Friday, 5 February 2016

छेड छाड़ हि एक वाईट विकृती आहे.......

छेड छाड़ क्यों ? मंजुळ भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक .... खरोखर हे नाटक नसून..हाजीवन जगत असताना घडत असणारा प्रसंग.... कारण , छेड छाड़ हि एक वाईट विकृती आहे .....आणि हे नाटक


आपल्या ला त्या विकृतींचा सामना करून ....त्याना सामोरे जावून .....या सत्ता धारी समजामध्ये अभिमानाने जगायला शिकवते ......अश्विनी नांदेडकर , सायली पावसकर ,कोमल खामकर यांनी या विकृती ला उखाडून काढण्यासाठी आणि तरुणाईला दिशा देण्यासाठी सुरुवात केली .......थियेटर ऑफ रिलेवंस च्या सहवासात आल्यापासून हे नाटक मी  आता पर्यंत पाहिले नव्हते .... आणि शो पाहिल्या नंतर हा क्षण  माझ्या साठी ऐतिहासिक राहिला ......नाटक पाहून घरी आल्यानंतर झोपलो आणि त्यानंतर मनामध्ये हे छेड छाड़ का ? हा प्रश्न सतत येत राहिला ......
नाटक पाहण्यासाठी मी पहिल्यांदा सर्वात शेवटी सर्वांच्या मागे उभा होतो ....रयत शिक्षण संस्थचे हे महाविद्यालय ....आज सरांसोबत या चळवळीचा हिस्सा होण्यासाठी आलो ..... खर तर , मी या चळवळीची सुरुवात करताना असायला हवं होत .....हिच गोष्ट मनाला खात असते .....याची खंत मनात राहून गेली आहे ....अखेर .मी स्वतः शी निर्धार केला ....यापुढील प्रवासाला मी .या चळवळीत असेल आणि या चळवळीला पुढे घेऊन जाईल असं ठरवलं .... या प्रोसेस मधून जाताना मुलांना आलेले अनुभव आणि मंचावर सादरीकरण यांची सांगड घालत असताना त्यांच्या मध्ये झालेले बदल हे अविस्मरणीय राहिले ...आज ज्यांचा स्वतावर विश्वास नव्हता ते विद्यार्थी चालण्यात ,बोलण्यात ,आणि वागण्यात एकदम खुलले होते .....हे त्यांचे व्यक्ती गत अनुभव ऐकत असताना थोडा भारावलो होतो ......त्वरीत असं काही सुचत नव्हत

आता काय बोलू .....आज आपण बसतो ते ठिकाण सोडून ते कलाकाराच्या भूमिकेत होते....प्रत्येक कलाकाराने त्याचे व्यक्तीगत आणि ग्रुप बरोबर काम करताना अनुभव सांगून झाल्यानंतर .....आजचा जवान हा रणभूमीवर लढण्यासाठी निघाला .....३००० ते ३५०० पर्यंत विध्यार्थी संख्या असणाऱ्या या विद्यापीठामध्ये त्यांच्या समोर हा प्रयोग म्हणजे.एका क्रांतीची सुरुवात वाटू लागली .....छेड छाड़ हा विषय घेऊन स्वतामध्ये दिव्य ज्योत पेटवून हे शिलेदार आज तलवार घेऊन मंचावर अवतरले ...आणि क्रांतीची सुरुवात झाली ......

.छेड छाड़ क्योँ ? अत्याच्यार क्यों ? हिंसाचार क्यों ? चा आवाज आला ....त्यामध्ये ढोल चां आवाज आणि कलाकारांच्या प्रत्येक अवयवातून येणारे हे संवाद शेवट पर्यंत पोहचत होते .....कलाकाराच्या अंगामधून बाहेर पडणारे भाव अगदी मनाला खेचत होते .....हृदयात भिडत होते .....हि गर्दी .......शो मध्ये मुलगा ज्यावेळी संवाद करत असतो त्यावेळी मुले खुश होऊन जायची ....आणि त्याच्या या विकृतीवर ज्यावेळी मुलगी कलाकार उठून बोलायची त्यावेळी मुलांच्या सन करून कानाखाली बसून जायची ....आणि क्षणात सुरु असणारा गोंधळ शांत होऊन जायचा ......नाटकातील दृश्य हे बिंबानुसार बदलत जाणारे .... त्यातच कलाकाराच्या शरीरातील छोट्या छोट्या बारीक मूव .....लगेच हृदयात भिडत होते .....या नाटकाची विशेष ओळख म्हणजे हे नाटक निर्णय घेण्यास भाग पाडतो ......आणि या एक सत्ता पुरुषप्रधान संस्कृती मध्ये ती नारी उभी राहते ....आणि बोलते माझा निर्णय मी घेणार .... वा , जबरदस्त आणि ती आपल्या स्वताची नवीन ओळख करून देते .....नाटक पाहत असताना सुरुवातीला आलेली गर्दी आणि त्यांचा होणारा आवाज हा शांत झालेला आणि शेवटी – शेवटी प्रेक्षक एकटक ...एकाग्रतेने रंगमंचावर कलाकारांकडे पाहत होते ......
हे सादरीकरण झाल्यानंतर कलाकारांना ज्यावेळी पाहिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधानाच तेज .......प्रसन्नता देणारे होते ...... कलाकार बोलत होता ...आज मी विश्व जिंकायला सुरुवात केली आहे आणि त्याची एक बाजू म्हणजे छेड छाड क्यों ? ….हि चळवळ आहे ......हे सर्व पाहत असताना माझ्या तोंडामधून एकही शब्द फुटत नव्हता मी फक्त पाहत होतो .......आणि मनामध्ये हा या चळवळीचा पहिला अनुभव साठवून ठेवून आणि हि चळवळ पढे घेऊन जाण्याचा निर्धार केला ....





तुषार म्हस्के
अनुभव : दिनांक 3 फेब्रुवारी 2016
(महात्मा फुले कला, विज्ञान व् वाणिज्य महाविद्यालय पनवेल, जिल्हा रायगड )

No comments:

Post a Comment