पुरोगामी महाराष्ट्र ...
मी इतिहासात वाचलेला, ऐकलेला महाराष्ट्र
इथे भय नाही प्रश्न विचारण्याला,
इथे भीती नाही सत्तेच्या खाली नतमस्तक होण्याची,
थोर संतांचा वारसा असणारा माहाराष्ट्र,
इथे आजिबात वाव नाही खोटारडेपणाला,
याच भूमीत जन्मले छत्रपती शिवाजी महाराज,
छत्रपती संभाजी माहाराज, दिले स्वतंत्र त्यांनी आपल्याला,
शिव, शाहू, फुले आंबेडकारांचा माहाराष्ट्र
लेखणी घेतली सावित्रीने हातात आणि शिक्षणाचे द्वार उघडले मुली, महिलांसाठी
नजीकच्या काळात १०६ हुतात्त्म दिले, महाराष्ट्राच्या निर्माणासाठी ,
महाराष्ट्र समतेची भूमी निर्माण करणारा, माणसामाणसातील भेद संपवणारा,
निधड्या छातीने उभा असणारा महाराष्ट्र, देशाची आर्थिक राजधानी असणारा महाराष्ट्र...
अभिमान वाटतो... या महाराष्ट्राचा ....
पण, आता लेखणी एकाच बाजूने आपली स्टोरी लिहीत आहे..
पाठीचा कणा आता पत्रकारांचा ताठ नाही आहे...
ती सत्तेची भाषा बोलत आहे ... कलाकार सत्तेकडून award घेण्यात व्यस्त आहेत...
जणमाणसाबरोबर संवाद राहिलेला नाही...
" खोटं बोला आणि ते रेटून बोला " वास्तवाला ते भ्रमित करून
भ्रमाचे जाळे निर्माण करत आहेत...
जनता लोकशाही मध्ये राजेशाही शोधत आहे...
त्यांना आपल्या मताची किंमत हि फक्त पैशाने मोजत आहे...
मग, सत्ताधारी हा धर्माच्या नावावर राजकारण करून, भांडवलदारांना देशाची संप्पती लुटत असो
त्याचे त्यांना काहीच फरक पडत नाही...
आज सत्ताधार्यांना प्रश्न विचारण्यासाठी कोणीच पुढाकार घेत नाही...
शोकांतिका आहे शब्दासाठी जागणारे मावळे आज राहिलेले नाहीत...
एकतर्फी जुलमी राज्य या महाराष्ट्रात निर्माण झाले आहे...
आज फतवे निघत आहेत... मुलींनी घराच्या बाहेर पडू नये...
जी मुलगी घरातल्या जाचाला कंटाळून बाहेर पडते तिच्या चरित्रावर हल्ले करून
चार भिंतीत बंद केले जाते... रक्षक भक्षकांच्या भूमिकेत आले आहेत...
कसा टिकणार हा पुरोगामी महाराष्ट्र ... कसं टिकवणार आपलं अस्तित्व ...
हि मनाला लागलेली धास्ती आहे...
इथे भूमिका माझी आहे...
माझी लेखणी अजून कमजोर झालेली नाही...
माझ्या साहित्यातून मी मांडणी वास्तवाची करत आहे...
मी चित्रकार माझ्या चित्रांमधून शोषणाला विरोध करत आहे...
मी सृजनकार माझ्या कलेतून माणसाचं अस्तित्व टिकवत आहे...
पुरोगामी महाराष्ट्राला ... माझ्या कलाकृतीतून जिवंत ठेवत आहे...
जय महाराष्ट्र .... पुरोगामी महाराष्ट्र ...
@ तुषार म्हस्के