Monday 25 January 2016

एक प्रवास अध्यात्मिक अनुभवाचा .....



अनहद नाद म्हणजे माझ्या अंतर्मनातील नाद .....
आज दिनांक २२ जानेवारी रात्रौ ८.३० वा. शिवाजी नाट्य मंदिर दादर, मुंबई . मंजुळ भारद्वाज यांच लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या अनहद नाद नाटकाची प्रस्तुती ....


आज मी पाहतो तर माझ्या जीवनाची हि यात्रा मला आज समाधानाचा श्वास घेण्यासाठी उस्फुर्त करणारी  .....
आता पर्यंत विद्रोहाच्या मनस्थिती मध्ये जगणारी माझी मनोवस्था आज एकदम शांत मुद्रेत मला दिसू लागली . मनाला सुख आणि समाधान मिळण्यासाठी तत्वांचा विस्तार होणं खूप गरजेचं असतं. आज ते तत्व मी माझ्या व्यवहारिक जीवनात रुजवण्यास सुरुवात केली आहे.


आज प्रत्येक कलाकार एकमेकांचे vibrations समजून घेत, एकमेकांना आपल्या नादात सामावून घेऊन, त्यांचा स्वतःचा नाद ऐकत होते. रिहर्सल ला सार्वजण भेटलो आणि पाहिलं तर, प्रत्येक कलाकार एक तेजोमय प्रकाशाचा झोत आणि त्याची यात्रा घेऊन फिरत आहे ....
अनहद नाद च्या show अगोदर झालेल्या ३ दिवसीय कार्य शाळेत विचारांचं मंथन करून निघालेले कलाकार आज त्या काजव्यांसारखे चमकत होते .... एक सुंदर अशी यात्रा.... हवी हवीशी वाटणारी ,मनात तेज निर्माण करणारी , मनाला शांतता  देणारी, माझी मला वाटू लागली.

आज शब्द हि खेळू लागले.... अगदि सहजतेने कालाकारांच्या वाणीतून झळकू लागले... रोमारोमात संचार करणारे शब्द आज शिवाजी मंदिरात घुमू लागले ....आज कोणाला दाखवायचा म्हणून performance नव्हता . आज स्वतःसाठी आम्ही perform करत होतो .

रिहर्सल करून आल्यानंतर आम्ही लगेच तयार होऊन रंगमंचावर रंगमंचाशी connect होण्यासाठी आलो .... अगदी सहजपणे.... माझी जबाबदारी मला माहिती असल्यामुळे रंगमंचावर बाहेर आलेले खिळे हातोडीने आत ठोकण्यास सुरुवात केली .... लगेच माझ्या बरोबर असणारे कलाकार हि कामाला लागले . शिवाजी नाट्य मंदिर च्या रंगमचावर पाहिल्यानंतर मनाला खूप चिंता आणि भीती वाटते .... एक सच्चा कलाकार रंगमंचाला आपली कर्म भूमी, आपली माता समजतो त्याच रंगमंचावर पाहिल्यानंतर तिथे कुठे खिळे वर आलेले, कुठे सेट चा वापर करून स्वतःला व्यावसायिक नाटककार समजणाऱ्या नाटककारांनी त्या रंगभूमीचा हवा तेवढा वापर करून सोडला आहे ..... कला हि स्वतःमध्ये परिपूर्ण असते .... मग जर प्रत्येक कलाकार स्वतःला कलाकार समजत असेल तर तो अशा पद्धतीने सेट design का नाही करत ज्या मुळे आपण perform करत असणाऱ्या रंगमंचाला काहीच ठोकाठाकी न करता त्यावर performance करता येईल .....? त्या कर्मभूमीला पाहिलं आणि डोळे पाणावलेले ....ती आग मनामध्ये सतत जळत राहते .

आजची अनहद नाद ची प्रस्तुती म्हणजे एक विलक्षण प्रयोग आहे हे सातत्याने जाणवत होते. रंगमंचावर झोपल्यानंतर humming आणि आलाप करण्यास सुरुवात केली आज माझा आवाज हा माझ्या ब्रम्हांडा मध्ये गुंजायमान होताना जाणवू लागला एका सुरामध्ये सूर , एका नादा मध्ये नाद..... अनहद चा प्रत्येक कलाकार एकमेकांच्या नाभी शी झोडलेला आहे आणि ते एकमेकांना अखंड विश्वा मध्ये एकमेकांशी एका चेतनेने बांधालेले आहेत हे दिसू लागले .....आज मी एकदम शांत होतो. मनामध्ये अजिबात ओझं नव्हतं. ना कोणता भाव होता, ना काशाचं दडपण होतं.... आज मी उन्मुक्त पणे performance करत होतो .... 



आज योगिनी विलक्षण तेजामध्ये दिसत होती. एकमेकांचा हात पकडून एकमेकांना उर्जा पास करत होती .... आज अश्विनी एक aura घेऊन फिरत होती .... आज प्रत्येक कलाकार एकमेकांना ऊर्जा पास करत होता .... पहिली बेल वाजली आणि आम्ही कलाकार आपली चेतना जागी करून perfomance करण्यासाठी तयार झालो ....किती महत्वाची गोष्टी असते ना एक कलाकार दुसऱ्या कलाकाराला perfomance करण्याअगोदर ऊर्जा पास करतो, आपल्या मध्ये सामावेष्ट करून घेतो आणि आपला रंगकर्म अगदी सहज होऊन जातो ....

आज अध्यात्मिकतेकडे जाणारा performance .....विलक्षण तेजाने नटलेला.... रंगमंचावर प्रवेश करताना एकदम वादळासारखा यायचो आणि सहजतेने perform करायचो आणि पुन्हा विंगेत जायचो. आज ते भाव हे समग्र दृष्टीचे होते. आपल्या व्यावहारिक गोष्टींना एकत्र समजून त्यांच्याबरोबर एक लयाने एकरूप होणे हे विशेष होते .....

नदीच्या सीन ला दगड बनल्यानंतर जाणवत होतं कि नाका तोंडामध्ये पाणी गेलय आणि मी पाण्यातील एक भाग आहे . माझ्या जीवनाची यात्रा हि विचारानुसार बदलणारी …. माझी दृष्टी हि त्यानुसार बदलणारी ....नाटक सुरु असताना आलेली सहजता आणि त्यातून निर्माण झालेली व्यवहारिकता हि एक निपुणता निर्माण करत होती .... त्या क्षणाला वाटू लागले मन आणि शरीर एकत्र perform करत आहेत ....

आज performance झाल्यानंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया :

अध्यात्मा चा अनुभव झाला ......त्या क्षणी मी इथे नव्हतोच .... मी तुमच्याबरोबर रंगमंचावर होतो ....
खूप भन्नाट नाटक आहे ....अशा पद्धतीचा नाटक मी पहिल्यांदा पाहिल ..... मी माझा वाढदिवस आज अनहद नाद पाहून इथे साजरा केला त्याच मला समाधान आहे ...संवाद हृदयाशी भिडत होते ....



या अशा लख लखत्या अनुभवांचं तेज घेऊन प्रेक्षक, म्हणजेच TOR नाट्यसिद्धांता मधील पहिला रंगकर्मी, आपल्या जीवनात विचार ,तत्व ,सत्व घेऊन  जीवन जगण्यासाठी , जीवनाला जगण्यासाठी , विचारांना समजण्यासाठी आयुष्याच्या रंगमंचावर जीवन जगण्यासाठी एक प्रेरणा घेऊन निघाला आहे......

तुषार म्हस्के

अनहद नाद - जिथे प्रेक्षक रंगकर्मी बनतो.


नाटक सहसा दृश्याच्या माध्यमातून रंगमंचावर प्रस्तुत होत असते आणि दृश्यागणिक दृश्यातून पुढे जाता जाता कथा आणि संदेश दर्शकांसमोर मांडत असते. पण ‘अनहद नाद’ हे नाटक पारंपारिक पद्धतीने प्रेक्षकांसमोर प्रस्तुत नाही होत. 

तसे पाहता रंगमंचावर हे नाटक नाटकाराच्या दृष्टीतून आणि त्याच्या स्वतःच्या विश्लेषणातून उद्भवलेले अनुभव व स्टेटमेंट आणि अभिनेता - अभिनेत्रींच्या भावप्रवण अभिनयाच्या माध्यमातून दृश्यमान होते ,परंतु खरे नाटक हे दर्शकांच्या आत प्रस्तुत होते. कलाकार नाटकाराचे शब्द - आंतरशब्द , त्यांचे भाव - आंतरभाव यांना आपल्या कुशल अभिनयाने रंगमंचावर प्रस्तुत करत होते, परंतु त्या शब्दांचा आणि भावांचा खरा तपशील प्रेक्षागृहात बसलेल्या प्रेक्षकांच्या मानवी मनावर आणि हृदय पटल यांवर उमटत होता , जिथे दृश्यही तयार होत होते आणि कथा आपली अर्थपूर्ण परिपूर्णता प्राप्त करत होती. खरं तर नाटक कोणतीही एक कथा सांगत नाही , उलट प्रेक्षागृहातील प्रत्येक प्रेक्षकाच्या आत घडून गेलेल्या आणि घडत असलेल्या कथेला गती देत राहते ,त्याचे पुनरावलोकन करत राहते आणि स्वतः समीक्षक होऊन बघण्याची दृष्टी देते. अशाप्रकारे हे नाटक मंजुल भारद्वाज ह्यांच्या रंग सिद्धांत ‘ थिएटर ऑफ रेलेवंस’ च्या ध्येयाला आकार देते , सिद्ध करते कि प्रथम आणि सर्वात महत्वपूर्ण रंगकर्मी दर्शक आहे.

इथे प्रेक्षागृहात बसलेला प्रेक्षक रंगमंचावर साकार होत असलेल्या दृश्यांना न केवळ पाहतो तर नाटकाराचे शब्द आणि त्या शब्दांच्या सुंदर समायोजनेतून प्रकटलेल्या भावांच्या पट्टीच्या पलीकडे जाऊन स्वतः नाट्य लेखक आणि अभिनेता बनतो आणि आपल्या आपल्या कथांना स्वतः समोर सादर करतो आणि स्वतःच त्याची समीक्षा ही करतो. अश्या प्रकारे मंजुल भारद्वाज यांचे अनहद नाद नाटक पाहणे म्हणजे एका अद्भुत जागतिक अनुभवातून प्रवास करण्याजोगे आहे. हे नाटक न केवळ नाटकांच्या ठराविक मापदंडांना तोडते उलट कोणतीही सीमा नसलेले जग तयार करते. गोस्वामी तुलसी दासांच्या ओळी नुसार " जाकी रही भावना जैसी प्रभू मूरत देखी तिन तैसी".


अनहद नाद मध्ये कोणतीही कथा नाही आहे , तरीही प्रेक्षकांच्या असंख्य कथांची घट्ट विण अतिशय सुंदर पद्धतीने जमली आहे.
अनहद नाद मध्ये कोणतेही पात्र नाही आहे, तरीही दर्शकांच्या जीवनातील सर्व पात्रे सजीव होतात. अनहद नाद मध्ये कोणताही संवाद नाही , तरीही दर्शकांच्या आतील संवादांचे धागे सोडवले जातात.अनहद नाद हा स्वर कानांनी न ऐकला जाणारा आहे, तरीही  प्रेक्षागृहात बसलेले प्रेक्षक त्या स्वरांना न केवळ ऐकतात, तर त्यांच्या उत्तरासाठी अस्वस्थ होतात.

हे निव्वळ नाटक नाही आहे, तर जीवनाला समजण्याची आणि जगण्याची एक अध्यात्मिक यात्रा आहे. हे नाटक " बिन गुरु जान कहाँ से पावे "  च्या  सामर्थ्यावर प्रश्न उठवते आणि दर्शवते की प्रत्येक व्यक्ति हा स्वतःचा गुरु आणि शिष्य आहे. हे नाटक प्रेक्षकांना आपआपल्या चेतना कक्षाच्या द्वाराला खोलण्याकरिता प्रेरित करते, आणि चेतनेच्या पंखांवर स्वार होऊन निसर्ग आणि जीवनाच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आमंत्रित करते.


ह्या नाटकाची समीक्षा करणे सोप्पे नाही कारण हे प्रत्येक प्रेक्षकाला एका समीक्षकाची दृष्टी देते. कलाकारांमध्ये योगिनी चौकने अद्भुत काम केले आहे, तिची संवादफेक आणि भावमुद्रा रसपूर्ण आहे, रससिक्त आहे..रसांमध्ये संमिश्र आहे. अश्विनी नांदेडकर,सायली पावसकर,कोमल खामकर आणि तुषार म्हस्के ह्यांनी अप्रतिम साथ निभावली आहे.
मंजुल भारद्वाज एक नाटककार आणि नाट्य दिग्दर्शक म्हणून अत्यंत यशस्वी ठरले आहेत.


(२२ जानेवारी २०१६ , शुक्रवार रात्रौ ८.३० वाजता , " शिवाजी नाट्य मंदिर " मुंबई मधील प्रस्तुतीची समीक्षा )
धनंजय कुमार
304, सुकांत को. ऑ. हा. सोसायटी, 
सेक्टर-3, आरडीपी-8, चारकोप, 
कांदिवली(प), मुम्बई- 40067. 
मोबाइल – 08080012313.
---------------------------------

Saturday 23 January 2016

नाटक बघताना मला शांतीवन आठवत होतं....तुषार चौक ( एक प्रेक्षक आणि रंगकर्मी )

आपण किती जण रोजच्या या धकाधकीच्या जीवनात स्वतःच्या आतला आवाज ऐकतो?.... कोणी नाही
ऐकत.... फक्त आपण गधामजुरी करतो.... सकाळी उठायचं, ऑफिसला जायचं, तेच ते काम करायचं.... ऑफिस टायमिंग संपलं कि त्या लोकलच्या, बसच्या गर्दीतून, दात ओठ खात, शिव्या देत प्रवास करत घरी यायचं आणि जेऊन झोपून जायचं.... या सगळ्यात आपण आपल्या बद्दल,
स्वतःबद्दल किती विचार केला?.... nothing.... फक्त पैसे कमावणे, new job search करणे, अनेक प्रकारचे लोन घेऊन ठेवणे आणि रिटायर होईस्तोवर हफ्ते भरत राहणे.... हि life आहे? यालाच आपण life म्हणतो? आणि यात काय enjoyment आहे.... घंटा....??
जो या सगळ्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करतो... जो unheard ऐकतो, आपला आतला आवाज ऐकतो, तोच फक्त life enjoy करू शकतो.... तोच या सुंदर जगाला enjoy करू शकतो....
हा सुंदर अद्भुत अनुभव मी काल घेतला....
"अनहद नाद - Unheard sounds of Universe" या नाटकाद्वारे....
एक सुंदर नाटक..... उत्तम आणि ग्रेट लिखाण आणि mind blowing performance..... सुंदर अप्रतिम ग्रेट Writer आणि Director मंजुल भारद्वाज!! वाह.... काय बोलायचं.... speechless.....no words.... बस्स थक्क करून गेलंय हे नाटक मला.....
योगिनी चौक, अश्विनी नांदेडकर, कोमल खामकर, सायली पावसकर, तुषार म्हस्के, सगळे कलाकार अप्रतिम!!

नाटक बघताना मला शांतीवन आठवत होतं.... ती नदी आठवत होती.... सगळी प्रोसेस आठवत होती.... जी माझ्या सोबत सुद्धा घडली होती.... कित्ती बोलू आणि कित्ती नको असं झालंय.....!!
I think, हे नाटक नसून आपला खरा जीवनप्रवास उलगडून सांगायचं माध्यम आहे.
मंजुल सर, Thank you very much for this wonderful experience.....!!
Guys must watch play.....

खरंच सर्वांनी बघा हे नाटक......



- तुषार चौक
एक प्रेक्षक आणि रंगकर्मी

Thursday 21 January 2016

सृजनशील जीवन जगणं हेच मंजुल भारद्वाज यांचे बहुभाषिक नाटक 'अनहद नाद - Unheard Sounds of Universe' चा ध्येय आहे. - म. झिं. गावंडे




शांतिवन 20 जानेवारी 2016

आज शांतिवनात श्री. मंजुल भारद्वाज यांचे बहुभाषिक 'अनहद नाद - Unheard Sounds of Universe' हे सव्वा तासाचे नाटक पाहण्यात आले . या पूर्वी पण त्यांचे एक नाटक मी पाहिलं आहे.श्री. मंजुल भारव्दाज स्वतः लेखक, कवी, दिग्दर्शक व निर्माते ही आहेत. त्यांची नाटके कलात्मक, सृजनात्मकवसकारात्मक असतात. ही कलाकृती मांडतांना त्यांचा गल्लाभरु दृष्टीकोन मुळीच नसतो.नाटकासाठी विषय निवडतांना तो जीवनाशी किती निगडीत आहे याचा ते विचार करतात. अशाच विषयात ते हात घालतात.
' वाँर अँड पिस ' हा विषय मांडतांना लिओ टाँलस्टाँय यांनी हाच विचार जगासमोर मांडला. जगाला शांततेची गरज आहे. मरते वेळी डाँ. मार्टिन लुथर किंग यांनी सुद्धा शांततेचाच संदेश दिला.
जग झपाट्याने विनाशाकडे जात आहे. पर्यावरण बिघडले. उत्पादन व पैशांच्या चढाअोढीत आम्ही स्वतः च स्वतः ला खाईत ढकलत आहोत. हीच गोष्ट श्री. मंजुल भारद्वाज यांना खटकते आणि तशी नाटकं त्यांच्या लेखणीतून उतरतात.
झाडं तुटली. डोंगर सपाट झाले. रेती, वाळू, दगड या खनिज संपत्तीचा ह्रास होत आहे. काँक्रीटची जंगलं वाढली. स्वार्थ ! निव्वळ स्वार्थ ! ही बाब जनतेच्या गळी उतरावी हाच भारद्वाज यांचा प्रयत्न आहे. कदाचित तो खारीचा ' इवलासा ' वाटा असेल पण तो अधिक महत्वाचा आहे.
सृजनशील जीवन जगणं हेच त्यांच्या जीवनाचं ध्येय आहे. विनाशाकडे जाणा-या स्वार्थी जगाला सावरण्याचा त्यांचा हा प्रयत्न आहे. यासाठी त्यांना आणि त्यांच्या कलाकारांना हार्दिक शुभेच्छा !












आपला
म. झिं. गावंडे
आनंदयात्री (अमरावती )

Wednesday 20 January 2016

प्रवास…

नवीन सुरुवात ….
विचारांचा पर्व ….
नवीन सूर जुळण्यास सुरूवात …
व्यवहार जीवन जगण्याचा प्रवास …..
चढ उतारामधील अनुभव अनुभवण्याचा …
मजबूत इच्छा शक्ती ने जग जिंकण्याचा अट्टाहास…
एक सूर एक ताल त्या तालामधील नादमय प्रवास….
परछाई ला उलगडून स्व छा ई ने जगण्याचा प्रवास…
जन्म ते मृत्यू मधील प्रयोगात्मक जगण्याचा प्रवास….
अनु , रेणू ,प्रोटॉन ,न्यूट्राॅन, इलेक्ट्रॉन च्या
एकजुटीने एकत्र येऊन सार्वभौमत्व घडवण्याचा हा प्रवास…..
सतत निरंतर शोध घेण्याचा हा प्रवास…
निर्णय घेण्याची चेतना जागवून …
चैतन्य जीवन जगण्याचा प्रवास …
हिरव्यागार सदाभरीत ,सदाहरित सृजनशील निर्माण चा प्रवास….
मंजुळ सूर ….सुरातील नाद ….नादातील प्रक्रियेला जिवंत ठेवण्याचा हा प्रवास…..

तुषार म्हस्के


Theatre of Relevance: सुप्रसिद्ध रंग चिंतक.मंजुल भारद्वाज द्वारा लिखित औ...

Theatre of Relevance: सुप्रसिद्ध रंग चिंतक.मंजुल भारद्वाज द्वारा लिखित औ...: जाने माने रंग चिन्तक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित और उत्प्रेरित बहुभाषिक नाटक “ अनहद नाद - Unheard Sounds of Universe” कलात्मक चिंतन है ...

Wednesday 13 January 2016

बहुभाषिक नाटक “ अनहद नाद - अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ” का मंचन

जाने माने रंग चिन्तक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित और निर्देशित बहुभाषिक नाटक “ अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ” का मंचन २२ जनवरी २०१६ - शुक्रवार को रात 8.30 बजे “शिवाजी नाट्य मंदिर” मुंबई में मंचन होगा. 

नाटक “अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स ” कलात्मक चिंतन है, जो कला और कलाकारों की कलात्मक आवश्यकताओं,कलात्मक मौलिक प्रक्रियाओं को समझने और खंगोलने की प्रक्रिया है। क्योंकि कला उत्पाद और कलाकार उत्पादक नहीं है और जीवन नफा और नुकसान की बैलेंस शीट नहीं है इसलिए यह नाटक कला और कलाकार को उत्पाद और उत्पादिकरण से उन्मुक्त करते हुए, उनकी सकारात्मक,सृजनात्मक और कलात्मक उर्जा से बेहतर और सुंदर विश्व बनाने के लिए प्रेरित और प्रतिबद्ध करता है ।

अश्विनी नांदेडकर ,योगिनी चौक, सायली पावसकर,तुषार म्हस्के और कोमल खामकर अपने अभिनय से नाट्य पाठ को मंच पर आकार देकर साकार करेंगें !
एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशन विगत २३ वर्षों से देश विदेश में अपनी प्रोयोगात्मक , सार्थक और प्रतिबद्ध प्रस्तुतियों के लिए विख्यात है




सुप्रसिद्ध रंग चिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक " अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ यूनिवर्स " ची शिवाजी नाट्य मंदिरात साद 
२२ जानेवारी , 2015 रोजी शुक्रवार रात्री 8.30 वाजता .

आजच्या तथाकथित रंगभूमिवर चालणाऱ्या कलेच्या बाजारीकरणावर प्रहार करणारे बहुभाषिक नाटक “अनहद नाद – अनहर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स” चा प्रयोग २२ जानेवारी , 2015 रोजी शुक्रवार रात्री 8.30 वाजता शिवाजी नाट्य मंदिर (दादर) मुंबई इथे होणार आहे. सादर होणार आहे. या नाटकाला नुकतंच मॅग्स मुंबई अवॉर्ड 2015 तर्फे 1 नोव्हेंबर 2015 रोजी "उत्कृष्ट कला पुरस्कार" हे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. 

सुप्रसिद्ध रंग चिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित “अनहद नाद - अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स” हे नाटक एक असं कलात्मक चिंतन आहे, जे कला आणि कलाकारांच्या कलात्मक गरजा, कलेच्या मूलभूत प्रक्रिया अंतर्बाह्य समजून त्या विश्लेषित करण्याची प्रक्रिया आहे. कारण कला ही व्यापार नाही तसेच कलाकार हा व्यापारी नाही आणि आयुष्य हे नफा-तोटयांचा हिशेबही नाही. म्हणूनच हे नाटक कलेला आणि कलाकारांना कलेच्या व्यापारिकरणांतुन उन्मुक्त करतं, त्यांना सकारात्मक, सृजनात्मक आणि कलात्मक उर्जेने उजळून....बहरुन, सुंदर विश्वाची रचना करण्याकरीता प्रेरीत आणि प्रतिबद्ध करतं. अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, तुषार म्हस्के आणि कोमल खामकर आपल्या अभिनयाने या नाटकाला रंगभूमीवर साकार करतील.

एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशन २३ वर्षांपासून देश-विदेशांत आपल्या सार्थक, प्रतिबद्ध प्रयोगशीलतेसाठी सुप्रसिद्ध आहे

The Experimental Theatre Foundation is presenting renowned playwright & director Manjul Bhardwaj `s multilingual play “अनहद नाद –Unheard Sounds of Universe” on 22 January – Friday , 8.30 PM sharp. At Shivaji Natya Mandir (Dadar-west), Mumbai. The play “unheard sounds of Universe” is an exploration of artistic needs to emancipate art and artists from productization to comiit their artistic creativity to make the world better and humane and not a profit and loss balance sheet of life .Ashwini Nandedkar,Yogini Chouk,Sayali Pawaskar,Tushar Mhaske and Komal Khamkar are performing in the play.

Experimental Theatre Foundation is known nationally & internationally for it`s experimental, relevant and committed performance since 1992