२०१५ पासून मी आरे मध्ये सातत्याने सकाळी चैतन्य अभ्यास करण्यासाठी जातो....
आरे परिसरातील वातावरण हे आरे मध्ये गेल्यानंतर आपल्याला अनुभवता येते.... थंडगार वातावरण ... शुद्ध हवा हि संपूर्ण मुंबई परिसरात अनुभवता येत नाही ती , आरे मध्ये अनुभवता येते... शरीरासाठी पोषक असे वातावरण इथे आहे... सकाळ आणि संध्याकाळ च्या वेळी आपण इथे पाहिले तर मोठ्या प्रमाणात शरीराचा अभ्यास करण्यासाठी आणि मानसिक समाधानासाठी लोक इथे येतात.. दिवस भर धावपळीमधून वेळ काढून स्वतः साठी जगण्यासाठी हा वेळ खूप महत्वाचा असतो. मुंबई मधील प्रदूषण कमी करण्याचं काम आरे करतो. म्हणजेच, मुंबईला प्राणवायू देण्याचं काम आरे मध्ये असणारी झाडे करतात. अनेक प्रकारचे पशु ,पक्षी ,प्राणी ,वेगवेगळ्या प्रकारची झाडे इथे आहेत... आदिवासी पाडे इथे आहेत. तसं पाहिलं तर इथलं जीवन खूप नैसर्गिक आहे...
माणसाला विकासाने झापाटले आहे. स्वार्थासाठी सत्ताधारी या ठिकाणी वाईट नजर ठेवून हीच जागा आहे जिथे , विकास करता येईल ... असे सांगून असे फतवे काढून न्यायालयाकडे पाठवून त्याची कायदेशीर पद्धतीने वाट कशी लावायची याचे कारस्थान सुरु झाले आहे. रातोरात माहिती येते वृक्ष तोडायला सुरुवात झाल्याची आणि एका - एक निसर्गाची जान असणारा वर्ग आरेच्या दिशेने धावतो... रातो- रात धर पकड सुरु होते. येईल त्याला पकडून आत टाकण्यात येते . तुघलकी पद्धतीने हुकूमशाही आणि शासनाची चोरी चालते . माझ्या मनात एक प्रश्न निर्माण झाला ... कोर्टाने आदेश दिले मेट्रो कारशेट बांधण्याचे त्यासाठी , वृक्षतोड करण्याचे ... मग , रातो - रात झाडे चोरून तोडण्याची वेळ का येते हा प्रश्न तर पडतो ना ? म्हणजे , कुठेतरी काही तरी गडबड आहेच ना !
कडे कोट्ट बंदोबस्त सुरु आहे ... लाठी खाणारे हि आपलेच आहेत आणि लाठी मारणारे हि आपलेच आहेत... पण, असं वाटत नाही का आपल्याला विकासाचा भस्म्या झालाय ? कि, आपल्याला आपल्या स्वार्थापुढे काहीच दिसत नाही ...
भारत माता कि जय बोला आणि धरणी मातेला सम्पवा ... अशी भूमिका सरकारची दिसत आहे...
" पर्यावरणवादी " हा शब्द ऐकल्यानंतर मनात येतं कि, कोणीतरी आहेत जे निसर्गाला वाचवण्यासाठी धडपड करतात.. पण, असे शब्द लिहिणारे काय पर्यावरणाच्या बाहेर राहतात का ? कि, त्यांना प्राणवायू नाही अजून काही लागतो... जी मुंबई आपल्या पोटाची व्यवस्था करते. त्या मुंबईचा फुप्पुस म्हणजेच , आरे कापला जातोय ... आणि मी मुंबईकर फक्त वाट बघतोय ... मुंबई संपण्याची ... का ? जी माती आपल्या पोटा पाण्याची व्यवस्था करते तिला वाचवण्याची जबाबदारी आपली नाहीच का . ? विचार करा ...!
आरे मधील झाडे कापली जात आहेत आणि जीव तीळ , तीळ तुटत आहे ...
आता वेळ आली आहे सर्वानी प्रतिकार करण्याची ... आरे ला वाचवण्याची
मुंबईकरांना आवाहन आहे ... चला एकत्र येऊ यात ... आरे ला वाचवुयात
तुषार म्हस्के
No comments:
Post a Comment