Tuesday 21 February 2017

मालाड पूर्व च्या मतदान केंद्रात भोंगळा कारभार???

मालाड पूर्व च्या मतदान केंद्रात भोंगळा कारभार???

काल दि. २१ फेब्रुवारी रोजी मालाड पूर्व च्या कुरारगावातील संस्कार शाळा ४३/३ ह्या मतदान केंद्रात बोगस मतदान झाले. मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गेलेल्या श्रीमती रोहिणी दळवी यांना सांगण्यात आले कि.. तुम्ही मतदान करु शकत नाही, कारण तुमच्या नावाने काहीवेळापुर्वी मतदान झालेले आहे. मतदान केंद्राध्यक्ष ना हि झाली बाब निदर्शनास आणून दिली. "अशा लहान सहान गोष्टी मतदानाच्यावेळी होतच असतात" असे त्यांनी सांगितले. मतदान प्रक्रियेत झालेल्या ह्या अन्यायावर न्याय मिळविण्यासाठी बोगस मतदान झाल्याची बाब तेथील पोलिंग एजंट, पोलिस यंत्रणा, एआरओ, पी आर ओ ह्यांच्या पर्यंत कळविण्यात आली परंतु ह्या बोगस मतदान बद्दल अधिक चौकशी न करता त्यांनी पर्यायी मतदान करण्याची प्रक्रिया सांगितली. अखेर प्रदत्त मतदान पद्धतीने मतदान करण्यास सांगितले. जुन्या मतदान प्रक्रियेप्रमाणे पोस्टल बॅलेट पेपर वर मतदान करण्यास सांगितले व प्रदत्त मतदान यादी वर नाव व सही करून घेतली. परंतु ह्या संपुर्ण प्रक्रियेदरम्यान त्यांनी मतदार कर्त्याच्या बोटांना निळी शाई मात्र लावली नाही. तसेच तत्सम कागदावर निवडणुक केंद्राचा स्टॅंप मारला नाही. सदर झालेल्या बोगस मतदानाच्यावेळी तेथील एआरओ कडुन लेखी अहवाल मागविण्यात आला. ह्या संपुर्ण बाबी पुर्ण करण्यासाठी निवडणुक अधिका-यांनी मतदानकर्त्याचे 4 ते 5 तास खर्ची घातले. परंतु लेखी देताना सदर मतदान केंद्रात बोगस मतदान झाले हा शब्द प्रयोग त्यांनी कटाक्षाने टाळला. (नोकरी वाचविण्यासाठी असेल कदाचित)

# अशा प्रकारचे बोगस मतदान प्रत्येक केंद्रावर झाले नसणार हे कशावरुन???
# मृत पावलेल्यांची पुष्कळ नावे मतदार यादी मध्ये समाविष्ट असल्याने त्यांच्या नावे बोगस मतदान झाले नसणार हे कशावरुन???
# प्रदत्त मतदार यादीतुन झालेल्या मतदान हे व्होटींग मशीनवर झालेल्या बोगस मतदानातुन वजावट केले की नाही याची जबाबदारी नेमकी कोणाची? जर तसेच झाले नाहीतर बोगस मतदान करणाऱ्यांचा १०० टक्के विजय असेल. आणि मतदान यंत्रणेचा पराजय.
# मतदान केंद्रात सीसीटिव्ही कॅमेरे बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे बोगस मतदान करणाऱ्यांसाठी मोठी मुभाच म्हणावी लागेल?
# हाती आलेल्या बातमी नुसार..." मुंबई : मतदार याद्यांमधून तब्बल 11 लाख मतदारांची नावं गायब" म्हणजे हा कोणता बेजबाबदार कारभार म्हणावा लागेल?
# मतदान केंद्रात बसलेल्या बसलेल्या ४ हुन अधिक पोलिंग एजंट कडे भिन्न भिन्न मतदार याद्या असल्याचे दिसुन आले. त्यापैकी काही एजंट ने असे सांगितले की काल रात्री काही मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती झाल्याचे सांगितले.
# निवडणुक आयोगाच्या वेबसाईट वरील यादी आणि बॅलेट ऑफिसर कडे उपलब्ध असलेली यादी ह्यात खुप तफावत असल्याचे दिसुन आले.
(इतिवृत्त)

सदर मतदान प्रक्रियेत पुढील दस्ताऐवजांचा वापर करण्यात आला. (फक्त अधिक माहितीसाठी)




No comments:

Post a Comment