भारत माता कि जय बोला आणि मुलींना उचलून आणा , जबाबदार नेते ... हीच आपली जबाबदारी आमदार राम कदम आपण केलेलं विधान हे एका लोकप्रतिनिधी ला शोभेल असं नाही ... आपण दहीहंडी उत्सवात केलेलं विधान चुकीचं आहे. लोकशाहीत आपण राहतो लोकशाहीच्या जोरावर निवडणूका लढवतो. आपल्या भारताच्या संविधानात प्रत्येक मुलीला तिला आवडत असणाऱ्या मुलाबरोबर लग्न करण्याची परवानगी दिली आहे. निर्णय घेण्याचा अधिकार संविधानाने तिला दिलेला आहे. त्याच संवविधानाच्या जोरावर आपण निवडणूका लढता आणि निवडून येता . त्याच बरोबर संविधानात असणारे तत्व आपण पाळत नाहीत ...त्याचा तुम्ही आपमान करता . ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे. त्याच जनतेच्या मुलींना वस्तू समजण्याची मानसिकता आपल्यात दिसू लागली आहे...
दहीहंडी उत्सवात आलेल्या तरुणांना आपण काय संदेश दिला आहात... बाहेर फिरणारी, बाहेर पडणारी मुलगी हि काय आपली संपत्ती आहे का ? विचार करण्याची वेळ आहे .
कोणालाही ती आवडेल ती आवडल्यावर त्या मुलीला तो मुलगा आवडत असेल कि नाही ते माहीती नाही . त्या मुलीच्या विरुद्ध तुम्ही , तिच्या मनाच्या विरुद्ध सांगतात त्या मुलीला उचलून आणण्याची भाषा वापरता आपल्याला याची जाणीवही नाही आपण दहीहंडी च्या दिवशी बोललात .कोणतंही काम असेल तर तुम्ही मला भेटू शकतात .." साहेब , साहेब मी तिला प्रोपोज केलं .. . ती नाही म्हणते मला मदत करा ... चुकीचं आहे १०० % मदत करणार ... आदी तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायचं ... तुमचे आई-वडील म्हटले साहेब , आम्हांला हि मुलगी पसंत आहे तिला पळवून आणणार आणि तुम्हांला देणार .. " ती मुलगी म्हणजे काय रस्त्यावर पडली आहे का ? कोणीही येणार आणि उचलून घेऊन जाणार ... लोकप्रतिनिधी , म्हणून हे विधान सामान्य जनतेला पटण्यासारखं नाही . आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण केलेलं हे विधान हे मुलींच्या अस्तित्वावर प्रश्न विचारणार आहे . एका बाजूला " बेटी बचाव , बेटी पढाव " बोंबलत फिरणार सरकार आणि त्यांचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी काय फक्त " भारत माता कि जय बोलणार " मात्र मनामध्ये राक्षस पाळणार ...आपल्या घरातल्या आई - बहीण सोडून त्यांना दुसऱ्या मुलींमध्ये आई - बहीण दिसत नाही कि काय ? हा पडलेला प्रश्न आहे .आपण आपल्या स्वार्थासाठी , लोकप्रियतेसाठी ,स्वताची वाहवा ... करण्यासाठी काय , बोलतोय काय वागतोय याचा थोडहि हि भान नाही. जनता अंधाधुंद जी नेते मंडळी निवडून देते ... त्या लोकप्रतिनिधींचे वागणे हे केवळ आणि केवळ राजनिती ला घाण करत आहे त्यामुळेच सामान्य माणूस राजनीति पासून लांब पळत आहे .एक साधी गोष्ट आहे ... मी मुलगा आहे ... मला माझा निर्णय घेण्याचा अधिकार आहे ... त्याच प्रमाणे निर्णय घेण्याचा अधिकार हा मुलीला आहे ... मी तुषार म्हस्के राम कदम यांनी दहीहंडी महोत्सवात केलेल्या विधानांचा जाहीर निषेध करतो....
मुलगी वस्तू नाही , ती व्यक्ती आहे ... कोणीही यावं .. आणि उचलून घेऊन जावं अशी वस्तू नाही ... एक माणूस म्हणून तिच्याकडे पाहण्याची जबाबदारी माझी आहे ... हि जबाबदारी कोण घेत नाही... ती जबाबदारी मला घ्यायची आहे .. हि जाणीव प्रत्येकाला झाल्यावर मुलीला वस्तू समजण्याची मानसिकता कमी होईल ... मग, तो सामान्य व्यक्ती असो , या लोप्रतिनिधी ...
रक्षाबंधन हा कार्यक्रम १५ दिवस साजरा करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांना दुसऱ्या मुलींमध्ये काय बहीण दिसत नाही का ? फक्त रक्षा बंधनाचा १५ दिवसाचा गाजावाजा करणारे आमादार फक्त आणि फक्त स्वतःच्या लोकप्रियेतेसाठी रक्षा बंधानाचे कार्य करतात... मात्र , मेंदूत अजूनही चिखल आहे ... हा पडलेला प्रश्न आहे ...
तुषार म्हस्के
वाह तुषार असे सैतान ठेचायलाच पाहिजे
ReplyDeleteपण, किती जणांना ठेचणार प्रश्न फक्त ठेचण्याचा नाही प्रश्न आहे ... सामान्य माणसाच्या भूमिकेचा ... माझा ह्या राजनैतिक प्रक्रियेशी काहीच संबंध नाही असे बोलणारा वर्ग सम्पवणे... प्रत्येक सामान्य व्यक्तीला वाटण गरजेचा आहे माझा राजकारणाशी मोठा सम्बन्ध आहे... आणि ज्या मुद्द्यांचा वादा घेऊन निवडून येतात वेळो - वेळी त्यांना प्रश्न विचारणे आवश्यक आहे...
ReplyDelete