Thursday 17 November 2022

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक : गोधडी संस्कृतीचा आत्मशोध ! थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत नाटक "गोधडी"

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक : गोधडी संस्कृतीचा आत्मशोध !

थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत नाटक "गोधडी"

रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक : गोधडी संस्कृतीचा आत्मशोध !  थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत नाटक "गोधडी"


कुठे : श्री शिवाजी नाट्य मंदिर, #दादर 

कधी : 19 नोव्हेंबर 2022 , शनिवार रोजी, सकाळी 11.00 वाजता

कलाकार :

अश्विनी नांदेडकर,सायली पावसकर,कोमल खामकर, प्रियंका कांबळे, तुषार म्हस्के,संध्या बाविस्कर, तनिष्का लोंढे, प्रांजल गुडीले,आरोही बाविस्कर हे आहेत.

नाटक: गोधडी

 रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित “नाटक गोधडी संस्कृतीचा आत्मशोध आहे. संस्कृती, काळ, माती आणि निसर्गासोबत विविध समाजातील सण, प्रथा, चालीरीती, परंपरा यांचा शोध घेऊन मानवी विवेकाचा नवा धागा विणते.”

"गोधडी" भारताचा आत्मा आहे.भारताची विविधता हे नाटक स्पंदीत करते आणि आपल्यातील विवेकशीलतेला जागवते.या गोधडीत सामावले आहे आपले सारे जग. मनुष्याचे पाखंड आणि विकृतीला समूळ नष्ट करत मानवाच्या मूळ संस्कृतीचा शोध घेते. वर्चस्ववादी शोषणचक्राच्या मुळाशी जाऊन हिंसाचाराच्या विकृतीला आपल्या दृष्टीने अहिंसेची, मानवीय संवेदनांची आणि नैसर्गिकतेची संस्कृतीला उलगडण्याचा ध्यास आहे नाटक "गोधडी" .!

प्रत्येक मानवामध्ये दोन महत्त्वाचे पैलू आहेत, एक म्हणजे आत्मबळ आणि दुसरे आत्महीनता. आत्महीनतेमुळे जगातील वर्चस्व, मक्तेदारी, हुकूमशाही निर्माण होते ज्यामुळे जगातील मानवता नष्ट होते. आत्मबळातून विचार जन्माला येतात, ते जगातील विविधता, सर्वसमावेशकता, मानवता, न्याय आणि समतेला स्वीकारतात व निर्माण करतात.विचार आणि विकाराच्या संघर्षात जेव्हा विचार विकाराला मिटवतो व मानवी जाणिवेने जिवंत होतो, त्याच बोधाला 'कला' म्हणतात.

सत्ता व्यवस्था बनवू शकते परंतु माणसाला माणूस बनवू शकत नाही. मनुष्याला मनुष्य बनवते 'कला'. 'रंगकर्म' सर्व कलांना जन्म देते. रंगकर्मात सर्व कलांचा समावेश आहे.कारण रंगकर्म वैयक्तिक असूनही सर्वभौमिक आहे.मानवतेचे तत्व म्हणजे रंगकर्म !! तत्वाशिवाय माध्यम म्हणून ते अपूर्ण किंवा केवळ दिखावा आहे.

 रंगकर्म हे केवळ एक माध्यम नव्हे तर मानवतेची संपूर्ण दृष्टी आहे, दर्शन आहे.

मनुष्याच्या या अधोगतीचे कारण म्हणजे त्याच्या सांस्कृतिक चेतनेचा मृत्यू. इतिहास साक्षी आहे की,कोणी कितीही सामर्थ्यशाली, पारंगत, सर्वज्ञ माणूस, समाज, सभ्यता किंवा साम्राज्य असले तरीही जेव्हा त्यांची सांस्कृतिक चेतना भ्रमिष्ट झाली, तेव्हा त्यांचा विनाश झाला. सांस्कृतिक चेतना म्हणजे "जी चेतना माणसाला अंतर्गत आणि बाह्य वर्चस्वातून मुक्त करते, त्याच्या मूल्यांना उत्क्रांतीच्या मार्गावर उत्प्रेरित करते आणि प्रकृती माणसाचे स्वायत्त अस्तित्व घडवते" मात्र विज्ञानाला फासावर लटकवून त्यातून निघालेल्या एकाधिकारवादी तंत्रज्ञानाने प्रकृतीशी युद्धाची घोषणा केली आणि संपूर्ण मानव संस्कृती धुळीस मिळवण्यास सज्ज झाले आहे.आज जग युद्धात आहे आणि अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील, जेव्हा संपूर्ण राजनैतिक व्यवस्था विकली गेलेली आहे. सत्य-असत्याच्या पुढे जाऊन आणि निरंतर खोटे पसरवून समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या विकारांपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.

 थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत:

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य तत्व मागील 30 वर्षांपासून आपल्या नाट्य प्रस्तुतीतून निरंतर कलात्मक सृजन प्रक्रियांना उत्प्रेरीत करत आहे. सृजनशील विचारांच्या, कलासत्वाच्या, तात्विक प्रतिबद्धतेच्या आणि विवेकशील प्रतिरोधाच्या हुंकारने विश्वाला सुंदर आणि मानवीय बनवण्यासाठी समर्पित आहे.

मागील 30 वर्षांपासून ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या नाटय़ सिद्धांताने सतत कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली कलेप्रति जबाबदारी आणि कर्तव्ये निभावली आहेत. प्रेक्षक सहभागाच्या आधारावर मुंबईपासून मणिपूरपर्यंत हे ‘रंग आंदोलन’ सुरू आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ ने जीवनाला नाटकाशी जोडून आपल्या कलात्मक  नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ लढत आहे !

 

रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्याविषयी :

 

लेखक - दिग्दर्शक "थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार "थिएटर ऑफ रेलेवन्स" च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट जन-माणसांसमोर ठेवतात. गेल्या 30 वर्षांपासून, म्हणजे एक चतुर्थांश शतकाहून अधिक काळ, थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाटय सिद्धांताचे रंगकर्म करून जिवंत आहे. कोणतीही सत्ता, कॉर्पोरेट किंवा राजनैतिक पार्टीच्या आश्रयाविना भारतभर रंग आंदोलनाला उत्प्रेरित करत आहे. जगातील अनेक देशांमध्ये 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' नाटय सिद्धांतावर आधारित कार्यशाळांसोबत नाटकांची प्रस्तुती केली आहे.

….

Tuesday 25 October 2022

5 नोव्हेंबर : मराठी रंगभूमी दिनानिमित्त थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक "गोधडी"

 5 नोव्हेंबर : मराठी रंगभूमी दिनानिमित्त

थिएटर ऑफ रेलेवन्स शुभचिंतक आणि प्रयोगकर्ता प्रस्तुत करत आहेत रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक "गोधडी"

कुठे : वासुदेव बळवंत फड़के नाट्यगृह, पनवेल

कधी : 5 नोव्हेंबर 2022 ,

शनिवार रोजी, सकाळी 11.30 वाजता

कलाकार : अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, तुषार म्हस्के, प्रियांका कांबळे, तनिष्का, प्रांजल आणि अन्य कलाकार.

नाटक: गोधडी

रंगचिंतक मंजुल भारद्वाज रचित “नाटक गोधडी संस्कृतीचा आत्मशोध आहे. संस्कृती, काळ, माती आणि निसर्गासोबत विविध समाजातील सण, प्रथा, चालीरीती, परंपरा यांचा शोध घेऊन मानवी विवेकाचा नवा धागा विणते.”

"गोधडी" भारताचा आत्मा आहे.भारताची विविधता हे नाटक स्पंदीत करते आणि आपल्यातील विवेकशीलतेला जागवते.या गोधडीत सामावले आहे आपले सारे जग. मनुष्याचे पाखंड आणि विकृतीला समूळ नष्ट करत मानवाच्या मूळ संस्कृतीचा शोध घेते. वर्चस्ववादी शोषणचक्राच्या मुळाशी जाऊन हिंसाचाराच्या विकृतीला आपल्या दृष्टीने अहिंसेची, मानवीय संवेदनांची आणि नैसर्गिकतेची संस्कृतीला उलगडण्याचा ध्यास आहे नाटक "गोधडी" .!

प्रत्येक मानवामध्ये दोन महत्त्वाचे पैलू आहेत, एक म्हणजे आत्मबळ आणि दुसरे आत्महीनता. आत्महीनतेमुळे जगातील वर्चस्व, मक्तेदारी, हुकूमशाही निर्माण होते ज्यामुळे जगातील मानवता नष्ट होते. आत्मबळातून विचार जन्माला येतात, ते जगातील विविधता, सर्वसमावेशकता, मानवता, न्याय आणि समतेला स्वीकारतात व निर्माण करतात.विचार आणि विकाराच्या संघर्षात जेव्हा विचार विकाराला मिटवतो व मानवी जाणिवेने जिवंत होतो, त्याच बोधाला 'कला' म्हणतात.

सत्ता व्यवस्था बनवू शकते परंतु माणसाला माणूस बनवू शकत नाही. मनुष्याला मनुष्य बनवते 'कला'. 'रंगकर्म' सर्व कलांना जन्म देते. रंगकर्मात सर्व कलांचा समावेश आहे.कारण रंगकर्म वैयक्तिक असूनही सर्वभौमिक आहे.मानवतेचे तत्व म्हणजे रंगकर्म !! तत्वाशिवाय माध्यम म्हणून ते अपूर्ण किंवा केवळ दिखावा आहे.

रंगकर्म हे केवळ एक माध्यम नव्हे तर मानवतेची संपूर्ण दृष्टी आहे, दर्शन आहे.मनुष्याच्या या अधोगतीचे कारण म्हणजे त्याच्या सांस्कृतिक चेतनेचा मृत्यू. इतिहास साक्षी आहे की,कोणी कितीही सामर्थ्यशाली, पारंगत, सर्वज्ञ माणूस, समाज, सभ्यता किंवा साम्राज्य असले तरीही जेव्हा त्यांची सांस्कृतिक चेतना भ्रमिष्ट झाली, तेव्हा त्यांचा विनाश झाला. सांस्कृतिक चेतना म्हणजे "जी चेतना माणसाला अंतर्गत आणि बाह्य वर्चस्वातून मुक्त करते, त्याच्या मूल्यांना उत्क्रांतीच्या मार्गावर उत्प्रेरित करते आणि प्रकृती माणसाचे स्वायत्त अस्तित्व घडवते" मात्र विज्ञानाला फासावर लटकवून त्यातून निघालेल्या एकाधिकारवादी तंत्रज्ञानाने प्रकृतीशी युद्धाची घोषणा केली आणि संपूर्ण मानव संस्कृती धुळीस मिळवण्यास सज्ज झाले आहे.आज जग युद्धात आहे आणि अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील, जेव्हा संपूर्ण राजनैतिक व्यवस्था विकली गेलेली आहे. सत्य-असत्याच्या पुढे जाऊन आणि निरंतर खोटे पसरवून समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या विकारांपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.


थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य तत्व मागील 30 वर्षांपासून आपल्या नाट्य प्रस्तुतीतून निरंतर कलात्मक सृजन प्रक्रियांना उत्प्रेरीत करत आहे. सृजनशील विचारांच्या, कलासत्वाच्या, तात्विक प्रतिबद्धतेच्या आणि विवेकशील प्रतिरोधाच्या हुंकारने विश्वाला सुंदर आणि मानवीय बनवण्यासाठी समर्पित आहे.

मागील 30 वर्षांपासून ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ या नाटय़ सिद्धांताने सतत कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली कलेप्रति जबाबदारी आणि कर्तव्ये निभावली आहेत. प्रेक्षक सहभागाच्या आधारावर मुंबईपासून मणिपूरपर्यंत हे ‘रंग आंदोलन’ सुरू आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ ने जीवनाला नाटकाशी जोडून आपल्या कलात्मक नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशी ‘थिएटर ऑफ रेलेवन्स’ लढत आहे !

रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्याविषयी :

लेखक - दिग्दर्शक "थिएटर ऑफ रेलेवन्स” नाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार "थिएटर ऑफ रेलेवन्स" च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट जन-माणसांसमोर ठेवतात. गेल्या 30 वर्षांपासून, म्हणजे एक चतुर्थांश शतकाहून अधिक काळ, थिएटर ऑफ रेलेव्हन्स नाटय सिद्धांताचे रंगकर्म करून जिवंत आहे. कोणतीही सत्ता, कॉर्पोरेट किंवा राजनैतिक पार्टीच्या आश्रयाविना भारतभर रंग आंदोलनाला उत्प्रेरित करत आहे. जगातील अनेक देशांमध्ये 'थिएटर ऑफ रेलेव्हन्स' नाटय सिद्धांतावर आधारित कार्यशाळांसोबत नाटकांची प्रस्तुती केली आहे.



Wednesday 18 May 2022

नाटकासाठी परिवाराचा मिळणारा सपोर्ट माझ्यासाठी प्रेरणा देणारा आहे...तुषार म्हस्के



रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक लोक-शास्त्र सावित्री
माझ्यासाठी प्रेरणा आहे. घर- परिवारामध्ये एक  नवीन ओळख निर्माण करत आहे. नाटक सादरीकरण प्रस्तुति एक भाग आहे. त्यापलीकडे नाटकाच्या प्रयोगासाठी परिवाराचा पुढाकार हा तेवढाच महत्वाचा आहे. " थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताची " ही प्रक्रिया घर परिवाराला एकत्र जोडणारी आहे. त्यामुळे, नाती केवळ भावनिक राहत नाही तर नात्यामध्ये एक वैचारिक स्पष्टता निर्माण होते. नाटक केवळ मनोरंजनासाठी राहत नाही . नाटक हे जीवनाला दृष्टी देणारे होऊन जाते. कलाकार आणि प्रेक्षक यांच्यामधील दरी संपते आणि प्रेक्षक हे नाटकासाठी आपली भूमिका बजावू लागतात.

 लोक- शास्त्र सावित्री नाटकाचा प्रयोग हा पुणे येथे बालगंधर्व रंगमंदिर ला 29 एप्रिल 2022 रोजी , सायंकाळी 5:30 वाजता प्रस्तुत झाला . नाटकाचं वैशिष्ट्य म्हणजे यावेळी, नाटक पुणे येथे प्रस्तुत होणार होत... थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताची मूळ प्रक्रिया आहे प्रेक्षक संवाद ... 14 ते 18 एप्रिल 2022 ला  थिएटर ऑफ रेलेवन्स ची कार्यशाळा सुरू होणार होती. त्या नियोजनामध्ये संवाद करत असताना 29 तारखेला प्रयोग सुनिश्चित झाला. 



सकाळी 7 ते दुपारी 1 मध्ये निळू फुले कला अकादमी मध्ये कार्यशाळा असायची त्यानंतर आम्ही प्रेक्षक संवाद करायचो. परिवार आणि कुटुंबासाठी स्वाती चा एक पुढाकार मला आणि टीम ला खूप आवडला..  तिने नाटक संपूर्ण फॅमिली ला म्हणजेच, तिच्या मामाकडच्या परिवाराला दाखवण्याचे ठरवले. हा पुढाकार म्हणजे मोठं पाऊल होतं... परिवाराला वैचारिक पातळीवर एकत्र जोडण्याचं... याच पुढाकाराला प्रतिसाद म्हणून स्वाती च्या मामी ने घेतलेला पुढाकार हा तेवढाच महत्वाचा होता. थिएटर ऑफ रेलेवन्स च्या संपूर्ण टीम ला घरी येऊन जेवणाचं दिलेलं निमंत्रण माझ्या साठी खूप महत्वाचे होते... यावेळी, प्रेक्षक संवाद प्रक्रियेला सुरुवात माझ्याकडून झाली याचं एक वेगळचं समाधान मला जाणवत होते... माझ्या संपर्कात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला मी फोन करून त्यांना भेटण्याचे नियोजन करत होतो... 

पुण्यात असणारी ओळखीची माणसे मला त्याबद्दल चांगलाच रिस्पॉन्स देत होते... यामध्ये , मला एक क्षण जो मी माझ्या हृदयात कोरुन ठेवला आहे तो म्हणजे, माझी टीम लीडर अश्विनी ताई बोललेली यावेळी, पुण्यामध्ये प्रेक्षक संवादाची सुरुवात तुषार ने केली... खूप छान आणि प्रेरणादायी वाटले... चंद्राचा पडलेला प्रकाश आणि पुण्यामध्ये सरकारी गेस्ट हाऊसच्या गच्चीवर आम्ही टीम म्हणून  संपूर्ण दिवसाची शेअरिंग करत असताना असलेला हा क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता..त्यावेळची  मिळालेली ऊर्जा माझ्यासाठी प्रेरणादायी ठरली...


प्रेक्षक संवाद करत असताना नव - नवीन संकल्पना घेऊन पुण्यात उतरलो होतो. स्वातीच्या मामी चा पहिला पुढाकार सर्व टीम ला जेवायला बोलावणं... त्याच बरोबर त्यावेळच्या पुढाकाराला मंजुल सरांनी दिलेली दृष्टी मामी मध्ये असणारे नेतृत्व गुण आणि सर्वांना एकत्र आणणारा स्वभाव... महत्वाचा होता...नाटकाच्या प्रकियेसाठी आम्ही पुण्यातील प्रत्येक व्यक्तीला भेटत होतो... संवाद करत होतो..मला जाणवत होते... आपल्याला पुण्यामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतीबा फुले यांच्या विचारांना पुण्यामध्ये पुन्हा जागृत करायचं आहे... त्यानुसार, प्रत्येक व्यक्तीला त्या विचारांबरोबर जोडत होतो... 

स्वातीचे आजोबा साधारणतः 75 ते 80 वय असेल परंतु, नवीन विचारांना समजून घेणारे आणि प्रक्रियेला पुढे घेऊन जाणारे जाणवले... संकल्पना सांगितल्या नंतर त्या संकल्पनेला कसं करता येईल त्यासाठी , त्यांची होत असणारी धावपळ त्यासाठी , एवढं वय असतानाही त्यांचा असणारा पुढाकार खूप मोलाचा आहे माझ्यासाठी..प्रेक्षक संवाद करायला जात असताना कोणाला कधी , केव्हा भेटायचं यांविषयी असणारा त्यांचा अनुभव हा जबरदस्त जाणवला... 

पुण्यामध्ये संवाद करत असताना येत असणारा अनुभव हा खूप मोलाचा होता... नाटकाची संकल्पना आणि थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांताची प्रक्रिया एका नगरसेवकांना सांगितल्या नंतर प्रेक्षक म्हणून त्यांनी त्यांच्या विभागात नाटकाचे बॅनर लावले ... आणि त्यांचं वाक्य " तुम्ही हे करत आहात ते कार्य आम्हांला करायला हवं ते तुमच्या कडून होतंय त्याबद्दल आमच्याकडून ह्या सदिच्छा ! प्रत्येक माणसापर्यंत कशा पद्धतीने पोहचता येईल...? आणि नाटक कसं पोहोचेल यासाठी प्रेक्षक स्वतः हुन पुढाकार घेत असताना दिसू लागले होते... स्वातीचे आजोबा हे त्यांच्यासमोर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला नाटकाविषयी सांगत होते... " आमचे नात जावई ह्या नाटकात आहेत , आणि बरं का ते सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुलेंच्या विचाराला घेऊन नाटक करत आहेत, अशा विचारांसाठी कमी लोक काम करतात .." आपल्याला ह्या कार्यासाठी पुढाकार घ्यायचा आहे...ही भूमिका मनाला खूप भावणारी होती...

कोरोना काळानंतर  दुसरा फेज  संपल्यानंतर एक उदासीनता निर्माण झालेली होती... माणसा - माणसांमध्ये असणारे माणुसकीचे धागे हे कमकुवत झालेले..नैराश्य निर्माण झालेलं .... अशा वातावरणात नाटक लोक- शास्त्र सावित्रीचा प्रयोग पुण्यामध्ये होणारा हा प्रयोग म्हणजे पुणेकरांसाठी  जीवन जगण्यासाठी असणारा आशेचा किरण जणू जाणवू लागला... 

दुसरा महत्वाचा पुढाकार म्हणजे माझ्या मामाच्या लहान मुलीचा अक्षया चा  नाटकाची संकल्पना आणि नाटकाची तारीख सांगितल्यानंतर तीने सम्पूर्ण तिच्या परिवाराला नाटक दाखवण्याचा केलेला  निर्धार हा खूप महत्वाचा होता... त्यामुळे, स्वातीच्या आणि माझ्या मामा कडील परिवार हे नाटकाच्या निमित्ताने एकत्र समोरासमोर आले होते... तेही सकारात्मक पुढाकरासाठी ...  


नाटकाची प्रस्तुति झाल्यानंतर परिवाराचा आमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदललेला होता... एक वेगळीच ऊर्जा आणि वलय आणि वाढलेली वैचारिक उंची मला माझ्या आत जाणवत होती... यावेळी, रंगभूमीवर कलाकार म्हणून माझी भूमिका जगत असताना मला जाणवले... प्रत्येक भूमिका ही माझ्या अंतकरणातून येत आहे... नाटकातील संवाद हे केवळ संवाद नाहीत ते शब्द मी पहिल्यांदा बोलत असल्याचे मला जाणवू लागले... विशेष म्हणजे ज्योतिबा फुलेंचे चरित्र performe करत असताना सम्पूर्ण शरीरामध्ये अचानक मुंग्या आल्यात आणि मी  संवाद बोलत आहे ते संवाद माझ्या मुखातून आपोआप येत आहेत... मला एका क्षणात जाणवले... मी आता नाटक सादर नाही करत आहे... मी स्टेज वर आहे पण, स्टेज वर नाही मी त्या पुण्यातील फुले वाड्यात आहे आणि संवाद बोलत असताना माझ्यासमोर सावित्रीबाई आहेत आणि मी त्यांना शिकवत आहे... खूप अदभूत हा अनुभव मला जाणवला ... त्या सीन नंतर मी विंगेत आलो काही क्षणासाठी मी विसरून गेलो. आता नक्की काय सीन आहे... ? आणि कोणता सीन आहे...? थोडा वेळ स्वतः ला सावरलं आणि नाटकावर फोकस केलं...मला पुढे काय सीन आहे हे आठवत नव्हते... परंतु, योग्य वेळी ,योग्य संवाद , ढोल वाजवत असताना ते अगदी सहज येत होते... 

नाटक लोक- शास्त्र सावित्री चा पुण्यातील प्रयोग हा केवळ माझ्यासाठी प्रयोग नव्हता तर, एक कलाकार आणि व्यक्ती यांना एका वैचारिक उंचीवर घेऊन जाणारा आहे...

:- तुषार म्हस्के

आता ,

रंगचिंतक मंजुल भारद्वाज द्वारा लिखित आणि दिग्दर्शित नाटक  " लोक-शास्त्र सावित्री " चा प्रयोग 
28 मे 2022 रोजी , सकाळी 11:30 वाजता .
श्री. शिवाजी नाट्य मंदिर, दादर येथे प्रस्तुत होणार आहे..

Thursday 24 March 2022

On World Theatre Day 27th March, at 11.30 AM Manjul Bhardwaj’s play ‘Lok –Shastra Savitri’ will be performed at Savitribai Phule Natayagruh, Dombivali !

Manjul Bhardwaj’s play ‘Lok –Shastra Savitri’ – is a process of self & collective interrogation leading to emancipation! – Dr Putul Sathe 


I choose to call this dialogue as Savitri and Me. I also acknowledge my thanks to Kusum Tripathi well known feminist & writer for introducing me to the play. So when I was told by Kusum that a play titled ‘Lok –Shastra Savitri’ was to be performed at Gadkari in Thane, on March 6, 2022, I eagerly looked forward to the experience of watching the play. I did not pay close attention to the title of the play and presumed that this play would add to my existing repertoire on anti-caste readings. However, once inside the auditorium, when the Director initiated the dialogue, a dialogue which would continue even after I left the auditorium. The introductory remarks challenged the concept of a well made play and professional theatre and thus broke the fourth wall. The stage was “ the minds of the audience” and the minds of the audience was the patriarchal society marked by gender inequality. The stage for the Savitribai Phule was caste-ridden colonial society and the Phules, the first anti-caste intellectuals challenged Brahminical patriarchy. The broad sweeping vision of Phules has been invoked in the play and the epithet ‘Lok Shastra’ resonated with Phule’s rejection of the Divine Truth or the revealed truth. The play invokes and celebrates the critical oppositional consciousness and therefore ‘Shastra’,  was now the philosophy of Humanism and was to be produced by ‘Lok’, the common human being- Savitri. 

     
The play therefore initiates a dialogue with the audience to create a new vocabulary to understand the legacy of Savitribai Phule, the anti-caste feminist. The play does not indulge in deification of Savitribai Phule and therefore what unfolds before the audience is a dialogue in liberatory politics. The task is daunting and three women characters are the working class woman, the urban middle class professional woman and the actress, who defies any class and caste identification. It is interesting that none of the characters have any name and therefore are representative of certain gender role embedded in certain social, cultural and economic location. The working class woman and the urban middle class professional woman portray the manner in which patriarchy collides with class to create a particular gender regime. Here we come across certain stereotyping which is disturbing. Alcoholism is not confined to working class only, nor is domestic violence. The exploitative relationship between the two women has been camouflaged by how gender based subordination is maintained today. The character of the actress is above gender politics and point to a culture of androgyny, where masculinity and femininity have to be dismantled as oppressive structures. However gender ideology is redefined by globalization and growing fundamentalism. What would Savitri say to Natasha Narwal or the women protesting at Shaheen Bagh? 


  Manjul’s Theatre of Relevance has defined theatre as the site of liberatory politics. Gender inequality is part of larger canvas and therefore the process of interrogation is the beginning of emancipation.

...


Tuesday 2 November 2021

मराठी रंगभूमी दिनानिमित्त,आम्ही मराठी रंगभूमीच्या वैचारिक प्रगतिशीलतेची प्रतिबद्धता साजरी करीत आहोत, नाटक "लोक-शास्त्र सावित्री" नाटकाने ! - थिएटर ऑफ रेलेवन्स रंगकर्मी


मराठी रंगभूमी दिनानिमित्त,आम्ही मराठी रंगभूमीच्या वैचारिक प्रगतिशीलतेची प्रतिबद्धता साजरी करीत आहोत, नाटक "लोक-शास्त्र सावित्री" नाटकाने ! - थिएटर ऑफ रेलेवन्स रंगकर्मी


मराठी रंगभूमी दिनानिमित्त                          
- माणुसकी
रा - रंग
ठी- ठेव
माणुसकीच्या रंगाची
ठेव आहे मराठी !
मर्म रहस्यांनी नटलेली
ठेव आहे मराठी !
ममत्वच्या रसाने उमटलेली
संस्कृती आहे मराठी !
रंग म्हणजे विचार
विचारांचा इंद्रधनुष आहे रंगभूमी !
माणसांमध्ये रंगाची उधळण करते रंगभूमी
माणसाला माणूस म्हणून घडवते रंगभूमी !
- मंजुल भारद्वाज

178 वर्षे पूर्ण झाली आहेत मराठी रंगभूमीच्या वाटचालीला, तरीही मराठी रंगभूमीच्या वैचारिक प्रगतीशीलतेची प्रतिबद्धता कुठे आहे ? जी रंगभूमी कधीकाळी आपल्या कलात्मक प्रगतीशिलतेतुन संपूर्ण देशाला सार्थक रंगकर्मासाठी प्रेरित करीत होती, त्याच रंगभूमीवर आज "वैचारिक नाटक चालत नाही" हे सावट का पसरले ?  रंगकर्मींनी हे समजून घेणे आवश्यक आहे की रंगकर्माची भूमिका ही समाजमनाची मशागत करण्याची आहे, त्यांच्यात मनुष्य असण्याची चेतना पेटवण्याची आहे. ना की समाजाच्या प्रश्नांपासून पळवाट काढण्याची !


पशु पासून माणसाला वेगळं करते ती त्याची वैचारिक क्षमता. म्हणूनच "वैचारिक नाटक चालत नाही !" या भ्रमाला हा नाट्य सिद्धांत आपल्या अनेक प्रस्तुतीतून गेले 29 वर्ष खोडत आला आहे. सातत्याने रंगभूमीवर विचारांचे नाटक प्रस्तुत करून प्रेक्षकांना माणूस म्हणून सृजित करणे आवश्यक आहे. इथे रंगचिंतक मंजुल भारद्वाज म्हणतात "विचार करण्याची क्षमता माणसांना जनावरांपासून वेगळी करते. जी लोकं हे म्हणतात की वैचारिक नाटक चालत नाही ते प्रेक्षकांना काय समजतात ?" दिवसभर कामाच्या रगाड्यातून बाहेर पडल्यावर परत वैचारिक नाटक बघण्यास कंटाळा येतो असे म्हणत प्रेक्षकांच्या वैचारिक चेतनेला नाकारणे समाजाला चेतनाहीन बनवणे आहे. प्रेक्षकांना विचारांनी मिळालेले आत्मिक समाधान त्यांच्या रोजच्या आयुष्यात एक नवचैतन्य भरते. आणि आयुष्य कंटाळवाणे न राहता जगण्याची नवदृष्टी प्रदान करते.  नाटक म्हणजे क्षणिक आनंद नाही तर आयुष्यभराची सात्विक ठेव आहे. माणसाला माणूस बनवते ती कला. कला जी प्रत्येक मानसिकता, सीमा तोडून मानवाला उंच भरारी देते.


 
    या मराठी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीचे वारसदार म्हणून आम्ही रंगभूमीला जिवंत ठेवण्यासाठी लॉकडाऊन च्या काळातही दोन नवीन नाटक मराठी रंगभूमीला दिले आहेत ते म्हणजे संविधानाचे मूल्य वाचवण्यासाठी धनंजय कुमार लिखित आणि मंजुल भारद्वाज अभिनित व दिग्दर्शित नाटक "सम्राट अशोक" आणि स्वतःतील सृजनकाराचा शोध घेण्यासाठी , सावित्रीच्या विचाराला घेऊन माणूस म्हणून अस्तित्व घडवणारे आणि  गाजवणारे मंजुल भारद्वाज लिखित आणि दिग्दर्शित नाटक "लोक-शास्त्र सावित्री" !




    कलेची नुमाईश - म्हणजे केवळ कलेचे प्रदर्शन करणे. रंगकर्माला केवळ प्रदर्शनाच्या साच्यात बसवल्याने, रंगकर्माची व्यापकता , त्याचा प्रभाव आणि प्रगतिशील प्रवाहाच्या कक्षा अरुंद होतात.  
 समाजाच्या उन्नतीसाठी रंगभूमीला प्रस्थापित दुराग्रह मोडुन काढणे आवश्यक आहे आणि आम्ही मागील 29 वर्षांपासून सातत्याने रंगभूमीला पुनरुज्जीवन देत आहोत.
या संकटकाळात जिथे अखंड समाज, अखंड विश्व थांबले होते तिथे "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य सिद्धांताच्या रंगकर्मींनी  आपल्या रंगभूमीला श्वास दिला, प्राण दिला आहे !

      बाजारावादी मानसिकतेत अडकलेला समाज खरेदी आणि विक्रीच्या पलीकडे जात नाही तिथे आम्ही रंगकर्मी केवळ "नफा कमावण्यासाठी नाटक नव्हे तर माणुसकीची दृष्टी जागवण्यासाठी नाटक" या दृष्टी स्पष्टतेने रंगकर्म करत आहोत.
नाटक म्हणजे चेतना , विवेक आणि विचार पेटवणे. रंगभूमीला घडवणारे आम्ही प्रतिबद्ध रंगकर्मी रंगभूमीला घडवण्यासाठी रंगकर्माच्या तत्वाला जगतो, आणि ते म्हणजे कलेच्या माध्यमातून, नाटकाच्या माध्यमातून समाजाला एक रचनात्मक दिशा देत माणसाला माणूस म्हणून जगण्यास उत्प्रेरीत करणे. मूर्च्छित झालेल्या समाजाला विचारांनी जिवंत करण्यासाठी आम्ही प्रतिबद्ध आहोत.


संवाद म्हणजे आपल्या मतांचे, विचारांचे केलेले प्रवाही चिंतन. मग ते आत्म संवाद असू दे किंवा दोन स्वतंत्र व्यक्तीं मधील संवाद असू दे. संवादाचे अनन्य साधारण महत्व आपल्या जीवनात आहे. पण आजच्या या काळात अनेक संवाद माध्यम असूनही संवाद हरवत चालला आहे. संवाद म्हणजे केवळ शब्द बोलणे नाही तर संवाद एक अनुभूती आहे. आणि म्हणूनच "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य सिद्धांताच्या रंगकर्मींची ताकद आहे कलात्मक "रंग संवाद". नाटकाच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संवाद करत नाटकाच्या व्याप्तीची आणि रंगभूमीच्या स्पर्शाची जाणीव आम्ही करून देत आहोत. आज समाज संवादहीन झालेला आहे, वाद - विवादात अडकलेला आहे, तिथे आम्ही रंगकर्मी आपल्या कलात्मक पुढाकाराने प्रत्येक प्रेक्षकांशी संवाद साधत त्यांना या कलात्मक रंगआंदोलनात सामील करत आहोत, त्यांची सहभागीता सुनिश्चित करत त्यांना प्रक्रियेशी जोडत आहोत. आपल्या रंगभूमीसाठी वैचारिक नाटकांना पाठिंबा देणारे प्रेक्षक निर्माण करत आहोत !



आम्ही "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाट्य सिद्धांताचे रंगकर्मी मराठी रंगभूमीच्या वैचारिक प्रगतिशीलतेची प्रतिबद्धता साजरी करीत आहोत. रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित-दिग्दर्शित  "लोक-शास्त्र सावित्री" नाटकाच्या प्रस्तुतीने!
मराठी रंगभूमी दिनाच्या निमित्ताने नाटक "लोक-शास्त्र सावित्री " 7 नोव्हेंबर 2021,रविवारी, सकाळी 11.30 वाजता सावित्रीबाई फुले नाट्यगृह, डोंबिवली येथे प्रस्तुत होणार आहे.




Wednesday 30 December 2020

सुप्रसिद्ध रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांचे युगपरिवर्तक नाटक “लोक-शास्त्र सावित्री” 3 जानेवारी 2021, रविवार रोजी, दुपारी 3 वाजता.मालती वैद्य स्मृती ट्रस्ट, बदलापूर (पूर्व) येथे प्रस्तुत होणार !

सुप्रसिद्ध रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांचे युगपरिवर्तक नाटकलोक-शास्त्र सावित्री” 3 जानेवारी 2021, रविवार रोजी, दुपारी 3 वाजता.मालती वैद्य स्मृती ट्रस्ट, बदलापूर (पूर्व) येथे प्रस्तुत होणार !


 थिएटर ऑफ रेलेवन्स चे शुभचिंतक आणि अभ्यासक माणुसकीचा समाज निर्माण करण्यासाठी , न्यायसंगत व्यवस्थेच्या निर्माणाचे क्रांतिकारी सूत्र घेऊन, नवी पिढी घडवण्याचा संकल्प करून, 3 जानेवारी २०२१ रविवार रोजी, दुपारी 3 वाजता  रंगचिंतक मंजुल भारद्वाज लिखित दिग्दर्शित युग परिवर्तक नाटक " लोक - शास्त्र सावित्री " प्रस्तुत करणार आहोत. हे नाटक क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधत बदलापूर येथे सादर होणार आहे...

 

कधी : 3 जानेवारी 2021रोजी, रविवार , दुपारी 3 वाजता.

 


कुठे : “मालती वैद्य स्मृती ट्रस्ट", बदलापूर (पूर्व).

 

कलाकार: अश्विनी नांदेडकर, सायली पावसकर, कोमल खामकर, सुरेखा साळुंखे, साक्षी खामकर, तुषार म्हस्के, स्वाती वाघ, प्रियंका कांबळे,अमित राणे,हरिकृष्ण पुली.

 

वेळ : 70 मिनिटे

 

 एकाधिकारवादाने तंत्रज्ञानाचा वापर करून संपूर्ण मानव संस्कृतीला धुळीस मिळवले आहे. जागतिकीकरणाने मानवाचे वस्तुकरण करून त्याला  फक्त खरेदी विक्री करणारी उपभोगची सामग्री बनवली आहे .. आज आधुनिकतेच्या नावाखाली तंत्रज्ञानाने आख्या जगाचा विध्वंस केला आहे ...त्या विध्वंसाला प्रश्न विचारण्या ऐवजी आज वैचारिक रूपाने उध्वस्त झालेला समाज त्याला विकास म्हणत आहे ...

 


अशा प्रलयकाळात सांस्कृतिक सृजनकारच या जगाला वाचवू शकतील, जेव्हा संपूर्ण राजनैतिक व्यवस्था विकली गेलेली आहे. सत्य-असत्याच्या पुढे जाऊन आणि निरंतर खोटे पसरवून समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या विकारांपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.

परंतु शोकांतिका आहे की, आज एकही सांस्कृतिक कर्मी जिवंत नाही , जो व्यवस्थेला भिडेल, याउलट पळवाटा शोधत आहे.दृष्टिहीन, विचारहीन गर्दी होत चाललेल्या समाजाला एक कलात्मक वळण देतो तो सृजनकार ! सृजनकार मानवीय चेतना जागवत प्रत्येक व्यक्तिच्या आत असलेल्या  कलात्मक पैलूंला स्पर्श करून नवीन काळ रचतात..

 

कोण आहे आज जो माणूस म्हणून जगतो ? सृजनकार म्हणून जगतो ? आणि निर्माण करतो ? सांस्कृतिक सृजनकार विवेकसंमत असतात. आपले विचार धैर्याने व्यक्त करताना मानवी कल्याणासाठी सत्याचा शोध घेतात.

 

असाच स्वतःच्या अस्तित्वाचा शोध

सावित्रीबाई फुले आणि बहिणाबाईंनी घेतला होता.

सावित्री बाईंनी  पितृसत्ता ,सामंतवाद, जातीवाद यांच्या वर्चस्ववादाला आव्हान दिले होते.

सावित्रीबाई फुलेंनी अज्ञानाच्या फेऱ्यातून अखंड समाजाला बाहेर काढले. वर्षानुवर्षे चालत आलेल्या अनिष्ठ रुढींच्या गुलामीतून बाहेर  पडण्यासाठी समाजाला प्रेरित केले.

सावित्रीबाईंनी आधुनिकतेचा बदल विचारांनी स्वीकारला होता...त्यांनी संघर्षाची मशाल हाती घेतली परंतु त्याची धग जनमानसाच्या मनात अजूनही धगधगते का ?

 

असं म्हंटल जातं कि माणूस शिक्षणाने माणूस होतो पण खरंच तसं घडतं का ?.. शिक्षण माणसाला न्यायसंगत करते का ? आणि जर तसं आहे तर मग बहिणाबाई कोण होत्या ? बहिणाबाई तर अशिक्षित राहूनही माणूस म्हणून जगल्या.

सावित्रीबाई आणि बहिणाबाई हे दोन ध्रुव आहेत. एक आहे विचार म्हणून

अस्तित्व जागवण्याचं आणि दुसरे आहे जीवनदृष्टीने तत्व जगवण्याचे या दोघांचा एकत्र येण्याचा बिंदू आहे माणुसकी !

 

"नाटक "लोक- शास्त्र सावित्री"



 

जनमानसात सावित्रीची ओळख आहे, तिचे नाव आहे परंतु तीचे तत्व रुजले नाही, आणि हे   तत्व रुजवण्याची प्रक्रिया "लोक- शास्त्र सावित्री" हे नाटक करते. प्रत्येकाच्या मनात सावित्री जागी होते पण ती व्यवहाराच्या प्रहराने गळते, हे आपण ओळखले नाही तर ती गळत राहणार, हे नाटक त्याला चिन्हीत करते.

सावित्रीने दिशा दाखवली परंतु आपण जागतिकीकरणाने रचलेल्या वाटेवर मार्गक्रमण करत आलो. सावित्रीच्या वाटेवर चालणे म्हणजे विचारांच्या वाटेवर चालणे जे आज अभावाने घडते.

 

भारताची जनता आणि भारतीय महिला या दोघांचेही निर्णय कोणीतरी दुसरं घेतं आणि ते  सहन करतात, शोषणाचे बळी पडतात पण त्याच्याविरुद्ध आवाज उठवत नाहीत.

भारतात आज कितीजण आहेत जे सावित्रीच्या पुढाकाराने शिकले ,

पण सवित्री घडवू शकले नाहीत. कारण प्रश्न आहे रचनात्मक पुढाकाराचा, न्यायसंगत वागण्याचा, माणूस म्हणून जगण्याचामाझ्यासाठी पुढाकार कोण घेणार ? या मानसिकतेवर "लोक- शास्त्र सावित्री"

हे नाटक वैचारिक प्रहार करते.

 

कला माणसात विवेक जागवते, माणसाला माणूस असण्याचा बोध करून देते. म्हणूनच सांस्कृतिक क्रांतीचे सृजनकार या भूमिकेला अंगीकारण्याची ही वेळ आहे.

कलासत्वाला मानवतेसाठी विश्वाच्या सौहार्दासाठी रचणारा सृजनकार शाश्वत माणूस म्हणून काळासोबत लढतो. आपला काळ निर्माण करतो. "थिएटर ऑफ रेलेवन्स" नाटयसिध्दांताचे  "लोक- शास्त्र सावित्री" हे नाटक युगपरिवर्ततनाचा काळ रचते.

 

परिवर्तनाच्या वाटेवर सांस्कृतिक सृजनकार मनुष्याला हिंसेपासून अहिंसेकडे, आत्महीनतेपासून आत्मबळाकडे, विकारांपासून विचारांकडे, वर्चस्ववादापासून समग्रतेकडे आणि व्यक्तीला सार्वभौमिकतेच्या प्राकृतिक न्याय आणि विविधतेचे सहअस्तित्व विवेकाच्या दिशेने उत्प्रेरित करतात.

 

नाटक "लोक- शास्त्र सावित्रीका ?

 

माणूस म्हणून जगण्यासाठी, न्यायसंगत समाज घडवण्यासाठी...स्वतःच्या आत सावित्री जागविण्यासाठी

सांस्कृतिक पुरोगामित्वाचा पाया रचण्यासाठी

सांस्कृतिक चेतना ही सार्वभौम अधिसत्ता आहे.

सांस्कृतिक सृजनकाराच्या भूमिकेत "लोक-शास्त्र सावित्री" हे नाटक समाजाच्या संवेदनांना त्यांच्या मृतवत अवस्थेला पेटवून जागे करणारे आहे.

 

1831 पासून आतापर्यंतच्या काळाचा आलेख घेतला तर लक्षात येईल, त्या काळापासून सुरू झालेले सांस्कृतिक प्रबोधन जागतिकीकरणाने संपवले आहे. .सावित्रीच्या प्रतिरोधाला प्रचारकी व्यक्तिवादाचे स्वरूप देऊन अलगदपणे सर्वसामान्य  केले.सावित्रीचा जो प्रतिरोध होता त्याची ताकद संपवली.आता हा प्रतिरोधाचा न्याय पताका घेऊन, "थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत" "लोक- शास्त्र सावित्री" या नाटकाच्या माध्यमातून पुन्हा सावित्रीच्या महत्वाला, तिच्या विचाराला जनमानसात जागवत आहे.

सांस्कृतिक  सृजनकार म्हणून सांस्कृतिक चेतना पेटवण्यासाठी कलाकार आणि व्यक्तीची उन्मुक्तता साधणे हे कलात्मक सौंदर्य आहे. कलात्मक सौंदर्य समाजात रुजवणे सांस्कृतिक क्रांतीचा सूत्रपात आहे.

थिएटर ऑफ रेलेवन्स नाट्य सिद्धांत

 

मागील 28 वर्षांपासूनथिएटर ऑफ रेलेवन्सया नाटय़ सिद्धांताने सतत कोणत्याही देशीविदेशी अनुदानाशिवाय आपली जबाबदारी आणि कर्तव्ये निभावली आहेत. प्रेक्षकांच्या सहभागाच्या आधारावर मुंबईपासून मणिपूरपर्यंत हेरंग आंदोलनसुरू आहे. ‘थिएटर ऑफ रेलेवन्सने जीवनाला नाटकाशी जोडून मागील 28 वर्षांपासून जातीय मुद्दय़ावरदूर से किसी ने आवाज़ दी’, बालमजुरीवरमेरा बचपनअशी, कौटुंबिक हिंसेवरद्वंद्व’, ‘मैं औरत हूँ’, लिंगनिदान या विषयावर नाटकलाडली’, जैविक आणि भौगोलिक विविधतेवरबी-7’ अशी नाटके रंगमंचावर आणली. मानवता आणि नैसर्गिक साधनसामग्रीच्या खासगीकरणाविरोधातड्रॉप बाय ड्रॉप : वॉटर’, मनुष्याला मनुष्य बनून राहण्यासाठीगर्भ’, शेतकऱयांची आत्महत्या आणि शेतीच्या होणाऱ्या विनाशावरकिसानों का संघर्ष’, कलाकारांना कठपुतली बनवणाऱ्या आर्थिक तंत्रापासून कलाकारांच्या उन्मुक्ततेसाठी नाटकअनहद नाद-अन हर्ड साउंड्स ऑफ़ युनिवर्स”,

शोषण आणि दमनकारी पितृसत्तेच्या विरुद्ध न्याय, समता आणि समानतेची हुंकार देणारेन्याय के भंवर में भंवरी’, समाजात राजनैतिक चेतना जागवण्यासाठीराजगतीअशा नाटकांच्या माध्यमातून फॅसिस्टवादी ताकदींशीथिएटर ऑफ रेलेवन्सलढत आहे! आजच्या या कठीण काळातथिएटर ऑफ रेलेवन्सने सांस्कृतिक सृजनकार घडवण्याचा निर्धार केला आहे! समाजाच्या मानसिकतेवर कब्जा करणाऱ्या मंडळींपासून आज केवळ सांस्कृतिक सृजनकार मुक्ती देऊ शकतात.

 

रंगचिंतक मंजुल भारद्वाज यांच्याविषयी :

 


लेखक - दिग्दर्शक "थिएटर ऑफ रेलेवन्सनाट्य सिद्धांताचे सृजक आणि प्रयोगकर्ता मंजुल भारद्वाज असे रंगचिंतक आणि रंग आंदोलक आहेत, जे राष्ट्रीय आव्हानांना फक्त स्विकारत नाहीत तर आपला रंग विचार "थिएटर ऑफ रेलेवेंस" च्या माध्यमातून ते राष्ट्रीय उदिष्ट जन-माणसांसमोर ठेवतात. ह्या अभिजात लेखक - दिग्दर्शकाने आजतागायत 28 पेक्षा अधिक नाटकांचे लेखन दिग्दर्शन केले आहे. तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर थियेटर ऑफ रेलेवन्स सिद्धांताच्या माध्यमातून 1000 पेक्षा अधिक नाट्यकार्यशाळांचे संचालन केले आहे.