Thursday, 30 August 2018

छेड़ छाड़ क्यों ? हिंसाचार क्यो ? अत्याचार क्यों छेड़ छाड़ क्यों ? हे परवर्तनीय स्वर आता प्रत्येक कलाकाराच्या शब्दांतून येऊ लागले....

छेड़ छाड़ क्यों ? मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिगदर्शित नाटक ... छेड़ छाड़ ही एक विकृती आहे ... ह्या विकृतीला सामना करण्याची ताकद हे नाटक देते... मालाड मध्ये छेड छाड बंद करण्यासाठी नाटकाची प्रक्रिया मालाड मध्ये दिनांक 30 ऑगस्ट 2018 पासून मालाड मध्ये सुरू झाली आहे ... 



विषय हा खूप जवळचा आहे... त्यामुळे , कार्यशाळेत सहभागी झालेले साथी त्या विषयाला आपला विषय समजून त्या विकृतीला सामना करण्याची ताकद हे नाटक कलाकारांना देत आहे...


रंगमंचावर ज्यांनी कधी परफॉर्मन्स केला नाही ... असे हे कलाकार नाटकाच्या प्रक्रियेत एकदम मोठ्या आवाजात बोलू लागले... हा आवाज आजूबाजूच्या वातावरणात "छेड छाड क्यों ? चा बुलंद आवाज परिसराला जागवणारा वाटला ... रस्त्याने आवक जावक करणारे लक्षपूर्वक ऐकत होते...

पाहिल्यादिवशी प्रत्येक कलाकाराचा आवाज वाढलेला जाणवला, नाटक कधी केले नव्हते ते नाटक करत होते... 
शरीराचा आणि आवाजाचा अभ्यास त्यामध्ये , आलाप हमिंग ची प्रक्रिया झाल्यामुळे मोकळेपणा निर्माण झाला होता...


नाटकातील सीन स्वतः हुन तयार करून घेत असताना प्रत्येक सहभागी त्यामध्ये स्वतःहुन भाग घेत होते... सुरुवातीला असणारी भीती आता निघून गेली होते...


छेड़ छाड़ क्यों ? हिंसाचार क्यो ? अत्याचार क्यों छेड़ छाड़ क्यों ? हे परवर्तनीय स्वर आता प्रत्येक कलाकाराच्या शब्दांतून येऊ लागले....

#मालाडछेड़छाड़लाविरोध #छेड़छाड़क्यों?

रंगकर्मी 
तुषार म्हस्के 
( विदर्भ विद्या मंदिर ,कुरार ,मालाड पूर्व )

मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिगदर्शित नाटक " छेड़ छाड़ क्यों ? " नाटकाची प्रक्रिया मालाड येथे सुरु होत आहे

मंजुल भारद्वाज द्वारा  लिखित आणि दिगदर्शित नाटक " छेड़ छाड़ क्यों ? " नाटकाची प्रक्रिया मालाड येथे सुरु होत आहे .


" छेड़छाड़ " हि विकृती आहे त्या विकृतीला थांबवण्यासाठी या नाटकाची प्रक्रिया सुरु करण्याचे दिनांक ३० ऑगस्ट २०१८ पासून ४ सप्टेंबर २०१८ पर्यंत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे .

थियेटर ऑफ रेलेव्हन्स नाट्य सिद्धांत गेली २६ वर्ष रंगकर्माच्या माध्यमातून परिवर्तन आणत आहे.नाटक हे केवळ मनोरंजनापर्यंत मर्यादित नाही.  ते परिवर्तनाचे सशक्त माध्यम आहे.

दिनांक ३० ऑगस्ट २०१८ पासून ते ४ सप्टेंबर २०१८ पर्यंत होणारया ह्या कार्यशाळेत " छेड़ छाड़ क्यों ? नाटक मालाड मध्ये राहणाऱया तरुण - तरुणींना घेऊन तयार केलं जाणार आहे ... ह्या प्रक्रियेतून तयार झालेलं नाटक हे अगामी येणाऱ्या गणेशोत्सवात आणि नवरात्री उत्सवात करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 
मंजुल भारद्वाज दवारा लिखित आणि दिगदर्शित नाटक " छेड़ छाड़ क्यों ? नाटकाची प्रक्रिया विदर्भ विद्या मंदिर शाळा , कुरार ,  मालाड येथे करण्याचे नियोजन आहे, वेळ सायंकाळी ४ ते ७ वा  . मालाड मध्ये गल्ली,रस्ता चौक आणि सार्वजनिक ठिकाणी होणारी  " छेड़छाड़ " हि विकृती थांबविणे हे आहे.
कारण, आपल्या घरात असणारी प्रत्येक स्त्री ,मुलगी ह्या प्रसंगातून जात असते ... जनावरांप्रमाणे असणारी नजर हि न बोलता राक्षसी वृत्ती दाखवू लागते ... हि विकृती थांबवण्यासाठी मालाड मध्ये " छेड़छाड़ क्यों ? नाटकाची प्रक्रिया होत आहे .... 
ह्या कार्यशाळेला रंगचिंतक मंजुल भारद्वाज स्वतः उत्प्रेरित करणार आहेत ...तसेच थियेटर ऑफ रेलेव्हन्स टीम  आंतरराष्ट्रीय कलाकार अश्विनी नांदेडकर ,सायली पावसकर विख्यात राष्ट्रीय कलाकार योगिनी चौक, कोमल खामकर व तुषार म्हस्के करणार आहेत .

मालाड मध्ये होणाऱ्या  " छेडछाड क्यों ? " नाटकाच्या प्रक्रियेचं आयोजन राखी सोनाळकर व स्वाती वाघ यांनी केलं आहे .
आपला सहयोग आणि सहभाग अपेक्षित आहे .

" चला एकत्र येऊया छेडछाड ला विरोध करूया "

#मालाडछेड़छाड़लाविरोध 

रंगकर्मी 
तुषार म्हस्के 
९०२९३३३१४७

न्यायसंगत व्यवस्था निर्माणाचा हुंकार नाटक “न्याय के भंवर में भंवरी” -मंजुल भारद्वाज

ती न्यायाची अजूनही वाट पाहत आहे,


ती एक स्त्री, राजस्थानी वेषात आपल्यापुढे उभी राहून तिची कहाणी आपल्याला सांगत असते. सांगता-सांगता आपल्याशी बोलता-बोलता ती पूर्ण मानव जातीचा, पितृसत्ताक समाज पद्धतीचा संपूर्ण इतिहासच आपल्यापुढे उलगडत असते. ती सांगत असते, या पितृसत्ताक समाजाने स्त्रीवर केलेला अन्याय.. ती सांगत असते, पुरुषांना त्यांचा वारस पुरुष हवा असतो.... ती सांगत असते, पुरुषांना आपली संपत्ती दुसरा पुरुषच बळकावील याची कायम भीती असते ... असं खूप काही... खुप काही ती सांगते आपल्याला... सांगता-सांगता ती आजच्या तिच्या कहाणीवर कधी येते आपल्या लक्षातही येत नाही याच समाजातील पुरुषी मानसिकतेने, स्त्रीला दुय्यम स्थान देणाऱ्या या इतिहासाने, स्त्रीला फक्त मुलं जन्माला घालण्यास, पुरुषाला सुख देण्यास स्थान दिले आणि याच मानसिकतेने तिच्यावर स्त्री म्हणून अत्याचार, बलात्कार केला आहे.

ती सांगते, की ती तर फक्त 'साथी' बनून सरकारी नियमच लागू करायला गेली होती. बालविवाह अडवायला गेली होती. पण त्या उच्च जातीच्या पुरुषांनी तिच्या या कार्याची शिक्षा म्हणून बदला घेण्यासाठी स्वतःच्या शरीराचा उपयोग करून तिच्यावर बलात्कार केला, कारण ते स्त्रीला फक्त शरीरच समजत होते .

मंजुल भारद्वाज यांच्या 'दि एक्सपेेरिमेंटल थिएटर फाउंडेशन' च्या 'न्याय के भंवर में भंवरी' नाटकात बबली रावतने भंवरीच नाही तर, त्या जागी अन्यायाच्या विरोधात पेटून उठणारी, पुरुषी मानसिकतेचा सर्वांगाने विचार करणारी एक स्त्री आपल्यासमोर अशी उभी केली आहे की आपल्यालाही विचार करण्यास प्रेरित करते.

नाटकाची सुरुवात भंवरी देवीचं नाव न घेता, मानव जातीचा पितृसत्ताक समाज पद्धतीचा इतिहास सांगण्यास एक स्त्री सुरू करते. ते ऐकता ऐकता काही काळानंतर मला मी एखाद्या डाव्या पक्षाच्या शिबिरात बसले आहे की काय असाच भास झाला. पण काही वेळाने भंवरीने त्या इतिहासाला वळण देऊन, आजच्या परिस्थितीवर बोलायला सुरुवात केल्यावर आपण 'न्याय के भंवर में भंवरी' बघत आहोत हे लक्षात आलं. बबली रावत यांनी आपला आवाज आणि अभिनयाने भंवरीला असं सादर केलं की, ती आपल्या मनात ठसते. 

या नाटकात नेपथ्य संगीत आहे ही आणि नाही ही कारण त्याची गरज या नाटकाला नाही. जेव्हा भंवरी एखादा कठीण किंवा वाईट प्रसंग आपल्याला सांगते तेव्हा डफ वाजतो. भवरी इतिहास सांगता-सांगता सांगते की कसा पुरुषाने स्त्रीला दाग-दागिने, पैंजण, घुंगरू देऊन घरात बंद केलं तेव्हा एक मिनिटासाठी घुंगरू वाजतात. भंवरी जेव्हा आपल्यावरील अन्याया बाबतीत आवाज टिपेला लावते, संगीत आपला आवाज देऊन तिची साथ देते, बस बाकी भरून राहतो तो भंवरी चा आवाज.

भंवरी देवी आजही आपली लढाई लढत आहे, याचं दुःख मोठ आहेच पण मंजुल सारखे नाटककार निदान तिचा विषय नाटकातून दाखवण्याचं काम करून तिची साथ देण्याचं काम करतात आणि विचार जिवंत ठेवण्याचं काम करतात.
२६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित - दिग्दर्शित नाटक,  "न्याय के भंवर में भंवरी" सादर झाले. नाटकाचे सहकलाकार अश्विनी नांदेडकर, योगिनी चौक, सायली पावसकर,कोमल खामकर,तुषार म्हस्के यांनी उत्तम साथ दिली.


मंजुल भारद्वाज आणि 'दि एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशन' समाजापुढे आलेल्या प्रश्नांवर वेळोवेळी आपल्या "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य तत्वाच्या माध्यमातून आवाज उठवण्याचे काम गेली सव्वीस वर्षे सातत्याने करत आहेत.

विद्या कोरे.