Saturday, 29 September 2018

Renowned theatre Thinker Manjul Bhardwaj’s Play “Rajgati” will be staged on 2nd October, 2018, Tuesday, 11 AM at Shivaji Natya Mandir



Organizers: Theatre of Relevance Practitioners & well-wishers

Writer & director: Manjul Bhardwaj

When: 2nd October, 2018, Tuesday, 11 AM

Where: Shivaji Natya Mandir, Dadar (west), Mumbai

Duration: 120 Min

Genre: Stage

Artists : Ashwini Nandedkar, Sayali Pawaskar, Komal Khamkar,Yogini Chowk, Tushar,Swati Hrushikesh Patil, Prasad Khamkar,Priyanka Kamble & Sachin Gadekar.


About Play Rajgati: Renowned theatre Thinker Manjul Bhardwaj Play ‘Rajgati’ unfolds the dimensions of ‘Power, System and Political Character & Politics’. Politics is pious policy. Politics is dirty; play breaks this illusion & appeals the common masses to actively participate in political process. Common masses are the custodian of world’s largest democracy. The Play creates the consciousness of changing the 'political scenario' for the creation of equality, justice, humanity and constitutional order.

Why Play Rajgati:

Every moment of our life is influenced and governed by "politics". But what role do we 'Citizens’ play? We only ‘donate’ our 'vote' and make ourselves free from our political role, shifting the blame and cursing politics every time.  We set our mindset stating that "Politics is 'bad' , Politics is polluted" !

Well, we are civilized people,aren't we ? We always find ourselves talking things like ‘politics is not our cup of tea, it's not our job to think and worry about politics’. When all the citizens are so honest and want a proper democratic system then how does the country's democratic political system is so  corrupted?

Let's think for a moment, will the biggest democracy of the world prevail without the political process that we always ignore? The answer is NO, a big NO!

When the 'civilized' citizens do not govern it, then the power position is obviously and unfortunately goes to the evil powers within the society. It's been 71 years since we have gain the independence but the political process is still out of hands from the commoners. Let's ponder upon this - Is Politics really bad or are we making it worse by not getting involved in it? ..We all expect that 'Gandhi, Bhagat Singh, Savitri and Lakshmi Bai' should born amongst us but not in my house’.

Is this attitude and apathy justified?

When the farmers choose the path of suicide, why the citizens of this country keep quiet ? Why the actual problems of our democracy are sidelined by the made up problems of our politicians.

About Writer & Director :



Manjul Bhardwaj is a theatre person who responds to national challenges and sets a national agenda through his philosophy "Theatre of relevance". A well known theatre thinker, playwright, director and actor whose play “Mera Bachpan” is instrumental in rehabilitation of 50,000 child labourers. A theatre icon has authored 28 plays and has been on stage for more than 16000 times at grassroots to elitist international levels. His play “Mera Bachpan” is instrumental in rehabilitation of 50,000 child labourers. His plays “B-7”, “Vishwa – The World” & “Drop by Drop: Water” are premiered & performed more than 100 times in Europe.

He has discovered himself as a theatre person. He is equipped with performing skills as an actor, director, writer, facilitator and initiator in theatre. He is a dreamer/visionary and has the positive attitude & skills to actualize the dreams. He initiated the philosophy of “Theatre of Relevance” on 12th August 1992 and practicing it in India and all over the world.


We the performers of ‘Theatre of Relevance’ have taken a positive step. The play "Rajgati" written by internationally renowned theatre thinker and philosopher Manjul Bhardwaj , inspires the audience (public) to churn on the above questions.

Looking forward for your constructive support & participation!

For further details contact : 9820391859/etftor@gmail.com

Thursday, 27 September 2018

सुप्रसिद्ध रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांचे नाटक “राजगति” 2 ऑक्टोबर 2018,मंगळवार सकाळी 11 वाजता “शिवाजी नाट्य मंदिर” मध्ये प्रस्तुत होणार!

थिएटर ऑफ रेलेवन्स” अभ्यासक आणि शुभचिंतक आयोजित नाटक “राजगति” 2 ऑक्टोबर 2018,मंगळवार सकाळी 11 वाजता “शिवाजी नाट्य मंदिर” दादर(पश्चिम), मुंबई मध्ये सादर होणार! सुप्रसिद्ध रंग चिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक “राजगति” समतान्यायमानवता आणि संवैधानिक व्यवस्थेच्या निर्माणासाठी ‘राजनैतिक परिदृश्य’ ला बदलण्याची चेतना जागवतेज्याने आत्महीनतेचा भाव उध्वस्त होऊन ‘आत्मबळाने प्रेरित ‘राजनैतिक नेतृत्वाचा निर्माण व्हावा.



कधी : 2 ऑक्टोबर 2018, मंगळवारसकाळी 11 वाजता
कुठे : “शिवाजी नाट्य मंदिर”, दादर(पश्चिम), मुंबई
कलाकार:अश्विनी नांदेडकरयोगिनी चौकसायली पावसकरकोमल खामकरतुषार म्हस्के ,स्वाती वाघ  प्रियंका काम्बळे,हर्षिकेश पाटिल,प्रसाद खामकर आणि अन्य सचिन गाडेकर।
वेळ :120 मिनिटे


नाटक 'राजगति', : “नाटक राजगति ‘सत्ताव्यवस्थाराजनैतिक चरित्र आणि राजनीतीची गति आहे. राजनीति ला पवित्र नीति मानत आहे. राजनीति घाणेरडी आहे या भ्रमाला तोडून राजनीति मध्ये जन सहभागितेची मागणी करते. ‘माझे राजनीतीशी घेणं देणं कायसामान्य जनतेच्या या अवधारणेला दिशा देते. सामान्य लोक लोकशाही चे पहारेकरी आहेत आणि पहारेकरी आहेत तर सामान्य जनतेचा सरळ सरळ राजनीतीशी संबंध आहे. नाटक 'राजगतिसमता,न्याय,मानवता आणि संवैधानिक व्यवस्थेच्या निर्माणासाठी ‘राजनैतिक परिदृश्यालाबदलण्याची चेतना जागवते. ज्याने आत्महीनतेचा  भाव उध्वस्त होऊन ‘आत्मबळाने प्रेरित ‘राजनैतिक नेतृत्वाचा निर्माण व्हावा.

नाटक “राजगति” का ?
आपले आयुष्य  दर क्षणी 'राजनीतीने प्रभावित आणि संचालित होत असते पण एक 'सभ्यनागरिक असल्या कारणाने आपण केवळ आपल्या 'मताचे दानकरतो आणि आपल्या राजनैतीक भूमिकेपासून मुक्त होतो आणि मग दर वेळी राजनीतिला कोसत राहतो आणि आपली मनोभूमिका ठरवून टाकतो कीराजनीती 'वाईटआहे... चिखल आहे.. आम्ही सभ्य आहोतराजनीति आमचे काम नाहीजर जनता प्रामाणिक आहे तर त्या देशाची लोकतांत्रिक राजनैतिक व्यवस्था भ्रष्ट कशी होऊ शकते?...चलाएक सेकंद विचार करूयाकी खरंच राजनीति वाईट आहे की आपण त्यात सहभागी होऊन त्याला वाईट बनवत आहोत?...

चला जरा विचार करूया की राजनैतिक प्रक्रियेविना विश्वातील सगळ्यात मोठे लोकतंत्र चालू शकेल का... नाही चालणार... आणि जेव्हा ‘सभ्य’ नागरिक त्याला नाही चालवणार तर मग वाईट प्रवृत्तीचे लोक सत्ता चालवणार आणि तेच घडतं आहे... चला एक सेकंद विचार करूयाकी खरंच राजनीती वाईट आहे की आपण त्यात सहभागी होऊन त्याला वाईट बनवत आहोत?...
आपण सगळे अपेक्षा करतो की, 'गांधीभगतसिंगसावित्री आणि लक्ष्मी बाई’ या देशातच जन्माला यावी पण माझ्या घरात नाही … चला यावर मनन करू आणि ‘राजनैतिक व्यवस्थे’ ला शुद्ध आणि  सार्थक बनवू ! समतान्यायमानवता आणि संविधानिक व्यवस्था निर्माणासाठी 'राजनैतिक परिदृश्यबदलण्याची चेतना जागवूज्याने आत्महीनतेचा भाव उध्वस्त होऊन 'आत्मबळानेप्रेरीत 'राजनैतिक नैतृत्वाचानिर्माण होईल .

थिएटर ऑफ़ रेलेवंस 26  वर्षांपासून फॅसिस्टवादी ताकदिंशी झगडत आहे . जागतिकीकरण आणि फॅसिस्टवादी शक्ती ‘स्वराज्य आणि समता’ या विचारांना उद्धवस्त करून समाजात विकार निर्माण करतात ज्याने संपूर्ण समाज ‘आत्महीनतेने’ ग्रासित होऊन हिंसक होऊन जातो. हिंसा मानवतेला नष्ट करते आणि कला मनुष्यात ‘माणुसकीचा’ भाव जागृत करते. कलाजी माणसाला माणुसकीचा बोध देते… कला ती जी माणसाला माणूस बनवते !
थिएटर ऑफ रेलेवन्स” …. 26 वर्षांपासून सतत सरकारीनीम सरकारीकॉर्पोरेटफंडिंग किंवा कोणत्याही देशी विदेशी अनुदाना पासून मुक्त. सरकारच्या 300 ते 1000 करोड च्या अनुमानित संस्कृति संवर्धन बजेट च्या विरुद्ध 'प्रेक्षकसहभागितेने उभे आहे आमचे रंग आंदोलन ... मुंबई पासून मणिपूर पर्यंत!


लेखक - दिग्दर्शक  : "थिएटर ऑफ रेलेवेंस” नाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेतजे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार "थिएटर ऑफ रेलेवेंस" च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट जन-माणसांसमोर ठेवतात. ह्या अभिजात लेखक - दिग्दर्शकाने आजतागायत 28 पेक्षा अधिक नाटकांचे लेखन दिग्दर्शन केले आहे. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर थियेटर ऑफ रेलेवेंस सिद्धांताच्या माध्यमातून 1000 पेक्षा अधिक नाट्यकार्यशाळांचे संचालन केले आहे.
प्रेक्षक सहयोग आणि सहभागीतेने आयोजित या प्रस्तुती मध्ये आपल्या सक्रिय सहयोग आणि सहभागितेची अपेक्षा!

विस्तृत माहिती साठी संपर्क :9820391859/etftor@gmail.com

Wednesday, 5 September 2018

मी तुषार म्हस्के राम कदम यांनी दहीहंडी महोत्सवात केलेल्या विधानांचा जाहीर निषेध करतो....


भारत माता कि जय बोला आणि मुलींना उचलून आणा , जबाबदार नेते ... हीच आपली जबाबदारी आमदार राम कदम आपण केलेलं विधान हे एका लोकप्रतिनिधी ला शोभेल असं नाही ... आपण  दहीहंडी उत्सवात केलेलं विधान चुकीचं आहे.   लोकशाहीत आपण राहतो लोकशाहीच्या जोरावर निवडणूका लढवतो. आपल्या भारताच्या संविधानात प्रत्येक मुलीला तिला आवडत असणाऱ्या मुलाबरोबर लग्न करण्याची परवानगी दिली आहे. निर्णय घेण्याचा अधिकार संविधानाने तिला दिलेला आहे. त्याच संवविधानाच्या जोरावर आपण निवडणूका लढता आणि निवडून येता . त्याच बरोबर संविधानात असणारे तत्व आपण पाळत नाहीत ...त्याचा तुम्ही आपमान करता . ज्या जनतेने आपल्याला निवडून दिलं आहे. त्याच जनतेच्या मुलींना वस्तू समजण्याची मानसिकता आपल्यात दिसू लागली आहे... 
दहीहंडी उत्सवात आलेल्या तरुणांना आपण काय संदेश दिला आहात... बाहेर फिरणारी, बाहेर पडणारी मुलगी हि काय आपली संपत्ती आहे का ? विचार करण्याची वेळ आहे .


 कोणालाही ती आवडेल ती आवडल्यावर त्या मुलीला तो मुलगा आवडत असेल कि नाही ते माहीती  नाही . त्या मुलीच्या विरुद्ध तुम्ही , तिच्या मनाच्या विरुद्ध सांगतात त्या मुलीला उचलून आणण्याची भाषा वापरता आपल्याला याची जाणीवही नाही आपण दहीहंडी च्या दिवशी बोललात .कोणतंही काम असेल तर तुम्ही मला भेटू शकतात .." साहेब , साहेब मी तिला प्रोपोज केलं .. . ती नाही म्हणते मला मदत करा ... चुकीचं आहे १०० % मदत करणार ... आदी तुमच्या आई-वडिलांना घेऊन यायचं ... तुमचे आई-वडील म्हटले साहेब , आम्हांला हि मुलगी पसंत आहे तिला पळवून आणणार आणि तुम्हांला देणार .. " ती मुलगी म्हणजे काय रस्त्यावर पडली आहे का ? कोणीही येणार आणि उचलून घेऊन जाणार ... लोकप्रतिनिधी , म्हणून हे विधान  सामान्य जनतेला पटण्यासारखं नाही . आपल्या स्वतःच्या स्वार्थासाठी जनतेचं लक्ष वेधून घेण्यासाठी आपण केलेलं हे विधान हे मुलींच्या अस्तित्वावर प्रश्न विचारणार आहे . एका बाजूला " बेटी बचाव , बेटी पढावबोंबलत फिरणार सरकार आणि त्यांचे निवडून आलेले लोकप्रतिनिधी काय फक्त " भारत माता कि जय बोलणार " मात्र मनामध्ये राक्षस पाळणार ...आपल्या घरातल्या आई - बहीण सोडून त्यांना दुसऱ्या मुलींमध्ये आई - बहीण दिसत नाही कि काय ? हा पडलेला प्रश्न आहे .आपण आपल्या स्वार्थासाठी , लोकप्रियतेसाठी ,स्वताची वाहवा ... करण्यासाठी काय , बोलतोय काय वागतोय याचा थोडहि  हि भान नाही. जनता अंधाधुंद जी नेते मंडळी निवडून देते ... त्या लोकप्रतिनिधींचे वागणे हे केवळ आणि केवळ राजनिती ला घाण करत आहे त्यामुळेच सामान्य माणूस राजनीति पासून लांब पळत आहे .एक  साधी गोष्ट आहे ... मी मुलगा आहे ... मला माझा निर्णय घेण्याचा अधिकार आहे ... त्याच प्रमाणे निर्णय घेण्याचा अधिकार हा मुलीला आहे ... मी तुषार म्हस्के राम कदम यांनी दहीहंडी महोत्सवात केलेल्या विधानांचा जाहीर निषेध करतो.... 
मुलगी वस्तू नाहीती व्यक्ती आहे ... कोणीही यावं .. आणि उचलून घेऊन जावं अशी वस्तू नाही ... एक माणूस म्हणून तिच्याकडे पाहण्याची जबाबदारी माझी आहे ... हि जबाबदारी कोण घेत नाही... ती जबाबदारी मला घ्यायची आहे .. हि जाणीव प्रत्येकाला झाल्यावर मुलीला वस्तू समजण्याची मानसिकता कमी होईल ... मग, तो सामान्य व्यक्ती असो , या लोप्रतिनिधी ... 
रक्षाबंधन हा कार्यक्रम १५ दिवस साजरा करणारे भाजपाचे आमदार राम कदम यांना दुसऱ्या मुलींमध्ये काय बहीण दिसत नाही का ? फक्त रक्षा बंधनाचा १५ दिवसाचा गाजावाजा करणारे आमादार फक्त आणि फक्त स्वतःच्या लोकप्रियेतेसाठी रक्षा बंधानाचे कार्य करतात... मात्र , मेंदूत अजूनही चिखल आहे ... हा पडलेला प्रश्न आहे ... 


तुषार म्हस्के