आजचा 'आवाज' वेगळा होता.
तो खरंच आतला आवाज होता.
अंधेरीवरुन आल्यानंतर तर तो फारच आतला वाटला.
या सभोवतालच्या कोलाहलात ऐकूच येत नाही आपलाच आवाज आपल्याला.
अशावेळी मंजुल भारद्वाज नावाचा एक रंगकर्मी तो आवाज सशक्त करत नवा नाट्यानुभव देतो. सगळी माध्यमं लोकांच्या हातून हिसकावून घेतली
जात असताना आणि 'लोकांची' या नावाखाली, बाजाराची माध्यमं उभी राहात असताना मंजुल भेटतात. ते लोकांच्या हातात नाटक देतात. मग ते आपलं, अगदी आतलं माध्यम आहे, असं वाटायला लागतं. तंत्रज्ञानानं अभिव्यक्तीला बाहुपाशात घेतलं आहे आणि बाजारानं तंत्रज्ञान काबीज केलेलं आहे. अशावेळी हे नाटक बंड करतं व्यवस्थेविरुद्ध, स्वतःविरुद्ध... नि मुख्य म्हणजे, ते बंड करतं कलेच्या प्रस्थापित धारणेविरुद्धही. काही मतभेद असले तरी मला ही मांडणी महत्त्वाची वाटते.
'थिएटर ऑफ रेलेव्हन्स'ची मांडणी करणारे मंजुल भारद्वाज आणि त्यांच्या टीमचं सादरीकरण असं सारं आज जमून आलं. गुढीपाडव्याच्या निमित्तानं नवतेचं हे नाटक समोर आलं. अश्विनी नि कोमलच्या आवाजानं आमची न्यूजरुम हादरली. तुषार नि सायली यांनी ग्रेट अनुभव दिला. आणि, योगिनीविषयी Yogini Chouk काय सांगावं! तिच्यामुळंच तर हे सारं जमून आलं. एरव्ही, हा 'अनहद नाद' असा स्टुडिओत लाइव्ह पकडणं सोपं थोडंच आहे!
रिपिट आता रात्री १२ वाजता.
मी इथेच खाली व्हिडिओ लिंकही दिलीय.
Awaaz Maharashtracha | gudipadwa special
https://www.facebook.com/SaamTV/videos/1326075247469971/

संजय आवटे |