Wednesday, 15 March 2017

खरेदी आणि विक्री च्या पाश्चिमात्य बाजारीकरणात ..

खरेदी आणि विक्री च्या पाश्चिमात्य बाजारीकरणात ...देशाची अध्यात्मिक धरोहर पतंजली च्या नावाने संपवली ...बाजारीकरणाचा उदोह ..उदोह ...करून योग दिवसातून करोडोंचा व्यापार चीनी कंपनी ला दिला ... ऐन दिवाळीत मात्र चीनी वस्तू खरेदी करायच्या नाहीत हा ...देशभक्तीचा नारा आपण आम्हाला दिलात ....देशभक्तीच्या नावाने संपूर्ण देश दिवस रात्र नारा लावून रांगेत उभा राहिला ....रांगेत उभा राहून मरणारा हा सामान्य होता ...त्याच वेळी अंबानी चा जीओ ने डिजिटल इंडिया ची कस पकडली ...त्यात फक्त काळ्याचा सफेद हा धन अंबानी चा झाला ...जिओ फुकट वाटूनही फायदा भांडवलदाराचा झाला ...सर्व नियम वेशीवर टाकलेत पण , कालाधन स्वीस बँकेतून काही आला नाही मात्र गरीबाच्या घरातून पैसा बाहेर निघाला ...जन- धन खाते ...संपत्तीने भरून निघाले ...रातोरात देश श्रीमंत झाला ...५०० करोड रुपयांचे लग्न हि त्या काळात झाले ...गरीबा च्या मुली मात्र हळद लावून रांगेत उभ्या राहिल्या ..राजकीय पक्ष मात्र त्यातून वाचले गेले ..आणि चोर ठरला तो सामान्य माणूस ...दारू पिणाऱ्या नवरया पासून बायकोने पैसे मुलांसाठी वाचून ठेवले पण , तुमच्या नोट बंदी ने ,त्याच पैशाच्या नावाने लातेचे बुक्के  तिच्या कंबरर्ड्यात पडले ...मिळाली नाही शांती ...नाही मिळाले समाधान ...हिंसा ...हिसा ...सर्वीकडे दिसू लागली ५० दिवसाचा हिशोब काही मिळाला नाही ...मात्र ५० वर्षांचा हिशोब मागण्याची वेळ आली ...बोलेल तो देशद्रोही  ...या ब्रीद वाक्याने सर्व नेते , समाजसेवक ,सर्व पक्ष मात्र चूप चाप तोंडाला टाळा लावून बसले ....इथेच हा खेळ संपला नाही ...सत्व हे खादी  ने विकले ...तत्वांचा काही खेळ नाही ...इथे फक्त brand ..brand दिसायला लागले ...देशाच्या विकासात सर्व काही माफ आहे ...तत्व आणि सत्व सोडा इथे फक्त खरेदी - विक्रीचा जमाना आहे ...इथे मुंबई - शांगाई होणार बनारस - क्योटो ...पण, असं नाही होणार मुंबई ला मुंबई आणि बनारस ला बनारस च आदर्श मोडल ...आमच्या देशात सर्व काही महान आहे ...कारण , आमचा देश विविधतेने नटलेला आहे ....देशाची सांस्कृतिक धरोहर चा वापर फक्त आणि फक्त स्वः हितासाठी होताना दिसत आहे ...शेतकऱ्यांच्या नावाने निघालेल बजेट...नोटबंदी वर येऊन संपलेला आहे ...कागदावर पैसे शेतकर्यांना मिळाले ...मात्र ते नोटबंदी मध्ये लुप्त होऊन ....तुमच्या या पारदर्शकतेच्या राजकरणात स्वतः ला मतदान करून सुद्धा त्याठिकाणी ० मतदान झाले याच्यातून तुमचे गुण जनतेसमोर दिसण्यात आले ...भक्तांच्या मनात फक्त  ' व्यक्तीवाद ' मरणारा हा आपलाच आहे ....आणि बदलणारी व्यवस्था हि आपलीच आहे ....पण, भक्ती महान यात अडकलेली जनता मात्र सत्त्याला नाकारून भक्ती मध्ये तल्लीन आहे ...प्रभू तुम्ही महान आहात .. तुम्हीच आमचे हिंदुत्वाचे नेतृत्व ...आंधळी भक्ती - आंधळी श्रद्धा , त्रास सर्वाना होतोय ..बोलणार कोण कारण , हिंदूत्व धोक्यात आहे ...राम मंदीर काही बनल नाही मात्र ..राम -मंदीर स्थानक जरूर बनले ...हिंदुत्वाची साद तिकडेच संपते ...ना काही मंदीर बनत ..ना तिकडे राम विराजमान होत ...आम्ही सामान्य भक्त ....प्रभू तुम्ही बोलाल ते सत्य ...आम्ही सर्व आपले पामर आहोत ...अशी हि मानसिकता ...ह्काच्या लढाईत हक्क सोडून भावनांच राजकारण केलं म्हणजे हे आप - आपसात भांडत बसतील तिकडे विजय माल्या चा कर्ज माफ होईल ...आणि सामान्य जनता प्रत्येक ४ व्यवहारांवर नगद  आवक - जावक कर भरेल ...कारण आमच्या देशात आता विदेशी brand दिसायला लागलेत ...या भक्ताचा काही नेम नाही ...अरे , बाबा sponser होते ना या इलेक्शन च्या मागे , मग नोटबंदी केली तर काय फरक पडतोय ...बघ , मित्रा काय आहे ....तुझा ठीक आहे ज्यांनी पैसा लावला त्यांना पैसा नको का मिळायला , मला तर वाटत हे सर्व योग्यचं आहे ...अशा वेळी बनलेल्या brand नेत्याची प्रतिमा फक्त बघून घेणारी वाटते ...छत्रपतींचा आशीर्वाद ..आणि मोदींची साथ ...इलेक्शन अगोदर छत्रपती दिसले आणि सत्ता आल्यानंतर कुठे गेले ..तुमचे brand काय इथे चालला नाही का ?...विकासाच्या परिणीती मध्ये कॉंग्रेस चे अजेंडे पूर्ण होत असताना दिसत आहेत ...आणि कॉंग्रेस मुक्त भारत घडवणार प्रश्नच आहे ...brand साहेब .....

रंगकर्मी 
तुषार म्हस्के

No comments:

Post a Comment