Wednesday, 7 September 2016

शेतकरी मावळा संघर्ष करायला विसरलाय .... तुषार म्हस्के

कसले हे वारे वाहु लागले ?औदयोगिक क्रांतीचे की, माणसातील माणुसकी संपवण्याचे..माणसा माणसातील स्वप्नांचे की, एक एकमेकांना खाली खेचण्याचे...सुरळीत जीवन जगण्याचे की, मालमत्तेवर एकाधिकार जमवण्याचे....या विकासाच्या पट्टीत मी बळी पड़लोय ....माझ अस्तित्व नाहीस होत चाललय....तरुण म्हणून मी संपत चाललोय...माणूस मी हरवत चाललोय ....माझ्यातील संवेदना ही संपत चालल्या आहेत ...मी माणसामधील माणुसकी हरवून पुन्हा प्राणी होत चाललोय ...का ? मी माझ्या संवेदना माझी निर्णय क्षमता हरवत जात आहे ....जगण्यासाठी अन्न लागत आणि ते मी शेतात पिकवतोय ...जीवन जगण्यासाठी लागणारी सर्व अन्न धान्य मी शेतात पिकवायच सोडून का मी गुलांमगिरिकडे वळलोय ?का माझ अस्तित्व मी हरलोय?....एका शेतकाऱ्याच  पोरग म्हणून मी का शेती करुन माझी आणि देशाची उपजीविका भागवत नाही ? का मी माझ सत्व हरवत चाललोय ? ‘’ हो ‘’  एका बाजूला बरोबर आहे........की, का करू मी शेती ? कारण, मला लग्न करण्यासाठी मुलगी ही नाही मिळत ,कारण त्यांना हवा असतो शहरात शिकणारा मुलगा, तो चांगली नोकरी करणारा असावा त्याची

मुंबईत स्वताची रुम असावी मग, तो हॉटेल मध्ये भांडी घासणारा असेल तरीही चालेल ....पण,  स्वताच्या शेतात ....स्वता राजा सारखा जगत असणारा नको ? ....अरे हा एक प्रश्न आहे राजा कुठे ? गुलाम कुठे ?तरीही आम्हाला नोकरी हविच गुलामी साठी .....जास्त टेंशन नको दर महिन्याला एवढे पैसे घरी यावेत .....त्याच्यामध्ये अड़कलोय ....काय करणार शेतकरी? कारण , शेतकरी बोलला की, तो आम्हाला गरीबच दिसतो .....म्हणजे एका बाजूला काय मज्जा आहे शेतातला राजा गरीब ,आहो प्रश्नच आहे ना ?....आणि  खरोखर दुसऱ्या बाजूला एक गोष्ट आहे ....मी माझ्याच शेतात गुलाम आहे कारण, पाऊस कधी पडेल आणि त्यानंतर मी धान्य कधी पिकवेल  ? आणि त्यानंतर मी नियोजन कधी करेल ?  हा प्रश्नच आहे ....आणि निसर्गाने साथ दिली तर ठीक आहे आणि नाही दिली तर मी बरबादच मग , माझ पुढच नियोजन संपत आणि मी वेडयासारखा आपली जागा जी हक्काची आहे ती सोडून कुठे तरी 10 x 10 च्या रुम मध्ये येतो .... आणि विचार करत असतो की माझ्या मुलांना चांगल शिक्षण द्यायच पण, त्यात आपण  एक गोष्ट विसरतो ती म्हणजे राजा सारख मुलाला जगयाला सांगतो आणि आपण स्वता एक नौकर म्हणून जगत असतो आणि गुलामी करत असतो त्यामध्ये स्वतचा निर्णय घेण्याचा अधिकार हा आपला कधीच राहत नाही आणि या चाकरी च्या शोधात भटकणारा चाकर मानी  चाकरी च जीवन जगायला आपल्या मुलांना  लावतो कारण, तो आपले नैतिक अधिकार आणि तत्व  विसरलेला   असतो आणि या मुंबईच्या 80, लाख सामान्य  माणसांमध्ये तो हरवून गेलेला दिसतो ....काय गम्मत आहे ? आणि शेतामध्ये काम करताना आपल् नियोजन आपल्या शेतात पिकणाऱ्या धान्याच् नियोजन केल्यावर एक व्यवस्थित समाज सुरळीत आयुष्य जगता येईल हे विसरून जातो....हो आणि एक मज्जा आहे ती म्हणजे अशी..... हा 12 महीने शेतात राबणारा शेतकरी आणि शेतात पिकणाऱ्या  त्याच्याधान्याला दर हा दलाल ठेवतो ...का ?  असा प्रश्न पड़त नाही  या शेतकर्यांना ? मी देशाचा शेतकारी आणि मी पिकवतो त्याचा दर मला ठेवण्याचा अधिकार मलाच नाही ?  ...का हे विसरुन जातो हे दलाल शेतकऱ्याची कोंडी करत चालले आहेत ,त्यांना आता लाथ मारण्याची वेळ आली आहे ...आता शहराचा विकास होतोय , शहराची जागा वाढली आहे ...आणि या शहराच्या विकासात माझी जमीन बळकावली जाते  ‘’ अरे ‘’ , मुर्खानो.. शहराचा विकास करण्यासाठी आम्हाला का मारत आहात ? का आमच्या जमीनी करोड़ोंच्या अमीषा खाली विकत घेत आहात ? कशासाठी म्हणजे आम्हाला छोट्याश्या पैशाच अमिश दाखवून आमची जमिन बळकावत आहात ? याच्याने सर्व पैसा एकदम हातात येतोय पण, तो पैसा हातात आल्यानंतर हातातून जमीन
जाते ...मग, फक्त घर राहत आणि हा पैसा ....मग, दारु पिऊन पैशाचि उधळपटी होते ....आजार वाढतो आणि हा मग , माझा खेळच् संपतो आता , यावर काय करणार ? पैसा आला जमिन गेली हातात फक्त आणि फक्त दारिद्र्य विकास कोणाचा होतोय? शेतकऱ्याचा की भांडवल दारांचा ,  दलाल मंडळीचा  कि , राजकर्त्यांचा ....आणि शेतकारी हा कुठे एकत्रित दिसतच नाही संपला आहे की संपत चाललाय ? ...दुसऱ्या  बाजूला औद्योगिक विकास महामंडळ ( midc)  क्षेत्रात असणाऱ्या कंपनी म्हणजेच उदा . महाड  midc .....इथे असणाऱ्या कंपन्यांमध्ये निर्माण होणारा केमिकल , आणि त्याच्या निर्मिति साठी सोडला जाणारा वायु हा एवढा घातक आहे की , काही तासांसाठी या कंपनीच्या आजुबाजुला असणाऱ्या गावांमध्ये मी ( तुषार म्हस्के ) गेलो काही मिनिटांमध्ये माझ  डोक दुखायला सुरुवात झाली ,काही क्षण घसा एकदम दाबल्यासरखा झाला श्वास घेत असताना उलटी होते की काय अशी परिस्थिति निर्माण झाली ....मग , अशा वेळेस प्रश्न निर्माण झाला की, इथे राहणाऱ्या गावांमधील लोकांना काही त्रास होतो की ,नाही?  काही ठिकाणी अस जाणवल की ,सर्वाना त्रास होतोय डोके दुखी , छाती मध्ये जळजळन , पण का होते याची जाणीवच नाही ...आणि अस ही समझल की, कोणी आवाज उठवला की,त्याला पैसे देऊन गप्प करण यासारखे विषय होत असतात.... आता करणार  तरी काय  ? मग , थोड़ा वेळ शांत राहून आयुष्यभर भोग आलिया भोगाशि असे निर्णय घेतले जातात ...एका बाजूला ही गुलामशाही काही संपत नाही जी विकासाच्या नावखाली दाबली जाते केमिकल कंपनी मध्ये काम करणारा व्यक्ति किती वर्ष आनंदाने जगतो हेही आपल्याला माहितीच् आहे तरीही काम करा .....आणि आयुष्य घालवा ...पण, शेतामध्ये नियोजन करुन काम करण आम्हाला जमत नाही....काय करणार हा प्रश्न  डोळ्यासमोर येतोच ?......किती हे प्रश्न त्याची किती ही उत्तरे ? पण त्यातून कोणीतरी कृष्ण  , कोणीतरी शिवाजी येईल आणि आम्हाला वाचवेल आणि त्यातून आमची सुटका कधी होईल हे आम्हालाच माहिती नाही .दुसऱ्या  बाजूला राजकीय नेत्यांना आपण  आपल् मानतो पण , ते तर आपलाच फायदा करून घेत चाललेत अरे , आपलेच g r , आणि पेपर वर काम दिसतात पण ,  प्रत्यक्षात रस्ते की खड्डे ,की खड्यात  रस्ते अशी परिस्थिति निर्माण होते....तरीही आमचे साहे ब ……  साला लाथ मारा अशा हराम खोर साहेबांना ……. चला एकत्र येऊन संघर्ष करूयात.... ....अशा नविन सकाळची वाट पाहतोय जिथे मी एक शेतकरी.. माझा निर्णय मी घेणार आणि एक नवीन महाराष्ट्र घडवणार ...विकास आपल्या शेतीतून करणार आणि हे दाखवून देणार की , हे सुंदर जीवन माझ आहे .... एका शेतकाऱ्याच् आहे ....
एका बाजूला होत असणाऱ्या  रास्त्यांच् रुंदीकरण  त्यामध्ये जाणारी जामीन,  कापली जाणारी झाडे ....पडणार पाऊसाच पाणी कसा जमिनित झिरपणार ? अरे गावांमध्ये घरा समोर असणारी  आंगन ही आता मातीची राहील नाही ते सीमेंट च झालय आणि या अंगनात पड़नार मातीच पाणी हे वाहून चाललय ...आणि विकास हा शेतकऱ्यांच्या मेलेल्या शरिरावरचा लोनी खात बसला आहे.... तरीही आम्ही विकास करणार आणि आपल्या जमीनी विकुन स्वताला संपवणार ....फक्त शहरांचा विकास मोठ्या प्रमाणात केला जातोय त्यामध्ये मोठ मोठी विमानतळे बांधली जात आहेत …..त्याच्यासाठी लागणाऱ्या जमिनी साम , दाम , दंड , भेद या तत्वांचा वापर करून बळकावल्या जात आहेत …..आणि त्याला हा शेतकरी बळी पडतोय …उदा .  उरण मध्ये तयार होत असणार अंतरराष्ट्रीय विमानतळ ….विकासाच्या नावाखाली दिल्या जाणाऱ्या जमिनी ….त्याठिकाणी विमानतळ होणार आणि प्रश्न आहे कि किती जमिनी विकणारे शेतकरी या विमानातून प्रवास करणार ? हा प्रश्नच आहे ना …..आमच्या देशाच्या बजेट मध्ये शहरांमध्ये a.c लोकल सुरु झाली आता लवकरच बुलेट ट्रेन सुरु होणार मग , किती शेतकरी त्यातून प्रवास करणार ? …...अरे ….मुर्खानो आता तरी जागे व्हा …..दळणवळण व्यवस्था हवी ...पण आता पर्यंत अशी काही गावं आहेत  ज्या ठिकाणी परिवहन महामंडळाची गाडी जातेय ..का? प्रश्न पडत नाहीत ? काय हि महाराष्ट्रामधील जनता एवढी गरीब , एवढी बेचारी , एवढी गुलाम झाली आहेत हे एक न संपणार कोड निर्माण झालय  
आहे …...काय  ? प्रश्न पडतो एका बाजूला शिवाजीला मानत असणारा हा शेतकरी मावळा संघर्ष करायला विसरलाय ....एकत्र रहायला विसरलाय ....जाती व्यवस्थेचा शिकार झालाय ..मग, फायदा घेऊन राजकारण करण सोप होऊन गेलय आणि फक्त शेतकरी निराश होऊन गेलाय ....आता मी संघटीत होऊन  संघर्ष करतोय आणि मी माझ राज्य निर्माण  करतोय हे ऐकण्यासाठी , हे पाहण्यासाठी डोळे आतुरलेत बदलाची वाट पाहत आहेत......


















तुषार म्हस्के
(९०२९३३३१४७)

No comments:

Post a Comment