स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला गेला, आणि
स्मरणात राहिला
भारतातील
स्वातंत्र्य
संग्राम! जाज्वल्य देशप्रेमाने सारा देश त्याकाळी भारून गेला होता. “आम्हाला स्वातंत्र्य हवेच”
या प्रेरणेने सारे भारतीय एक होऊन इंग्रजांविरुद्ध लढत होते.
प्रत्येक
स्वातंत्र्य
सैनिकांच्या
हौतात्म्याला
त्यांच्या विचारांना स्मरण्याचा दिवस ‘शहीद दिवस’
या दिवशी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी स्वतंत्र भारतातील सूर्योदय पाहण्याकरिता, आपल्या देशासाठी हौतात्म्य स्वीकारले होते.
या
लढ्यात भारतीय स्त्रियाही मागे नव्हत्या. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताच्या कानाकोपऱ्यांतून असंख्य अनामिक स्त्रिया भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देण्यास सज्ज झाल्या. या असंख्य क्रांतिवीरांच्या योगदानाला आम्हा रंगकर्मींचा सलाम !
त्यांच्या
जगण्याचा उद्देश एकच , मुलींना शिक्षणाचा अधिकार मिळावा... या एकाच ध्येयाने झपाटून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समाज निर्माणासाठी समर्पित केले. आज आम्ही शोधली आहे सावित्री आमच्या आत.आम्ही शोधला भगतसिंह आमच्या आत, भगतसिंहने जीवनात वैचारिक क्रांतिची जी मशाल
पेटवली, ती घेऊन आम्ही प्रत्येकात कलात्मक चेतना जागवत आहोत. कलेच्या माध्यमातून आम्ही सावित्रीबाई फुले यांचा वारसा पुढे घेऊन जात आहोत. जीवनासाठी कला, परिवर्तनासाठी कला या ध्येयाने आम्ही कलाकार समाजातील विभिन्न स्तरांतील मुद्यांवर - समस्यांवर कलेच्या म्हणजेच नाटकाच्या माध्यमातून प्रस्तुती करतो आणि परिवर्तनासाठी प्रेरित करतो.
3 जानेवारी
2019 , क्रांतीज्योती
सावित्रीबाई
फुले जयंती आणि 23 मार्च 2019 शहीद दिवस च्या निमित्ताने
थिएटर ऑफ रेलेवन्स चे रंगकर्मी " कला ते क्रांती !" हा विचार घेऊन , विचार प्रेरणा नाट्य जागर साजरा करत आहेत.
या नाट्य जागरात दिनांक 22 मार्च 2019 रोजी दुपारी 2.00 वाजता वैश्विक रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्या मार्गदर्शनासह, हिंदुस्तान अँटीबायोटिक्स स्कुल, पिंपरी पुणे येथे " थिएटर ऑफ रेलेवन्स शैक्षणिक चिंतन कार्यशाळा".आयोजित होणार आहे आणि " मैं औरत हूँ " हे नाटक प्रस्तुत होणार आहे.
रंगचिंतक
मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक – “मैं औरत हूँ !” – आपल्या असण्याची , त्याला स्वीकारण्याची आणि आपल्या "अस्तित्वाला"
विभिन्न स्वरूपात पडताळण्याची , शोध घेण्याची एक यात्रा आहे. नाटक ‘मैं औरत हूँ!’ पितृसत्तात्मक भारतीय समाजाची मानसिकता , बंधन , परम्परा , समज यांना मुळापासून नाकारते आणि त्यांना खुले आवाहन देऊन स्वतःचे ‘स्वतंत्र मानवीय अस्तित्व’
स्वीकारते .
हे नाटक महिला व पुरुषाला बरोबरीच्या आरशात न पाहता ‘स्त्री’
च्या ‘स्वतंत्र मानवीय अस्तित्वाला' रेखांकित आणि अधोरेखित करते. हे नाटक ‘कलाकार आणि प्रेक्षकां’
साठी आत्म मुक्ततेचं माध्यम आहे. नाटकात अभिनय करताना ‘जेंडर समानता’
च्या संवेदनशीलतेशी कलाकार एकरूप होतात आणि नाटक बघताना ‘प्रेक्षक’
‘जेंडर बायस’
या अविर्भावा पासून मुक्त होतात . नाटक ‘मैं औरत हूँ’
कलाकार आणि प्रेक्षकांवर अद्भुत प्रभाव पाडते. ‘नारी’
मुक्ति का बिगुल बजा त्याला आपल्या ‘अधिकारा’
साठी संघर्ष करण्यासाठी प्रेरित करून ‘सक्षम’
करते .
थिएटर
ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांत हे "नाटकाने परिवर्तन येते " ह्याची जिवंत प्रयोगशाळा आहे. भारतीय दृष्टीकोनांमध्ये पितृसत्तात्मक समाज , रुढीवाद , धार्मिक कट्टरवाद धारण केलेला वर्ग समाजाच्या प्रत्येक भागात व स्तरात अस्तित्वात आहे. थिएटर ऑफ रेलेव्हन्स ने या आव्हानांचा एक योजनाबद्ध पद्धतीने सामना केला आहे. रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक "मैं औरत हूँ" ने स्त्री अस्तित्वावर भाष्य करून कितीतरी महिलांना स्वतः बद्दल, स्वतःच्या अस्तिवा बद्दल विचार करण्यासाठी
प्रेरित केले. वेगवेगळ्या स्तरांवरील महिलांना - मुलींना जगण्याचा नवीन दृष्टिकोन दिला …
पितृसत्तेच्या
व्यवस्थेला या नाटकाने आव्हान दिले, आपल्या अस्तिवाला शोधणा-या अर्ध्या लोकसंख्येचा आवाज बुलंद करणाऱ्या ' मैं औरत हूँ' नाटकाचे 1998 पासून ते आतापर्यंत 1000 हुन जास्त प्रयोग संपूर्ण भारतात झाले आहेत. या नाटकाच्या माध्यमातून सामाजिक स्तरांवर नवनवीन संकल्पना मांडल्या आहेत. "मैं औरत हूँ " नाट्यप्रयोगाने सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत, आपले सणांना व उत्सवांना एक कलात्मक आणि वैचारिक दृष्टी प्रदान केली आहे. या नाटकाने सामाजिक उत्सवानिमित्त जनतेला (प्रेक्षकांना) ज्ञानात्मक व बोधात्मक मंच उपलब्ध करून दिला ज्याने “मैं औरत हूँ”
नाटकाने सामाजिक आणि सांस्कृतिक चळवळीचे स्वरूप प्राप्त केले.
कार्यशाळां
मध्ये एखादा विषय अजून सखोलतेने शिकवायचा असेल तर तो विषय आम्ही नाटकाच्या माध्यमातून सहभागीं समोर प्रस्तुत करायचो आणि मग त्याचे विश्लेषण व्हायचे. असाच एक अनुभव 'Gender
Sensetisation' या
विषयाला अनुसरून आम्ही मंजुल भारद्वाज लिखित "मैं औरत हूँ" या नाटकाची प्रस्तुती करायचो.
एकदा
झाले असे की, नाटकाच्या प्रयोगानंतर दाढी मिशी असलेले पुरुष सहभागी या नाटकाच्या प्रस्तुती नंतर ओक्साबोक्शी रडला. त्यांचे मनोगत त्यांनी व्यक्त केले की, "आतापर्यंत आम्ही स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली. अगदी बाहेर समाज कार्य करून घरातील स्त्रीची कुचंबणा केली" पण आताच्या क्षणापासून आम्ही पितृसत्तात्मक भारतीय समाजाची मानसिकतेला नकारतो. या नाट्य प्रस्तुतीतून आम्ही त्यांच्या समोर विचार तर मांडायचो, पण त्याही पलीकडे एक महिला
म्हणून जिथे स्त्रीकडे पाहण्याची एक कट्टर मानसिकता आहे अशा गावांमध्ये आम्ही एक माणूस म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली
सक्षमतेची
सुरुवात आधी स्वतःपासून होते...एक स्त्री जेव्हा सक्षम होते तेव्हा परिवार ही सक्षम होतो आणि परिवारासोबत समाज ही सक्षम होतो.. आणि जसजसा समाज आपल्या नवीन सकारात्मक आणि रचनात्मक निर्माणाच्या दिशेने मार्गक्रमण करतो देश आपोआप सक्षम होऊन जातो. म्हणून हे अनिवार्य आहे की देशातील स्त्रियांनी सक्षम होणे, कारण जेव्हा स्त्री प्रगतिशील असते तेव्हा तो देश खऱ्या अर्थाने प्रगत आणि विकसित होतो.
समाजाचे
रचनात्मक परिवर्तन आणि न्यायसंगत व्यवस्थेची निर्मिती आपल्या कलात्मक प्रतिबद्धतेने साकारणारे कलाकार अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर , योगिनी चौक , कोमल खामकर , तुषार म्हस्के.
आम्ही
कलाकारांनी समाजात परिवर्तनासाठी पुढाकार घेऊन आपल्या परिवारासाठी, समाजातील अर्ध्या लोकसंख्येचा आवाज उठवण्यासाठी हा नाट्य जागर आयोजिला आहे, तरी आम्ही कलाकार आवाहन करत आहोत की, सामाजिक - वैचारिक परिवर्तनासाठी या नाट्य जागरात आपण पुढाकार आणि सहभाग घ्यावा.