महात्मा गांधी म्हणजे फक्त इव्हेंट नाही. महात्मा गांधी हे भारतीय आणि वैश्विक राजनैतिक प्रक्रियेचा विवेक आहेत.विविधता आणि सर्वसमावेशकतेचे सत्य आधारित अहिंसा मुक्तिचा मार्ग आहेत.राजनीती म्हणजे केवळ सत्ता स्थापन करून तिचा उपभोग घेणे व शोषण करणे हे मिथक तोडून, राजनीतीला जनकल्याणाच्या रुपात प्रस्थापित करणाऱ्या विचारवंताचे नाव आहे 'गांधी'.वर्चस्ववादाच्या संकीर्णतेचे विष पिणारा, राजनैतिक प्रयोग आहे 'गांधी'.ज्या प्रयोगाच्या भूमीवर भारत देश श्वास घेतो. जवाहरलाल नेहरुंचे सार्वभौमत्व व बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान संपन्न राष्ट्र विश्वभरात आपली धमक दाखवत आहे. जो एका नवराष्ट्राला दोन ध्रुवीय विश्वात गुटनिरपेक्ष देशांना नेतृत्व करण्याची विवेकात्मक शक्ती देतो आहे.
कॉंग्रेस सत्तेने गांधींना सरकारी कार्यक्रम व सरकारी योजनांच्या नामकरणांपुरते मर्यादित करून ठेवले आहे. गांधींचे प्रताप, नेहरूंची दृष्टी आणि आंबेडकरांची न्यायिक जाण आणि सामाजिक समतेच्या संविधानिक तरतुदींनी कॉंग्रेसला सत्तेत तर ठेवले, पण गांधींचा विचार मात्र संपत गेला. सत्ताधारी कॉंग्रेसला याची कल्पना ही नव्हती आणि 70 वर्षांत गांधींच्या विचारांवर
विकाराने कब्जा केला. सरकार आज राष्ट्रवादाच्या नावाखाली संविधानाला उडवून लावत आहेत.लोकशाहीला निवडणूकीच्या सर्कसमध्ये बदलविण्यात त्यांनी प्रभुत्व मिळवले आहे. बौद्धिक वर्ग तर यांच्या जुमलांच्या कार्यक्षमतेचे वर्णन संवादाचे प्रभुत्व म्हणून करत आहे, परंतु आत्महीनतेने ग्रासलेला सत्ताधारी प्रत्येक वेळी गरळ ओकत आहे आणि देशाच्या अस्मितेचे हनन करण्यात यशस्वी होताना दिसतो आहे.
अशा वेळी केवळ गांधींचा राजनैतिक विवेकच भारताला वाचवू शकतो. आज देशवासीयांमध्ये राजनैतिक जाणीव जागृत करण्याची गरज आहे. देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा भ्रम तोडण्याची गरज आहे की लोकशाही म्हणजे निवडणुका हरणे आणि जिंकणे एवढंच नाही !
ही राजकीय जाणीव जागृत करण्यासाठी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ चे प्रतिबद्ध रंगकर्मी "विचार, विविधता, विज्ञान, विवेक आणि संविधान संम्मत" राजनैतिक पिढी घडवण्याचा संकल्प करत 2 ऑक्टोबर, 2019 (बुधवारी सकाळी ११ वाजता) रोजी, शिवाजी नाट्य मंदिर, मुंबई येथे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित - दिग्दर्शित नाटक "राजगति" सादर करणार आहेत.
नाटक 'राजगति' : नाटक
"राजगति"
सत्ता, व्यवस्था, राजनैतिक चरित्र आणि राजनीती' ची गति आहे. राजनीति ला पवित्र नीति मानत आहे. राजनीति घाणेरडी आहे या भ्रमाला तोडून राजनीति मध्ये जन सहभागितेची मागणी करते. ‘माझे राजनीतीशी घेणं देणं काय' सामान्य जनतेच्या या अवधारणेला दिशा देते. सामान्य लोक लोकशाही चे पहारेकरी आहेत आणि पहारेकरी आहेत तर सामान्य जनतेचा सरळ सरळ राजनीतीशी संबंध आहे. नाटक 'राजगति' समता,न्याय,मानवता आणि संवैधानिक व्यवस्थेच्या निर्माणासाठी ‘राजनैतिक परिदृश्याला' बदलण्याची चेतना जागवते. ज्याने आत्महीनतेचा भाव उध्वस्त होऊन ‘आत्मबळा' ने प्रेरित ‘राजनैतिक नेतृत्वा' चा निर्माण व्हावा.
नाटक “राजगति” का ?
आपले आयुष्य दर क्षणी 'राजनीती' ने प्रभावित आणि संचालित होत असते पण एक 'सभ्य' नागरिक असल्या कारणाने आपण केवळ आपल्या 'मताचे दान' करतो आणि आपल्या राजनैतीक भूमिकेपासून मुक्त होतो आणि मग दर वेळी राजनीतिला कोसत राहतो आणि आपली मनोभूमिका ठरवून टाकतो की, राजनीती 'वाईट' आहे... चिखल आहे.. आम्ही सभ्य आहोत, राजनीति आमचे काम नाही, जर जनता प्रामाणिक आहे तर त्या देशाची लोकतांत्रिक राजनैतिक व्यवस्था भ्रष्ट कशी होऊ शकते?....
चला जरा विचार करूया की राजनैतिक प्रक्रियेविना विश्वातील सगळ्यात मोठे लोकतंत्र चालू शकेल का... नाही चालणार... आणि जेव्हा ‘सभ्य’ नागरिक त्याला नाही चालवणार तर मग वाईट प्रवृत्तीचे लोक सत्ता चालवणार आणि तेच घडतं आहे... चला एक सेकंद विचार करूया, की खरंच राजनीती वाईट आहे की आपण त्यात सहभागी न होऊन त्याला वाईट बनवत आहोत?...
आपण सगळे अपेक्षा करतो की, 'गांधी, भगतसिंग, सावित्री आणि लक्ष्मी बाई’ या देशातच जन्माला यावे पण माझ्या घरात नाही …चला यावर मनन करू आणि ‘राजनैतिक व्यवस्थेला' शुद्ध आणि सार्थक' बनवू ! समता, न्याय, मानवता आणि संविधानिक व्यवस्था निर्माणासाठी 'राजनैतिक परिदृश्य' बदलण्याची चेतना जागवू, ज्याने आत्महीनतेचा भाव उध्वस्त होऊन 'आत्मबळाने' प्रेरीत 'राजनैतिक नैतृत्वाचा' निर्माण होईल .
"जे 'भीड' मानसिकते मुळे त्रस्त आहेत.. राजनैतिक घडामोडी पाहुन त्रासलेले आहेत .. जे " काहीही होऊ शकत नाही" या मानसिकतेत अडकलेले आहेत, "आम्ही काय करू शकतो ?", "पर्याय काय?", "चळवळ चालवून काही उपयोग नाही झाला!", " हे जसजसे आहे तसेच राहणार"... या प्रश्नाच्या जाळ्यात गुंतलेले भारताचे मालक माझ्या प्रिय बांधवांना, मला आग्रहाने हे सांगायचे आहे, कितीही वादळ आले तरी सूर्य उगवतोच !...
सूर्य म्हणजे 'चेतना' या चेतनेला 'विवेकाची' दिशा देण्यासाठी 2 ऑक्टोबर 2019 ला सकाळी 11.00
वाजता शिवाजी नाट्य मंदिर येथे प्रस्तुत होत आहे नाटक
"राजगति"
!
कोणताही पक्ष, विपक्ष, अपक्ष - प्रतिप्रक्ष व कोणताही विशिष्ठ राजनैतिक वाद न बाळगता, सर्वांना समावेशी करणार हा क्रांतिकारी नाट्यप्रयोग !"
लेखक - दिग्दर्शक
"थिएटर ऑफ रेलेवेंस” नाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार "थिएटर ऑफ रेलेवेंस" च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट जन-माणसांसमोर ठेवतात. ह्या अभिजात लेखक - दिग्दर्शकाने आजतागायत 28 पेक्षा अधिक नाटकांचे लेखन दिग्दर्शन केले आहे. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर थियेटर ऑफ रेलेवेंस सिद्धांताच्या माध्यमातून 1000 पेक्षा अधिक नाट्यकार्यशाळांचे संचालन केले आहे.
नाटक : “राजगति” प्रस्तुती
कधी : 02 ऑक्टोबर 2019,
बुधवार सकाळी 11.00 वाजता.
कुठे : “शिवाजी नाट्य मंदिर”, दादर (पश्चिम), मुंबई
वेळ :120 मिनिटे
लेखक - दिग्दर्शक : रंगचिंतक मंजुल भारद्वाज.
कलाकार:अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के ,स्वाती वाघ , प्रियंका कांबळे, बेटसी अँड्र्यूस आणि सचिन गाडेकर.
प्रेक्षक सहयोग आणि प्रेक्षक सहभागीतेने आयोजित या प्रस्तुती मध्ये आपल्या सक्रिय सहयोग आणि सहभागितेची अपेक्षा!