एका जबरदस्त वादळाची सुरुवात शांतीवन येथे झालेल्या थियेटर ऑफ रिलेवन्स च्या शिबिरात मला मिळाली. हे शिबीर मंजुळ भारद्वाज यांच्या जबरदस्त मार्गदर्शनाखाली झाले……
दिनांक :-१०/९/२०१४
वार :- बुधवार
सकाळी ४:३० ला उठून गावाहून वर्क्शोप साठी निघालो आधल्या दिवसी मम्मी सोबत आजोबांच्या पाढव्यांसाठी गेलो होतो. ५:३० वाजेपर्यंत महाड बस स्थानकावर पोहचलो मौशीच्या मुलाने सोडलं आता पुढे पनवेल पर्यंत येणारी गांधी शोधत होतो त्याच दरम्यान ६ वाजता ची महाड ते मुंबई सेन्ट्रल हि गाडी लागली होती . गाडी मध्ये बसलो आणि गाडी सुरु झाली २० ते २५ मि . चा अंतर पार करून गेल्यावर समजल कि गाडी वरून लिकेज आहे. नेमक पाणी माझ्या अंगावर पडत होत मग मी सरळ शब्दात तिकीट काढणाऱ्या मास्तरांना बोललो त्याच बरोबरो माझ्या माघून सर्व जन बोलले म्हणजे कावळा बसाव आणि फांदी तुठावी हि परिथिती झाली . पुन्हा तीच गाडी स्थानकावर आणण्यात आली . दुसऱ्या गाडीत बसल्यानंतर ती गाडी चालू झाली दरम्यान मला मध्ये डुलकी लागली आणि झोप आली मधल्या कालावधीत आश्विनी दीदी चा फोन येवून गेला होता पुन्हा फोन वाझला त्यावेळी मी पेण ला पोहचलो होतो. साधारणता ८:४५ झाले असतील सर्व जन पनवेल ला भेटण्याचा कालावधी ९:०० वाजताच ठरला होता. पण तांत्रिक अडचणींमुळे मला उशीर झाला. मी ९.:३० पर्यंत पनवेल ला पोहचलो. ए . टि . म मधून मला पैशे काढायचे होते, तसेच अंतर वस्त्र पण घ्यायचे होते . मग खूप वेळ चालल्यानंतर मला ए . टि . म त्याच्याच शोध १०:३० वाजले होते. मग बाकीच्या गोशिती घेतल्यानंतर मी शांतीवन ला जाणारी विक्रम शोधू लागलो आणि ती मिळालो साधारणता ११:३० पर्यंत पोहचलो पण रस्त्यात फार चिडचिड झाली . मनाला वाटत होते वेळेवर का नाही पोहचू शकलो आणि मंजुळ सर यांच्याबद्दल खूप काही खूप काही ऐकले होते त्यामध्ये ते वेळेवर पोचतात आणि वेळेचा गणित त्यांच एकदम पक्क असत मग आता पुढे काय करायचं माझ्या अगोदर बाकीचे लोक पोहचले होते . हा पण निसर्ग येवढा जबरदस्त होता कि सर्व ठीक आहे आपण याचा आनंद घेवूयात मग पुढे गेलो मस्त नाचत रस्त्यावरच पाणी उडवत माझ्या घेत मस्त आणि जबरदस्त वाटत होत कदाचित एका नव्या युगाची सुरुवात जाणवत होती. एकदाच कसतरी पोहचलो त्या ठिकाणी लांबून सर्व जन आवाज देत होते तुषार धाव अरे म्हटल पोटात कावळे ओरडत आहेत कसा काय धावू गेलो पाहिलं तर सार्वजन v सेप मध्ये बसले होते . शांतीवन हि जागा माझ्यासाठी नवीन नव्हती कारण त्या अगोदर ७ ते ८ वर्ष्या पूर्वी आमच्या शाळेची सहल आली होती हा पण तेव्हा एक वादा त्या परिसराबरोबर मी केला होता कि पुन्हा मी नक्की येणार या जागेवर आणि निसर्गाने साक्षात खेचून आणले होते. बर वाटलं खूप समाधान मिळाल्यासारख झाल. सर खुर्चीवर बसले होते त्यांनी सर्व प्रथम सुचना दिल्या समोर दिसणाऱ्या हाल मध्ये स्त्री व पुरुष एकत्र राहणार कोणाला काही प्रोब्लेम नसे पर्यंत काहीहि करा पण समोरच्याला प्रोब्लेम झाला तर आयुष्यातून एवढे प्रोब्लेम बाहेर येतील कि पुढच्या गोष्टी बाझुला.सर म्हणाले ‘’ काही कपडे वैगरे बदलायचे असतील तर बदलून घे फक्त ५ मि. मी गेलो कपडे बदलले शोर्ट घातली आणि टि - शर्ट घातली बुक आणि पेन्सील घेवून बसलो . माझ्यासाठी भजी बाजूला काढून ठेवलेले . पण सर जे काही सांगत होते ते समजण्या पलीकडच होत .त्यांनी सांगितल जोपर्यंत एखाद्या स्त्री ला असा वाटत नाही कि, या माणसाचा हात सोडावा तोपर्यंत आपल मन असत हि गोष्ट माझ्या मनात घर बांधून गेली. त्यांनी सांगितलं तुम्हाला जे काही या वर्क्शोप मधून अपेक्षित आहे ते आपल्या वहीवर लिहून काढा . ते काढले काही कालावधीत जेवणाची वेळ झाली १२:३० वाजता भूक तर खूप लागलेली तर आम्ही जेवणासाठी नवीन भोजन गृहात गेलो जेवल्यानंतर पुन्हा सर्व पहील्य जागेवर आलो . त्याच्यानंतर पुन्हा आम्ही सार्वजन वही आणि पेन घेवून बसलो . काही कालावधीनंतर सचिन व त्याचा मित्र या वर्क्शोप साठी आला पुढे एक छ्यान आणि हसण्यागात इंसिदेठ झाला लक्ष्मि ला सचिनला हात मिळवण्यासाठी साठी सांगितलं त्यावेळी तिच्या तोंडून ‘’ अय्य ……असे शब्द बाहेर आले त्यानंतर सरांनी पुढे सांगितलं कि जोपर्यंत तुला असा वाटत नाही कि सचिनचा हात सोडला पाहिजेल तोपर्यंत तू हात सोडायचा नाही.
खूप वेगळी क्रिया होती त्या दरम्यान समजल कि आपला स्पर्श हा किती महत्वाचा असतो ते आपण कोणत्या उद्देश्याने एखाद्या व्यक्तीला स्पर्श करतो आणि त्यातून समोरचा माणूस कश्या पद्धतीने प्रतिक्रिया देतो म्हणजेच आपण आपला समोरच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा .
नंतर काही वेळानंतर योगिनी कार्यशाळेसाठी सामील झाली . त्यावेळी तिच्याशी बोलताना कळल हि मुलगी किती च्यान आहे तिचे विचार आणि समोरील व्यक्ती च्या बद्दलची आपुलकी सर्वच सुरेख वाटलं. हा पण एक गोष्ट अशी वाटत होती कि, ही स्वतासाठी जास्तच प्रमाणात विचार करते. तिच्याबरोबर आम्ही drop by drop…water या नाटक आपल्या पद्धतीने बसवण्यासाठी घेतला त्यावेळी तिणे जबरदस्त रित्या मार्गदर्शन केले आणि तो भाग बसवून घेतला खूप च्यान आणि वेगळा अनुभव अनुभवायला मिळाला . संध्याकाळी ८:३० वाजता जेवण झाल्यानंतर सार्वजन काही वेळ अनुभव सांगितल्या नंतर सर म्हणाले सकाळी किती वाजता सार्वजण भेटूयात मग मी सांगितले सकाळी ६:३० वाजता आणि सार्वजन झोपण्यासाठी गेले नंतर अश्विनी ,मी ,सायली, लक्ष्मि व योगिनी गप्पा मारत बसलो होतो साधारणत: १:४५ पर्यंत बोलन झाल्यानंतर सर्व जन झोपून गेले.
दिनांक ११/९/२०१४
वार ; गुरुवार
सकाळी ४.:४५ वाजता जा आली सर्वीकडे अंधार दबक्या पावलांनी हाल च्या बाहेर आलो सर्व काही नवीन वाटत होत सर्वी कडे अंधारच अंधार खुरच्या हि बोलू लागल्या .
‘’ अचानक , डोळ्यातून पाणी वाहू लागले . सर्व काही वातावरण मनाला स्पर्श करत होते . आज खुर्ची माझ्याशी बोलत होती . आलास …. ये तुझी मी वाठ पाहत आहे . सर्व बाजुला अंधार रातकिड्यांचा असणारा आवाज . मधेच सुरु झालेला पाउस त्यातून येणारी थंडगार हवेची झुळूक आणि मधेच आलेला आवाज . …… ‘’ स्वागतम !!!!! सुस्वागतम …… वैश्विक रंगमंच्यावर तुझा स्वागत आहे …. मी … कावरा बावरा झालो इकडे तिकडे पाहू लागलो …. वेड्या … बघतोस काय विंगेतून तुला रंगमंच खुणावत आहे . रडतोस काय … अरे हि जागा तुझीच आहे हीच तुझी कर्मभूमी . सतत सतत …… ‘’ स्वागतम !!!!! सुस्वागतम …… …… ‘’ स्वागतम !!!!! सुस्वागतम …… …… ‘’ स्वागतम !!!!! सुस्वागतम …… …… ‘’ स्वागतम !!!!! सुस्वागतम …… चलबिचल झालेला मन शांत झाला सर्व भावनांचा उद्रेक आणि नंतरची झालेली शांतता पण , डोळ्यातून येणाऱ्या पाण्याचा वेग काही थांबला नव्हता . एखाद्या वाळवंटातील प्राण्याला जेव्हा पाणी मिळतो त्याच्यातून लाभलेला सामाभान माझ्या डोळ्यातून एका एकी बाहेर येत होते .
त्या अनुभूती नंतर डोळ्यामध्ये एक वेगळीच लय आणि चमक आली . मन स्थिरावला समोरच्या भिंतीवर हि तेच लिहील होत सुस्वागतम … । मनातील सर्व शंखा दूर झाल्या आता काही नाही निसर्गाच , निसर्गातील प्रत्येक घटकाच सर्व कांही ऐकत जायचं , शांत बसायाच . काही वेळात सर तिकडे आले . त्यांनी चहा आणण्यास सांगितला . मी लगेच चप्पल घालून चहा आणण्यासाठी गेलो . दरम्यान ६:१५ ते ६.:२० झाले होते मग ,चहा पीत मी निसर्गाचा आनंद घेत होतो . बर वाटत होत सर्वजण ७ ते ७:३० पर्यंत जमा झाले. काही वेळातच सार्वजन गोलाकार सर्कल करून उभे राहिले . तेव्हा सरांनी सांगितले सर्वांचा निर्णय ऐकून घेतला पाहिझेल कि सर्वाना काय वाटत . मनात समाज पटली कि नाही बरोबर आहे माझ चुकल आपण सर्वांचा अभिप्राय घेतला पाहिजेल . सर्वाना विच्यारल आताचा अजेंडा काय आहे . हा मोठा प्रश्न होता कि असा काय विचार केला नाही मग काय सांगू मग काहीतरी टाकले मग अश्विनी दीदी म्हणाली चैतन्य अभ्यास करू त्यावेळी सर म्हणाले १५ मि. बाकी आहेत जा करा …। मग मास्त पैकी आम्ही धावायला सुरुवात केली . स्वताच नाव घ्या स्वताच नाव पण घेणं खूप खतरनाक असत हे समजत होत हृदयाचे ठोके वाढत होते. हा , त्यातील अनुभव जबरदस्त होता माझ्या हाती आला . नंतर मिली लिहिण्यास सांगितलं काल पासूनचा अनुभव व त्यातून काय शिकण्यासाठी मिळाले . अनुभव मांडायचा त्यासाठी तयारी सुरु झाली . आणि ते लिहिल्यानान्तारचा समाधान जबरदस्त होता . १२.:३० वाजले आणि आम्ही जेवणासाठी सर्वजण भोजनालयात गेलो .जेवल्यानंतर सर्वजण गोल खुर्च्यांवर बसले दरम्यान रुपाली या शिबिरासाठी आली त्यानंतर योगिनी ला थोडा लोकप्रियतेचा अनुभव आला . दरम्यान रुपाली जेवणासाठी गेली . काही वेळानंतर आम्ही drop by drop…water ची स्क्रिप्ट घेवून बसलो संद्याकालाची वेळ होती वातावरण जबरदस्त तेजमय वाटत होते . काही वेळानंतर रुपाली सहभागी झाली बर वाटलं एखादा अनुभवी माणूस सहभागी झाल्यावर नंतर आम्ही ८:३० वाजता जेवणासाठी गेलो तिकडून आल्यानंतर आम्ही पुन्हा स्क्रिप्ट भाष्यान्तार्नासाठी बसलो साधारणता ९ :३० झाले होते अझून थोडा वेळ मागून घेतला आणि scene बसवायला सुरुवात केली प्रत्येकाची सृजनशील कलाकृती बाहेर येत होती आणि भीती हि वाटत होती . कि काही चुकीचा केला तर सर पुन्हा काहीतरी बोलतील म्हणून सार्वजन मन लावून बसून काम काम करत होते . हा , आणि ईश्वर हि आमच्या सोबत होता बर वाटलं देव बरोबर असल्याची जाणीव झाली . तालीम सुरु होती त्यावेळी ईश्वर चा आवाज काही येत नव्हता आता याच्या तोंडून आवाज कसा काढणार तर अचानक माझ्या तोंडून आवाज आला ‘’ जरा , renge मध्ये या तुमचा आवाज मला ऐकायला नाही येत आहे . त्यावेळी सार्वजन जोरात हसू लागले . काही कंट्रोल नव्हत हा त्या अगोदर योगिनी , अश्विनी आणि सायली आणि रंगकर्मी या लेखा वर नाट्य सादर केले . जबरदस्त सायली आणि अश्विनी या ग्रीप पकडली होती . इतक्या पणे सर्व करत होते डोळ्यामध्ये तेज झळकत होते . दरम्यान संध्याकाळच्या वेळेस खूप दास चावत होते कारण मी हाप चड्डी घातली होती . डासांना हि नवीन रक्त भेटत होते मग ते कसले सोडतात . अंगावर काळ येई पर्यंत रक्त शोसून घेत . हा पण या सर्व प्रक्रिये मध्ये हि काळ काही जाणवत नव्हती. झोपायला जाण्यापूर्वी सर्वांनी सकाळी ७:३० वाजता दुसर्या दिवशी भेटण्याचे ठरले नवीन नवीन अनुभव डोळ्यासमोर आले होते सर्व काही नवीन मनाची सहन करण्याची ताकत वाढली एक जबरदस्त तेज डोळ्यांना जाणवत होते खूप मनमोहित करणारा अनुभव डोळ्यांना जाणवत होता . हात पाय शांत होवून मन प्रसन्न होत होते. सर्व जन झोपण्यासाठी गेले मनाला बरे वाटले कारण , प्रत्येक रात्र प्रत्येक क्षण मनाला खूप काही शिकवून जात होता . आणि कुठेतरी एकांत हवा होता. काही वेळ बाहेर एकठाच बाहेर पढलो होतो आणि बंद करून जबरदस्त शांत बाकावर पढलो. सर्व काही चकमकीत वाटत होते. थोडा वेळ डोळे बंद करून झाल्यानंतर आत मध्ये गेलो. सर्व जन गाढ झोपेमध्ये होती. मी जावून चादर अंगावर घेवून झोपलो.
दिनांक :१२/९/२०१४
वार : शुक्रवार
सकाळी ५:४५ वाजता जाग आली आणि बाहेर येवून बसलो कोणीही उठले नव्हते . थोडा वेळ बाहेर फिरल्यानंतर समोरून सर येताना दिसले . मग पुन्हा मी चहा आणण्यासाठी गेलो चहा आणल्यानंतर मी आणि सरांनी चहा पिल्यानंतर मग पुढे एक एक जन उठून आप आपल उरकून पुढे आले त्यानंतर आम्ही चैतन्य अभ्यास केला खप छ्यान वाटलं जमिनीवर झोपल्यानंतर चा अनुभव खूप मोठा होता असा जाणवत होत कि जमिनीला काहीतरी बोलायची आहे. तिची चाहूल मनात आली मग त्या दृष्टीकोनातून विचार करण्याची प्रक्रिया सुरु होवु लागली. जमिनीकडे लक्ष गेले त्यावेळेस मुंग्या जामिनीला खड्डा करून त्यातून एक एक कान बाहेर आणत होते त्यावेळी जाणवलं माणूस आपल्या स्वार्थासाठी पण अशाच पद्धतीने जमिनीचा वापर करतो .किडे , तसेच या भूतलावरील प्रत्येक किठ्क त्यापधितिने जगात जगत असतो . म्हणजे स्वार्थी हा मनुष्य नाहीतर तर प्राणी हा आहे . म्हणजेच प्रत्येकामध्ये स्वार्थी होण्याची भावना हि त्याच्या व्यापकतेनुसार आलेली असते का ? … त्यातून एक समजले कि कितीही जमिनीचा वापर केला तरीही ती शांत आहे जणू काय आपली हि सर्व लेकरेच आहेत . कदाचित त्यामुळेच तिला धरणी माता बोलत असतील . पुढे सर्वजण आपला अनुभव सांगू लागले.
‘’ प्रत्येक क्षण अनुभवायला हवा,अन्न,पाणी , मानस,
सुख,दुख,राग, तिरस्कार सर्वच काही ‘’
दिवस खूप छ्यान चालला होता mily वाचल्यानंतर खूप बर वाटल mily ची संकल्पना त्यातूनच एक मिळणारी समाधानाची स्पुर्ती त्यानंतरचा अनुभव खूप अल्लाहदाइ वाटत होता आम्ही सर्वजण आपल्या दिलेल्या task मध्ये गुंतलो होतो . सायली अनुवाद करत होती ‘’ drop by drop…water ‘’ या स्क्रिप्ट ची त्यातूनच मध्येच त्यांना follow करत होतो. सचिनचा अनुभव जबरदस्त असल्यामुळे प्रत्येक गोष्ट त्यातून दिसत होती तसेच रुपलीशी खूप छ्यान पद्धत वापरताना दिसली त्यातून सर्व गोष्टी लगेच काळात होत्या . मधेच अवस्था जड झाली . कारण scene बसवण्याची वेळ आली . या सर्व प्रकिये मध्ये खूप मज्ज्या येत होती . विजयाला सर्व काही येत होत पण , कदाचित आपण करताना कोणीतरी पाहीन अ आपल्याला हसेल या भावनेने ती ग्रासली होती. हा पण तिच्या मध्ये माझ पूर्वीच वागण दिसत होत . त्यानंतरच्या प्रक्रियेत जात होतो दरम्यान सरांचा एक जुना विद्यार्थी आला होता त्याच्याबरोबर छ्यायाचीत्रणकाढून झाल्यानंतरची वेळ खूप मोठी आणि महत्वाची होती .सर्वजण गोल सिर्कल करून बसले होते, त्यामध्ये . अस जाणवत होत कि’’ मी एक कलाकार आहे आणि ते जीवन आता मी जगात आहे .’’ आणि सर्व काही घडत होत ते enjoy करत होतो. त्यानंतर योगिनीने जबरदस्त perfomance सादर केला खूप छान वाटला आणि बर हि वाटल ती सर्व बंधन तोडून ती वे जगली होती . नंतर दोन वाघिणी रंगमंचावर आल्या आणि त्यांनी संपूर्णता हाहाकार माजवून सोडला. पुढील सत्रात आम्ही संध्याकाळच्या वेळेस बाहेर फिरण्यासाठी गेलो . सुंदर आणि प्रफुल्लीत करणार वातवरण होत. दुसर काहीच सुचत नव्हत . निसर्गाशी एकरूप होत आल्याची चिन्हे दिसत होती . थोडा अन्द्द्र्मय वातावरण झाल होत . त्या अंधारात प्रतेक जीवाचा अंधारातला असणारा प्रवास तसेच त्यांची चैतन्य शक्ती खूप जबरदस्त जाणवत होती . त्यांच्या आवाजातून , त्यांच्या संभाषनातून , रस्त्याच्या एका बाजूला आवाज तर दुसर्या बाजुच्या आवाजाजाबरोबर एक जबरदस्त लय करून देत होत. तो मनाला खूप भावत होता आम्ही त्या उत्साहात पुन्हा परत आलो. नव्या जोमाने drop by drop…water या नाटकाचे गाणे बसविण्यासाठी क्रिया खूप आणि भरपूर शिकवून जात होती एक पाय उचलन , हात हलवण , काम्भर हलवण काहीच ताल मेल लागत नव्हता . रिदम लय भारी होता . ‘’ water water …… water water पुढील प्रोसेस मधील अनुभव आणि अनुभव पुरती आली . खूप मोठ्या शक्तीचा , विचारांचा अनुभव , संदर्भ आणि स्प्ष्टीकरण . माझ्यातील नवीन गुण समोर आला संधर्भ लावण नंतर स्पष्टीकरण योगिनी आणि सचिन लावत होते खूप वेळ आ,हि काम केला खी वेलानंतर योगिनी झोपण्यासाठी गेली मी आणि सचिन नोट्स घेऊन बसलो दरम्यान विज्याबरोबर्चा झालेला संवाद मनाला वळण लावून गेला . जाता जाता सचिनच्या चैतन्य अवस्थेची जाणीव दाखवून गेल. तसेच आपण कस राहतोय ? … कस वागतोय ? … कस व्यक्त करतोय , व कस presents होतोय आणि त्यातून होणार पश्याताप सचिन शी बोलता बोलता नकळत जीवनातील भरपूर व्यक्तीना dominte करत आलोये आणि त्याच्यातून पुन्हा दोमिणते होणार नाही अस आपण वागलो पाहिजेल हे जाणवलं व आपल्यासमोर असणारा प्रत्येक व्यक्ती हा काही क्षणापुरती बरोबर असतो व त्या बरोबर आपण चांगल्या पद्धतीनेच वागाल पाहिजेल हि शिकवण सचिनने दिली . ….
दिनांक : १३/९/२०१४
वार : शनिवार
सकाळी ७:३० नंतर सर्व जण पुन्हा भेटले मग मिली वाचण्याची प्रक्रिया सुरु झाली . सचिन न ने माझ्याबद्दल खूप छ्यान लिहिले होते त्याच गोष्टीवर पुढे बोलताना सरांनी माझ्या मधील एका नवीन गुणाचा अनुभव करून दिला होता . सरांनी विच्यारल ‘’ तुझ वय किती आहे ?’’ मी म्हणालो २३ त्यावेळी सरांनी सांगितले तुझ्याकडे असणारा अनुभव हा १० पट्टीने पुढे आहे . आणि मलाच पहिल्यांदा हि गोष्ट माहिती पडली होती खूप बर आणि वेगळ वाटल त्यानंतर पुढे सरांनी मला विच्यारले तू ज्या लोकांबरोबर असतोस त्यांचा वय काय आहे . त्यावेळी मी सांगितली ३५, ४० ,४५ , ५० त्यावर सार्वजन माझ्याकडे एका वेगळ्याच दृष्टीकोनातून पाहू लागले आणि हा अनुभव माझ्यासाठी जबरदस्त होता आणि ते मला जाणवत होते . काही जे प्रश्न होते त्यांची उत्तरे आपोआप मिळत होती . समाधान आणि तेज डोळ्यावर दिसू लागले होते. काही वेळानंतर अश्विनी आणि रुपाली दोघी घरी निघून गेल्या साधारणता ९ ते ९:३० वाजले असतील . काही गोष्टी बाहेर येत होत्या magical identity and lovable you. संध्याकाळी आम्हाला सरांनी सांगितले . तुमच्याकडे असलेली मिली सर्वानी सकाळी ११:०० वाजता सादर करायची आहे. पुढे सार्वजण त्या कामाला लागले . पुढे सरांनी सांगितले कि, तुम्ही सादरीकरण करताना कोण कोणत्या गोष्टी वापरणार आहात त्यावर विछार केल्यानंतर काही शब्द मला मिळाले. conceptual,story,feeling,enjoyment,connection,relation,attraction,involvement,heart touching, eye catchy,inspirational,rhythm,composition. या सर्व गोष्टी डोक्यात तर ठेवलेल्या आणि त्या नुसार काम चालू झाल . मिली वर वर काम तर करायचं होत आणि त्यातून सृजनशील कलाकाराच दर्शन घ्यायच, प्रोसेस जबरदस्त सुरु झाली रात्री पासून विचार मनात खूप आले. त्यांना आकार द्यायचं हे चालू झाल , काहीच नाही केल हा पण मिली च्या सर्व गोष्टी निसर्गात व आजूबाजूच्या परिसरात शोधण्यास सुरुवात झलॆ. कस्तुरीचा सुगंधाच्या शोधात ज्यापद्धतीने पाडसाची होणारी धावपळ होते त्यापद्धतीने माझ्या मनाची धावपळ झाली होती. सर्व काही माझ्या जवळ आहे आणि मी बाहेरील विश्वात काय शोधत होतो ? हाच प्रश्न मला पडला . परिसराचा रिदम आणि फील या दोन गोष्टी मनात ठेवल्या मग अंधारात कट्ट्यावर उभा राहून मागच्या बाजूला वाकून तोल सावरणे कारण हात लांब करून हवेचा स्पर्श आणि जाणीव फक्त सर्व काही ऐकून घेण्याची क्रिया तसेच जमिनीवर झोपून केलेला स्पर्श, कधी बेडूक उडी मारून तर पाय उलटे करून एक जबरदस्त चैतन्य शक्तीचा अनुभव जबरदस्त आल. त्यामध्ये अस हि जाणवत होत कि. ‘’ एक जबरदस्त तेज मला जाणवत आहे त्या तेज्यामध्ये एवढी शक्ती आहे कि , ज्यामुळे मला आज प्रत्येकाम्ध्ये एक चैतन्य शक्ती दिसत आहे . प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये चमक आली आहे, परतेक जन खुप सुंदर दिसत आहे . प्रत्येकाच्या हातामध्ये एवढी शक्ती आली आहे कि, हात हलवला तर हवा रस्ता बद्लेल. बोलण्यात एवढी ताकद आली आहे कि, पाउसाला म्हटल आता ये रे तहान भागाव तरीही तो येण्याच्या तयारीत बसला आहे निसर्गातील प्रत्येकामधे माझ अस्तित्व दिसत आहे. ‘’ रात्री काही वेळानंतर अश्विनी आली नंतर थोडा वेळ गप्पा चालल्या आणि काही वेळानंतर सर्व जन झोपण्यासाठी गेले . खूप वेळ संदर्भ शोधत बाहेर बसलो होतो . पण संधर्भ काही मिळत नव्हते मग मी उठून झोपण्यासाठी गेलो रात्रीचे ३ वाजले असतील.
दिनांक : १४/९/२०१४
वार : रविवार
सकाळी ७:३० वाजता उठल्यानंतर गोंधळ झाला त्याच बरोबर एक नवीन गोष्ट आणि जबरदस्त म्हणजे उठायला उशीर तर झाला होता . सर समोर बसले होते डोळे फुसत बाहेर पडलो धावपळ झाली सर्वांनी सकाळी ६:३० वाजता उठण्याच ठरवलं होत पण सर्व जन जबरदस्त झोपले होते उठल्यानंतर बाथरूम मध्ये जाउन आलो. आल्यानंतर झोपेतच सरांना सांगितलं सर संधर्भ मिळत नाही आहेत . त्यांचीशी बोलता बोलता समोर एक कोमल सर्याचा प्रकाश समोरून येताना दिसला . काहीच कलाल नाही मन सारी प्रकाश्याच्या दिशेने धावत गेले वाटल या सारी प्रकाश्याच्या झोतात स्वताला झोकून द्याव . त्या बझून धावत गेल्यानंतर तो प्रकाशाचा झोत आपल्या साठी निसर्गाने पाठवला आहे त्या ठिकाणी गेल्यानंतर नकळत हात सूर्य प्रकाशाच्या दिशेने उचलले आणि सूर्याला म्हणालो ‘’ हे सूर्या तू किती महान आहे तुझ्या मध्ये एवढी चैतन्य शक्ती आहे कि सर्वी कडे अंधार घालवते व प्रकाश देतोस तर तुझ्या अंश्यात जी शक्ती आहे तशीच चैतन्य शक्ती माझ्या हृदयात दे …. मला या प्रकाश्याच्या झोतात समाविष्ट करून घे,. त्याने सर्वच काही ऐकले डोळे बंद केले आणि झोकून दिले . एक जबरदस्त शक्ती माझ्या हृदयात येताना जाणवत होते होते एक कोमाठ स्पर्श हृदयाला जाणवू लागला त्यानंतर काही वेळ तसाच उभा राहिलो . थोड्या वेळानंतर एक लय बाहेर पडू लागला होता . तो एवढा जबरदस्त होता कि, माझे पाय हळू हळू नाचू लागले होते . हात हळू लागले हात हलताच हवा येण्यास सुरुवात झाली . सर्व काही एकवट झ्ल्यासर्खे वाटू लागले तन-मन - शरीर आणि निसर्ग सर्व काही एकच आणि त्यातील एक अंश म्हणजे मि. लय एव एवढा जबरस्त होता कि ,जंगली किड्यांचा जबरदस्त आवाज , त्यामध्ये विलीन झालेला मन आणि त्या लयावर नाचू लागलेले पाय … त्यातूनच अच्यानक हात वरती जावून नकळत मनातून आले तू पण ये रे पाउसा ……. तो हि आलाच ……त्यातून एवढा आनंद मिळत होता कि , आता असाच जगत रहाव … डोळे बंद होते पाय ओल्या लादीवर त्याच्यावर असलेली हिरवीगार शेवाळ ……. आणि त्या अवस्थेत डोळे बंद आणि एक अविष्कार म्हणजे मला कुठेच पडताना जाणवले नाहि. काय निसर्गाची किमया असेल याचा तर्क लावणे हि कठीण साधारणता : १०:३० वाजले नंतर पुढे त्या परिस्थितून बाहेर आल्यावरच आनंद खूप मनाला मोहित करणार होता पुढे ११ :०० वाजता सर्वांच सादरीकरण तर होतच . काय करायचं याची तयारी तर झालीच नव्हती असा कुठेतरी वाटत होत . सर्वजण बसले आणि आप आपल सद्रीकर्ण करण्याची वेळ आली . माझा ४ था नंबर होता ईश्वर आणि कृष्ण या दोन देवांनी सुरुवात केली नंतर सचिन त्यानंतर विजया लक्ष्मी खूप छ्यान पद्धतीने त्यांनी सादरीकरण दिसत होत . नंतर माझ्यावर नंबर आला बिनधास्त रंगमंच्यावर गेलो . मी स्वताला त्यांच्या स्वाधीन केल . त्यातून जी कला सादर झाली एकदम अप्रतिम अवर्णनिय होती. आणि प्रत्येक क्षण माझा हाच दिसत जाणवत होता. प्रत्येक क्षण हा जगत होतो . प्रत्येक क्षणाचा आनंद घेत होतो . आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे हे जे काही सर्व झाल ते च तर मी अनुभवल होत . त्याचच प्रत्क्षित बाहेर पडत होत . रंगमंचावरून बाहेर आल्यानंतर खूप छ्यान आणि बर वाटल मनाला जबरदस्त समाधान मिळाल होत. प्रत्येक गोष्टींच समाधान जाणवत होत . नंतर योगिनी ने आपली कला सादर केली अतिशय च्यान आणि अवर्णनीय वाठ्ली . त्यानंतर सायली आणि अश्विनी या दोघींनी केली जबरदस्त फ्रेश अनुभव मिळाला . पुढे काही वेळ संभाषण झाल्यानंतर आम्ही जेवणासाठी गेलो व त्यानंतर आम्ही परत येण्यासाठी निघालो . त्यावेळी सरांना मारलेली मिठी एक जबरदस्त चैतन्य शक्तीचा अनुभव देत होते . एवढ जाणवत होत आपल्या शक्ती मधील काही अंश शक्ती ते मला देताना जाणवत होते म्हणजेच त्या माणसाचा अंतर्गाभा सर्वव्यापी जाणवत होता …… अशीच एक शक्ती जबरदस्त व्यापी घेवून मी या माया नगरीत पुन्हा प्रवेश केला ……….