Sunday 19 February 2017

आजचा दिवस हा सकारात्मकतेला आकर्षित करणारा वाटला ..

क्षणा क्षणाला बदलत जाणारं वातावरण आणि त्याची निर्मिती करणारी. TOR ( Theatre of Relevance) ची प्रक्रिया ....विचारांची व्यापकता वाढवून ते विचार तळापर्यंत पोहचवत असताना दिसलेे ....कुरार व्हिलेज ,मालाड पूर्व , विदर्भ विद्या मंदिर शाळेत हि प्रक्रिया विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देऊन सकारत्मक विचार आणि दृष्टिकोन वाढवत असताना दिसू लागले ....


इयत्ता नववी चे विदयार्थी हि बॅच आतापर्यंत शाळेतील शिक्षक त्यांना आतंकवादी बॅच बोलायचे , वर्गाला शांत करण्यासाठी कोणीतरी एक बकरा पकडायचा मग, त्यानंतर सम्पूर्ण वर्ग शांत राहायचा ...परंतु , याठिकाणी TOR ( Theatre of Relevance) ची प्रक्रिया कार्य करते , जोपर्यंत मनाची तयारी होत नाही तो पर्यंत जबरदस्ती करायला नाही लावत ... 


सहभागी असलेल्या साथींनकडून जोपर्यंत येत नाही मला माझ्यावर काम करायचं आहे ....तोपर्यंत , एकतरफ़ी प्रेमासारखं काम नाही करत , ती दोन्ही बाजूने अभिव्यक्त होणारी प्रक्रिया आहे ....नववी च्या दुसऱ्या दिवशी च्या सत्रात आल्यानंतर हि मुले जबदस्त आनंदी दिसली ....लेटर सर्वांनी लिहून आणले होते ....आता पर्यंत वर्क शॉप मध्ये एक तरी बिना लेटर चा यायचा पहिल्यांदा मी पाहिलं ...सर्व विद्यार्थ्यांनी लेटर लिहून आणले होते ...आणि त्यामध्ये असणारी वैचारिक स्पष्टता हि मनाला भावणारी होती ....त्यानंतर रिदम घेण्याची प्रक्रिया झाली या प्रक्रियेमध्ये सर्कल मध्ये जाऊन बसण हे सर्वात मोठ अवघड काम ...सर्व प्राण्यांसारखे कळपा मध्ये यायचे एकमेकांच्या अंगावर पाय देऊन बसायचे ...


हि एक माणसाची मनोवृत्ती आहे आपल्याला विचार नाही मिळाला ...कां करतोय ते नाही समजल कि लगेच प्राण्यांसारख होऊन जायचं ....या परिस्थिती ला निपटण्यासाठी ....त्यांना challenge देण्यात आलं ... बघुयात तुमच्या मध्ये आहे दम तर व्यवस्थित बसून दाखवा ....आणि हा एक स्वभाव आहे ज्यावेळी व्यक्ती आपले आवाहन स्वीकारतो आणि त्या परिस्थितीला सामोरे जातो ... त्याचं पद्धतीने या विद्यार्थ्याना आवाहन केल्यानंतर त्यांनी आवाज न करता जागेवरून उठले आणि सर्कल मध्ये जाऊन बसले ... आजचा दिवस हा सकारात्मकतेला आकर्षित करणारा वाटला ....


.या बालिका आणि बालक मध्ये जबरदस्त ऊर्जा दिसू लागली होती ..... आणि त्या रिदम मध्ये ते वातावरण अगदी चैतन्यमय होऊन गेले .....त्याच्यामध्ये सामुहीकता , वैचारिकता आणि एक सूर हे एकत्र दिसताना जाणवू लागले व त्याचं बरोबर त्यांना दिशा हि दिली जात होती .....नंतर त्यांना प्रश्न देण्यात आले " मी जिवंत का आहे ? ' मी माझे ध्येय कशा पद्धतीने पार करणार ? '' त्यासाठी माझी नैतिक जबाबदारी काय आहे ? ... या प्रश्नांची उत्तरे लिहित असताना ....एकदम शांतता सर्व ठिकाणी पसरलेली दिसली ... शाळेतील शिक्षक अगदी ...बाजूला बसून बोलत होते ....हि शैतान मंडळी एवढी शांत बसली आहे आणि यांना कोणच काहीही बोलत नाही आहे .....कोणाला दम द्यायची गरज नाही कोणाला मारायची गरज नाही ....हि मुलं शांत बसली आहेत म्हणजे पृथ्वीवर जीव आल्यासारखे जाणवत आहे १५ ते २० मिनिटे शांततेत लिहिल्यानंतर त्यांनी लिहिलेले अनुभव वाचायला सांगितले ...


अनुभव वाचत असताना प्रत्येकाचा शब्द उच्चार त्याची बोलण्याची पद्धत हेच सर्वात मोठ साध्य असल्याचे जाणवू लागले ....विचारांचे परिवर्तन हे क्षणात बदलत असताना जाणवू लागले ....काल जे आतंकवादी हातात दिले होते ते आज एकदम साधू झालेले दिसले ....या प्रक्रीये मध्ये शिशक हे या विद्यार्थ्यांकडे कुतुहलाने पाहत होते .....त्यानंतर प्रत्येकाचा रोल मोडल आणि त्यांचा एक गुण यांवर चर्चा करायला सांगितले आणि हे ग्रुप मध्ये चर्चा करायला सांगितले ....ती चर्चा एकदम मन लाऊन केली जात होती ...एकत्रितपणे सर्वांचा सहभाग हि त्या मध्ये दिसू लागला ...प्रत्येक जन त्या विषयाला अगदी सखोल चर्चा करून मांडताना दिसू लागला ....


त्या मिळालेल्या उत्तरांना आता प्रत्येक विद्यार्थ्याचा विचार बनवायचा त्यासाठी नाटकाची प्रक्रिया आणि या प्रक्रियेमध्ये त्यांच्या समोर असणारी आवाहाने आणि त्याचं बरोबर त्यांच्यावर मात कशी करणार ......या विषयाच नाटक करण्यासाठी वेळ फक्त १५ मिनिटे या वेळेत ते नाटक करू शकतात .. तो आत्मविश्वास निर्माण करण ...त्यांच्या स्वपनांमध्ये 


अडथळा येणाऱ्या घटना मधून कशा पद्धतीने बाहेर पडतील यांवर मनन आणि चिंतन सुरु झाले ...मग या प्रवाहात उडी मारली आणि मी जेवढा त्यामध्ये स्वतःला झोकून देतोय त्या पद्धतीने सहभागीचा येणारा response हा अवर्णनीय दिसला तेवढंच कुतूहल .....तेवढाच विश्वास , तेवढीच उर्जा आणि त्या उर्जेला असणारी दिशा .... कमजोर कडीला पकडून तिला सक्षम केला ... आणि त्याच प्रक्रियेमुळे ग्रुप एकदम ताकतवर झाला ... आणि सादरीकरण जबरदस्त झालं ...


 त्यामध्ये आपली मैत्री कशी असावी ...ग्रुप च सहकार्य आणि चांगली मैत्री ...माझा निर्णय आणि माझं ध्येय त्यासाठी माझी पाउले ... या गोष्टी दिसण्यात आल्या .... ३ गटांचा सादरीकरण अशा पद्धतीने झाले कि , एकदम जबरदस्त मोठे कलाकार आहेत ...



आणि तोच आत्मविश्वास TOR ( Theatre of Relevance) ने मनात निर्माण केला ...हो हे जग माझं आहे ....आणि माझी स्वप्ने मी पूर्ण करू शकतो .......




रंगकर्मी 
तुषार म्हस्के

No comments:

Post a Comment