 August 2015

गुलाब की खुशबु...

खुशबु इसकी दिल में समां जाती है...
बहुत रूप है इस के ...
इतिहास से जोड़कर इसकी खुशबु अत्तर सी महकती है...
इसका रूप ताजगी देता है...
प्रेम का पर्याय बनकर दिलों में खिलता है...
फूलोंका राजा बनकर खुली सांस का निर्माण करता है...
आयुर्वेदा में इसका बहुत महत्व है...
इसका जल आँखों को ठंण्डक देता है...
समाज के कांटो में यह खिल जाता है...
उसी समाज को सुगंधित कर देता है...
साहित्य में इसका विशेष महत्व है...
कवी की कल्पना में तरंगित हो जाता है...
विश्व में विविधता का प्रतिक हो जाता है...
कभी बचपन की यादें बिखेरता है...
तो बुढ़ापे में यादों का मंजर हो जाता है...
गुलाब की खुशबु शरीर में प्रेम का निर्माण कर जाती है....

~ तुषार म्हस्के

Friday, 7 August 2015

मेरा इश्क़...

एक अहसास जीने की प्रेरना देता है....
एक अहसास दिल में आग लगाता है...
आँखों से बातें करवाता है...
एक अहसास मेरी धड़कन बढ़ाता है...
एक अहसास मुझे अपने से जोड़ता है...
किसी की चाहत ना होगी मेरी चाहत दुनिया बदल देगी..
एक हौसला दिल में जलाय रखता है...
क्योंकी,
मेरा इश्क़ कमजोर नहीं मुझे ताकतवर बनाता है....


तुषार म्हस्के

मिलेंगे बाते करेंगे....

मिलेंगे बाते करेंगे ,
अपने आप से मुलाक़ात करेंगे,
सोचेंगे हम दर्द को,
दर्द की दवा निकालेंगे,
अपनी यात्रा को समजेंगे,
एक दूसरे की प्रेरणा बनेंगे,
हौसला बनकर नया रास्ता निकालेंगे,
नए रंगो को समजेंगे ,
साधना की और बढ़ेंगे,
विचारोंका मंथन करेंगे,
अपने इंसान होने को जानेंगे,
मिलाप होगा मन,तन और विचारोंका ...
निकलेगी सुकून भरी सांस,
कोमल सी किरण,
पोर्णिमा का चाँद,
अंदर के भावोंको रंगो को दिशा देकर..
एक नया रंगकर्म करंगे और रंगकर्मी कहलाएँगे....

तुषार म्हस्के

Monday, 3 August 2015

रस्ता हा खडतर

रस्ता हा खडतर,
थंडगार येणारी हवा ,
शरीराला स्पर्श करुण जाते ,
डोळ्यांना भावनारी विचारांची तीव्रता ,
श्वास घेवून केलेली हिम्मत,
रस्त्यावर  घट्ट पाय रोवत करत असणारा प्रवास,
वातावरण नादमय,
रंगली आहे ही जीवनाची फ्रेम ,
रस्तात कोणतीही चिंता नाही ,
चिंतनात करत असणारा प्रवास,
हृदयातिल ठोक्याप्रमाने,
विश्वाच्या पलीकडे आपल् अस्तित्व ,
विचारांमध्ये बांधन्यासाठी ,
घेतलेला निर्णय ,
ध्येया कड़े मला घेवून जाताना दिसतोय...
श्वास घेवून चालत राहण म्हणजे जीवन ,
आव्हानांना समजून केलेली मात ....
ही माझ्या जीवनाची साक्ष सोडत आहे....

...........तुषार म्हस्के